Login

जेव्हा दुरावा दुर होतो

Bonding of brother and sister

राधा :समीर  फोन येतोय...उचल पटकन ..
समीर:कोणाचा फोन आहे ??
राधा:नताशा ताईचा.
त्याने  राधाकडे नजर वळवली तर तर तिने डोळे मिचकवले ,त्याच्या केसांवर अलगद हात फिरवला. समीरला जरा अवघडल्या सारखे झाले.. "करतो नंतर तिला फोन" म्हणून पुन्हा कामाला लागला..
राधा :अरे वेडा आहेस का??त्यांना काही काम असेल म्हणून  फोन केला असेल.उचलायचा तरी..तू पण ना...

पुन्हा नताशाचा फोन आला .
समीरने फोन उचलला..
तिने सांगीतले नवऱ्याच्या  छातीत दुखत आहे .. खूपच  त्रास होत  आहे ..दवाखाण्यात न्यायचे होते ..समीर हातातली कामं टाकून तिच्या मदतीला धावला.. राधाही जोडीला होती...

घरी गेल्यावर पाहिले तर नताशा रडत होती, राधाने तिला सावरलं.. समीरने तिच्या नवऱ्याला लगेच गाडीत बसवून दवाखान्यात नेहले..डॉक्टरांनी तपासले त्याला अटेक आला होता...थोड्यावेळाने तो स्थिरावला. खूप मोठा अनर्थ होण्यापासून वाचला होता आज..थोड्यावेळाने नताशा आली आणि समीरला पकडून रडु लागली...आज तब्बल वर्षभराने बहीण भाऊ समोर आले होते.समीर आणि आलोक म्हणजे राधाच्या नवऱ्याने मिळून एक व्यवसाय सुरू केला होता ,त्यातूनच दोघांमध्ये बिनसले होते ..दोघांनाही राग आला होता.आलोक गरम डोक्याचा होता  त्याने नताशाला रोखले होते भावाशी बोलायचे नाही.माहेरशी संबंध ठेवयाचे नाही..नताशाचे माहेर म्हणजे भाऊ होता आणि त्याच्याशीही संबंध ठेवण्यास मना केले होत्तं..बघितलं तर दहा मिनिटांवर दोघे बहीण भाऊ राहत होते पण झालेल्या वादामुळे एक बहीण भावाला भेटू शकत न्हवती.आणि समीरला पण त्याची कल्पना होती ,आलोक खूप रागिष्ट स्वभावाचा होता.त्याच्या मनाविरुद्ध वागलेलं त्याला पटत नसे,त्याचा इगो दुखावला जायचा.हे समीरला चांगलंच माहीत होतं. नताशाला त्रास नको म्हणून समिरही स्वतःहुन तिच्याशी बोलत नसे. रक्षाबंधन, भाऊबीज असली की दोघांचे मन भरून येत..पण एकेमकांचे दरवाजे बंद झाले होते.मनाने किती जरी जवळ असले तरी आलेला दुरावा ही दरी वाढवत होता... 
नताशा बोलू लागली "दादा आज तू आलास म्हणून ह्यांचा जीव वाचला .कसे उपकार फेडू..?
राधा:अहो ताई,काय हे काय बोलता. आम्ही काही उपकार नाही केले.उलट  अश्या वेळी तुम्हाला  आमची आठवण झाली हे महत्वाचे..भाऊ व्यवस्थित आहे ,सुखरूप आहे देवाची कृपा. बरं आता स्वतःला सावरा आणि भाऊंची काळजी घ्या...काही कमी जास्त लागलं तर हक्काने सांगा...
समीरने नताशाच्या डोक्यावरून हात फिरवला तशी ती अजून रडु लागली.किती वर्षाने बहीण भावाने डोळे भरून एकमेकांना पाहिले होते..राधालाही रडु आले पण ते आंनदाचे अश्रू होते.  तिने पाहिली होती त्याची तगमग बहिण असूनसुद्धा तिच्या जुन्या राख्या हातात बांधायचा.ती येण्याची वाट पाहायचा ,तिच्यासाठी भेट घेऊन ठेवायचा .तिच्यासाठी आणलेल्या वस्तू त्याने तश्याच ठेवल्या होत्या जपून.. इतकं सहज तुटणारे नाते थोडीच असते रक्ताचे..
राधा आणि समीर घरी आले.आता मात्र समीर स्वतःला सावरू शकला नाही.तोही ढसाढसा रडला....रात्र झाली .राधा झोपी गेली..समीरला आज झोपच न्हवती येत..आज त्याला आई बाबांची खूप आठवण आली..दोघांच्या फोटोकडे पाहून त्याला जुने दिवस आठवले. आईने जाता जाता वचन मागीतले होते,तुम्ही बहीण भाऊ शेवटपर्यंत नेहमी सलोख्याने राहा..एकमेकांच्या सुखदुःखात हक्काने जा...समीरने आज जणू आईचे वचन पूर्ण केले होते.. आलेला राग बहिणीचा आवाज ऐकून नाहीसा झाला होता...वेगळीच किमया असते अश्या नात्यांची...

दहा दिवसांवर भाऊबीज होती..समीरने ह्यावेळीसुद्धा नताशासाठी छान साडी विकत घेतली होती.. पण ह्यावेळी ती येईल अशी त्याला आशा होती...भाऊबीजचा दिवस उजाडला.. सकाळी नऊ वाजताच नताशा,आलोक दारात येऊन उभे राहिले..आलोकने  समीरला मिठी मारली .दोघांमध्ये आलेला दुरावा नाहीसा झाला .राग ,वाद विवाद,मीपणा ती वाईट वेळ आल्याने जणू गिळंकृत केला होता नेहमीसाठी.. अलोकने समीरची माफी मागितली.. "माझ्या रागामुळे नताशा  आणि तुझ्यात दुरावा आला"आता पुन्हा नाही...माफ कर समीर मी खूप चुकीचे वागलो....तू माझ्या अश्यावेळी धावून आलास..माझे प्राण वाचवले मित्रा..
जन्मभर ऋणी राहील मी..
समीर निशब्द झाला होता...
आज खऱ्या अर्थांने बहीण भावाने भाऊबीज साजरी केली..हा भाऊ बहिणीवर वाईट वेळ आल्यावर रक्षणकर्ता झाला होता.नात्यातला दुरावा प्रेम कमी करत नाही हेच खरं..प्रेमाचा ओलावा काही केल्या कोरडा कधीच होत नाही..नाही का??

                              समाप्त

लेख आवडल्यास नक्की फॉलो करा
लेख शेअर, लाईक,कंमेंट करा
अश्विनी पाखरे ओगले.