जिवलगा-गोष्ट पुनर्जन्माची. भाग-28.

कथा गतजन्मीच्या प्रेमाची......

जिवलगा-गोष्ट पुनर्जन्माची- भाग-28.

तन्वी सापडत नसल्यामुळे विरेन बेचैनपणे सगळीकडे शोधत होता. पण तन्वीचा काहीच मागमूस लागत नव्हता.

त्याने एकेक भुयारी मार्ग शोधायला सुरवात केली. सगळीकडे शोधलं पण तन्वी सापडली नाही. शेवटी हताश होऊन तो तिथून बाहेर पडला आणि सगळीकडे तन्वीच्या नावाने हाक मारू लागला.

पण कोठून काहीच प्रतिसाद येत नव्हता.

इतक्यात त्याचं लक्ष पायाखालच्या दगडावर गेलं. त्यावर ओल्या बुटांचे ठसे दिसत होते.

विरेन मनाशी विचार करू लागला,

'हे ठसे तर आपल्या कॅम्पसाठी दिलेल्या बुटांचे आहेत आणि हे माझे किंवा तन्वीचे असू शकत नाहीत, कारण हे इकडे येणारे ठसे नाहीत तर इथून बाहेर जाणाऱ्या बुटांचे ठसे आहेत.म्हणजे तन्वीला याच लोकांनी उचलून नेलेलं असणार आणि हे लोक तीन ते चारजण किंवा त्यापेक्षाही ज्यादा असण्याची शक्यता आहे. हे नक्कीच अश्विन आणि त्याच्या साथीदारांचं काम असणार.आता आपल्याला आततायीपणा करून चालणार नाही,बुद्धीने काम कराव लागेल आणि त्यांना शोधून काढावं लागेल.'

त्याने आपली बॅटरी बंद केली आणि आपल्या मोबाइलच्या छोट्या बॅटरीच्या प्रकाशात त्या ठस्यांच्या आधारे त्यांच्या मागावर निघाला. जास्तीतजास्त रस्ता हा दगडातून असल्याचा फायदा विरेनला होतं होता आणि त्यात जमेची बाब ही होती की, जाताना वाटेवर अधूनमधून पाण्यातूनही जावं लागत होतं त्यामुळे बूट भिजून त्याचे ठसे पुन्हा पुढील दगडावर उमटत होते.त्यामुळे विरेनला त्यांची दिशा कळत होती. हळूहळू मागोवा घेत विरेन एका ठिकाणी आला आणि थबकला कारण तिथून पुढे ठसे उमटलेले नव्हते.म्हणजे ते लोक आजूबाजूलाच कुठेतरी असणार याची खात्री विरेनला पटली.तो सावध झाला आणि त्याने मोबाईलची बॅटरी बंद केली.

मिनिटभर डोळे मिटून त्याने मन एकाग्र केलं आणि लक्षपूर्वक तो आजूबाजूचे आवाज ऐकू लागला.

रातकिडे, घुबड, कोल्हेकुई बरोबर आणखी काही वेगळा आवाज आजूबाजूला ऐकू येतोय का? ते पाहू लागला. पण असा कोणताच आवाज ऐकू येत नव्हता.

त्यानंतर तो एका झाडावर चढून आजूबाजूला न्याहाळू लागला आणि त्याला काही अंतरावर एक मंदसा प्रकाश दिसू लागला.विरेन सावध झाला आणि दबक्या पावलांनी त्या दिशेला निघाला. पायाखाली चिरडली जाणारी पानं कर्रर्रर्रर्र कर्रर्रर्र आवाज करत होती. पण तो प्रकाश अजून थोड्या अंतरावर असल्यामुळे त्या पानांचा आवाज तिथंवर जाणार नाही असं विरेनला वाटलं.

पण इतक्यात एका झाडावरून दोघांजणांनी विरेनसमोर धप्पकन उडी घेतली.

अचानक पुढ्यात आल्यामुळे विरेन क्षणभर गोंधळला पण लगेच त्याने सावध पवित्रा घेतला.

त्यातील एकजण म्हणाला,

" आलास?ये!ये!तू येणार हे आम्हाला माहित होतं. आज तुझा सोक्षमोक्ष लावायचा आहे."

 असं म्हणून ते दोघे विरेनवर चाल करून आले.

विरेनही कच्या गुरूचा चेला नव्हता,तोही तयारच होता. सद्या त्याला फक्त तन्वी दिसत होती.या नराधमांच्या तावडीतून तिला सोडवणं हे एकमेव ध्येय होतं. त्यामुळे तो जीवाची बाजी लावायलाही तयार होता.

विरेनने कमरेचा शेला सोडून हातात घेतला आणि त्यामध्ये दगड घालून त्याची गाठ मारली. समोरून चालून आलेल्या दोघांवर तो अक्षरशः तुटून पडला.

गोफन फिरवाल्यासारखा तो गरगरा शेला फिरवत होता.ते विरेनला पकडायला त्याच्या जवळ गेले की शेल्यातील दगडामूळे त्याचा प्रहार एकदम जबरदस्त होतं होता.त्या दोघांनाही बेदम मार बसला. ते दोघे घाबरून अश्विनच्या दिशेने पळत सुटले.अंधार असल्यामुळे झाडांझुडपातून पळताना ते धडपडत होते, पडत होते. पण विरेनचा मार खाण्यापेक्षा त्याच्यापासून लांब पळून जाणं त्यांना बरं वाटलं.

विरेन आता त्या प्रकाशाकडे धावला. थोड्याच वेळात तो तिथं पोहोचला आणि पाहतो तो काय तन्वी बेशुद्ध अवस्थेत तिथं पडली होती आणि अश्विन तिच्या शेजारी तिच्याकडे एकटक बघत बसला होता.

विरेन ओरडला,

"तन्वी!तन्वी!काय झालय तुला?

तो तन्वीकडे धावला इतक्यात अश्विन आणि त्याच्या साथीदारांनी त्याला अडवलं आणि अश्विन तुला म्हणाला,

"अजून काहीच केलं नाही तिला,पण ती शुद्धीवर आली की सगळा हिशोब पुरा करणार आहे. तुझाही आणि तिचाही."

विरेन चवताळून उठला आणि म्हणाला,

"अरे हाड कुत्र्यानो.तुम्ही काय आमचा हिशोब पुरा करणार? कुत्र्यांनी मांजरावर चालून जावं, वाघावर नाही. तेव्हा गप्प लायकीत राहायचं आणि तन्वीपासून दूर व्हायचं.आधीच तिला पळवून आणून तुम्ही मर्यादेचं उल्लंघन केलं आहे. तरीपण मी तुम्हाला एक शेवटची संधी देत आहे.सगळेजण इथून मुकाट्यानं निघून जा."

अश्विन असुरी हसू लागला,

"हाहाहाहाहा!वाघ आणि तू? असं लय वाघ बघितल्यात मी. आणि तू वाघ असशील तर मी शिकारी आहे शिकारी. आज शिकार पक्की आहे. आधी या मदमस्त, मादक हरिणीची आणि मग तुझी. नाहीतर तुझी शिकार करायलाच नको. प्लॅन चेंज! असंही तुझ्या मेहबुबाची डोळ्यासमोर शिकार होताना पाहून तू लाजेनेच मरशील.चल तुला जिवंत सोडून तुझ्यावर दया करतो मी आणि जर का तुला स्वतःची लाज वाटली तर शेजारी दरी आहेच, त्यात उडी मारून जीव दे."

अश्विनची मग्रूरी पाहून विरेनच्या तळपायाची आग मस्तकी गेली आणि तो अश्विनच्या दिशेने धावला.त्याने अश्विनची कॉलर पकडली आणि म्हणाला,

"बास अश्विन बास. खूप बोललास, याऊपर तन्वीविषयी एक जरी अवाक्षर काढलंस तर जीभ हासडून हातात देईन."

इतक्यात अश्विनच्या साथीदारांनी विरेनच्या डोक्यात लाकडाने प्रहार केला त्यामुळे अश्विनची कॉलर सोडून विरेन खाली कोसळला.

इकडे तन्वी शुद्धीत येऊ लागली तसा अश्विन तिच्याजवळ जाऊ लागला. ते पाहून विरेन वर उठू लागला. ते पाहून अश्विनच्या साथीदारांनी त्याचे हात आणि पाय पकडून त्याला जमीनीशी तसाच दाबून धरला.

तन्वी डोळे चोळत इकडेतिकडे पाहू लागली, काय चाललंय ते तिला काहीच कळत नव्हतं. तिने समोर पाहिलं तर तिला अश्विन दिसला,

ती हैराण होऊन म्हणाली,

"तू इथे? आणि मी इथे कशी आले? विरेन कुठे आहे?"

इतक्यात तिला थोड्याच अंतरावर कोणाची तरी झटापट सुरु असल्याचं दिसलं म्हणून ती थोडी पुढे गेली, तर तिला खाली आडवा पडलेला विरेन दिसला,तिला सगळ्या प्रकाराचा अंदाज आला आणि 

ती रागाने म्हणाली,

"ये!सोडा त्याला. नालायकांनो इतक्याजणांनी एका माणसाला पकडून ठेवला आहे.हातात बांगड्या भरा बांगड्या."

ती त्यापैकी एकाला मारू लागली पण इतक्यात अश्विनने तिला पाठीमागून पकडलं आणि तिला ओढून घेऊन जाऊ लागला.

थोड्या अंतरावर गेल्यावर तो थांबला आणि म्हणाला,

"विरेन मी तुला चॅलेंज दिलं होतं की, कॅम्प संपेपर्यंत मी तन्वीला माझी बनवून दाखवीन. आज आता इथं तुझ्यासमोर तिला माझी बनवणार आहे. तुझ्यात दम असेल तर तुझ्या डोळ्यांनी बघ,नसेल तर लाजून डोळे मिटून घे."

असं म्हणत त्याने तन्वीला मिठी मारली.

तन्वी त्याला विरोध करत म्हणाली,

"सोड हरामखोरा. खबरदार काही करण्याचा प्रयत्न केलास तर तुला फाडून खाईन मी. सोड कुत्र्या सोड म्हणतेय तुला."

ती सगळी शक्ती एकवटून त्याला विरोध करत होती. पण तिच्या नाकाला क्लोरोफॉर्म लावला असल्यामुळे ती अजून थोडी गुंगीतच होती,त्यामुळे त्याच्यापुढे ती दुबळी ठरत होती.

इकडे विरेन पूर्ण शक्ती एकवटून सुटण्याचा प्रयत्न करत होता.

 अश्विनने आता तन्वीच्या कपड्यांना हात घातला हे पाहून विरेन जोरात गरजला,

"अशव्या सोड तिला, तुला अजून सांगतोय. याचे परिणाम खूप वाईट होतील. तुला कुत्र्याची मौत मारीन लक्षात ठेव. तुला उभा चिरला नाही ना तर बापाचं नाव लावणार नाही."

विरेनची तळमळ बघून अश्विन आणखीनच खवळला, त्याने तन्वीला खाली जमिनीवर आडवं पाडलं आणि तो आपली कपडे काढू लागला.इतक्यात तन्वीच्या डोळ्यासमोर एक व्यक्ती तिच्यावर जबरदस्ती करताना दिसू लागला. तीच डोकं जड झालं.सगळं जग गरागरा फिरू लागल्यासारखं वाटू लागलं,तो प्रसंग आणि काळ तिला पुन्हा डोळ्यासमोर दिसू लागला. इतक्यात अश्विन तिच्या अंगावर पडण्याच्या तयारीत असतानाच 

तन्वीने समयसूचकता राखून त्याच्या अवघड जागी जोरात लाथ घातली, तसा तो कळवळून बाजूला पडला. ते पाहून त्याचे साथीदार विरेनला सोडून अश्विनकडे धावले.

तो टाचा घासत पडला होता.

तो किंचाळत म्हणाला,

"पकडा दोघांना.एकालाही सोडू नका."


 

इतक्यात त्यातल्या एकाने तन्वीला पाठीमागून पकडलं आणि तिला जमिनीवर पालथी पाडून तिचे हात घट्ट बांधून ठेवले.

बाकी लोकांनी विरेनला वेढा टाकून पकडण्याचा प्रयत्न केला पण तो सगळ्यांवर भारी पडत होता. प्रत्येकजण त्याचा मार खात आहे हे बघून अश्विन कसातरी उठून उभा राहिला आणि त्याने त्या साथीदाराला सांगितलं,

"हिला दरीकडे घेऊन चल."

त्याने तिला ओढतच दरीकडे आणलं.

मग अश्विन तिथून ओरडला,

"तू माझी नाही होऊ शकत, तर तुला कोणाचीच होऊ देणार नाही.अय हिरो एका बापाची औलाद असशील तर वाचव तुझ्या हिरोईनला."

असं म्हणत त्याने तन्वीला जोरात धक्का दिला.

क्षणात तन्वी तिथून खाली दरीत कोसळली, ते पाहून विरेनही क्षणभर थबकला.पण पुढच्याच क्षणी त्याने धावत जाऊन मागचा पुढचा विचार न करता तन्वीच्या पाठोपाठ दरीत उडी घेतली.

इकडे अश्विनला आसुरी आनंद झाला आणि तो जोरजोरात हसू लागला.

पण काय होईल तन्वीचं?

तिच्या पाठोपाठ उडी घेणारा विरेन तिला वाचवू शकेल? की दोघांचंही काही बरंवाईट होईल?

हे सगळं आणखी बरंचकाही जाणून घेण्यासाठी वाचत रहा.  'जिवलगा'

(माझी कथा आवडली तर नक्की आपला बहुमोल अभिप्राय कमेंट करा आणि माझ्या इतर कथा वाचण्यासाठी मला फॉल्लो करा, तसेच काही सूचना असतील तर हक्काने सांगा. त्यासाठी आपलं स्वागतच आहे. सर्व वाचकवर्गाचे मनःपूर्वक आभार.)

क्रमशः

©® सारंग शहाजीराव चव्हाण

कोल्हापूर 9975288835.


 

(सदर कथा सबस्क्रिप्शनमध्ये नसून शेवटपर्यंत वाचण्यासाठी पूर्णपणे मोफत आहे.)

🎭 Series Post

View all