Mar 01, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

जीवनरेखा (भाग- १)

Read Later
जीवनरेखा (भाग- १)


    कथा मालिका

    शिर्षक - जीवनरेखा ( भाग १ )

    विषय  - कौटुंबिक कथा

    फेरी - राज्यस्तरीय करंडक कथा मालिका स्पर्धा.


     लिहावं कुटुंबाविषयी, शब्दही आनंदी होतील बापडे...

     बोलावं कुटुंबाविषयी, निसर्गही झुकेल ज्याच्यापुढे .


'अगं ! ए सायली उठ नां. 'आज तुझ्या आजीचा वाढदिवस,

त्यांच्यासाठी गिफ्ट आणायचे, इतर तयारी करायची. उठ

आणि हो लवकर तयार. सायली ची आई सायलीला आवाज 

देत होती. 'हो आई, आलेच बघ मी.' सायली म्हणाली.


खुशालराव आणि वीणाताई. या दांपत्याला तीन मुले.

रविकांत, श्रीकांत व लक्ष्मीकांत. रविकांतची पत्नी रजनी,

श्रीकांत ची पत्नी सुषमा व लक्ष्मीकांत ची पत्नी लीना.

या सर्वांचं एक संयुक्त कुटुंब. अतिशय समाधानी. सर्व भावंडांचे

एकमेकांवर अतिशय प्रेम. वडील खुशालराव अगदी उमदं..

व्यक्तिमत्व. एकदम ठणठणीत. पांढरे शुभ्र केस, पिळदार मिशा,

सडसडीत बांधा. अत्यंत उत्साही .त्यांचा पेन्शनर लोकांचा एक ग्रुप.

रोज सकाळी उठून फिरायला जाणे, एकमेकांचे वाढदिवस साजरे..

करणे. असे सदैव चालायचे. खुशाल रावांची पत्नी वीणाताई.

अत्यंत समजूतदार.

सायली ,रविकांत आणि रजनी ची मुलगी. आज सायलीच्या..

आजीचा वाढदिवस. 'अगं आई ,आजी कुठे आहे?अगं सायली, मी बाहेर झाडाची फुले तोडत आहे. आजी म्हणाली.

सर्व नातवंडांवर आजी आजोबांचे निरातिशय प्रेम. संयुक्त

कुटुंब म्हटले की नातवंडांवर आजी आजोबांकडून चांगले संस्कार

घडतात. श्रीकांत व सुषमा चा मुलगा राम. अतिशय हुशार.

नुकताच बारावी मध्ये चांगले गुण मिळवून इंजीनियरिंग कडे

वळलेला. लक्ष्मीकांत आणि लीनाचा मुलगा पराग. दहावीची परीक्षा

अलीकडेच उत्तीर्ण झालेला. सर्व नातवंडांनी आपल्या आजीला

वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. नातवंडांना तिचा फार लळा.

आजीचे विचारही तितकेच प्रगल्भ होते. ती नेहमी म्हणायची.

माणसाच्या वाणीतून त्या व्यक्तीचे आचार- विचार, संस्कार,

ज्ञानाची सखोलता, बुद्धिमत्तेचे तेज झळकत असते. वाणीतील 

सहजता, नम्रपणा, शब्द भांडार उच्चारणाची ढब हा व्यक्तिमत्त्वाचा

महत्त्वाचा पैलू आहे. आजी आजोबांच्या अशा योग्य

संस्कारांमुळे नातवंडे घडत होती.


आजीसाठी बर्थडे गिफ्ट आणायला तसेच इतरही काही वस्तू

घ्यायला ती बाहेर पडली. जाता जाता ती आजीला म्हणाली,

'आजी सांग बरं तुला काय गिफ्ट हवं आहे.?'

सायली .

 'अगं, माझी मुलं, सूना, तुमच्यासारखी नातवंडं, हेच तर माझ्यासाठी

गॉड गिफ्ट आहे. मला आता काहीही नको. 'आजी म्हणाली.

'बरं ,मीच बघते काय आणायचे ते.'

अशा रीतीने सर्वांनी आजीचा वाढदिवस घरच्या घरी पण

अतिशय छान पद्धतीने साजरा केला.

सायली मुळातच हुशार. नुकतीच डॉक्टर झालेली. सुंदर आणि

संस्कारी सायली साठी आता वर संशोधन सुरू झाले. आणि

लवकरच डॉक्टर सुशील सोबत तिचे लग्न झाले. सुशील

नावाप्रमाणेच अत्यंत सुशील मुलगा. सायलीला मिळालेल्या

योग्य संस्कारांमुळे तिने सासरी जाताचं सासरच्या सर्वांना

आपलेसे करून घेतले.

मात्र सायलीचे लग्न झाल्यामुळे तिच्या माहेरच्या घरात

तिची अनुपस्थिती खूप जाणवत होती. सर्वांनाच तिची खूप

आठवण येत होती. खरंच मुलीला माहेरचे सर्व नातेबंध तोडून

सासरी जावे लागते. सायली सासरी खूप खुश होती.

अधून मधून ती आजी आजोबा तसेच सर्वांना भेटायला यायची.


आता श्रीकांत चा मुलगा राम सुद्धा इंजिनियर झाला होता.

आणि एका चांगल्या कंपनीत रुजू सुद्धा झाला. आता घरात

सून आणावी असं सर्वांना वाटू लागलं जेणेकरून सायलीची

उणीव भरून निघेल. आजीला सुद्धा नातसून हवी होती.

ती नेहमी म्हणायची 'अरे राम, मला नातसून बघायची आहे रे.'

'हो नां गं आजी. मला थोडं सेटल होऊ दे. मग बघू.'कसली एवढी लग्नाची घाई गं.

राम म्हणायचा.

'बरं बाबा होऊ दे तुझ्या मनासारखं.'

एक दिवस राम साठी एक चांगलं स्थळ चालून आलं. मुलगी

देखणी होती.M.S.C. झालेली. सर्वांनी होकार दिला.

आणि रामचं लग्न अगदी धुमधडाक्यात पार पडलं. आजीला

तर नातसूनेला अगदी कुठे ठेवू नि कुठे नाही असे झाले होते.

कारणही तसेच होते. रामची बायको रश्मी अगदी सोज्वळ 

मुलगी होती. तिने आपल्या स्वभावाने लवकरच सर्वांना

आपलेसे करून घेतले. राम आणि रश्मी ची जोडी अगदी

दृष्ट लागण्यासारखीच होती. घरातील सर्वच जण खूप

आनंदित होते.


पाहता पाहता एक वर्ष निघून गेले. रश्मी आता संसारात पूर्णपणे

रूळली होती. घरातील सर्वांचीच ती खूप काळजी घ्यायची.

विशेषतः खुशालराव आणि वीणाताईंची तिला जास्त काळजी असे.

त्यामुळे रश्मी जणू सर्वांच्या गळ्यातील ताईत बनली होती.

तसे तिला सर्वजण म्हणून सुद्धा दाखवायचे.

'अगं रश्मी तू आमची सून नसून मुलगीच आहे बरं.'

रश्मीलाही ते ऐकून खूप छान वाटायचं. लगेच ती भाऊक..

व्हायची. कारण तिची आई ती लहान असतानाच मृत्यू पावली होती.

पण सासरी मात्र सर्वांकडून तिला आई-वडिलांचे प्रेम मिळत होते.

सायली ही अधून मधून त्यांच्या भेटीला यायची. त्यामुळे

सायली आणि रश्मी दोघी मैत्रिणीचं झाल्या होत्या.


खरंच प्रेमानेच प्रेम मिळते. कोणतीही मुलगी सासरी जाताना

आधीच थोडी इमोशनल असते. तिला सासरच्या मंडळींकडून

प्रेम, आधार हवा असतो. कुणीतरी म्हटले आहे...

      मुलगी मन असेल तर सून नशिबाने लाभलेलं धन आहे...

      मुलगी संस्कृती असेल तर सून परंपरा आहे...

      मुलगी सौभाग्य असेल तर सून परम भाग्य आहे.


     " ससुराल और मायका है दो नदी की धारा...

     जो एक नारी में समा कर नारी को बनाती है..

     सागर सा गहरा."

अशाप्रकारे खुशालराव आणि त्यांचे सर्व कुटुंबीय अत्यंत

सुखी आणि समाधानी होते. अशातच रामला दुसऱ्या कंपनीकडून

जास्त पॅकेजची ऑफर आली. त्याने ती कंपनी जॉईन करायचे

ठरवले. मात्र त्याला आता दुसऱ्या शहरात जावे लागणार होते.

घरातील सर्वांच्या दृष्टीने ही गोष्ट संमिश्र स्वरूपाची होती.

कारण मुलगा मोठ्या हुद्द्यावर जातो आहे हा आनंद. तर

रश्मी आणि राम आपल्याला सोडून दुसऱ्या ठिकाणी राहायला 

जाणार याचं दुःख देखील. पण स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून

सर्वांनी त्यांना जाण्याची परवानगी दिली.


रश्मीला आपल्या सासरच्या लोकांना अजिबात सोडवत नव्हते.

पण इलाज नव्हता. अशा तऱ्हेने ती दोघं दुसऱ्या शहरात

जाण्यासाठी तयार झाले. तो क्षण सर्वांच्या दृष्टीने निश्चितच

भावनाप्रधान होता. रश्मी तिच्या तिन्ही सासू, आजी सासू

यांना धरून धरून खूप रडत होती. शेवटी सर्वांनी त्यांना

प्रेमाचा निरोप दिला.

काळजी घ्या. वरचेवर फोन करत रहा. असे एकमेकांना म्हणत

रश्मी आणि राम दुसऱ्या शहरात जाण्यासाठी निघाले.


आता पुढील भागात रश्मीच्या जीवनात कोणते संकट आले

हे पाहण्यासाठी या कथा मालिकेचा दुसरा भाग अवश्य वाचा.

क्रमशः

कथा मालिकेचा हा भाग आवडला असल्यास अवश्य

लाईक व कमेंट करा.

धन्यवाद

लेखिका- सौ. रेखा देशमुख

टीम- अमरावतीईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//