Dec 05, 2021
प्रेम

जीवनसाथी...भाग 84

Read Later
जीवनसाथी...भाग 84

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..


"असेल इथेच कुठे तरी...पण उंदरीन भारी हा...एवढीशी आहे त्यामुळे दिसणार पण नाही कुठे लपली ती...लवकर शोधले पाहिजे तिला...नाहीतर हा चान्स आपला जाणार..."राघव हसून बोलतो आणि त्यावर प्रदिप ही हसतो...हे बोलणे तिथेच एका टेबल खाली लपलेली रुही ऐकते...ते दोघे तिला थोडाफार तिथून शोधून जातात... ती ते गेल्यावर बाहेर पडते...

"मला उंदरील बोललात ना आता लुही बदला घेणार..."रुही गुढपणे हसत बोलते...ती तशीच बुट्स घेऊन गाडीजवळ जाते...गाडीजवळ बॉडीगार्ड थांबलेले असतात...ती त्यांच्याजवळ जाते...

"अंतल गाली खोला ना...??प्लीज..."रुही क्यूटपणे बॉडीगार्डला बोलते...तिचे बोलणे ऐकून बॉडीगार्ड लगेच गाडीचा दरवाजा ओपन करतो...तशी रुही खुश होऊन गाडीमधील स्वतःची बॅग आणि स्केटिंग बोर्ड हातात घेते...

"थॅंक्यु अंतल..."रुही हसून बॉडीगार्डला बोलते आणि तिथून निघून जाते...ती जात असते तसा तिला विराज दिसतो...तिला एवढं सामान हातात घेऊन येताना पाहून तो धावत तिच्याजवळ जातो...

"ऐ हनी बी एवढं सामान का घेतलं आहे?दे मी थोड घेतो..."विराज तिच्याजवळ येत बोलतो...

"ना लुही मॅनेज कलते..."रुही अस म्हणून सामान घेऊन तिथून निघून जाते...काही अंतरावर जाताच ती आसपास पाहते...कोणी नाही याची खात्री तिला होताच ती बॅग,शुझ आणि स्केटिंग बोर्ड खाली ठेवते...

रुही बॅग मधील एक एक सामान काढून काहीतरी करते आणि ती स्केटिंग बोर्ड हातात घेऊन हॉलमध्ये जाते... तिला जॉकी रॉकी दिसतात...तशी ती त्यांच्याजवळ जाते आणि त्यांना काहीतरी बोलून ती बाहेर येते...रॉकीला राघव हॉलच्या बाहेर फोनवर बोलताना दिसतो...तसा रॉकी त्याच्याजवळ जातो आणि मोठया मोठयाने भुंकू लागतो...

"रॉकी मी राघव आहे...अरे अस कस तू मला भूकतो??थांब सुशांतीलाच नाव सांगतो तुझे...??"राघव चिडून त्याला बोलतो...तसा तो भुंकने बंद करतो आणि जमिनीवर शांत बसतो...राघवला या गोष्टीच आश्चर्य वाटत...राघव रॉकीला पाहत असतो...तेवढ्यात रुही त्याच्या मागे जाते आणि गोट्याची बरणी हळू आवाजात खोलून राघवच्या मागे ओतते...पण चुकून आवाज होतो...तशी ती आणि रॉकी तिथून गपचुप निघून जातात...राघव मागे वळून पाहायला जातच असतो की तेवढ्यात त्याचे पाय गोट्यांवर पडतात...तसा तो घसरून धपकन खाली पडतो...

"रुही$$$$$$"राघव ओरडतो...कारण हे आधीही त्याच्यासोबत घडलं होत तेव्हा पण रुहीने गोट्या वापरल्या होत्या...त्या गोट्या पाहून त्याला मागच आठवलं म्हणून रुहीचे नाव पटकन तोंडात आले त्याच्या...तो कसा बसा धडपडत पडत उठतो आणि पुन्हा पडतो...तो कसाबसा एकदाचा उठून त्यातून बाहेर येतो आणि हॉलकडे जातच असतो की तेवढ्यात प्रदीप स्केटिंग बोर्डवरून स्पीडने त्याच्याजवळ ओरडत येत असतो...

"राघव याला थांबव बे...चूक केली रे मी त्या महाकाली रुहीला बोलून...प्लीज थांबव याला..."प्रदिप स्केटिंग बोर्डवर राहून बोलतो...पण काहीवेळातच दोघे एकमेकांना आढळतात आणि जोरात खाली पडले जातात...पडल्याने स्केटिंग बोर्ड दुसरीकडे जातो...दोघे कळवळत असतात...

त्यांचा आवाज ऐकून रुही त्यांच्याकडे जाते...ती प्रदीप कडे जाऊन त्याच लक्ष नसताना त्याच्या मागे स्केटिंग बोर्ड ठेवून आली होती...तिला वाटलं प्रदिप दुसरीकडे जाऊन आपटेल... पण त्याला बोर्ड वर बॅलन्स न करता आल्याने तो राघवच्या दिशेला आला...तो येतानाच रुही जॉकी रॉकी तिथे आले आणि लपून सगळं काही पाहत होते...ती जातच असते की तेवढ्यात विराज त्या दोघांजवळ जातो...तो लपलेल्या रुहीकडे एक जळजळीत कटाक्ष टाकतो...तशी ती तिथेच थांबते...

"अंकल उठा तुम्ही..."विराज त्या दोघांना बोलतो...रुहीने काय काय केलं होतं हे त्याने पाहिले होते म्हणून त्याला आता तिचा थोडासा राग आला होता...कारण रुहीच्या अश्या करण्याने त्यांना भरपूर मार लागला असता...म्हणून तो तिच्यावर चिडला होता...

विराजच्या आवाजाने दोघे एकमेकांना सावरत कसे तरी उठून बसतात...त्यांची नजर रुहीवर जाते...तसे ते गप्प बसतात आणि तिला काही न बोलता तिथून निघून जातात...

"विल शॉली ना..."रुही बोलते...

"वाव रुही मी तर तुला साधी समजलो होतो पण तू तर खूपच चालू आहे...आज तुझ्या अश्या करण्याने त्यांना जास्त लागलं असत तर काय केलं असत??मस्ती करायला एक हद्द असते रुही...एवढं पण करू नये ज्याने दुसऱ्याला हानी होऊ नये..."विराज रागातच तिला बोलतो...

"ही अशीच मुलगी आहे...अनाथ असल्याने कोणीही हिला सांभाळणार नाही आहे ना म्हणून अशी वागत चालली आहे...सुशांती आणि राधाच नाव बदनाम करत चालली आहे...एवढस बोलल की लगेच शिक्षा करायला लागते..." एक मुलगी तिथे येऊन बोलते...

"मयुली आंटी मिनी अनात नाही आहे...लुही ला मम्मी पप्पा आहेत..."रुही डोळ्यात पाणी ठेवून बोलते...

"नाही आहेत ते तुझे मम्मी पप्पा तू अशी मुलगी आहे जिने स्वतःच्या मम्मी पप्पाना खाल्लं आणि आता बाकीच्याना त्रास देत असते..."मयुरी रागातच बोलते...तिचे बोलणे ऐकून विराजला वाईट वाटत...इकडे रुही तिथुन पळतच हॉलमध्ये जाते...मयुरी विचित्र पणे हसून तिथून निघून जाते...विराज देखील धावतच रुहीच्या मागे जातो...रुहीने मयुरीला त्रास दिल्यामुळे ती आज मनाशी काहीतरी ठरवून मुद्दाम लग्नाला आली होती...तिला ती संधी मिळाल्याने तिने पुढे होऊन रुहीला बोलले...आता रुही कायमची निघून जाईल या विचाराने ती बोलली आणि तिथून निघून गेली...

रुही हॉलमध्ये पळत येऊन एका बाजूला फोनवर बोलणाऱ्या राधाकडे जाऊन तिच्या पायाला मिठी मारते आणि रडू लागते...तिचे रडणे पाहून राधा फोन कट करते आणि तिला पटकन उचलून घ्यायला जाते तशी ती बाजूला होते...

"माझी खली मम्मा कोण आहे??"रुही राधापासून दूर होत विचारते...तिच्या अश्या प्रश्नाने राधा शॉक होऊन तिला पाहत असते...विराज देखील त्या दोघींना पाहत असतो...

"रुही माझ्याकडून काही चूक झाली का बाळ??की माझं प्रेम कमी पडत आहे??"राधा खाली बसून तिला विचारते...

"मी विचालल माझी मम्मा कोण आहे..."रुही मोठया आवाजात रागात राधाला विचारते...एव्हाना तिचा आवाज पूर्ण हॉलमध्ये घुमतो...तशी अजयची टीम,सुशांती आणि घरातील सगळे तिच्याजवळ जमा होतात...

"रुही काय झालं प्रिन्सेस??"रवी तिच्याजवळ येत तिला विचारतो...

"माझे खरे मम्मी पप्पा कोण आहे...मी अनाथ आहे ना?"ती रवीला विचारते...सगळे तिच्या या प्रश्नांवर एकमेकांना पाहतात...सुशांती पुढे येते...

"का हवे क्युटि तुला तुझे खरे मम्मी पप्पा?आमचे प्रेम कमी पडत आहे का?की आम्ही तुझ्याजवळ लक्ष देत नाही आहोत?"सुशांती शांतपणे तिला विचारते...

"रुही चूप बस..."विराज कसतरी पुढे येऊन तिला बोलतो...कारण तिच्या अश्या प्रश्नाने राधा आणि रवीच्या डोळयांत पाणी आले होते...रुहीचा अनाथ शब्द ऐकून त्यांना कसतरी वाटत होते...

"एक मिनिट वीर बोलू दे तिला..."सुशांती त्याला बोट दाखवत अडवत शांतपणे त्याला बोलते तसा तो बाजूला होतो...

"बोल ना रुही?एवढी मुलं आहेत आमची पण आम्ही त्यांच्यावर जास्त प्रेम करतो आणि तुझ्यावर कमी अस होत आहे का आमच्याकडून?तस असेल अजय तर मला हे आपलं बाळ पण नको आहे..."सुशांती डोळ्यात पाणी ठेवून बोलते...तिच्या अश्या बोलण्याने सगळे शॉक होतात...

"सुशांती काय बोलत आहेस तू...???"रवी थोडस चिडून तिला बोलतो...एकीकडे बहीण आणि एकीकडे मुलगी दोघी त्याला हव्या होत्या...सुशांती साठी ते बाळ किती महत्त्वाचे आहे हे सगळयांना माहित होते...पण त्या नादात तिने कधीच कोणत्याच अजयच्या टीमच्या मुलांकडे दुर्लक्ष केले नव्हते...सगळया मुलांवर ती सारखच प्रेम करत होती आणि रुही तर तिचा जीव की प्राण होती...म्हणून तिला दुःखी करून ती बाळाला जन्म देणार नव्हती...

"माऊ तू अश नाही कल्याच..."रुही...

"मग तू हा प्रश्न कसा विचारला??तुझे मम्मी पप्पा कोण म्हणून??एवढी चांगली मोठी फॅमिली आहे ना तुझ्याकडे... सुरेश दादा,राघव दादा,प्रदिप दादा या सगळयांना तू त्रास देते तरीही ते तुला आपली मुलगी समजून प्रेम करतात...हे तुझे अजय अंकल नेहमी मार्केट ला गेले की रुहीला काय घेऊया?रुहीला हे आवडेल ना?याचा विचार आधी करतात...या तुझ्या सगळ्या आंटी तुझ्यावर जास्त प्रेम करतात...यातील कोणी तुला त्रास दिला का आजवर?राधा वहिनी तर तुझ्यासाठी वेडी आहे...त्या दोघांनी खूप काही केलं आहे...पण तू जो आज प्रश्न विचारला ना त्याने आज त्या दोघांना त्रास झाला आहे..."सुशांती डोळ्यात पाणी आणत बोलते...

"माऊ i am चोली ना...मना नको काही...प्लीज तू नको लदु..."रुही सुशांतीजवळ जाऊन तिच्या पायांना मिठी मारून रडू लागते...सुशांतीच्या डोळ्यांत पाणी पाहून तिला वाईट वाटत होते...सुशांती डोळे पुसते आणि तिच्यासमोर गुडग्यावर अलगद बसते...ती रुहीचा चेहरा ओंजळीत घेते...

"हे क्युटि तू अनाथ नाही आहे पिल्लु...तुझ्याकडे तुझी एवढी मोठी फॅमिली आहे...महत्त्वाचे म्हणजे तुझ्याकडे राधा वहिनीसारखी मम्मी आणि रवी दादा सारखे पप्पा आहेत...तुझे आईवडील रक्ताचे नसले तरी ते जीव ओवाळून टाकतात तुझ्यावर...माझ्याकडे माझी मम्मी असून पण नसल्यासारखी आहे तरीही बघ ना मला माझी आई कधीच तिची आठवण येऊ देत नाही एवढं प्रेम करते...तुझ्या अजय अंकल पेक्षा जास्त लाड माझे होतात..."सुशांती अजयच्या आईकडे पाहून तिला बोलते...

"शॉली ना माऊ...मी नि नाई विचालनाल पुन्हा...मना तुमी पाहिजे नको मला खली मम्मा पप्पा..."रुही रडत रडत तिला मिठी मारत बोलते...तशी सुशांती तिला घट्ट मिठीत घेते आणि कुरवाळते...एव्हाना सगळेच जण इमोशनल झाले होते...सुशांती आणि रुही दोघीही अजयच्या टीम साठी सारख्याच होत्या...सुशांती अनाथ आहे असे समजले तेव्हा अजयच्या आईने आणि बाबांनी तिला स्वतःच्या मुलीसारखंच जपले होते...तसेच राधाने आणि रवीने देखील रुहीला जपले होते...अजयच्या टीमच्या तर त्या दोघी जीव की प्राण होत्या...पण आज रुहीचा प्रश्न ऐकून त्या सगळयांना वाटले की त्यांचे प्रेम तिच्यावरचे कमी झाले का?म्हणून तिने हा प्रश्न विचारला...ते सर्वजण रुहिवर प्रेम करण्यात कमी पडत आहे का?असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात डोकावला होता...त्याचे जास्त दुःख तर रवी,राधा आणि सुशांतीला झाले होते...

"क्युटि पुन्हा हा शब्द आणि प्रश्न तुझ्या मनात आला नाही पाहिजे...जर आला तर माऊ अजिबात तुझ्यासोबत बोलणार नाही..."सुशांती तिला बाजूला करत बोलते...तशी ती मानेने नाही म्हणते...

"आम्हाला काही त्रास होत नाही तुझा CCTV उलट आवडत आम्हाला..."राघव तिच्याजवळ येत हसून बोलतो...

"शॉली अंतल..."रुही शांतपणे त्याला बोलते...रुही ने सॉरी बोलण्याने सगळे तिला पाहत राहतात...कारण ती त्यांना शिक्षा करून कधीच सॉरी बोलत नसायची...

"तू आज पहिल्यांदा सॉरी बोलली...प्रदीप सूर्य बघ कोणत्या दिशेला उगवला तो?"राघव शॉक होत बोलतो...

"विल ने सांगितले म्हणून..."रुही वीर कडे पाहून बोलते...तसे सगळेजण विराजकडे पाहतात...तेवढ्यात तिथे एक बाई येते...

"वीर चल जाऊ आपण..."ती बाई त्याच्याजवळ येऊन त्याला पाहून बोलते...

"नितु दि तू?"सुशांती त्या बाईला पाहून बोलते...

"अरे सुशांती तू?"नितु दि..

"हो माझंच तर लग्न आहे ना...हा विराज तुझा मुलगा काय?"सुशांती विरकडे जाऊन विचारते...ह्यांचे बोलणे ऐकून सगळे तिथून निघून जातात फक्त अजय,रुही सुशांती तिथे थांबतात...

"हो हा माझा मुलगा...ही गोड क्युट मुलगी तुझी का?खूप भारी दिसते ही..."नितु दि रुहीला पाहून बोलते...

"हो ही माझ्या मुलीसारखी आहे ...राधा वहिनी आणि रवी दादाची मुलगी आहे ही..."सुशांती रुहीला पाहून बोलते...

"ही एवढी क्युट आहे ना अस वाटत तिला घरी घेऊन जावं...येते का तू पिल्लु घरी आमच्या?मी,विरच असतो घरात बाकी कोणी नाही..."नितु दि हसून बोलते...तिच्या या वाक्यावर ते दोघे तिच्याकडे पाहतात...

"पिल्लु बघ ऐ सासू ला पसंत आहे...किती घाई लागली आहे त्यांना आपल्या सुनेला घरी घेऊन जायची..."अजय सुशांतीजवळ येऊन हळू आवाजात बोलतो...त्याचे बोलणे ऐकून सुशांती त्याच्यावर एक कटाक्ष टाकते तसा तो गप्प बसतो...

"नको दि...ही माझी क्युटि मला हवी आहे बाबा..." सुशांती...

"ओके आता ठेव हा पण नंतर तर नक्कीच घेऊन जाणार आम्ही आणि हो तुझे पती म्हणतात तसही मला आवडेल हा...सुनबाई म्हणून ग..."नितु दि हळु आवाजात दोघांना बोलते...तिचे बोलणे ऐकून दोघे शॉक होतात..

"अग दि ते मस्करीत बोलत आहे..."सुशांती...

"बट मी सिरिअस आहे..."नितु दि हसून रुहीला पाहून बोलते...

सुशांती यांचं काही खर नाही या अविर्भावात तिथून निघून जाते...ती गेल्यावर अजय आणि नितु दि भरपूर हसतात...

"नितु दि तुम्ही कसे ओळखतात एकमेकांना??"अजय त्यांच्याजवळ जाऊन प्रश्न विचारतो...

"माझे मिस्टर बिझनेसमन होते पण एका कार अकॅसिडेंटमध्ये वारले...तेव्हा मला काहीच कळत नव्हते काय करावे?लोकांची लाईन लागायची घरी लोन वगैरे भरण्यासाठी...अक्षरशः घर विकायचे ठरवले होते... त्याचवेळी एकदा माऊली ग्रुपशी बोलून काय होत का पाहूया?अस मनात आले आणि मी एकदा त्या ऑफिसला गेली...सुशांतीसोबत बोलून सगळी परिस्थिती मी तिला कळवली...तेव्हा तिने सगळे लोन आमचं स्वतः भरलं... मला बिझनेस सांभाळायला मदत केली...आज मी आणि विराज इथे आहोत ते सुशांतीमुळे...खूप उपकार आहेत तिचे आमच्यावर...खरच तुम्ही सगळेजण लकी आहात सुशांती तुमच्याजवळ आहे..."नितु दि थोडीशी भावुक होऊन बोलते...सुशांती बद्दल ऐकून अजयला तिचे कौतुक वाटते...रोज ती नव्याने त्याला कळत होती...

"आहेच सुशांती अशी...आजपासून तुम्ही पण आमच्या फॅमिली मेम्बरसारखे आहात आम्हाला...वीर खरंच खूप स्मार्ट मुलगा आहे...आमची रुही आजवर कधीच कोणाला सॉरी बोलायची नाही पण आज तो बोलला म्हणून तिने बोललं..."अजय विराज कडे पाहून बोलतो...

"Thank you मिस्टर परांजपे...पण मी सिरिअस बोलली हा सुनबाई बद्दल..."नितु दि हसून त्याला बोलते...

"हो नक्कीच पाहू..."अजय हसून तिला बोलतो...

"विल शॉली..."रुही कान पकडत त्याला बोलते...ती ऑल रेडि एवढी क्युट दिसत होती आणि त्यात कान पकडून तोंडाचा चंबू करून ती उभी होती...

"इट्स ओके हनी बी पण पुन्हा असा त्रास कोणाला देऊ नको.."विराज तिचे हात खाली करत बोलतो...

"थॅंक्यु...मी अंतला नाई देणाल पण बॅड लोकांना देणार..."रुही...

"ओके बॅड लोकांना दिला तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे...चांगल्या लोकांना नाही द्यायचा हा...आता मी जातो बाय..."विराज थोडस हसून तिला बोलतो...

"तू शॉली नाही बोलला??"रुही गाल फुगवून हाताची घडी घालून बोलते...

"अरे यार ही एवढी क्युट का आहे??"विराज स्वतःशीच मनात बोलतो...

"ओके बाबा सॉरी...आता जाऊ मी?"विराज...

"पुन्हा भेटनाल ना?"ती क्युटपणे त्याला विचारते...तो बोलणार तेवढ्यात नितु दि तिथे येते...

"हो पिल्लु पुन्हा तुला भेटायला येणार हा...नाहीतर तू ये माऊ सोबत पुढच्या आठवड्यात...विराजचा बर्थडे आहे..."नितु दि तिच्या गालावर किस करत बोलते...

"हनी बी ये हा तू आल्यावरच मी केक कापीन...नाहीतर नाही हा...मी वाट पाहीन तुझी..."विराज हसून तिला बोलतो...

"ओके येईल ती आणि तिची माऊ...रुही बाय कर त्याला..."अजय तिथे येत बोलतो...तशी रुही त्याला बाय करते...तसा विराज आणि नितु दि तिथून निघून जातात...अजय रुहीला उचलून घेतो आणि रविकडे देतो...

"सांभाळ हिला...पण एक मिनिट रुही तुला कोण बोललं मम्मी पप्पा बद्दल??"अजयला काहीतरी आठवते म्हणून तो तिला विचारतो...

"म्यूली आंटी..."रुही बोलते...तिचे बोलणे रिया आणि पल्लवी ऐकते...

"पल्लवी,रिया...पुढच काय करायचे ते तुम्हाला कळलंच असेल ना??"अजय त्या दोघींना पाहुन बोलतो...

"हो जीजू...तुम्ही एन्जॉय करा आम्ही पाहुणचार घेऊन येतो..."रिया गुढपणे हसून अजयला बोलते...तसा अजय हसून तिथून सुशांतीजवळ जातो...तो गेल्यावर रिया आणि पल्लवी मयुरीला हॉल बाहेर शोधायला लागतात...रियाला मयुरी गेटच्या रस्त्याने बाहेर जाताना दिसत असते...तशी ती पल्लवी ला मेसेज करून बोलावून घेते...ती बाहेर जातच असते की तेवढ्यात कोणीतरी समोर येऊन सणसणीत तिच्या कानाखाली मारते...तशी मयुरी जमिनीवर पडते...ती डोळे खोलून वर पाहते तर पल्लवी असते...

"तुझी हिंमत कशी झाली आमच्या रुहीला बोलायची...तिच्याजवळ तिची फॅमिली आहे ती अनाथ नाही आहे...हे लक्षात ठेव तू हडळ..."पल्लवी रागात बोलते...

"तुम्ही इथे.......??"मयुरी घाबरत बोलते...

"तुला invite कोणी केलं ग इथे??इथे येऊन आमच्याच मुलीला बोलली...बाईच आहेस ना तू??एक स्त्री असून असे विचार तुझे शी..."रिया तिच्याजवळ येत रागात तिला बोलते...

"मी काहीही चुकीच बोलली नाही...सक्खी आई वेगळी असते आणि सावत्र सावत्रच राहते...मी खरच बोलली माझ्या मते रुहीच्या पायगुणामुळेच तिचे आई वडील मेले असणार...काय अवदसा जन्माला घातली काय माहिती त्यांनी......"मयुरी पुढे बोलतच असते की एक जोरदार कानाखाली तिच्या बसते...आताचा मार एवढा जबरदस्त असतो की तिच्या नाकातून रक्त येते...तिला कळायच्या आत दुसरी पण बसते...तीच डोकं एकदम सुन्न होते...

"खुप बोलली तू...माझी रुही रस्त्यावर पडलेली मुलगी नाही आहे...ती सुशांती परांजपेच पहिल अपत्य आहे... माझ्या रुहीबद्दल काहीही बोललेलं मी खपवून घेणार नाही...आता जर गन असली असती ना मर्डरच केला असता तुझा..."सुशांती भयंकर चिडत तिला बोलते...सुशांती धावून जात असते की रिया तिला धरते...

"सुशांती बस्स झालं...खुप लागलं तिला...आता पुन्हा ती रुहीला बोलताना विचार करेल...पुन्हा वागली तर मर्डर नक्कीच होईल तिचा..."रिया एक जळजळीत कटाक्ष मयुरीवर टाकून बोलते...

"या अश्या बायका मुळे स्त्री जातीचा अपमान होत असतो...मुलगी असली तरी एक स्त्रीच आहे ना रुही तरीही हिने बोलताना विचार केला नाही...एक स्त्री दुसऱ्या स्त्रीची कदर करत नाही हे पाहून राग येतो मला...नेक्स्ट टाईम मी विसरून जाईन तू कोण आहे ते...माझ्यातील माही जागी झाली ना तर तुझं काहीच खर नाही"सुशांती गुढपणे हसून रागात हळू आवाजात तिला बोलते...तीच बोलणं ऐकून मयुरी घाबरते...कारण सुशांती जेवढी शांत होती त्याच्या दुप्पट माही डॅशिंग होती...माहीची कीर्ती सगळी कडे पसरली होतीच...जर तिने माहिला जाग केलं तर ती जिवंत वाचणार नाही हे तिला माहीत होते म्हणून मयुरी गपचूप तिथून निघून जाते...(माही आठवते ना....नाही आठवत तर जीवनसाथी वाचा पुन्हा...)

सुशांती कॉलवर बोलण्यासाठी बाहेर आली होती तेवढ्यात मयुरीचे बोलणे तिच्या कानावर पडले म्हणून तिला राग आला आणि पुढचा मागचा विचार न करता तिने तिला मारले...आता अजयसारखा तिचा हात बसायचा...त्यामुळे तिच्या एका फटक्यात मयुरीला चांदणे दाखवले आणि दुसऱ्या फटक्यात ब्रह्मानंड दाखवले...

सुशांती तशीच काही न झाल्यासारखे आपला लेहंगा व्यवस्थित करून आतमधे निघून जाते...पल्लवी तर तिलाच जाताना पाहत राहते...ती जात असताना पल्लवीला तिच्यात अजय दिसतो...

"वा अजय मानलं तुला...डुप्लिकेट तयार केलीस तू..." पल्लवी मनात बोलते...त्या दोघी तिथून निघून आतमधे जातात...पल्लवी झालेला प्रकार अजयला सांगते...अजय सुशांतीकडे पाहून गालात हसतो...त्याला तर सुशांतीच फाईट वगैरे आधीपासूनच माहीत होती...कारण त्यानेच शिकवली होती ती...

सगळे आनंदी होऊन एकमेकांसोबत बोलत असतात...फोटोसेशन पण अधेमधे करत असतात... रुही गप्प चूप पणे अजयचे आणि सुरेशचे बुट आणून देते...ते सुद्धा कसलीही फर्माईश न करता...शेवटी पाठवणीची वेळ येते तेव्हा सानिका अजयच्या आईला,बाबांना मिठी मारून रडू लागते... सुशांती नसताना सानिका ला अजयच्या फॅमिलीने स्वतःच्या मुलीप्रमाणे सांभाळले होते...इकडे सुशांतीपण इमोशनल होते...अजय तिला जवळ घेऊन शांत करतो...

काहीवेळाने सुरेशची फॅमिली सानिकाला तिथून घेऊन जाते...ते जाताच बाकी सगळे देखील तिथून निघून जातात...

आजपासून सानिका कायमची सुरेशची झाली होती... सगळयांना त्यांचे हक्काचे त्यांच्यावर प्रेम करणारे जीवनसाथी मिळाले होते...प्रत्येकाने खूप खडतर प्रवास करून अग्निपरीक्षा देऊन आपल्या जीवनसाथीला मिळवले होते...प्रेम करणे सोपे असते पण ते निभावणे कठीण असते...वेळोवेळी येणाऱ्या सगळ्या संकटावर मात करत एकमेकांना साथ देत आज इथपर्यंत पोहचले होते...अजयंती तर कमालच होती...पण ती बाकीच्या टीम शिवाय अपूर्ण होती...आज ते सुखी होते ते सर्वांमुळे होते...वेळोवेळी टीमने एकत्र राहून त्यांना मदत केल्याने आज सुशांती अजय जवळ होती...सुखाचे क्षण आज सगळयांना लाभणार होते...पण येणारी वेळच ठरवणार होती सगळयांचे भवितव्य???खरच सुख आहे का???की आणखीन काही घडणार??
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
क्रमशः
©®भावना सावंत
------------------------------------
आजचा भाग कसा वाटला नक्की कळवा...काही चुकले तर माफ करा...कंटाळला नाही ना स्टोरीला??सुशांती ही बिझनेस वुमन आहे मोठी त्यामुळे तिचं लग्न साधं अस दाखवले जाणार नव्हते.... कन्स्पेट मी तशी ठरवलीच नव्हती...त्यामुळे तीच लग्न खास बनवले...एखाद्या मोठया श्रीमंत माणसांसारखे....

भेटू 9 नोव्हेंबर ला

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

[email protected]@[email protected]

Bsc Cs

माझ्या कल्पनेच्या विश्वात तुमचे स्वागत आहे...