Dec 05, 2021
प्रेम

जीवनसाथी... भाग 83

Read Later
जीवनसाथी... भाग 83

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..एक पटकन झलक देते तुम्हाला...

झलक:-सुशांती प्रेग्नेंट आहे...अजयंतीचे पुन्हा लग्न होत होते...सोबत सुरेश सानिका चे पण...एंगेजमेन्ट सेरेमनी,हळद हे सर्व कार्यक्रम झाले होते...रुहीने मयुरीला धडा शिकवला...अजयने सुशांतीला गोलगप्पा म्हटल्याने सुशांती फुगून बसली होती...नंतर तिने अजय ला शिक्षा सुनावली होती...रुहीने सुरेश आणि प्रदिपचा कसला तरी व्हिडीओ सानिका आणि पल्लविला दाखवला होता... त्यामुळे त्या दोघी त्यांच्यावर चिडल्या होत्या...अजय उठाबशा मारायला लागला होता...

हे सर्व मागील भागात घडले...आता जाऊ पुढे...
****************************

"CCTV काय माझं लग्न होऊ देत नाही वाटत...झालं लग्ना आधीच मला घराबाहेर काढलं जात वाटत..."सुरेश मनातच बोलतो...

"माझ्या संसाराची पुरे पुर वाट लागणार आता...या CCTV मुळे...ज्याची भीती होती तेच झाले...भोगा आता आपल्या कर्माची फळ..."प्रदिप मनातच बोलतो...ते सर्वजण आता गप्प राहून देवा कडे धावा करत असतात...

"पिल्लु झालं माझं लिहून...आता किती उठाबशा मारू??हा 100 ना त्या पण मारतो हा..."अजय तिच्याजवळ येत बोलतो...तो यांना शिक्षा मिळणार म्हणून खुश झाला होता...तो तसाच उठाबशा मारायला लागतो...सगळे अजयकडे आवासून पाहत होते...पण इकडे सानिका आणि पल्लवी मात्र रागात सुरेशकडे आणि प्रदिपकडे पाहत होते...कारण आपल्या रुही मॅडमने ते दोघे मघाशी चेहरा पाडून बोलत होते ना त्याचा व्हिडीओ बनवला होता...

अजयला उठाबशा मारताना पाहून सुशांती त्याच्याकडे जाते...अजय साधारण 50 ते 60 उठाबशा मारतो...ती त्याच्याकडे जाते आणि त्याचे दंड पकडत त्याला थांबवते...

"मी सांगीन आणि तुम्ही लगेच करायला लागतात..." सुशांती चेहरा पडत बोलते...कारण त्याने तिच्यासाठी उठाबशा मारल्या खऱ्या पण त्याला अस करताना पाहून तिलाच कसतरी वाटलं...

"अरे पिल्लु मी प्रेम करतो ना तुझ्यावर म्हणून अस करतो...थांब पूर्ण करतो ना..."अजय अस म्हणत पुन्हा मारत असतो...

"नको ना अजय...ओके माफ केले तुम्हाला..."सुशांती त्याला अडवत बोलते...तसा तो थांबतो आणि हसून तिला जवळ घेतो...

"Thank you पिल्लु..."अजय तिच्या कपाळावर स्वतःचे ओठ टेकवत बोलतो...तो कधीच कोणाला घाबरायचा नाही...तर आजपण नाही घाबरला...पण सुशांती मात्र भरपूर लाजली यावर...

"अजय कुठे आहोत आपण याचे भान राखा की जरा..."सुशांती आजूबाजूला पाहत बोलते...

"माझी मर्जी..."अजय खांदे उडवत बोलतो...तसे सगळे सुशांतीला हसतात...ती गोड अशी लाजते...

"तुमचं झालं तर जावा आता झोपायला...अजय सुशांतीला घेऊन जा झोपायला..."अजयची आई अजयला पाहून बोलते...

"हो आई जातो..."अजय हसून बोलत सुशांतीचा हात पकडून तिला तिथून घेऊन जातो...इकडे प्रदिप आणि सुरेश संधी साधून पळतच असतात...तसे पल्लवी आणि सानिका त्यांना धरतात...

"प्रदिप मला अस बोलतो तू...??"पल्लवी चिडून बोलते...

"नाही...ग...त्यादिवशी चुकून प्लीज एकदा माफ कर आयुष्यात पुन्हा कुठेच तुला काहीच बोलणार नाही..."प्रदिप मागे वळून तिला बोलतो...

"नाही करणार मी तुला माफ...मी लग्न झाल्यावर माहेरी चालली माझ्या..."पल्लवी चिडून बोलते...

"पल्ली पुन्हा नाही बोलणार प्रॉमिस...हे बघ मी कान पण पकडले...उठाबशा पण काढतो पण मला सोडून जाऊ नको...माझ्या बाळांना मी लागतो ना म्हणून नको ना जाऊ..."प्रदीप गयावया करत बोलतो...त्याच अस बोलणं तिला आवडत...त्याचा फेस पाहून तर तिला पटकन हसूच फुटते...

"किती घाबरतो यार तू??इट्स ओके चल माफ केले...पण पुन्हा अस मला आढळून आलं तर अजिबात ऐकून घेतले जाणार नाही तुझे..."पल्लवी शांतपणे बोलते...

"ओके आजपासून नाही बोलणार तुला..."प्रदिप हसून बोलतो...

"आता चल बाबा झोपायला ती प्रियल काही झोपणार नाही तुझ्याशिवाय..."पल्लवी थोडीशी वैतागत बोलते...

"ओके चल..."प्रदीप हसून बोलतो...तो तसाच पल्लविला घेऊन जातो...इकडे रुही मात्र सगळयांना पाहत असते...

"सोनू अजिबात पुन्हा ड्रिंक करणार नाही...पण प्लीज लग्नाला नकार नको देऊ हा..."सुरेश सानिकाचे पाय धरत बोलतो...त्याला अस करताना पाहून सानिका घाबरते... बाकीचे सगळे त्याला हसत असतात...

"अरे सुरेश सोड मला...काय करतोय तू हे??"ती वैतागत बोलते...

"जो पर्यंत माफ करणार नाही तोपर्यंत नाही सोडणार..." सुरेश...

"अरे मी पडेल यार...सोड ना..."सानिका...

"नाही आधी माफ कर एकदा..."सुरेश हट्ट करत बोलतो...यांचं चालू असत..पण इकडे सगळे हसून त्यांना पाहून आपल्या रूममध्ये निघून जातात...रुहीला पण रवी घेऊन जातो...

"ओके चल माफ केले पण पुन्हा कुठे ड्रिंक करताना दिसला ना केस करून जेलमध्ये टाकेन..."सानिका थोडीशी चिडून बोलते...तिचे बोलणे ऐकून सुरेश उठतो आणि तिच्या कंबरेत हात घालून तो तिला स्वतःजवळ खेचतो...त्याच्या अश्या करण्याने ती कावरीबावरी होते...

"तू मला जेलमध्ये टाकणार???कोणती केस लावणार आहेस तू??"सुरेश घट्ट पकडत खट्याळपणे तिला विचारतो...

"सोड ना मला...कसतरी होत आहे..."ती त्याच्या छातीला मारत बोलते...पण तो आणखीन घट्ट धरून तिला जवळ खेचतो...त्याच्या अश्या करण्याने ती त्याला घट्ट धरते आणि डोळे बंद करते...तिला अस घाबरलेल पाहून तो गालात हसतो...तो एका हाताने तिचे चेहऱ्यावर आलेले केस मागे करतो आणि तिच्या गालावर स्वतःचे मऊशार ओठ ठेवतो...

"सोनू किती घाबरते...चल गुड नाईट आज सोडतो पण नंतर नाही..."सुरेश मिश्किलपणे हसत तिला बोलतो आणि सोडतो...तशी ती लाजून तिथून पळून जाते...सुरेश देखील तिला हसून तिथून झोपायला आपल्या रुमला निघून जातो...
*************************

आज अजयंती आणि सुरेनिकाचे लग्न होते...सुशांती लवकरच उठून घरातून निघून गेली होती...अजयला उशिरा जाग येते तो आजूबाजूला पाहतो तर सुशांती नसते...तो फ्रेश व्हायला जात असतो की त्याला वोर्डरोबला एक कागद लावलेला दिसतो...तो कागद तो उघडतो आणि वाचू लागतो...

"ओ मिस्टर आयपीएस ऑफिसर...मी तुम्हाला लग्नात भेटेन तोपर्यंत मला तुम्ही शोधू नका...जरा लवकर तयार होऊन लग्नाला या...तुमचीच बायको सुशांती..."

अजय हसून ती चिठी वाचतो आणि तसच ठेवून तो फ्रेश व्हायला निघून जातो...तो फ्रेश होऊन रूममध्ये येतो तर त्याला तयार करायला प्रदिप आणि अवि आलेले असतात...तसा तो एक smile त्यांना देतो आणि तयार व्हायला लागतो...अवि आणि प्रदिप त्याला मस्त तयार करून खाली आणतात...राघव आणि रवी सुरेशला तयार करून घेऊन येतात...दोघांची नजर मात्र आपल्या बायकोना शोधत असते...ते अविच्या नजरेतून सुटत नाही...

"अजय पिल्लु हॉलवर येणार आहे...नको काळजी करू security आहे तिच्यासाठी tight...पिल्लु पण स्ट्रॉंग आहे..."अवि हसून अजयच्या कानात बोलतो...

"अंम माहीत आहे मला ती आहे फायटर पण सध्या तिला जपावे लागते म्हणून काळजी वाटत आहे..."अजय हळू आवाजात त्याला बोलतो...अवि पुढे होऊन काहीतरी बोलणार तेव्हाच अजयची आई त्यांच्याजवळ जाते...

"चला हॉलवर तिकडे भेटतील बायका तुम्हाला..."अजयची आई हसून बोलते...त्यांचे बोलणे ऐकून सगळेजण घराच्या बाहेर पडतात...बिझनेसमन फॅमिली होती...त्यात ऑफिसर पण आपली अजयची टीम होती म्हणून त्यांना भरपूर security दिली गेली होती...सुशांती टॉप वर्ल्ड बिझनेसमन वूमन असल्याने तिला तर सगळ्यात जास्त security नेहमी असायची...तिचे बॉडी गार्ड पण अजयला आज दिले होते...सगळे जण घराच्या बाहेर येऊन सजवलेल्या गाडीत बसतात आणली हॉलच्या दिशेला जायला निघतात...अजय आणि सुरेश फक्त सानिका आणि सुशांतीचा विचार करत असतात...

काहीवेळाने त्यांच्या गाड्या हॉलवर पोहचतात...हॉलवर येताच सगळेजण गाडीच्या बाहेर पडून हॉलच्या दरवाजापाशी उभे राहतात...अजय आणि सुरेश थोडेसे मागे थांबतात कारण पुढे वरातीतील मंडळी डान्स करत असतात...सगळे जण मिळून भरपूर डान्स करतात...त्यात आपली रुही तर कमालच करत होती...सुशांतीची कॉपी होती ती...मग सुशांतीसारखच मनमोकळे पणे ती डान्स करत होती...अजयची टीम तर तिला हसून पाहत होती...तेवढ्यात रुही डान्स करता करता खाली पडत असते तेव्हा कोणीतरी तिला धरत...

"Stupid आहेस का?डान्स करताना आजूबाजूला पाहायचे असते...पडली असती तर लागलं असत ना?"तो तिला सरळ उभं करत बोलतो...

"ऐ तू लुहिला बोलतो...लुही पडत नव्हती आणि पडल्यावर लुहिला लागत नाही...कारण लुही स्ट्रॉंग आहे..."रुही attitude ने ओढणी सांभाळत त्याला बोलते...

"ओह दिसत किती स्ट्रॉंग आहे...जा कर डान्स..."तो हसून तिला बोलतो...ती एवढया क्युट पणे त्याला बोलली म्हणून तो तिला हसला...

"हेय तू मला कमी समजू नतो हा चल बाजूला फाईट करू..."रुही...

"ओय हनी बी तू नाही हा कमी...पण जाऊ दे ना...कशाला भांडूया?त्यापेक्षा मैत्री करूया??"तो हसून तिला बोलतो...

"ओके माझं नाव लुही... तुझं??"रुही...

"माझं नाव विराज...तू मला वीर बोलू शकते...काय आहे you are my first sweetest क्युट friend..."विराज हसून तिला बोलतो...

"मी विल बोलू तुला?पण तू तर मोठा आहे....??"रुही...

"असू दे त्यात काय आहे ना हनी बी..."तो...

"चल आपण डान्श कलू..."रुही त्याला ओढतंच घेऊन जात बोलते...इकडे दूरवर असलेला अजय त्या दोघांना पाहून हसतो...कारण रुही खूप कमी लोकांसोबत बोलायची आणि ती विराज सोबत एवढी बोलत आहे पाहून तो गालात हसतो...

"पिल्लु ला सांगावे लागेल बाबा...जावई याची तयारी करायला...सो cute आहेत दोघे..."अजय मनातच स्वतःशी हसून बोलतो...त्याला स्वतःच्याच विचारांवर हसू येत...

इकडे विराज आणि रुही डान्स करतात...रुही पण लगेच त्याच्यासोबत मिक्स होते...डान्स करताना तो हळूच तिचे फोटो त्याच्या हातातील मोबाईल मध्ये काढत असतो...

विराज हा साधारण रुहीपेक्षा 5 ते 6 वर्षाने मोठा होता...रुहीला तो आल्यापासून पाहत होता...तिच्या cuteness वर तो फिदाच झाला होता...ती पडणार अस दिसताच तो तिच्याजवळ आला आणि तिला वाचवले...विराजला ती कोण आहे ते कळलं होतं...पण तिला नाही...दोघे खूप सर एकमेकांसोबत बोलत हो...

"नवऱ्या ची एन्ट्री अशी झाली पण सुशांती कुठे गायब आहे?"अजयचे बाबा अजयच्या ठिकाणी येत बोलतात...

"ओ आमच्या वाघिणीची एन्ट्री साधी नाही आहे बाबा....आजवर कोणाचीच तशी एन्ट्री झाली नसेल तशी आहे..."रिया फुल्ल attitude मध्ये त्यांच्याजवळ येत बोलते...

"म्हणजे?"सगळेजण...

"ते पाहा वरती आकाशात दोन्ही वाघिणी येत आहे आमच्या..."रिया आकाशात बोट करत बोलते...
तसे सगळे आकाशात पाहतात...ते पाहून आलेले सगळे लोक शॉक होतात...कारण आकाशात 7 ते 8 हेलिकॉप्टर घिरट्या घालत होते...अजयला ते हेलिकॉप्टर पाहून लगेच काय कळायचे ते कळते...कारण कॅप्टन शहाचे हेलिकॉप्टर होते ते...(आता जीवनसाथी वाचली तर त्यांना माहीत असेल कॅप्टन शहा कोण आहे ते...)

काही वेळात ते सर्व हेलिकॉप्टर हॉलच्या मोठया ग्राउंड वर लँड होतात...तसे त्यातून सुशांती आणि सानिका खाली उतरतात...ते पाहून आलेल्या लोकांचे डोळे मोठे होतात...

"मॅडम पुन्हा एकदा आपली भेट झाली...happy married life सुशांती मॅम अँड सानिका मॅम...हे आमच्याकडून तुम्हा दोघींना..."कॅप्टन शहा त्या दोघी खाली उतरल्यावर त्यांना बोलतात...ते तसेच दोघींना बुके देतात...

"Thank you मिस्टर शहा...माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी..."सानिका...

"तुमची इच्छा आम्ही नाही केली सुशांती मॅम,धैर्य सर अँड अवि सरांनी केली...thank you त्यांना बोला..."कॅप्टन शहा हसून बोलतात...

"Thank you सुशांती..."सानिका सुशांतीला मिठी मारत बोलते...

"अग हो हो चल जाऊ आता..."सुशांती तिला बाजूला करत बोलते...दोघीं काही अंतरावर चालून जातात...तसे त्यांच्या अंगावर वरून फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव होतो...दोघी वरती पाहतात...तर सुशांतीच्या हेलिकॉप्टर ड्रोन कॅमेराने ते सर्व होत होते...त्या ड्रोन सोबत आणखीन पाच ते सहा तसेच कॅमेरे त्या दोघींवर वर्षाव करत असतात...अजय सुशांतीला पाहून आऊटच होतो... सुशांतीने लाईट पिंक कलरचा लेहंगा घातला होता... डोक्यावर मस्त अशी ओढणी ओढून घेतली होती...कपाळावर बिंदी...डोक्यावर टिकली लावली होती...थोडासा लाईट मेकअप तिने केला होता...गळ्यात मोठी अशी मोत्यांची पाच पदरी माळ आणि एक आणखीन छोटासा नेकलेस घातला होता...त्यालाच मॅचिंग कानातले घातले होते...एकदम साधी सीम्पल आणि cute ती आज दिसत होती...तीच चेहऱ्यावरच निखळ हसू पाहून अजय आऊट झाला होता...होती ती श्रीमंत पण तिच्याकडे पाहून कोणी तिला म्हणार नाही की ही बिझनेस वूमन असेल असे...एवढी ती साधी राहत होती...पण स्मार्ट तेवढीच होती ती...सद्या बाळाच्या विचाराने ती थोडी हळवी व्हायची म्हणून अजयला तिची काळजी वाटायची...तिने अजयला पाहून हसून स्वतःच्या पोटावर प्रेमाने हात फिरवला...

इकडे सुरेशची अवस्था वेगळी नव्हती...तो पण अजयसारखाच डोळे फाडून सानिकाला पाहत होता...सानिकाने आज पिंक कलरचा लेहंगा घातला होता...थोडेसे दागिने गळ्यात परिधान केले होते जे सुरेशच्या आईने तिला दिले होते...केस style मध्ये वरती बांधले होते...हातात मॅचिंग बांगड्या घातल्या होत्या...गोरी असल्याने ती खुप भारी दिसत होती...त्यात तो लेहंगाचा रंग तिला खुलून दिसत होता...म्हणूनच सुरेश पण आउट झाला होता...

"आईशप्पथ असली धमाकेदार एन्ट्री कोणाचीच झाली नसेल राव अजय,सुरेश भारी राव तुमचे"रवी हसून दोघांना पाहून बोलतो...

"सगळ्यात मोठया लेडी business women ची एन्ट्री आहे ही...मग अशीच असणार ना"रिया हसून सुशांतीला पाहून बोलते...

सुशांती आणि सानिका हळूहळू चालत समोर येत असतात तस मागे बॅकग्राऊंडला एक सॉंग लावले जाते...ते सॉंग ऐकून अजय तिच्याजवळ जातो...


Ban-than ke mutyara aaiyan
Aaiyan patola ban ke
Kanna de vich pipal patiyan
Baanhi chooda khanke x (2)

(अजय असून तिचा नाजूक हात स्वतःच्या हातात धरतो...ती हसून त्याचा हात घट्ट पकडते आणि हळूहळू त्याच्यासोबत चालू लागते...)

Mere sohneya sohneya ve
Ve maahi mera kitthe naiyo dil lagna x (2)

Maahi

Jaavi chhod ke na
Tere naal rehna ve
Tu shingar mera
Tu ae maahi gehna ve x (2)

Jinna tu mera onni main teri

Mere sohneya sohneya ve
Ve maahi mera kitthe naiyo dil lagna x (2)

(सुरेशदेखील सानिकाजवळ येऊन तिचा हात धरतो...ते चौघे तसेच हॉलमध्ये जात असतात...त्यांच्यावरून फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव होत असतो...सगळे जण त्यांच्या मागे जात असतात...)

Haye tera raasta ve
Nange pair turrna ve
Tu hai naal mere
Taan main kyon ae darna ve x (2)

Haye dono ne rona
Dono ne hasna
Sab nu ae dassna

Mere sohneya sohneya ve
Ve maahi mera kitthe naiyo dil lagna x (2)
Ve maahi mera kitthe naiyo dil lagna

Ve maahi mera kitthe naiyo dil lagna
Ban-than ke mutyara aaiyan
Aaiyan patola ban ke
Kanna de vich pipal patiyan
Baanhi chooda khanke x (2)

(सुरेश आणि सानिका स्टेजवर जातात...त्यांच्या नंतर अजय आणि सुशांती स्टेजवर जातात...)


ते चौघे स्टेजवर येताच लग्नाच्या विधींना सुरवात होते...अजय एका बाजूला लग्नाचे विधी करत होता...तर सुरेश एका बाजूला करत होतात...आज दोघांनी क्रीम कलरची शेरवाणी घातली होती...दोघेही आधीपासूनच हॅन्डसम असल्याने त्यात नेहमीप्रमाणेच भारी दिसत होते...अजयंती आणि सुरेनिका आपल्या आपल्या जोडीदाराला हार घालतात...त्यानंतर मंगळसूत्र,सिंदूर भरणे या विधी पार पडतात...कन्यादानची वेळ येते तस अवि नंदिनी उठून सुशांती जवळ जातात...अजयची आई आणि अजयचे बाबा सानिका जवळ जातात...या वेळी सुशांती थोडी इमोशनल होते पण लगेच सावरते... सानिकाची पण तीच स्थिती असते...ती यावेळी आई वडिलांना तिच्या मिस करत होती...पण त्यांची कमी आज अजयच्या आई बाबांनी भरून काढल्याने तिला मनात समाधान वाटत होते...सुशांती आणि अजयच्या डोळ्यासमोरून आताचा त्यांचा सगळा प्रवास जातो...कन्यादान विधी पार पडल्यानंतर सप्तपदी पण पार पडते...

शेवटी पंडितजी लग्नसोहळा पार पडल्याचे सांगता तसे सगळेजण टाळ्या वाजवतात...रुही हसून वरती स्टेजवर जाऊन सुशांतीला मिठी मारते...

"कॉंग्रेलटूशन माऊ आणि अंतल..."रुही हसून बोलते...

"हनी बी ते काँग्रेच्युलेशन असत..."वीर मागून येत तिला बोलतो...सुशांती त्याला तर पाहत राहते...कारण रुहीला क्युटि नंतर कोणीतरी वेगळ्या नावाने अशी हाक मारली होती...बाकीचे सगळे बिझी असल्याने त्यांच्या काही लक्षात आले नव्हते...

"पिल्लु आपला जावई आहे तो...म्हणून सांभाळून घेतो..."अजय हसून सुशांतीला बोलतो...

"अजय काहीही काय अहो?लहान आहेत ती अजून..."सुशांती हळूच त्याला कुजबुजते...

"मी जर लहान असलो असतो आणि तेव्हा जर तू मला मिळाली असती ना तर अजिबात सोडलं नसत तुला...तेव्हाच जीवनसाथी बनवलं असत..."अजय बोलतो...पण त्याच्या या बोलण्यावर ती हसते...

"Hey you are so smart ! व्हाट्स युअर नेम??"सुशांती त्या मुलाला पाहून त्याला विचारते...तो बोलणारच असतो की रुही बोलते...

"विलाज..."रुही हसून बोलते...

"बघ पिल्लु आता तर फिक्स आहे हाच आपला जावई...दोघे एकमेकांना सांभाळून घेतात...महत्वाचे म्हणजे आपलं CCTV पहिल्यांदा कोणाशी तरी एवढं चांगलं बोलत आहे..."अजय हसून हळू आवाजात बोलतो...

"तुमचं काहीच होऊ शकत नाही..."सुशांती हसून अस बोलून खाली निघून जाते...

"मी फुल्ल गॅरेनंटीने सांगतो पिल्लु हाच फिक्स आहे...कारण जे भाव त्याच्या डोळ्यात आहे ते वेगळे आहे...he is वेरी इंटेल्लेंजेन्स बॉय..."अजय विराजकडे पाहून बोलतो...विराज आणि रुही मस्त अशी खेळत असतात...अजय त्यांना पाहून निघून जातो...

अजयंती सुरेनिका ही जोडी सगळ्या मोठ्याचा आशीर्वाद घेते आणि थोडाफार फोटोशूट करून ते सगळयासोबत जेवायला जातात...हीच संधी साधून रुही कोणाची नजर नाही पाहून अजय आणि सुरेशचे बूट उचलते...सुशांतीला पाहिलं होतं तिने रवीच्या लग्नात अस करताना म्हणून ती करते...रुही तशीच बुट घेऊन पळू लागते...पण तिला बुट घेऊन पळताना प्रदिप आणि राघव पाहतात...

"हे CCTV थांब...हे काम आमचं होत...आम्हाला दे ते बुट..."राघव तिच्या मागे धावत बोलतो...

"मी नि नाई देणाल...वाट बघा दोघे..."रुही अस म्हणून बुट घेऊन पळते...तिच्या मागे राघव आणि प्रदीप पण पळू लागतात...पण रुहीची पळण्याची स्पीड जास्त असल्याने ती त्यांच्या नजरेआड होते...इकडे दोघेजण तिला शोधत असतात पण ती काही त्यांना मिळत नाही...

"अरे ही रवीची उंदरीन कुठे पळाली अजयचे आणि सुरेशचे बूट घेऊन...किती शोधत आहे तरीही भेटत नाही मला..."प्रदिप एका ठिकाणी थांबून राघवला बोलतो...

"असेल इथेच कुठे तरी...पण उंदरीन भारी हा...एवढीशी आहे त्यामुळे दिसणार पण नाही कुठे लपली ती...लवकर शोधले पाहिजे तिला...नाहीतर हा चान्स आपला जाणार..."राघव हसून बोलतो आणि त्यावर प्रदिप ही हसतो...हे बोलणे तिथेच एका टेबल खाली लपलेली रुही ऐकते...ते दोघे तिला थोडाफार तिथून शोधून जातात... ती ते गेल्यावर बाहेर पडते...

"मला उंदरील बोललात ना आता लुही बदला घेणार..."रुही गुढपणे हसत बोलते...
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
क्रमशः
©®भावना सावंत(भूवि)

*******************************


आज संडे असल्याने दोन पार्ट टाकत आहे....पुढील पार्ट 9 नोव्हेंबर नंतर येतील....काही कामामुळे मी व्यस्त आहे...त्यामुळे लेट होईल....सॉरी ऑल....पुन्हा 85 व्या पार्टला भेटू....

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

[email protected]@[email protected]

Bsc Cs

माझ्या कल्पनेच्या विश्वात तुमचे स्वागत आहे...