????जिवलगा???? भाग 2????

A beautiful love story

????जिवलगा???? भाग 2????

जय ला दिया पुण्यात नाही तर सर्व पुणे ओस पडलय असे वाटू लागले... तसे त्याला मित्र परिवाराची कमी नव्हती पण गेल्या वर्ष भरात सर्व गोष्टी, फिरणे, होटेल ला जाणे, मुवी बघणे तिच्या सोबत च करत होता, अर्थात पुर्ण घोळका फिरायचा पण ह्या दोघांचे मात्र आपले वेगळेच नात तयार झाले होते...

नाशिक ला आई वडिल सोबत असल्याने दिया चे फ़ोन मेसेज चे प्रमाण फारच कमी किवां नाहीच असे झाले होते....तिचे वडिल काही हिटलर नव्हते पण त्यांच्या बहिनी ने पर जातीय विवाह केला होता त्या काळात, त्या मुळे झालेला अपमान, त्रास ते विसरले नव्हते इतकेच. मुलीं ना मित्र नसावे असे नाही पण ते त्या पली कडे काही नसावे नसावे ह्या मताचे होते, आई मात्र 3 तरूण मुली नीट रहाव्यात ह्या साठी खुप कडक आणी रागीट बनली होती, जीव खुप होता शेवटी आईच ती.

दिया ला मात्र नाशिक ला आल्या पासुन जय ची कमी जाणवत होती खुप... पण सवय झाली म्हणून असेल, असे पण आता महिना भरा नंतर आपण भेटणार आहोतच...

जय चा एक खुप जवळचा मित्र होता, समिर त्याला जय मधला बदल जाणवला होता, त्याने जय ला स्पष्ट च विचारले काय रे प्रेमात पडलास की काय दियाच्या...????????समिर सोबत बोलतना जय कसला आड पडदा ठेवायचा नाही...त्याने सांगितले हो रे अगदी पहिल्या दिवशी त्या कडू कॉफी च्या दिवशीच ती मला खुप आवडत होती, पण ती फक्त आकर्षण की प्रेम हे माहित नव्हते, पण गेला वर्ष भरात मी अनेक क्षण मनमुराद जगले, हळू हळू ती कधि माझी जिव की प्राण प्रिय झाली कळलेच नाही रे....???????? समिर बोलला मस्त रे, आज पर्यंत एका ही मुली ला कधि न बघणारा आज चक्क प्रेमात पडलाय...???????????? तुझ्या शी सुत जुळावे म्हणुन किती मुली मला मस्का मारतात???? असो पार्टी तर झाली पाहिजे मित्रा????????

पण अचानक जय खुप टेन्शन मधे जातो समिर विचारतो काय प्रोब्लेम आहे नक्की मित्रा...जय बोलतो एक तर आम्ही एक जातीचे नाही मला काही त्रास नाही रे पण तिच्या घरचे वातावरण खुप वेगळे आहे सम्या ????तिने आधिच तसे सांगितले आहे रे मला त्यां मुळे मी कधीच तिला स्वता हून सांगणार नाही, तुला आपल्या दोस्ती शपथ तू कधीच असे काही करु नकोस????

बघता बघता दिड महिना संपला...रिझल्ट लागले...दिया खुप हुशार आणि मेहनतीने अभ्यास करणारी होती त्यामूळे साहजिकच ती कॉलेज मधे 2री आली होती???? जय जास्त नाही आणि कमी नाही पण आपला 72% नी पास झाला होता....

शेवटचे वर्ष सरु झाले होते...

खुप दिवसांनी भेट झाली त्या मुळे जय आणि दिया ने...खुप गप्पा मारल्या, खुप फिरणे, सर्व ठरलेले कट्टे, हॉटेल फिरुन झाले.... एक आठवडा कसा गेला कळलच नाही....

पण नाशिक वरुन आल्या पासुन दिया ला जय बद्दल काही तरी वेगळे जाणवू लागले....त्याचे ते पोट तिड किने तिला जपने, तिच्या बोलायच्या आधी तिच्या छोट्या छोट्या इछा पूर्ण करने.... पण तिन तसे त्याला जाणवू दिले नाही....कारण ती पुण्याला येताना तिच्या आईने तिच्या वडिलांच्या डोक्यावर हाथ ठेवून शपथ घायला सांगितली होती, बाहेर एकटी राहत असल्याचा ती कधीच गैरफायदा घेणार नाही आणि कोणत्या ही मुलाचा विचार, प्रेम असले काही करणार नाही.... ह्या सर्व बंधन मुळेच कदचित तिला तिच्या मनाचा ठाव लागेना सा झाले...

एक दिवशी जय तिला घरी सोडून जात होता, अचानक त्याच्या बाईक चा आणि कार चा ऐक्सीडेंट झाला, जय ला जास्त लागले नव्हते, फक्त उजव्या हातचे 2 बोट फ्रक्चर झाले....

पण ते समजल्या वर दिया ला काही भान न राहता ती तिची गाडी घेऊन जयच्या घरी,....त्याला फार लागले नाही हे बघुन ही तिचे आश्रु थांबत नव्हते....ती त्याला भेटून, त्याची चांगलीच शाळा घेऊन घरी आली,

पण घरी येउन तिला काही कळत नव्हते तिला का रडु येतय असे कधि झाले नव्हते.....

मग शांत पणे विचार केला तेव्हा समजले की जय आपल्या साठी फक्त मित्र नहिये...पण ह्या भावनाचे पुढे काही भविष्य नाही हे तिला एका क्षणात जाणवले.... आणि तिच्या साठी तिचे आई वडिल हे सर्वात आधी होते. तिला पदवी घेऊन काही तरी करुन दाखवायचे होते, कारण 3 मुली मुलगा नाही ह्या मुळे तिच्या आईचा झालेला अपमान तिने पाहिला होता. त्या मुळे तिने मनाशी च ठरवले होते की आपण काही तरी मोठे करुन दाखविले पाहिजे जेणेकरून कधि कोणाला मुलगी झाली म्हणून खंत होता कामा नये.

जे कधि होणारच नाही मग कशाला जय ला ह्यात अडकवायचे, आपण त्याला कधीच सांगायचे नाही असा तिने मनाशी पक्का निर्धार केला????...

To be continued ..........

हेमांगी सुर्यवंशी ©®

भाग 1 -

https://m.facebook.com/story.php?story_fbid=4316457665063561&id=100000981116892

🎭 Series Post

View all