जिवलगा
भाग 3
मौन नात्यातले बोलते सारखे
शब्द माझेच आता मला पारखे
अंतरंगातले रंग हे शोधण्या
भेटलो एकमेका मनासारखे
रोज दारावरी सांज ओथंबते
भोवताली तरी चांदणे दाटते
ओघळे थेंब गाली सुखाचा
मिटे अंतर लपेटून घेता
तूच माझी मीच तुझा, सखा
"जिवलगा, जिवलगा"
मर्म बंधातल्या ह्या सरी बरसता
ऊन वाटेतले सावली भासते
तूच ह्रदयात ही तूच श्वासात ही
"जिवलगा, जिवलगा"
(*टीप* - कविता माझी नाही *)
दोघांच्या मनाच्या परिस्तिथी काही शी अशीच असते...
मनाशी निर्धार तर दिया ने केला पण डोळे आणी वागणे तिला कधि कधि साथ देत नव्हते
जय आठवडा भरात ठणठणीत बरा झाला होता, आणि दिया ला रडु बाई म्हणुन म्हणून तिच डोक खराब केले होते त्याने
पण त्याला मनोमन खुप बरे वाटले होते की त्याला लागले हे तिला सहन झाले नाही...
शेवटचे वर्ष म्हणून सर्वानी खुप धमाल करत घालवायच असे ठरवले, मग काय पिकनिक, मुवि, पार्टी सर्व जोरात झाले ह्या वर्षी....ह्या सोबत त्यानी अभ्यास पण चालू ठेवला होता.
बघता बघता वर्ष कधि संपले समजलेच नाही, एप्रिल महिना उजाडला होता, आता परिक्षा, अभ्यास, सबमिशन्स चालू झाले होते.
हुश्श....संपले एकदाचे पेपर..असे म्हणत दिया, जय, समिर आणि सर्व आण्णा च्या कँटीन ला बसले होते..
गेल्या दोन वर्षांत जय ने दिया च्या कॉफी मधे आणि तिच्या आयुषात ही गोडवा आणि रंग भरले होते...आता दिया तशी कडू कॉफी पित नव्हती
दिया ने सांगितले की ती आता ती 2 दिवसा नंतर लगेच नाशिक ला जातेय कायमची
ते एकुण जायच्या हातात ला कॉफी चा ग्लास निसटला आणि फुटला समिर ने सावरुन घेतले. समिर म्हणाला काय ग असे बॉम्ब टाकते अचानक...
दिया - सम्या आधी सांगितले तसे परिक्षा सोडून हेच पुराण चालेल मला अंदाज होता....म्हणून असे सांगितले
समिर - अग पण रेझिल्ट तर लागू देत कायमचे जायचे का डोक्यात घेतले आहेस....
दिया - सम्या तूम्हाला तर माहितीच आहे पुढच्या महिन्यात माझ्या दोघी बहिणीची लग्न आहेत आणी मला काही तरी वेगळे करण्याची इच्छा आहे अजून शिक्षण घेऊन वेळ घालवायचा नाही मला.
सर्व एकदम शांत होतात.
जय - अरे ती नाशिक ला जातेय फक्त चंद्रा वर नाही आणि उगाच वातवरण हलके करतो. त्याला माहित होते हे होणारच होते.
सर्व दिवस भर दंगा मस्ती करत दिवस घालवतात.
पुढचे दोन दिवस पण असेच निघुन जातात...
दुसर्या दिवशी सकाळी सर्व भेटतात मस्त सकाळी 7 नाश्ता करतात 10 वाजता तिची बस असते निघताना सर्व खुप भावुक होतात.
दिया रडून रडून रडु बाई झलेली असते जय मात्र फक्त तिला चिडवत असतो...मग तोच तिला बस मधे बसवून देतो...आणि त्याच्या नकळत डोळ्यांतून पाणी यायला लागले असते...दिया ची अवस्था काय वेगळी नसते.. बस निघते आणि तिचा एक नविन प्रवास चालू होतो...
फ़ोन, मेसज ने सर्व मित्रांची बोलणी होत असतातच.. रिझल्ट लागुन एव्हाना सर्वानी आपली आपली दिशा ठरवली असते...पण
जय ला दिया आयुषात नसणे ही गोष्ट सहन होत नसते...आणि तो त्याच्या वडिलांच्या मित्रा च्या उद्योगात मला काम करायची इछा आहे असे सांगून अमेरीकेत बॉस्टन ला जाण्याचा निर्णय घेतो...आणि पुढच्याच आठवड्यात जाणार असतो...
दिया ला तिच्या बहिणीच्या लग्नात एका उच्च शिक्षित आणि अति श्रीमंत मुलाचे स्थळ चालून येते...मुलगा एकटाच असतो आई वडिल दोघे नसतात, लग्ना नंतर शिक्षण ला हरकत नाही असे कळवतो...मग असे सोन्या सारखे स्थळ कशाला कोणते ही मध्यम वर्गीय सोडतील... 1 महिन्यातच लग्न करायचे असे ठरते...
इथे जय आणि त्याची आई अमेरिकेत जाऊन 1 आठवडा झाला असतो...जय ने दिया ला मुद्दाम त्याच्या अमेरीका जाण्याचा निर्णय सांगितला नसतो..
दिया जय ला कॉल करते...
दिया - जय माझे लग्न ठरले आहे.
जय - अरे वा मज्जा आहे पण तुला तर काही तरी बनायचे होते ना??
दिया- अरे सर्व छान आहे, आणि लग्ना नंतर मला हवे ते करण्याची मुभा आहे
जय- अग तुला गडबडीत सांगितले नाही मी ही पप्पां च्या मित्राला इथे अमेरिकेत जॉईन केलय आत्ता काही वर्ष इथेच... हे दिया ला खुप लागले मनाला...तिने नंतर बोलते सांगून फोन ठेवून दिला.
आज पर्यंत मनात असलेल्या भावनांचा बांध फुटलातिने खुप रडून घेतले...खुप त्रास झाला तिला....पण तिला वाटले साधे सांगावे वाटल नाही मला
जय ची अवस्था पण तिच होती...तिचे लग्न हे एकून च त्याचे हालत खुप वाईट झाली....
जय आई कडे गेला...तिच्या मांडीवर डोके ठेवून लहान बाळा सारखा रड्ला आणि तिला सर्व सांगितले...
महिना असा निघुन गेला...दियाच्या लग्ना ला सम्या गेला होता पण जय ने फक्त मेसेज ने शुभेच्छा दिल्या होत्या... दिया ला खुप राग आला होता त्याच्या न सांगता जाण्याचा तिने पण नाही केला कॉल त्याला
लग्नाला एक महिना झाला होता...आणि एका संध्याकाळी जय चा दिया ला कॉल येतो...उचलावा की नाही ह्या विचारात ती उचलून त्याला खुप ओरडायचे म्हणून उचलते..
जय - कशी आहेस??
दिया - तुला आज आठवले का??? मी कशी आहे ते...
जय - काय ग काय झाले मला वाटले आधी खुप शिवी गाळ कानात जाईल खुप बोलणारी मला वाटेल तशी शिव्या देणारी आज इतक्या सभ्य पणे बोलतेय
काय झाले???
दिया - तुला न बोलता कसे कळते रे...दिवस भर एकटी असते रे घरात पैसा खुप आहे पण बोलायला कोणीच नाही रे
जय - अग काय हे ...होईल ग सवय हळू हळू..
मला सांग मी जर विचारले असते माझ्या शी लग्ना करशील का तर केले असतेस का????
दिया- बरे झाले रे नाही विचारले ते...
जय - का ग इतका वाईट आहे का मी???
दिया - नाही रे मी.....हो बोलली असते ना आणि तिच्या भावना अनावर झाल्या
दिया जय आहेस ना बोलना काही तरी...पण पलिकडून काहीच उत्तर नाही....
पण फोन तर चालू होता...
अचानक तिला जय च्या आईच्या रडण्याचा आवाज आला....
तिने फोन कट करुन अनेक कॉल केले पण कोणीच उचलले नाहित...अर्ध्या तासात तिला
सम्या चा कॉल आला ती त्याला काही सांगणार तितक्यात तो खुपच रड्त बोलला जय गेला ग दिया....
To be continued for last part
$ हेमांगी सुर्यवंशी $ ©®
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा