Oct 16, 2021
प्रेम

जीवनसाथी... भाग 79

Read Later
जीवनसाथी... भाग 79
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now


आज अजयंती आणि सुरेनिकाची इंगजमेंट होती... त्यासाठी सगळे जण लवकर उठून आपली आपली तयारी करत होते...सुशांती आज लवकर उठली आणि मस्त स्वतःचे आवरुन बाहेर आली...काहीवेळाने अजय पण तयार होऊन तिच्यामागे आला...ती आली तशी रुही पळतच तिच्याजवळ आली...

"माऊ माऊ गुड मॊर्निंग..."रुही सुशांतीच्या पायाला मिठी मारत बोलते...तिच्या बोलण्याने सुशांती थोडीशी झुकते...

"गुड मॉर्निंग क्युटि..."सुशांती तिच्या गालावर किस करत बोलते...

"माऊ तू आणि मी मस्त डान्स करू हा आज..."रुही आनंदातच सुशांतीला बोलते...(रुही आता साधारण सात ते आठ वर्षांची झाली आहे...त्यामुळे तिचे बोलताना शब्द आता थोडेफार चांगले पडत होते...ती आता जास्तीत जास्त परफेक्ट शब्द बोलायला लागली होती...)रुहीचे बोलणे ऐकून अजयच्या डोक्यावर आट्या पडतात...तो काम सोडून सुशांतीकडे येतो...

"ऐ CCTV माऊ आज डान्स नाही करणार...माऊ फक्त आज बघणार आहे आणि एंजॉय करणार..."अजय रुहीला उचलून घेत बोलतो...

"माऊ तू का नाही कलनाल डान्स?"रुही क्युट फेस करत तिला विचारते...तिचे बोलणे ऐकून अजय हसतो...

"माऊ डान्स करणार नाही कारण माऊ कडे बेबी आहे..."अजय रुहीच नाक ओढत बोलतो...अजयचे बोलणे ऐकून रुही खुश होते...

"ये नाचो ये नाचो माऊच बेबी येणार आहे..."रुही अजयच्या हातात अशी हातवारे करून नाचत बोलते...तिचा चेहरा खूप आनंदी झाला होता...आधीच ती गोड होती आणि त्यात तिचे नखरे भयंकर क्युटनेस वाढवत होते...अजयने तिला खाली सोडलं तस तिने सुशांतीला मिठी मारली...

"माऊ तुझ्या टम्मी मध्ये मम्मा सारख बेबी आहे ना?तू नको डान्स करू हा...बेबीला तल्लास होईल..."रुही सुशांतीला बोलते...रुहीचे बोलणे ऐकून सगळे तिलाच पाहत रहातात...कारण ती एवढी छोटी होती आणि त्यात ती एवढं मोठं बोलत होती...खूपच समजदार झाली होती रुही हे आता सर्वांना कळले...तिचे ते बोलणे ऐकून सुशांतीला खूप भारी वाटलं...तिने पटकन तिच्या दोन्ही गालावर किस केले...रुहीने पण हसून सुशांतीच्या गालावर किस केलं...

"किती गोड ती माझी क्युटी...खुप मोठी झाली..."सुशांती तिच्या डोक्यावर हात फिरवत बोलते...ती तशीच रुही सोबत बोलून सोफ्यावर जाऊन बसते...कारण अजय तिच्यावर नजर रोखून बघत होता...तिला काम तर करायचे होते...पण अजयची नजर तिच्यावर असल्याने ती गप्प सोफ्यावर बसते...काही बायका,मुली सुशांतीजवळ येऊन सुशांतीच्या मेहंदीचे कौतुक करत असतात...कारण खूप भारी तिची मेहंदी रंगली होती...

अजय दर अर्ध्या अर्ध्या तासाने तिला जूस,फ्रुट्स घेऊन येत होता...ती प्रेग्नंट होती म्हणून जास्तच काळजी घेणे त्याचे चालू होते...पण हे पाहून सुशांतीच्या मागे उभे राहिलेल्या बायका कुजबुज करतात...

"काय बाई या दोघांचे चालू असते ना जस काही हेच दोघे उत्तम नवराबायको आहेत...बाकी कोणच नाही...आम्ही पण राहिलो प्रेग्नंट पण एवढ लाडात नाही ठेवलं घरातल्यानी आम्हाला...नुसतं या मोठया लोकांना दाखवायचे असते...आम्ही अस प्रेम करतो हे..."एक बाई कुचकट पणे बोलते...

"हो ना अग तुला एक गोष्ट माहीतच नाही हिच्याच आईने स्वतःच्या मुलीवर आरोप केले होते...हिचे दुसऱ्या सोबत संबंध आहेत वगैरे...अग मला अस वाटत हे बाळ पण यांचं नसेल...उगाच ही स्वतःच पाप लपवण्यासाठी अजयच्या माथी हे मारत असेल...तो तर आधीच भोळा आहे त्याला काय कळते ना यातलं...तूच बघ आता एवढी अडीच वर्ष झाली पण हिने चांगली बातमी दिली नाही आणि आता दिली म्हणजे काहीतरी गडबड आहे..."दुसरी बाई त्या बाईला बोलते...तिचे बोलणे ऐकून सुशांती स्वतःच्या पोटावर हात ठेवते...त्यांचे बोलणे ऐकून तिचे डोळे भरतात...अजय कुठेतरी गेला होता...म्हणून त्याला ते बोलणे ऐकू नाही आले...

क्षणात सोफ्याच्या मागून एक सटाक$$$ असा आवाज येतो...तशी ती डोळे पुसून मागे पाहते आणि शॉक होते...कारण अजयच्या आईने त्या दोन्ही बायकांचा एका बाजूला गाल लाल केला होता...

"पुन्हा जर माझ्या सुने बद्दल आणि तिच्या बाळाबद्दल काही बोललात ना विसरून जाईन मी तुम्ही दोघी कोण आहात ते...बाई आहात का कोण आहात दोघी?एवढे बोलताना लाज नाही वाटली का तुम्हाला...मी विचारू का मीरा तुला तुझा मुलगा कोणत्या संबंधातुन झाला आहे वगैरे?तू पण बाहेरच असते ना आणि पाच वर्षाने तुला मुलगा झाला आहे...याचा अर्थ तुझा अनैतिक संबंध आहेत असा धरू का?तू नीरजा तुला घरातून सासू सासरे चांगले करत नाही म्हणून अस बोलावे का?काय आहे ना आमची सून ना आमच्यासोबत सगळयांची काळजी घेऊन ऑफिस सांभाळते...तिने कधीच संसाराकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही...सुने पासून ते बायको पर्यंतचे सगळी कर्तव्ये तिने पार केली म्हणून तिला आज सगळे लाड करतात... कारण तिने लोकांना प्रेम करायला शिकवले...रक्ताचे नाते नसून देखील सर्वांना प्रेमाच्या दोरीत बानले आहे...पण तू तर साधं सासू सासऱ्याना सांभाळू शकत नाही...मग कसे ते तुला प्रेम देतील ना?जेव्हा आपण प्रेमाने वागतो ना तेव्हाच प्रेमाची अपेक्षा करावी माणसाने...राहिला प्रश्न बाळाचा ते बाळ आमचे आहे...सुशांती माझी सून नसून ती माझी मुलगी आहे आणि तिच्या चरित्रावर कोणी काही बोलले ना ते मी बिलकुल खपवून घेणार नाही...तुमच्या दोघींचे इथे काहीच काम नाही आहे...तुम्ही निघू शकतात...नाही गेलात तर धक्के मारून हाकलून दे पल्लवी या दोघींना..."अजयची आई भयंकर चिडत बोलते...तिचा राग आणि बोलणे पाहून सगळे शॉक होतात...त्या दोन्ही बायकांना दिवसा ढवळ्या चांदण्या दिसल्याने दोघी गालावर हात ठेवून गप्प बसतात...

"ओ चला दोघी बाहेर पायाने जातात का अजून एक ठेवून देऊ..."पल्लवी त्यांच्याजवळ येत बोलते...तिचे बोलणे ऐकून त्या दोघी तिथून पळतच बाहेर निघून जातात...अजयची आई सुशांतीच्या बाजूला बसते आणि तिला प्रेमाने जवळ घेते...

"सॉरी बेटा माझ्यामुळे हे सर्व झाले...मी यांना बोलावले नसते तर अस झालेच नसते...कोणी माझ्या मुलीवर विश्वास नाही ठेवला तरी आमच्या सर्वांचा आहे आमच्या सुशांतीवर विश्वास...त्यामुळे तुला कोणी बोललेलं मी खपवून घेणार नाही...अग ते जळतात माझ्यावर ना एवढी चांगली सून मला मिळाली म्हणून असलं काहीतरी बरळत असतात...पण तू अजिबात लक्ष देऊ नको...तुझी ही आई आहे ना सगळं सांभाळायला..."अजयची आई प्रेमाने सुशांतीचे डोळे पुसत तिला समजावत बोलते...त्यांचे बोलणे ऐकून सुशांतीला भरून येते...ती तशीच अजयच्या आईला मिठी मारते...तिला अजून भरुन येईल म्हणून अजयची आई तिला बाजूला करते...

"अजय घेऊन जा तुझ्या बायकोला रूममध्ये खूपवेळ बसून राहिली ती..."अजयची आई डोळयांनेच अजयला खुणावत बोलते...तसा अजय सुशांतीजवळ येऊन तिला रूममध्ये घेऊन जातो...ती गेल्यावर अजयची आई उभी राहते...

"पुन्हा जर इथे असलेल्या एका बाईने देखील माझ्या सुशांतीबद्दल वाईट बोलले तर ही समिक्षा परांजपे काय करेल तुमचं याचा अंदाज पण तुम्हाला बांधता येणार नाही...माझी ओळख तर वेगळी सांगायला काही गरजच नाही ना तुम्हाला सर्वांना बहुतेक..."अजयची आई सगळ्या बायकांकडे पाहत थोडी कडक आवाजात बोलते...त्यांचे ते बोलणे ऐकून सगळे थोडेसे घाबरतात आणि आपलं आपलं काम करायला निघून जातात...अजयच्या आईचे रूप पाहून राधा आणि सानिका शॉक होतात...पण बाकी अजयची टीम तर अजयच्या आईवर खुश असतात...

"आपली डॉन आय थिंक वापस येत आहे...समिक्षा परांजपेच्या पुढे तर कोणीच टिकू शकत नाही...लगे रहो आई"प्रदिप गुढपणे हसत बोलतो...त्याचे बोलणे ऐकून सानिका आणि राधा तर एकमेकींना पाहत राहतात... अजयचे बाबा पण अजयच्या आईला कौतूकाने पाहत असतात...

"चला जावा आपापल्या कामाला..."अजयची आई अजयच्या टीमकडे पाहत बोलते...तसे ते सर्व भानावर येत तिथून निघून जातात...

त्या दोन बायका जेव्हा आपापसात बोलत होत्या तेव्हा अजयची आई आणि पल्लवी तिथेच उभ्या होत्या...त्या दोन बायकांचे बोलणे त्या दोघीच्या कानावर पडले...ते बोलणे ऐकून अजयच्या आईला राग आला म्हणून त्यांनी मागचा पुढचा विचार न करता त्या दोघींच्या सणसणीत कानाखाली वाजवली...अजयची आईला सुशांती बद्दल कोणी वाईट बोललेल चालायचे नाही म्हणून त्यांनी अस केलं...
**************************

संध्याकाळ झाली तसे सगळे एक एक पाहुणे अजयच्या घरी यायला सुरुवात झाली...कारण आजची एंगेजमेन्ट अजयच्या घरातील गार्डन जवळ पार पडणार होती... आपले टीम मधील पल्लवी प्रदिप,राधा रवी,राघव रिया आपल्या आपल्या पिल्लांना मस्त तयार करून घेऊन आले होते...रुहीला सुशांती तयार करणार होती म्हणून ती तिच्यासोबत येणार होती...अजय,सुरेश पण गार्डन जवळ तयार होऊन आला होता...ते आता फक्त सानिका,सुशांती आणि रुहीची वाट पाहत होते...सगळयांचे आईबाबा पण तयार होऊन तिथे आले होते...ते सर्व आता गार्डनच्या मेन गेट कडे तिघींची वाट पाहत होते...

अचानकपणे गार्डन मधील लाईट सगळ्या बंद झाल्या आणि काही पांढरा रंगातील फोकस लाईट गार्डनच्या मेन गेटला थांबल्या...आधीच गार्डन मध्ये लग्न असल्याने अजयच्या टीमने मंडप तर तयार केला होता...पण एकदम असा खुल्ला खुल्ला मंडप होता...वरच्या बाजूला त्यांनी अजिबात कपडा टाकला नव्हता...कारण सानिकाला चांदण्याच्या प्रकाशात आणि अश्या खुल्या मंडपात इंगजमेंट करायची होती...म्हणून त्यांनी तस केले होते...

त्या फोकस मध्ये एक छोटी मुलगी चालत मस्त तयार होऊन येत असते...तिला पाहून सगळे भान हरपतात...

"माझी प्रिन्सेस किती भारी दिसत आहे..."रवी राधाला बोलतो...कारण ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून आपली रुही होती...orange पिंक कॉम्बिनेशनचा घागरा ओढणी तिने आज परिधान केली होती...ओढणी मस्त अशी पिनअप केली होती...केस असे मोकळे सोडले होते...हातात थोडयाश्या बांगड्या,डोक्यावर टिकली आणि चेहऱ्यावर थोडसा मेकअप करून ती त्या फोकस मध्ये चालत येत होती...मध्ये येता येता ती अचानक थांबते...ती थांबली तस म्युझिक सिस्टीमवर एक गाणं चालू होते आणि रुही त्या गाण्यावर ठेका धरायला लागते...(सॉंग-swag से करेंगे सबका स्वागत...)

Listen close to what I gotta say.
Cause you know there ain’t no other way
Love is the message

(रुही सगळयांना पाहत बोलते...ओठांवर एक वेगळंच हसू ...चेहऱ्यावर एकदम नटखट हावभाव...एकदम सुशांतीसारखे होते...अजयची टीम तर डोळे मोठे करून रुहीला पाहत होती...)

You ready?

(रुही विचारते तस सगळे लोक येस म्हणतात...तशी ती हसते...)

Let’s go

(ती अवि आणि धैर्यला थोडीशी पळत गार्डनच्या मेन गेट जवळ जाऊन घेऊन येते....तसे ते दोघे डान्स करतच रॉयल एन्ट्री आतमध्ये करतात...)

Yeah.. we can make it better.
Yeah.. when we come together.
Yeah.. all you got is me.
Yeah.. all I got is you!


Ishq se aage?
Kuch nahi kuch nahi kuch…
Ishq se behtar?
Kuch nahi kuch nahi kuch…
Ishq se upar?
Kuch nahi kuch nahi kuch…
Ishq bina hum kuch nahi…

(अवि समोर येत गाण्याचे कडवे बोलत डान्स करत समोर येतो...)

Ishq se uncha?
Kuch nahi kuch nahi kuch
Ishq se badhkar?
Kuch nahi kuch nahi kuch
Ishq se accha?
Kuch nahi kuch nahi kuch
Ishq bina hum kuch nahi…

(अवि सोबत काही डान्स परफॉर्मन्स करणारे मुलं मुली पण हे कडवं म्हणत मागे येतात....)

Chaahe jo aaye
Leke dil mein ishq mohabbat
Sabko gale lagaana
Apne culture ki hai aadat

(धैर्य रुहीला घेऊन गाणं म्हणत अविच्या ठिकाणी येतो आणि ते तसच रुहीला मध्ये ठेवतात आणि तिच्या बाजूला उभे राहून हात जोडून पुढील कडव म्हणतात...)

Swag se karenge sabka swagat!
♪ ♪ ♪ ♫
Swag se karenge sabka swagat!
♪ ♪ ♪ ♫

(या गाण्यात रुहीला त्यांनी मध्ये ठेवल्याने सगळयांच्या नजरा तिच्यावरच पडत होत्या...पडणारच आज आपली CCTV लय भारी दिसत होती...त्यात तिचा डान्स तर लाजवाब होता...)


Milke chalta chal
Masle karke hal
Behtar hoga kal
Ye sabse kahte rehna


Rehna banke dil
Dil hi hai manzil
Manzil pe tu mill
Sab sabka hai kehna kehna

(रुही मस्त अशी कंबर हलवत भारी वाला डान्स कडवं बोलत करते...तिचे ते हावभाव पाहून सगळयांना सुशांतीच त्यांच्यासमोर डान्स करत आहे असे वाटते...कारण सेम हावभाव रुहीचे होते...)

Chaahe jo aaye
Leke dil mein ishq ibaadat
Sabko gale lagaana
Apne culture ki hai aadat
Swag se karenge sabka swagat!
♪ ♪ ♪ ♫


Ya’ll ready to bring the riff back?


Swag se karenge sabka swagat!
♪ ♪ ♪ ♫

(रुही मस्त अशी एक हात नाकाजवळ नेत सलमान खानच्या style मध्ये नाकावर लावते आणि खाली करते...ते पाहून सगळे गालात हसतात...)

Hey.. ishq se pyara?
Kuch nahi kuch nahi kuch
Ishq se umdaa?
Kuch nahi kuch nahi kuch
Ishq se asaan?
Kuch nahi kuch nahi kuch
Ishq bina hum kuch nahi…

(रवी मध्येच राधाकडे पाहून हे कडवं बोलतो...ते पाहून राधा लाजते...)

Ishq se meetha?
Kuch nahi kuch nahi kuch
Ishq se gehra?
Kuch nahi kuch nahi kuch
Ishq se taaza?
Kuch nahi kuch nahi kuch
Ishq bina hum kuch nahi…

(रिया राघव जवळ जात त्याला पाहून हे कडवं बोलते आणि ती तशीच रुहीजवळ जाते...)

Insaan hai insaan jag mein
Jab tak ishq salaamat
Sabko gale lagaana
Apne culture ki hai aadat

(प्रदीप आणि पल्लवी दोघ सोबत गाणं म्हणत रुहीला जॉइंट होतात...)

Swag se karenge sabka swagat!
♪ ♪ ♪ ♫


Swag se karenge sabka swagat!
♪ ♪ ♪ ♫


Swag se karenge sabka swagat!

(सुरेश,अजय हे दोघ सोडून सगळे रुहीला जॉइन होऊन मस्त असे डान्स करतात....शेवटी गाणं संपते तसा ब्लास्ट चा आवाज होतो आणि सगळ्यावर फ्लॉवर च्या पाकळ्या पडतात ते पाहून सगळे हसतात....)

इकडे अजयची आणि सुरेशची नजर मात्र सुशांती आणि सानिकाला शोधत असते....तेवढ्यात पुन्हा म्युझिक सिस्टीमवर सॉंग लागते आणि सगळयांच्या नजरा मेन गेटवर जातात...तिथून मस्त अशी सानिका डान्स करत रेड कार्पेट वरून आतमध्ये येत असते...तिच्यामागे सुशांती चालत असते...त्या दोघींना पाहून अजय आणि सुरेशचा चेहरा खुलतो...

ओ हो हो हो हो
ओ हो हो हो हो
ओ हो हो हो हो..

अज्ज लगदी मैं तां मिस इंडिया
करे टीम टीम तारों वाली बिंदिया
मेनू नॉनस्टॉप तक्दे ने सारे
ओह वे माहिया

(सानिका मस्त असे बांगड्या हलवत सुरेश कडे पाहत डान्स करत असते...)

मेरे हाथ में है जो मेहंदी
बस नाम उसी का लैंदी
वो खोया कहाँ पे है ढूँढो ज़रा
ओह भाई

(सानिका आणि सुशांती हात उलटे करून पुढे धरत गाणं म्हणतात...नंतर सानिका आपला डान्स करते पण सुशांती उभी राहून फक्त हात असा चेहऱ्याजवळ नेऊन अजयकडे पाहून शोधण्याची acting करते...तीच ते गोड एक्सप्रेशनने अजयच्या हृदयाचा ठोका चुकतो...)


रिंग सेरेमनी अज्ज रखवा के
बैंड बाजा अज्ज पार्टी च बुला के
माहि मेरा किथे रह गया
कार्ड शगना दे अज्ज छपवा के

बैंड बाजा अज्ज पार्टी च बुला के
माहि मेरा किथे रह गया
रिंग सेरेमनी अज्ज रखवा के

(डान्स परफॉर्मन्स करणाऱ्या मुली दोघीना जॉईन होऊन डान्स करतात...इकडे सुरेशची नजर अजिबात सानिका वरून हटत नव्हती...)

ओ हो हो हो हो
ओ हो हो हो हो
ओ हो हो हो हो..

दिल मेरा सेंटी है
तू दिल ना मेरा तोड़ना हो..

(सानिका सुरेश जवळ जात सुरेशच्या खांद्यावर हात ठेवून बोलते...का कोणास ठाऊक तिचे डोळे भरतात...कारण सायली प्रकरण तिला आठवते...सुरेशला पण ते आठवते तसा तो पुढे होऊन सानिकाचे डोळे पुसतो आणि तिला आश्वासक करतो डोळयांनी...ते पाहून ती रिलॅक्स होते...)

दिल मेरा सेंटी है
तू दिल ना मेरा तोड़ना
कहते हैं नैन मेरे
ना नैन किसी से जोड़ना

(सुशांती फक्त उभी राहून हाताने मस्त अशी acting करत असते...ती अजिबात डान्स करत नव्हती...फक्त हातवारे करत होती...तिला अस हातवारे करताना पाहून मध्येच तिला बोलता येत नव्हते...तो प्रसंग आठवला...ते सर्व आठवून तिच्या डोळ्यात पाणी जमा झाले...तिने लगेच हात खाली केले...तिचे भरलेले डोळे पाहून अजय तिच्याजवळ आला आणि त्याने तिला जवळ घेतलं...)

अजयने तिला स्वतःपासून दूर केलं आणि डान्स परफॉर्मन्स करणाऱ्या ग्रुपला काहीतरी त्यांच्याजवळ जाऊन सांगितले तसा तो ग्रुप हसत सुशांतीच्या बाजूला आला...


O.. o.. o...
O.. o.. o...

Dil se dil ka rishta juda
Pal do pal mein mit.ta nahi
Bandhan dilon ka toot.ta nahi
Bandhan dilon ka toot.ta nahi

(सुशांती जवळ आलेली मूल मुली म्हणतात...त्यातील दोन मुलं तर गिटार हातात घेवून हे कडवं बोलत होते...ते पाहून सगळयांना भारी वाटत होते...)

Tere dil ka mere dil se
Rishta purana hai

(अजय सुशांतीकडे हात करून हे कडवं बोलतो...)

In aankhon se har aansoo
Mujhko churana hai
Mujhko churana hai..
Mujhko churana hai

(अजय सुशांतीजवळ चालत येत तिच्या डोळ्यांच्या कडांवर स्वतःच एक बोट फिरवत बोलतो...)

Tere dil ka mere dil se
Rishta purana hai
In aankhon se har aansoo
Mujhko churana hai
Mujhko churana hai..
Mujhko churana hai

(अजय थोडस हसतच कडवं बोलत असतो...त्याचा आवाज चांगला असल्याने सुशांतीला खूप भारी वाटत होते...तो आज खूप दिवसांनी तिच्यासाठी गाणं म्हणत होता...)

Tere dil ka mere dil se
Rishta purana hai


Teri bechaini ka, teri tanhayi ka
Ehsaas hai mujhko sun..

(अजय तिचे दोन्ही हात हातात धरत बोलतो...)

Main jo saath tere hoon
Phir tujhe hai kaisa gham
Dard baant lenge hum sun..

(सुशांतीच्या डोळ्यासमोरून आतापर्यंतच अजयने तिला दिलेली साथ हे सर्व प्रसंग निघून जातात...)

O.. o.. o...
O.. o.. o...

In palkon mein khushiyon ka
Sapna sajana hai
Tere dil ka mere dil se
Rishta purana hai

(अजय तिच्या पोटावर हात ठेवत थोडस हसत बोलतो...)

Kaise main bataaoon yeh
Tera is tarah rona
Dekha nahi jaata hai sun..
Shaam jab dhalti hai
Subah muskurati hai
Khushbuyein lutati hai sun..

(अजय तिच्या डोळ्यांत पाहत बोलतो...इथे फक्त दोघे डोळयांनी एकमेकांना बोलत असतात...त्यांचे बोलणे काही वेळापूरतेच असते...कारण मागे गिटार वाजते तसे दोघे भानावर येतात...)

O.. o.. o...
O.. o.. o...

Udaasi ke lamhon mein
Hamein muskurana hai
Tere dil ka mere dil se
Rishta purana hai
In aankhon se har aansoo
Mujhko churana hai

(अजय स्वतःच्या बोटांनी तिच्या तोंडावर हात फिरवून तीच हसणं मुठीत कैद करण्याची acting करतो आणि तो तसाच त्या बंद मुठीला आपल्या हृदयाकडे नेतो...ते पाहून सुशांती आणखीन खुदुखुदु हसते...ते पाहून अजय आणि बाकी सगळयांना आनंद होतो...कारण ती हसली ती आनंदी असली की सगळे आनंदी असायचे...)

सगळे अजयच टाळ्या वाजवून कौतुक करतात...अजय तसाच सुशांतीचा हात पकडतो आणि स्टेजवर घेऊन येतो...सुरेश आणि सानिका आधीच स्टेजवर येऊन थांबलेले असतात...

सानिका आणि सुरेश ने आज एकमेकांना मॅचिंग कडले होते...सुरेशने पिंक शेड कलरचा सदरा आणि व्हाईट कलरचा पायजमा घातला होता...तर सानिकाने पिंक शेड कलरचा लेंहंगा घातला होता...केस वरती style मध्ये बांधून त्यात फुल माळली होती...ओठांवर त्याच कलरची लिपस्टिक आणि चेहऱ्यावर भरपूर असा मेकअप केला होता...कारण आज तिचा दिवस होता ना म्हणून...दोघ खूपच भारी दिसत होते...

इकडे आपले अजयंती पण काही कमी दिसत नव्हते...ते तर लाजवाब दिसत होते...सुशांतीने ब्यागेंनी(जांभळा) क्रीम कलरच्या कॉम्बिनेशनचा लेहंगा घातला होता...दोन्ही हातात सोन्याचे कडे घातले होते...भांगेत बिंदी आणि कुंकू लावले होते...गळयात तीच नेहमीच नाजूक मंगळसूत्र होते...एक छोटासा नेकलेस सुध्दा होतात...चेहऱ्यावर एकदम लाइट असा मेकअप तिने केला होता...कारण तिला आवडायचा नाही ना जास्त मेकअप...त्यात तिने तिचे मोठे केस पण मोकळे सोडले होते...अजयला आवडतात म्हणून सोडले होते...खूपच सुंदर दिसत होती ती...अजय महाशय पण कमी नव्हते हा त्यांनि पण सुशांतीला मॅचिंग केलं होतं आज....क्रीम कलरची शेरवानी आणि त्याच रंगाचा पायजमा त्याने घातला होता...एका हातात ब्रँडेड घड्याळ...आधीच गोरा असल्याने तो यात मस्त दिसत होता...


सानिका आणि सुरेशच्या समोर अंगठीचे मस्त असे डेकोरेशन केलेलं ताट धरण्यात आले...ते ताट पाहून दोघांना काहीच कळले नाही...दोघे एकमेकांना प्रश्नांर्थ नजरेने पाहू लागले...त्यांचे असे चेहरे पाहून सगळयांना हसू आले...पल्लवी पुढे आली आणि त्यांना तिने एक अंगठी काढून दिली...

ते ताट गोल होते आणि त्यात मोठया अश्या दोन अंगठ्या होत्या...त्या मस्त अश्या सजवल्या होत्या...त्या अंगठ्यावर एक एक छोटासा गोल असा बंद बॉक्स होता...त्यात खऱ्या अंगठ्या लपवलेल्या होत्या... पल्लवीने एका बॉक्समधील अंगठी काढून सुरेशच्या हातात दिली...तस सुरेशने हसतच सानिकाच्या रिंग फिंगरमध्ये अंगठी घातली...ते पाहून सगळयांनी टाळ्या वाजवल्या...नंतर राधाने त्या बॉक्समधील दुसरी अंगठी काढून सानिकाच्या हातात दिली...तशी सानिकाने अंगठी हातात घेऊन सुरेशच्या बोटात घातली...ते पाहून सगळयांनी हसून त्यांना अभिनंदन केले...

अजयंती समोर पण तसेच ताट होते...पण थोडं डीफ्फेरेंट होते...मस्त असे फुलांनी सजवलेले आणि त्यात दोन हार्ट शेप्स चे बॉक्स होते...ते ताट पाहून अजयंतीला भारी वाटले...नंदिनीने त्यातील अंगठी काढून अजयच्या हातात दिली...अजय हसतच ती अंगठी धरतो आणि सुशांतीला घालायला जाणार तशी ती मस्ती मध्ये हात मागे करते...ते पाहून सगळे हसतात...अजय पुन्हा तिचा हात समोर आल्यावर तिला अंगठी घालायला जातो...ते पाहून ती हसतच पुन्हा हात मागे करते...ते पाहून अजय वैतागतो...तो पण काही कमी नव्हता...तो तसाच पुन्हा सुशांतीकडे अंगठी नेतो...पुन्हा सुशांती मागे हात करते हे पाहून तो सुशांतीच्या बाजूला उभ्या असलेल्या मुलीकडे अंगठी नेतो...ते पाहून सुशांती पटकन आपली रिंग फिंगर समोर करते आणि अजयच्या हातातील अंगठी स्वतःच्या बोटात घालते...ते पाहून सगळे तिला हसतात...

"माझ्यासोबत नो मस्ती पिल्लु..."अजय attitude मध्ये तिला बोलतो...त्याचा attitude पाहून ती स्वतःच्याच वेंधळ्या पणावर हसते...त्यांचे अशी मस्ती पाहून सगळे त्या दोघांना हसतात...रिया बॉक्समधील दुसरी अंगठी काढून सुशांतीला देते...अजयला अजिबात तिला त्रास द्यावासा वाटतं नव्हता म्हणून तो पटकन हात समोर करून रिंग फिंगर मध्ये अंगठी घालून घेतो...सगळे टाळ्या वाजवून या दोघांना अभिनंदन करतात...

नंतर हा सोहळा झाल्यावर सगळयांना खाली मस्त सोफ्यावर बसवले जातात...अजयंती आणि सुरेनिका यांना स्पेशल सजवलेल्या सोफ्यावर बसवले जाते...

सगळे बसल्यावर अजयची आई आणि अजयचे बाबा स्टेजवर जातात...ते दोघे हातात माईक घेऊन उभे असतात...

"आज माझ्या मुलांचा एंगेजमेन्ट सोहळा तुमच्या सर्वांच्या उपस्थिती मध्ये पार पडला त्याबद्दल सगळयांचे आभार...पण आज आमच्यासाठी हा दिवस खूप खास होता...कारण आमच्या अजयंतीचे लग्न आम्हाला आधीपासून भारी असे करायचे होते...पण काही कारणाने ते झाले नाही पण यावेळी आम्ही काहीही कमी पडू देणार नाही हा आमच्या मुलांच्या लग्नाला...त्यासाठी हा सोहळा आणखीन भारी बनवण्यासाठी आम्ही आज इथे वेगवेगळे कपल्स गेम ठेवणार आहोत..."अजयची आई हसतच सगळयांना पाहून बोलते...त्यांचे बोलणे ऐकून आपले कपल्स excite होऊन त्यांच्याजवळ पाहत असतात...

"मी तुमचा जास्त वेळ न घेता आमच्या सर्व कपल्सना स्टेजवर आमंत्रित करतो...अजयंती,सुरेनिका,राघव-रिया,धैर्य-श्वेता,अवि-नंदिनी,पल्लवी-प्रदिप,रवी-राधा...या सर्वांनी स्टेजवर लवकर यायचे आहे..."अजयचे बाबा सगळयांची नाव माईक वर बोलत बोलतात...सगळे नाव ऐकून सगळे कपल्स वेळ न दवडता स्टेजवर येतात...

"तर मंडळी आजवर या सगळयांनी जीवनसाथी म्हणून सगळ्या जबाबदाऱ्या आपल्या पार्टनरच्या पार पाडल्या आहेत...कोणीच कुठे कमी पडले नाही...सगळेजण हे सर्व करू शकले कारण त्यांच्या मध्ये असलेले प्रेम हे अविरत होते त्यामुळे...तसच आज पाहूया हे आज पण आपल्या जीवनसाथीला कस सांभाळून घेतात ते...त्यासाठी पहिला खेळ आहे "सोलाह श्रुंगार"..."अजयची आई थोडीशी हसत बोलते...त्या गेमच नाव ऐकून सुशांती लाजते...

"ऐ ऐ मी नाही खेळणार...अजय त्रास देतील मला या गेममध्ये..."सुशांती थोडीशी लाजत बोलते...तिचे बोलणे ऐकून सगळे तिला हसतात...

"सुशांती तुला माहिती आहे का हा गेम?"सुरेश विचारतो...तशी ती मानेने लाजत "हो" बोलते...

"सुशांती जो गेम समजत आहे ना तसाच गेम आहे...तुम्हाला तुमच्या बायकोला सोलाह श्रुंगार करून सजवायचे आहे...तुम्हाला मुलांना पाच मिनिटं दिले जातील बायकोला सजवण्यासाठी...त्यात तुम्हाला त्यांना आहे त्या ड्रेसवर साडी नेसवायची आहे आणि मेकअप करायचा आहे...जो व्यवस्थित करेल तो या गेमचा विनर असेल..."अजयची आई थोडीशी हसत बोलते...त्यांचे बोलणे ऐकून सगळयांच्या डोक्यावर आट्या पडतात...ते पाहून सगळयांचे आई बाबा त्यांना पाहून हसतात...पण ऑपशन काही नसल्याने सगळे तयार होतात...

प्रत्येक जोडीमध्ये अंतर ठेवून त्यांना उभे केले जाते...सगळ्या कपल्सच्या समोर एका मोठया ताटात साडी ठेवलेली असते आणि दुसऱ्या ताटात मेकअप सेट आणि दागिने ठेवलेले असतात...

"चल पिल्लु आपण पण खेळू हा गेम...नाही देणार मी त्रास बाळा तुला हा..."अजय लाडीगोडी लावत तिला बोलतो...कारण त्याला मगासचा बदला घ्यायचा होता ना म्हणून...आयती संधी आली होती चालून मग तो थोडीच सोडणार होता...

"खरं नाही देणार ना..."सुशांती...

"नाही देणार हा तुला त्रास..."अजय गुढपणे हसत बोलतो...त्याचे बोलणे ऐकून ती हसू लागते... त्याच्यासोबत ती गेमसाठी तयार होते...

"चला तर सगळे रेडी आहात ना?"अजयचे बाबा विचारतात...तसे सगळे ओरडून येस बोलतात...

"द time स्टार्ट now..."अजयची आई हसून बोलते...तसे सगळे बॉय हातात साडी घेऊन आपल्या आपल्या पार्टनरला नेसवायला लागतात...पण यांच्यातिल बरेच मुलांना ती कशी नेसवतात माहिती नव्हती...म्हणून ते विचार करत बसले होते...इकडे अवि आणि अजयने मस्त अशी साडी पूर्ण खोलली...अजयने साडीचे एक टोक सुशांतीच्या लेहंगामध्ये स्वतःच्या हाताने घातले...तो तसाच हात बाहेर काढत मुद्दाम सुशांतीच्या उगड्या कंबरेवर हळुवार चिमटा काढतो आणि हात बाजूला करतो...

"आउच अजय....मी मारेन हा तुम्हाला"सुशांती जोरातच बोलते...तिचे बोलणे ऐकून सगळे तिला पाहतात...

"काय झालं सुशांती का मारणार आहेस तू अजयला...???" अजयची आई तिच्याजवळ येत बोलते...त्यांचे बोलणे ऐकून ती भानावर येते...अजय तर मिश्किलपणे हसतच तिला पाहतो...

"काही नाही...असच बोलली..."सुशांती अजयकडे पाहत बोलते...

"ओके चला लवकर करा..."अजयचे बाबा बोलतात...अजय मुद्दाम साडी नेसवताना सुशांतीला त्रास देत होता...ते पाहून ती मध्येच चिडायची पण तिला देखील त्याचा स्पर्श हवाहवासा वाटत होता...अजयने साडी नेसवून सुशांतीला चेअरवर बसवून मेकअप करायला पण स्टार्ट केले...पण इकडे आपलं प्रदिप आणि राघव साडी साडीच खेळत होते...मुलींना बोलायचे नव्हते म्हणून ते फक्त या दोघांना रागात पाहत होते...खूप प्रयत्न करून सुरेशने पण कशीबशी साडी नेसवून घेतली सानिका ला...धैर्यला पण हे काही जमत नव्हते म्हणून त्याने हार मानली या गेममधून...

अजयने सुशांतीला त्रास देत आपलं मस्त असा श्रुंगार पूर्ण केला...त्यानंतर अवि आणि रवि ने पण केला...सगळ्यात शेवटी सुरेशने पण कसा बसा complete केला...

"Stop आता कोणीही सजवणार नाही आहे बायकोला..."अजयची आई माईक वर ओरडते...तसे सगळे थांबतात...गेम संपला म्हणून प्रदिप आणि राघव पुढच काही ऐकून न घेता तिथून हळूच गायब होतात...

"तर तुम्हाला सगळयांना दिसतच आहे कोण जिंकले ते...पण राघव आणि प्रदिप कुठे गेले त्यांना तर बक्षीस आहे आमच्याकडून..."अजयचे बाबा थोडेसे हसत बोलतात...तेव्हा पल्लवी आणि रिया बाजूला पाहतात तर दोघेही स्टेजवरून खाली पळत होते...ते पाहून दोघी धावत त्यांच्याजवळ जातात आणि चांगलं भाषण सूनवतात...ते पाहून सगळे हसतात...नंतर प्रदिप आणि राघव अँकरिंगला येतात....

" आता पुढचा गेम आहे डीसपोजल कप... या गेममध्ये प्लॅस्टिकचे कप तुम्हाला दिले जातील आणि यात मुलींनि ते कप मुलांच्या शरीरावर अडकवायचे आहेत...त्यासाठी तुमच्याकडे तीन मिनिट आहेत..."राघव थोडस हसत बोलतो...

"पण यात एक ट्विस्ट आहे..."प्रदिप गुढपणे हसत बोलतो...

"कोणता??"सगळ्या मुली...

"यात मुलं हात वर करून हँडसप मध्ये राहणार आहे...त्यात तुम्ही ते कप अडकवायचे कसे ते तुम्ही पहा..."प्रदिप हसतच बोलतो...त्याचे बोलणे ऐकून सगळयांना टेन्शन येते...पण अजय सुशांतीला नजरेने आश्वासक करतो...तशी ती हसून मान हलवते...

रिया,पल्लवी,श्वेता आणि रुही प्लॅस्टिकचे कप हातात घेऊन सुशांती,राधा,नंदिनी आणि सानिका कडे उभे राहतात...

"तर आता या सर्व जनी तुम्हाला कप देतील ते कुठे ठेवायचे आणि कसे लटकवायचे ते तुम्ही ठरवा..."राघव सगळयांना पाहत बोलतो...

"ओके तर आता तुमचा time स्टार्ट होत आहे हा...मुलांनी आपली पोझिशन घेऊन उभे रहा..."प्रदिप घडयाळकडे पाहत बोलतो...त्याचे बोलणे ऐकून सगळ्या मुली पटपट कप ठेवत असतात...सुशांती अजयच्या डोक्यावर कप ठेवायला सुरवात करते...इकडे नंदिनी चा स्पर्श होताच अविच्या अंगावर शहारे येत होते...त्यामुळे त्याच्या अंगावरील कप खाली पडत होते...ते पाहून तो खाली उतरतो आणि नको म्हणतो नंदिनीला...नंदिनी पण हसून खाली उतरते आणि बाकी सगळयांना पाहते...इकडे रवी राधा जोडी परफेक्ट game खेळत होती...अजय तर बिचारा स्वतःवर खुप कंट्रोल ठेवून गेम खेळत होता...सानिका कोणाची नजर नाही पाहून सुरेशला हात खाली घ्यायला सांगते आणि कप घालते...पण तेवढ्यात प्रदिपची नजर तिच्यावर पडते...

"डिसपोजल कप गेम आहे हा सानिका...नो chitting हा"प्रदिप हसून बोलतो...तशी सानिका गप्प पणे आपला गेम खेळत असते...

इकडे सुशांती अजयच्या नाकावर,खांद्यावर, डोक्यावर, हाताच्या बोटांमध्ये कप घालत असते...शेवटच्या वेळी अजयच्या कानामध्ये पण मस्त असे कप घालून ठेवते...अजय बिचारा दोन्ही हात वर करून उभा असतो...अजिबात न हलता...पण त्याला तस पाहून सगळे हसतात....सुशांतीने स्वतःचे चातुर्य वापरून अजयच्या अंगावर थोडीशी चढून बोटांमध्ये कप घातले होते...तिच्या अश्या करण्याने सगळे तिला हसत होते...

"सुशांती अजून कुठे कप ठेवायचे राहिले तर बघ...मी काय म्हणतो मी time वाढवतो आता गेमचा..."राघव थोडस हसत बोलतो...त्याचे बोलणे ऐकून सुरेश शॉक होतो...

"ऐ तू वाढवच राघव नाही तुला मारलं ना तर बघ..."सुरेश वैतागत बोलतो तसे त्याचे कप्स खाली पडतात...हे पाहून सगळे हसतात...

"Time stop"प्रदिप बोलतो...तसे सगळे थांबतात... सानिका मात्र भरपूर चिडते...

"अवि दादा ती क्रिकेटची बॅट आणा जरा...आज मला क्रिकेट खेळायचे आहे..."सानिका रागातच सुरेशकडे पाहत बोलते...तिचे बोलणे ऐकून सुरेश घाबरतो पण इकडे खरंच अवि हसून bat आणून देतो...तशी सानिका हातात bat घेते...

"आई तुझ्या सुनेला सांग हा अजिबात मला मारायचे नाही...माझी काहीच चुकी नाही..."सुरेश चिडत बोलतो...

"सानिका माझ्याकडून पण चार पाच दे हा..."सुरेशची आई बोलते...तसे सगळे हसतात...सुरेशला कळते आपले काही खरे नाही तस तो पळून जातो...सानिका त्याच्या मागे धावते...पण सुरेश काही तिला मिळत नसतो...यांची पकडापकडी पाहून सगळे हसतात...

"हा लास्ट गेम आहे हा...यात मुलांना घरातील सगळयात महत्तवाची गोष्ट आणायची आहे...त्यासाठी तुमच्याकडे दोन मिनिटे असतील...अजय,रवी रेडी आहात ना?"प्रदिप बोलतो...त्याचे बोलणे ऐकून दोघे "हो" बोलतात...

"चला तुमची वेळ सुरू होत आहे आता..."राघव बोलतो...तसा रवी अजयच्या घरात धावत जातो आणि वस्तू शोधत असतो...अजय मात्र जागचा हलत नाही ते पाहून सगळे शॉक होतात...पण सुशांती मात्र त्याला बोलते...

"अजय जा बाबा तुम्ही मला हरवत आहात...त्यापेक्षा आपण खाली जाऊया ना..."सुशांती चिडत अजयला बोलते आणि ती खाली उतरत असते...ते पाहून अजय तिचा हात पकडतो आणि तिला जवळ पकडून थांबवतो...सगळे तर अजयला अस काही न करता पाहून गोंधळतात...इकडे रवी आपली वस्तू घेऊन बाहेर सुद्धा येऊन स्टेजवर येतो...

"या खेळाचा विजेता आहे......"अजयचे बाबा मध्येच उठून येत बोलतात
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
क्रमशः
©® भावना सावंत(भूवि)
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

[email protected]@[email protected]

Bsc Cs

माझ्या कल्पनेच्या विश्वात तुमचे स्वागत आहे...