जय....वेडी 3

जय नयन

भाग 3

Hey........ Nayan......... देवळात आई सोबत आलेल्या जय ला नयन दिसली आणि त्याने तिला आवाज दिला..

Hello doctor..,..... ती त्याच्या जवळ जात बोलली,  त्याला तिथे इतक्या दिवसांनी बघून तिला खूप आनंद झाला होता......त्याच्या पण चेहऱ्यावर खूप आनंद दिसत होता..

कशी आहेस??.....आणि ज्योती , ती कशी आहे आता??.....जय

मी छान आहे, ज्योती पण ठीक आहे....तुम्ही कसे आहात..??......नयन

कसा दिसतोय.....??.....जय

तिने त्याच्या प्रश्र्नातला रोख जाणला होता.....आणि तिने त्यावर तिला कसेतरी स्मायल दिले..

जय........ आवाज देत त्याची आई त्याला शोधत तिथे आली......
अरे कुठे गायब झाला होता........?....आई

अग आई माझी मैत्रीण भेटली खूप दिवसांनी....म्हणून बोलत होतो.....आई ही नयन, आणि नयन ही माझी आई............ जय दोघींची ओळखी करून देत होता

नमस्कार काकु.....नयन ने आईसमोर हाथ जोडून नमस्कार केला.......पण आई चे लक्ष नयन सोबत असलेल्या दोन मुलांकडे होती..,पाहताच लक्षात येत होते की ती गरीब घरची आहेत......त्या मुलांचा अवतारच बघून जय च्या आई च्या चेहऱ्यावरचे भाव बदलले.....आणि तिने नयनला कसेबसे स्मायल केले......ते बदललेले भाव नयन ने बरोबर टिपले.

तू आज इथे...??.......जय

हो....आमच्या या छोट्या कान्हा चा आज वाढदिवस आहे ना, म्हणून त्याला आज फिरवायच प्रॉमिस केले होते.....तर सुरुवात देव बाप्पांच्या आशीर्वाद पासून....नयन ने हसून खूप प्रसन्नतेने उत्तर दिले...

अरे वाह.....छोटू सरकार.... हॅपी बर्थडे......जय ने त्या छोट्या मुलाला कडेवर उचलून घेतले....नयन ला ते बघून त्याचं खूप कौतुक वाटलं......पण जय च्या आईला मात्र ते आवाढले नव्हते....पण त्यांना त्यांच्या मुलगा कसा आहे माहिती होते, म्हणून मग त्या फार काही बोलल्या नाही....

अरे जय, मला उशीर होतोय......आई

अ.....हो......... बरं नयन तू इथेच थांब मी पंधरा मिनिटात आलो....जाऊ नका कुठे.........तो त्या लहान मुलाला खाली उतरवत बोलला

नयन ने मान हलाऊन होकार दिला.....

जय आईला घेऊन पुढे गेला.....

काय रे हे कसे कसे मित्र बनवतो तू.......शोभतात तरी काय तुला........आई, आणि नेमक ते बोलणं नयन च्या कानावर पडलं.......नी तिला ते ऐकून खूप वाईट वाटले

आई, अगं ती नयन, खूप गोड मुलगी आहे,.....चालतच तो आईला तिच्याबद्दल सांगत जात होता......

नयन तिथेच एका साईड ला बसून जय ची वाट बघत होती....बरोबर पंधरा ते वीस मिनिटात जय परत आला होता......तो आई ला घरी पोहचून परत आला होता...

चला........जय

कुठे....??.......नयन

अगं तूच म्हणाली ना आज तुमचा फिरायचा प्लॅन आहे......जय

हो, पण तुम्ही...??.......नयन

अग आज मला पण सुट्टी आहे.....तर म्हटले या छोटू राम ला माझ्याकडुन ट्रीट......जय

अहो पण........नयन

आता पण बिन काही नाही, मला पण माझ्या फ्रेंड सोबत वेळ घालवायला मिळेल.......म्हणत जय ने त्या लहान मुलाचा हाथ पकडला नी पुढे जायला निघाला

नयन पण त्याच्या मागून दुसऱ्या लाहाण्या मुलीचा हाथ पकडून निघाली..
जय ने दोन्ही मुलांना कारच्या मागच्या सीट वर नीट बसवले......मुलांना पण कार मध्ये बसून खूप आनंद वाटत होता....त्यांच्या चेहऱ्यावरून च तो दिसत होता.........आधी तर नयन ला थोड ऑकवर्ड वाटत होते, पण मुलांच्या चेहऱ्यावर चा तो आनंद बघून तिला पण खूप आनंद झाला....

जय ने नयन साठी पुढले दार उघडले......मॅडम या बसा.....त्याने हाताने तिला इशारा केला....नयन ने त्याला स्मायल दिले नी ती आतमध्ये जाऊन बसली..

जय ने गाडी आधी एका रेस्टॉरंट मध्ये घेतली.....तिथे सगळ्यांनी भरपेट नाश्ता केला.......जय ने सगळं लहण्या मुलांच्या आवडीचे मागवले होते.......मुलांना तर खूप आनंद झाला होता......नयन फक्त त्या तिघांना बघत होती.....नंतर जय ने सरळ गाडी एका वॉटर पार्क मध्ये नेली.........

अहो डॉक्टर......इथली तिकिटं खूप महाग असतील हो.......नयन

नयन किती विचार करते आहेस.........आणि मी अस्तांना तुला मी देऊ देणार आहे काय...??.....तू तुझा एक दिवस माझ्यासोबत घालवायला तयार झाली..... त्याचं मोल मी आयुष्यभर नाही चुकाऊ शकत........जय

क....काय...?...... नयन एकटक त्याच्याकडे बघत होती, त्याच्या डोळ्यात तिला खूप प्रेम दिसत होते......तिने झटकन मान दुसरीकडे वलावली.......

काय...?...का काय......आज फक्त एन्जॉय करायचं, जास्ती विचार नाही करायचा........okay..... जय तिला बोलून पुढे तिकिटं काढायला गेला.....
त्या चौघांनी पण तिथे खूप एन्जॉय केली....जय मुलांना घेऊन प्रत्येक राईड वर गेला......त्याने त्यांच्या सोबत खूप फोटो काढले....अधूनमधून नयन च लक्ष नसताना त्याने नयन चे सुद्धा काही छान छान फोटो क्लिक केले..... दुपारी दोन वाजेपर्यंत त्यांनी तिथे खूप धमाल केली ... आता मुलं थकले होते भूक लागली होती..... जय सर्वांना घेऊन जेवण करण्यासाठी परत एका रेस्टॉरंटमध्ये गेला......जेवण आटोपून सगळे बाहेर पडले......दमल्यामुळे मुल पेंगायला लागली होती, आणि थोड्या वेळातच ती झोपली सुद्धा......जय गाडी ड्राईव्ह करत होता...........
 

डॉक्टर किती चांगले आहेत....इतका श्रीमंत हुशार मुलगा, पण अजिबात कशाचा घमेंड नाही....दुसऱ्यांच्या आनंदात किती खुश होतो......नयन खिडकी मधून बाहेर बघत विचार करत होती.....आणि नकळतच अधूनमधून तिला त्याला बघायचा मोह होत होता....केस नीट करायच्या बहाण्याने ती त्याच्याकडे बघत होती...

काहीतरी आहे ती मैत्री पेक्षा पण वेगळी बाँडींग आहे, का त्यांच्याकडे माझं मन ओढाल्या जातेय.....का त्यांनाच बघावेसे वाटतेय.....दूर राहण्याचा प्रयत्न करूनही का सतत ते माझ्या डोक्यात आहेत....मी प्रेमात तर पडले नाही ना डॉक्टरांच्या.........नाही नाही असे नाही होऊ शकत...तिच्या मनात विचारांचे काहूर माजले होते....

नयन खिडकीतून बाहेर बघत होती.....वाऱ्यावर उडणारे तिचे लांब मोकळे केस , वारंवार त्यांना सावरत कानामागे अडकवण्याचा असफल तिचा प्रयत्न........त्यामुळे होणारा तिच्या खनखनणाऱ्या मधुर आवाज......त्याचं लक्ष वेधून घेत होते तो ड्राईव्ह करता करता अधूनमधून तिच्याकडेच बघत होता.......... ती काहीच बोलत नव्हती,  त्या दोघांमध्ये एकदम शांतता होत...,त्याने  म्युझिक सिस्टम वर मग  सॉन्ग सुरू केले...... जणूकाही त्याचा मनातलेच बोल बोलत होते ते गाणं.....

ना कजरे की धार
ना मोतियों के हार
ना कोई किया सिंगार
फिर भी कितनी सुंदर हो
तुम कितनी सुन्दर हो

मन में प्यार भरा
और तन में प्यार भरा
जीवन में प्यार भरा
तुम तो मेरे प्रियवर हो
तुम्हीं तो मेरे प्रियवर हो

सिंगार तेरा यौवन,
यौवन ही तेरा गहना
सिंगार तेरा यौवन,
यौवन ही तेरा गहना
तू ताज़गी फूलों की,
क्या सादगी का कहना
उड़े खुशबू जब चले तू,
उड़े खुशबू जब चले तू,
बोले तो बजे सितार
ना कजरे की धार
ना मोतियों के हार
ना कोई किया सिंगार 
फिर भी कितनी सुंदर हो
तुम कितनी सुन्दर हो

गाण्याच्या बोल ऐकून नयन च लक्ष जय कडे गेले...नी तेव्हांच जय ने सुद्धा तिच्या कडे बघितले.....आणि दोघांची नजरानजर झाली.....आता त्याला पण तिच्या नजरेत काही जाणवले होते......आता आणखी उशीर नको...... हीच योग्य वेळ आहे जाणून त्याने गाडी साईड ला एका घनदाट वृक्षा जवळ थांबवली..

काय झालं डॉक्टर, अशी अचानक मध्येच का थांबवली कार...??.....नयन

नयन मला खूप महत्वाचं बोलायचं आहे तुझ्यासोबत......जय

त्याचं वाक्य ऐकून तीच हृदय जोरजोराने धडधडायला लागले......तो कर मधून बाहेर आला.....आणि त्याने तिच्या साईड चे दार उघडले.....ती घबारातच बाहेर आली...... तो तिच्या पुढ्यात येऊन उभा राहिला,पण सुरुवात करावी कुठून त्याला काहीच कळत नव्हते........ती नाही म्हणाली तर, याची सुद्धा त्याला भीती वाटत होती.....पूर्ण धीर एकवटून शेवटी त्याने बोलायला सुरुवात केली...

नयन.......मी तुला पहिल्यांदा हॉस्पिटल मध्ये बघितले, नी तुला बघताक्षणी मी तुझ्या प्रेमात पडलो....मला तू खूप आवडते, माझ्या आयुष्याची सोबती बनशिल.....I Love you Nayan, will you Marry me....... तो भर रस्त्यावरच तिच्या पुढ्यात खाली गुढग्यावर बसला ...नी आपला एक हाथ पुढे केला नि खूप अपेक्षेने तिच्याकडे बघत होता.....

इतका मोठा डॉक्टर तिच्या पुढ्यात बसला होता इतक्या सगळ्या लोकांपुढे........तिचा हाथ मागत....तिला आज तिच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंद भेटला होता, इतका मान त्याने तिला दिला होता......तिच्या डोळ्यात आनंदाश्रू जमा झाले होते.......ती त्याला बघण्यात गुंतली होती......डोळ्यात पाणी, ओठांवर हसू अशी समिश्र भाव तिच्या चेहऱ्यावर होते....तिला पण तो आवडत होता......आणि ती तिचा एक हात ती पुढे करत होती...

ये.... हट.... जा तिकडे......कुठून कुठून येतात भिक मागायला.....चांगले लोक बघितली नाही की लागतात मागे........एक बाई तिथे पार्क जवळ एका लहान भिकारी मुलाला हटकत होती......तिच्या आवाजाने नयन भानावर आली......नी तिकडे बघू लागली.......आणि तिला तिच्या अस्तित्वाची जाणीव झाली.....आणि पुढे नेत असलेला हाथ तिने लगेच मागे घेतला.....

सॉरी डॉक्टर......आम्हाला प्लीज घरी सोडा......नयन

नयन, काय झालं ? तू खुश होती, मला माहिती आहे तुला पण मी आवडतो, मग का मागे घेतला हाथ.......??..जय

नयन काहीच न बोलता मागे वळत कार मध्ये बसायला जात होती......तेवढयात जय ने तिचा हाथ पकडला....

नयन , तू अशी काहीच न बोलता जाऊ नाही शकत...मला कळले आहे तुला या so called, उच्चभ्रू समाजाचं टेन्शन आलंय....तू तुझी नि माझी तुलना करतेय.....नको करू असे....तू या सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ आहेत....ही लोकं स्वतःसाठी जगतात, स्वतःसाठी कमावतात....तू तशी नाहीये, तुझं मन खूप प्युर आहे....निरागस आहेस तू, काहीच अपेक्षा न ठेवता तू तुझ्या या बहिनभवांची काळजी घेते, दिवसरात्र झटत त्यांना मदत करते....तू या समाजापेक्षा खरंच खूप वेगळी आहे.....मी खूप प्रेम करतो तुझ्यावर, तुझ्याशिवाय आता मी माझं आयुष्य इमॅजिन च नाही करू शकत , मला आधी वाटलं कदाचित हे अट्ट्रॅक्शन असू शकते....पण या तीन महिन्यात मला कळले आहे , मी खरंच तुझ्याशिवाय नाही राहू शकत, तूच माझं पाहिलं नी शेवटचं प्रेम असशील....हे तर प्रेमाचं झालं, दुसरं म्हणजे मला तुझ्यासारखी च जीवनसाथी हवी आहे, जी मी कल्पना केली होती त्यात तू अगदी फिट बसते...आपली स्वप्न , आपलं ध्येय एकच आहे......समाजाची सेवा करणे, ज्यात फक्त तूच मला साथ देऊ शकते.......जय खूप भावनिक होत बोलत होता...........तो त्याचे प्राण डोळ्यामध्ये आणून तिच्याकडे तिच्या उत्तराची वाट बघत होता.......

त्याचं बोलणं तिच्या मनाला भेदून जात होते,  नयन ला त्याच्या भावना कळत होत्या, पण त्याला होकार द्यायला तीच मन पुढे धजत नव्हते.......

दोन अटी वर...........नयन

जय प्रश्नार्थक नजरेने तिला बघत होता....

मला माहिती आहे प्रेमात व्यवहार, अट, शर्त असे नसते, प्रेमात कुठलाच सौदा नसतो....पण तरीही........

मला तुझ्या सगळ्या शर्ती मान्य आहे.........जय

अहो ऐकून तर घ्या.......नयन

बोललो ना सगळं मंजूर आहे.........त्याचे डोळे आनंदाने चमकत होते....नी त्याच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता......त्याला तर काय करू काय नको असे होत होते....

अहो.....डॉक्टर........नयन

बरं बरं बोल............जय 

एक.....लग्न तेव्हाच करेल जेव्हा तुमच्या घरून परवानगी असेल.......नयन

ओके मान्य............दुसरी अट...??...जय

तुम्ही मला तुमच्यापासून कधीच दूर नाही कराल....कशीही परिस्थिती आली तरी........मला तुम्ही नेहमीच तुमच्या जवळ ठेवाल...... मरण आलं तर फक्त तुमच्या कुशीत मला घ्याल............नयन

Shsss...........त्याने तिच्या ओठांवर आपले बोट ठेवले नी तिला आपल्या कुशीत घेतले.....

तू नेहमी माझीच राहशील, अगदी माझ्याजवळ....मी तुला कधीच अंतर देणार नाही, अगदी कशीही, कितीही खराब परिस्थिती असली तरी.........तिच्या डोक्यावरून मायेने हाथ फिरवत बोलत होता..

तिने पण आता हक्काने त्याच्या कांबरे भोवती तिच्या हातांचा वेढा घट्ट केला.....

डॉक्टर आपण रस्त्यावर आहोत.....तीच आजूबाजूला लक्ष गेले तर येताजाता काही लोक त्यांना बघत होते...

असू दे, माझं मन नाही भरले अजून, तीन महिने झालेत , किती मिस करत होतो तुला, तू बोलायची पण नाहीस माझ्यासोबत, कश्या रात्री जागून काढल्या आहेत मी , माझंच मला माहिती.....मला आता अजिबात तुला दूर नाही करायचे....... जय

डॉक्टर ..........नयन

ओके नयु..........तो तिच्यापासून दूर झाला.....

काय बोललात..??....नयन

नयु.............नाही आवडलं काय..??.....जय

आवडलं......खूप आवडलं..........नयन, त्याच्या डोळ्यात बघत त्याच्या गालावर हात ठेवत बोलली....

त्याने त्याच्या गालावरचा हाथ आपल्या हातात घेत त्यावर किस करत ,तिला बसायला म्हणून कार चे दार ओपन केले......जातांना एक छोटीशी आइस्क्रीम पार्टी करत नंतर त्याने त्यांना आश्रमात सोडले....

******

क्रमशः

******

नमस्कार मित्रांनो

या कथे मध्ये मी थोड अनाथ आश्रम बद्दल लिहिले आहे.........आणि ती खरच वास्तविक , जवळून जाणून घेतलेल्या भावना आहेत...

मी एका NGO मध्ये काम करते, त्यात आम्ही बऱ्याच अनाथ मुलांसाठी, काही orphange house साठी काम करतो....महिन्यातून 2-3 दा तरी तिथे जाणे होते...आता कोरोना मुळे कमी आहे......तर तिथल्या मुलं मुली सगळ्यांसोबत खूप वेळ घालवत असतो...मेडिकल कँप, एज्युकेशनल कॅम्प...असे बरेच काही आम्ही घेत असतो........त्यातूनच या मुलांना जवळून समजून घेण्याचे प्रयत्न करत असते......tyanchya सोबत गप्पा करून त्यांच्या मनातल्या खूप गोष्टी कळल्या.....तेच मी माझ्या शब्दात या कथे मध्ये थोड मांडले आहे..

धन्यवाद!

****

🎭 Series Post

View all