Jan 22, 2022
कथामालिका

जय.....वेडी 2

Read Later
जय.....वेडी 2

 

भाग 2

 

आता सतत त्याच्या डोक्यात नयन बद्दल चे च विचार सुरू होते, आता त्याला पूर्ण खात्री झाली होती तो नयन च्या प्रेमात पडला आहे........आणि तो खूप खुश झाला.....

 

आता त्याने त्याची नाईट शिफ्ट च सुरू केली होती......आणि रोज ती झोपली की तो तिच्या जवळ थोड्या वेळ येऊन बसायचा.....मन भरून तिला बघून घ्यायचा.......बाकी त्यांचं फार काही बोलणे होत नव्हते.....तो फक्त तिला बघत असायचा.........असेच बारा दिवस गेले.....आता ज्योती पूर्ण बरी झाली होती.....उद्या तिला डिस्चार्ज होणार होते.....आता मात्र त्याला अस्वस्थ वाटायला लागले.....आता उद्यापासून ती दिसणार नाही......विचार करूनच त्याचं मन चलबिचल होत होते......तो एकदा राऊंड घेत थोड्या वेळ ज्योतीच्या रूम मध्ये जाऊन बसला होता........येव्हणा ज्योतीला पण माहिती झाले होते डॉक्टर रोज थोड्या वेळ इथे येतात म्हणून , कधी कधी ती जागी असली की जय तिच्या सोबत थोड्याफार गप्पा मारायच्या.....पण आज मात्र तो खूप शांत पणे बसला होता...

 

काय झालं डॉक्टर , आज इतके शांत का...??.सगळं ठीक आहे ना...??........ज्योती

 

 

हो, ठीक आहे सगळं.......बर तू आराम कर मी येतो.......जय,एकदा नयन कडे बघत बाहेर निघून आला.......केबिन मध्ये विचार करत बसल्या बसल्या त्याचा डोळं लागला होता..... कॅबिन च्या दारावर नॉक झाले नि त्याची झोप उघडली, तर बऱ्यापैकी पहाट झाली होती....दिवस उजाडणार च होता....

 

Yess come in....... जय

 

नयन आतमध्ये आली........

 

बोला मिस नयन.........काही काम होते....

 

हो डॉक्टर, थोड्या वेळाने तुम्ही घरी जाणार म्हणून भेटायला आले होते......आज ज्योती ला डिस्चार्ज होईल, मग आपली भेट होणार नाही......तुम्हाला थांक्स म्हणायचे होते.........नयन

 

 

मिस नयन, बसा तुम्ही........त्याने फोन वर दोन चहा ऑर्डर केले......

 

डॉक्टर, अहो याची काही गरज नाही.......तुम्ही उगाच त्रास घेतला.........नयन

 

It's okay mis Nayan, मला पन छान कंपनी मिळेल..... please sit down........ जय

 

नयन त्याच्या पुढ्यात येऊन बसली..

 

डॉक्टर तुमचे आभार कसे मानू, माझ्या जवळ शब्दच नाही आहेत.......आणि हो मी बिल साठी गेले होते तर तुम्ही सगळे आधीच पे केलंय ते पण कळले......मी परत करेल डॉक्टर तुमचे पैसे.....मला फक्त थोडा वेळ द्याल आहात.......नयन

 

मिस नयन, त्याची काही गरज नाही...........जय

 

नाही हो, असे मी तुमचे पैसे नाही घेऊ शकत.....मी जॉब करते, मी करेल आहे परत........नयन

 

खरंच त्याची काहीच गरज नाही, ज्योती आता माझी बेस्ट फ्रेंड झालिये........मित्राच्या नात्याने मी तर येवढे करूच शकतो......जय

 

ठीक आहे, मी तुमचं मन नाही मोडणार,  मग आपण फिफ्टी फिफ्टी करू......नयन

 

जय ने डोक्यावर हात मारला........as you wish mis..... जय

 

Thank you for everything doctor, मी तुमचे हे ऋण आयुष्यभर नाही फेडू शकत, तुम्ही खूप चांगले डॉक्टर आहात, त्यापेक्षाही तुम्ही खूप छान माणूस आहात, असेच राहा नेहमी......नयन

 

जय ने तिला बघून स्मायल केले......

 

आणि ही तुमची शाल....खूप छान आहे, खूप छान झोप येते यात......म्हणून इतके दिवस परत नव्हती केली.....नयन ने तिच्या हातातली शाल पुढे केली.....

 

तुम्हाला आवडली ना, माझ्याकडून गिफ्ट समजा तुम्हाला, त्याने परत तिच्या हातात दिली.......

 

अहो पण, मी हे कसे काय घेऊ शकते.........नको असू द्या.....नयन

 

मिस नयन, तुम्ही एक खूप छान मुलगी आहात, प्रेमळ, सर्वांना आपलेसे करणारी, सर्वांना मदत करणारी......फ्रेंड्स...?? त्याने हात पुढे केला..

 

आज जर ती गेली तर मग परत लाईफ मध्ये तिला आणाने कठीण होईल....म्हणून त्याने बराच विचार करून तिच्या सोबत मैत्री करायचे ठरवले होते, तसेही कुठल्याही नात्याची सुरुवात जर मैत्री ने होते असेल तर ते नात खूप घट्ट असते ....असे त्याचे मत होते.

 

त्याने फ्रेंडशिप साठी हाथ पुढे केलेला बघून तिला खूप आनंद झाला......पण थोड्या वेळातच तो निवळला....

 

का....काय झालं......? मी तुम्हाला आवडलो नाही काय...??......जय

 

नाही....नाही हो तस काही नाही आहे, तुम्ही तर खूप चांगले आहात, पण मीच, आपली काहीच बरोबरी नाही....आणि तुम्हाला माझ्या बद्दल काहीच माहिती नाही...........नयन

 

मिस. नयन......मैत्री मध्ये लहान मोठ असते काय....??..मला माहिती सगळं तुमच्या बद्दल......ज्योती कडून ठम्हा सगळ्यांची बरीच माहिती मिळाली आहे.......आणि तुमचं अनाथ असणे, माझ्या मैत्रीवर त्याचा काही परिणाम होणार नाही......जय

 

बरं ठीक आहे....फ्रेंड्स.........म्हणत तिने तिचा हाथ पुढे केला...

 

पण एक शर्त आहे, तुम्ही मला मिस नयन नका म्हणू, नी अहो जाओ सुद्धा नाही.....नयन

 

ओके, पण मग तू पण मला अहो म्हणते की......जय

 

अहो तुम्ही मोठे आहात, वरून येवढे मोठे डॉक्टर, तुम्हाला तू म्हणायला शोभणार नाही, नी माझ्याकडून म्हंटला पण जाणार नाही........तेवढ एक राहू द्या...

 

त्याने तिला छानशी स्मायल दिले......अर्धा गड जिंकल्याचा आनंद त्याला झाला होता..तेवढयात चहा आला.....दोघांनी गप्पा करत चहा संपवला....

 

ठीक आहे मी येते आता....म्हणत ती जायला उठली......

 

नयन आता तू ही शाल घेऊच शकते.....आता मी मित्र आहो तुझा, मी तुला गिफ्ट देऊच शकतो......जय

 

तिने पण आनंदाने त्याच्या हातातून ती शाल घेतली....

 

बरं तुझा फोन दे एक मिनिट......जय

 

नयन ने खिशातून काढून तिचा फोन त्याच्या समोर धरला.....

 

त्याने तिच्या हातातून फोन घेतला नि स्वतःच्या नंबर वर कॉल केला........नयन हा माझा फोन नंबर आहे, कधीही काही गरज पडली तर मला सगळ्यात आधी कॉल करायचा......कुठलीही, कशीही, कधीही....anytime, anywhere.........okay...... जय

 

जय च्या असे काळजीचे बोललेले ऐकून तिच्या डोळ्यात पाणी साठायला लागले, आधी कोणीच असे प्रेमाने , काळजीने बोलले नव्हते, त्याच बोलणं ऐकून तीच मंनखुप भरून आले........नी प्रयत्न करूनही एक अश्रू तिच्या गालावर ओघळलच होता.....

 

तिच्या डोळ्यात पाणी बघून त्याला खूप वाईट वाटले.....कुणीतरी त्याच्या काळजावर वार केल्यासारखे त्याला जाणवले............नयन काय झाले...??..का रडते आहेस....??.....मी काही चुकीचं वागलो काय...??.....जय

 

काही नाही, हे आनंदाचे अश्रू आहेत, आतापर्यंत येवढे प्रेमाने, काळजीने कोणीच बोलले नव्हते ना, आमच्या वाट्याला सदोदित तिरस्कार च आलेला आहे.....असे प्रेम,काळजी कधीच नाही.....आम्हाला जन्म देऊन आमचे सो कॉल्ड आई वडील आम्हाला सोडून गेले पण त्याची सजा आम्हाला मिळते आहे......आई काय असते, बाबा काय असतो, परिवार काय असतो काहीच माहिती नाही हो डॉक्टर........या इतक्या मोठ्या जगात ते आम्हाला एकटे सोडून गेले हो डॉक्टर............आम्ही नकोच होतो तर आम्हाला जन्मच का दिला हो त्यांनी.....पोटातच मारून टाकायचं होत ना.......पदोपदी खूप अपमान सहन करावा लागतो, खूप वाईट वाईट काय काय बोलतात लोक,मुलगी म्हणून तर खूप वाईट नजरेने बघतात माणसं .....कुणाचाच मायेचा हात नाही डोक्यावर.......बोलता बोलता तिचा आवाज कापरा झाला होता, तिचं दुःख , तिचा त्रास तीच मन भरून येत होते, तिला आता बोलायला पण जमत नव्हते......ती आपल्या एका हाताने डोळे पुसत होती, पण डोळे वाहायचे काही बंद होत नव्हते........

 

तिचे एक एक शब्द त्याच्या काळजावर अविरत घाव घालत होते........तिच्या डोळ्यातले पाणी आता त्याच्या डोळ्यात जमायला लागले होते, तिच्या वेदना आता त्याला जाणवत होत्या......आणि न राहून त्याने तिला जाऊन मिठी मारली ......

 

एका अनाथ ला प्राथमिक गरजा तर आपण पुरवू ही कदाचित, पण त्यांच्या या मानसिक, शारीरिक, सामाजिक जखामांच काय...??.....त्यांच्या मनावर झालेल्या या खोल घावांच काय...??...चूक तर दुसऱ्यांनी  केली, पण त्याची सजा यांना का....?...नयन मी तुला कधीच सोडणार नाही, तू ज्या ज्या प्रेमाची, मानाची हकदार आहेस ते ते मी तुला देईल, इतके प्रेम देईल की तुझी ही सगळे दुःख, तुझा होणारा हा त्रास सगळं , सगळं तू विसरशील.....इतकं प्रेम करेल मी तुला........तो तिला मिठीत पकडून , मायेने तिच्या डोक्यावरून हात फिरवत मनातच स्वतःला प्रॉमिस करत होता........त्याच्या मिठीत तिला बहुतेक काहीतरी वेगळेपणा जाणवला, बहुतेक तिला त्याच्या प्रेमाची जाणीव झाली..खूप माया,खूप प्रेम, खूप काळजी होती त्याच्या मिठी मध्ये........नी सर्कण ती त्याच्या पासून दूर झाली......

 

सॉरी डॉक्टर, ते भावाने च्या भरात......तशी मी खूप स्ट्राँग आहे, रडणं तर केव्हाच बंद केलेय मी......पण आज माहिती नाही....का असे झाले..........नयन

 

It's okay Nayan......you can come to me anytime, don't feel alone..... I am always there for you, with you.....okay..... जय

 

Don't worry, I am perfectly strong doctor....... चला बराच वेळ झाला...निघते आता......नयन

 

ह्मम..........बाय....जय

 

नयन परत जात दाराजवळ आली.....

 

नयन... beautiful name...... अगदी तुझ्या निरागस मनासारखं....स्वच्छ , सुंदर........जय तिला जातांना बघून बोलला

 

त्याच्या वाक्याने तिच्या चेहऱ्यावर गोड हसू आले....

 

जय........ very stunning name.... अगदी तुमच्या परसनालिटी ला शोभेल असे, तुमच्या कामाला अनुरूप....नक्कीच तुम्ही पुजण्याच्या लायक आहात........नयन मागे वळत त्याच्याकडे बघत बोलली....

 

तो गोंधळलेल्या नजरे ने तिला बघत होता.....

 

जशी तुम्ही माझ्याबद्दल सगळी माहिती काढून घेतली....तशीच मला सुद्धा तुमच्या बद्दल बरेच माहिती झालं आहे,एक बलाढ्य श्रीमंत घरचा एकुलता एक मुलगा, पण कुठलाच गर्व नाही,  तुमची ऋग्नां प्रतीची सेवा, तुमचं चारिटी काम, तुमची फ्री मेडिकल चेकप कॅम्पस.....कशाचीही काहीही अपेक्षा न करता....तुमची समाजसेवा.....हो ना......नयन

 

तिच्या बोलण्याने त्याच्या चेहऱ्यावर आनंदाने स्मायल आले....

 

Good day doctor............म्हणत ती बाहेर निघून आली..

 

*******

 

असेच दिवसामागून दिवस जात होते.....दोघेही आपल्या कामात बिझी होते.......पण जय ला मात्र रोज नयन ची आठवण येत होती....एक दोनदा त्याने तिला कॉल पण केला ज्योतीच्या तब्बेतीच्या विचारपूस करत.......पण कामा व्यतिरिक्त ती फार काही बोलायची नाही....त्यामुळे मग त्याला पण तिला कॉल करायला थोड अवघड वाटायचे...पण तो पूर्णपणे तिच्यावर लक्ष ठेऊन होता...तिला त्याने एकटे सोडले नव्हते. जरी तो तिच्या डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये नव्हता, तरी तिचं सगळं त्याला माहिती असायचे..

 

नयन च कॉलेज, नंतर नोकरी असा तिचा दिवस पूर्ण बिझी जायचा, पण रात्र झाली की तिला जय ची आठवण यायची,, बरेचदा तिला त्याला फोन करायची इच्छा व्हायची....पण जेव्हा त्याने तिला मिठी मारली होती, तेव्हा तिला जाणवले की तो तिच्यावर प्रेम करायला लागला आहे बहुतेक, कदाचित हा गैरसमज पण असू शकतो, पण तिला माहिती होती तिची नि त्याची काहीच बरोबरी नाही आहे , हा समाज , त्याचा परिवार त्यांच्या मैत्रिलांच तर परवानगी देईल तिला डाऊट होता, तर मग पुढले नाते तर दूरच होते...त्यामुळे तिने स्वतःला त्याच्यापासून होईल तितके दूर ठेवले होते...एक दोनदा त्याचा फोन, मेसेज ही आलेला, पण तिने अगदी कामापुरते बोलून फोन ठेवून दिला होता......उगाच पुढे जाऊन होणाऱ्या त्रासापेक्षा आताच दूर राहिलेले बरे आहे असे तिला वाटत होते...

 

आता जवळपास तीन महिने होत आले होते, त्या दोघांचा काहीच कॉन्टॅक्ट नव्हता..

 

*******

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Megha Amol

उडणाऱ्या पक्षासारखं बेधुंद होता यावं...!! आणि हे जगणं सुंदर व्हावं...!!!❤️