Aug 16, 2022
सामाजिक

जय....वेडी 4

Read Later
जय....वेडी 4

तीच कॉलेज नंतर जॉब, तो त्याचं हॉस्पिटल नी त्याच एज्युकेशन सांभाळत , दोघंही एकमेकांना वेळ देत होते...दिवसागणिक त्या दोघांमधले प्रेम आणखीच घट्ट होत चालले होते.... त्याचं पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण व्हायचं होते म्हणून अजून तो त्याच्या घरी तिच्या बद्दल नी लग्न बद्दल काही बोलला नव्हता... ती त्याला वेळ भेटेल तेव्हा त्याच्या मेडिकल कॅम्प मध्ये, इतर सोशल अक्टिवितीज मध्ये मदत करायची.....तो पण तिच्या आश्रम मध्ये सगळ्यांचे free चेकाप, आणि तिच्याच मदतीने बाकी इतर आश्रांमध्ये पण मुलांना चेकप , त्यांच्या एज्युकेशन मध्ये मदत करत होता......

 

अश्यातच सोबतीने त्यांच्या रिलेशनशिप ला दीड वर्ष होऊन गेले होते...आता तीच शिक्षण पूर्ण झालं होते, आणि तिला एका चांगल्या कंपनी मध्ये जॉब मिळाला होता....आता तिने रेस्टॉरंट मधला जॉब सोडला होता.... आश्रम पासून ऑफिस तिला खूप दूर पडायचं, जण्यायेण्यातच खूप वेळ जायचा, म्हणून आता ती आश्रम मधून वेगळी एक रूम घेऊन राहायला लागली होती....तेवढाच वेळ वाचऊन तिने काही जास्तीची कामे सुरू केली होती, आणि मुलांच्या ट्युशन घेणे तिने सुरू केले होते...त्यातून तिला पगरासोबतच वरती जास्ती पैसे मिळायचे.....ती त्याचा वापर आश्रम मधल्या मुलांच्या चांगल्या शिक्षणासाठी, कॉम्प्युटर क्लासेस साठी वापरत होती...

 

इकडे आता जय चे पण पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण झाले होते, आता हॉस्पिटल मध्ये त्याची पोझिशन सुद्धा वाढली होती,  तो त्याच डॉक्टर असण्याचे काम अगदी चोखपणे पार पाडत होता....आता त्याचे नाव पण व्हायला लागले होते..

 

दोघंही खूप खुश होते. येव्हणा जय ने तिच्यासाठी एक छोटा फ्लॅट घेतला होता....ती नाही म्हणत असताना सुद्धा जय ने जबरदस्तीने तिला तिथे शिफ्ट केले होते....दोघांनीही तो फ्लॅट त्यांच्या आवडीने सजवला होता....दोघं मिळून त्यांच्या भविष्याची स्वपने बघायला लागली होती.....आता घरात ते बराच वेळ सोबत घालवत होते....जय तिच्या मागेपुढे च असायचा, पण त्या दोघांना त्यांची लिमिट माहिती होती, जी त्यांनी कधीच पर केली नव्हती...त्या दोघांमध्ये अजूनही शुद्ध प्रेमाचे नाते होते....

 

*******

नयु.........काय करते आहेस..,..करू दे ना काम......जय, नयन तिचा एक बोट त्याच्या गालावरच्या खळी मध्ये घालत त्याला त्रास देत होती...

 

काय हो डॉक्टर तुम्ही पण..... असं सुट्टीच्या दिवशी पण काम का हो....??...आजकाल तर तुम्हाला माझ्यासाठी वेळच नसतो.......नयन फर्गटून रुसल्याच नाटक करत होती

 

झालंच आहे ,फक्त पंधरा मि दे........जय

 

नयन तिचा मोबाईल घेत काहीतरी टाइमपास करत बसली होती...

 

नयु.....कॉफी देना तुझ्या हातची...,.फार थकायला झालं , लास्ट विक पासून खूप काम वाढलेले........... जय लॅपटॉप मध्ये काही काम करत बोलत होता....

 

शी बाबा, रुसाता पण येत नाही...कोणी मनवत सुद्धा नाही आहे........नयन उठून किचन मध्ये गेली....

 

नयन ने मस्तशी गरमा गरम कॉफी चे दोन मग घेऊन त्याच्या पुढ्यात बसली....

 

बस करा ना डॉक्टर आता.......किती थकला आहात.....थोडा तरी आराम करायचा ना.....नयन ने त्याचा हातातला लॅपटॉप काढून घेत बाजूला ठेवला....नी त्याचा हातात कॉफी चा मग दिला...

 

इ sss , किती कडू आहे........... जय

 

काय...?....माझी तर ठीक आहे........नयन

 

तू गोड घालायला विसरली .......जय

 

दाखवा...तिने त्याच्या हातातला मग घेत कॉफी चा एक सीप घेतला..

 

ठीक तर आहे हो डॉक्टर.......नयन

 

बघू.......त्याने तिने दिलेली कॉफी तिने पीली होती त्या साईड ने मग फिराऊन तिच्या लीप च्या निशाण वर आपले ओठ ठेवत तिच्या कडे बघत कॉफी पीत होता.......

 

तुम्ही ना डॉक्टर फारच बदमाश झाला आहात.......तिला त्याची मस्ती कळली होती

 

मग काय करणार......तू किस कर करू देत नाहीस...मग मला आपलं असेच भागवावे लागते.......मी बिचारा....,जय नयन ची मस्करी करत होता...

 

हो का.....नयन ने कुशन उचलले नी त्याच्या पाठीत घातला......आता ती दोघं एकमेकांच्या खोड्या करत लहान मुलांसारखी मस्ती करत होते.....

 

नयन जय सोबत असली की एकदम लहान बनून जायची....अगदी लहान मुलांसारखे हट्ट करायची.....तो पण तिचे सगळे हट्ट पुरवत होता....त्याला माहिती होते ती लहान वयातच जास्ती म्याच्युएड झाली होती....ती आश्रम मधल्या मुलांची ताई झाली होती, लहान वयातच तिने खूप जबाबदारी स्वतःवर घेतली होती.......तीच लहानपण कधीचेच हरवले होते.......पण आता तो तिच्या त्या सगळ्या राहून गेलेल्या गोष्टी तिच्यासाठी करत होता.....पावसात भिजणे काय, पाण्यात कागदाच्या बोटी सोडणे काय, तिला आवडणारे सगळं सगळं तो करत होता......त्याला सुद्धा कधी कधी तिचं खूप कौतुक वाटायचे, बाहेर अगदी जबाबदारी ने मोठ्यांसारखी वागणारी मुलगी त्याच्या कुशीत मात्र पिल्लू सारखी शिरायची.....त्याने पण म्हटल्याप्रमाणे सगळी सुख तिच्या पायाशी घातली होती त्याला पण तिच्या डोळ्यात अश्रू चा एकही थेंब सहन व्हायचा नाही.....थोड जरी दुखले खुपले तर तो अगदी आईच्या मायेने तिची काळजी घ्यायचा.....तिला अगदी फुलाप्रमाणे जपत होता.........आता तर ती अनाथ आहे हे सुद्धा विसरली होती......ती त्याच्या सोबतीने स्वर्गवत आयुष्य जगत होती.......आता तर फक्त तोच नी तोच तीच सगळं बनला होता.... तीच पूर्ण आयुष्य त्याच्या भोवती फिरायचे......

 

******

 

आता जयच्या घरी त्याच्या लग्नाबद्दल विषय सुरू झाले होते...आणि हीच संधी साधून त्याने नयन बद्दल घरी सांगितले होते, पण त्याच्या घरचे त्यांच्या या नात्याला परवानगी देत नव्हते. जय त्यांचा एकुलता एक मुलगा....सूने साठी म्हणून बघितलेली त्यांची स्वपने वेगळी होती, त्यात नयन बसत नव्हती, म्हणून घरून त्याला नकार मिळाला होता...पण नयन च्या अटी मुळे बरेचदा विचारून सुद्धा नयन लग्नासाठी तयार होत नव्हती. ती अनाथ होती, डोक्यावर आईवडिलांचे छत्र नसले, अनाथ असले म्हणजे काय होत तिला माहिती होते, म्हणून अजूनही ती तिच्या ठेवलेल्या अटीवर ठाम होती...त्यामुळे जय घरून परवानगी भेटायची वाट बघत होता.....पण त्याने तिला ठामपणे सांगितले होते, लग्न करेल तर फक्त तिच्यासोबत च, अन्यथा तसाच राहील...त्यामुळे दोघेही जय च्या घरून परवानगी भेटायची वाट बघत होते....पण येवढे होऊन सुद्धा त्यांच्या प्रेमात काहीच कमतरता आली नव्हती, उलट दिवसेंदिवस त्यांचं प्रेम वाढतच होते.....जरी ते दोन वेगळे शरीर होते, पण त्यांची आत्मा एक झाली होती, येवढे त्यांचे एकमेकांवर प्रेम नी विश्वास होता.

 

******

 

आता त्यांच्या नात्याला   तीन वर्ष होत आली होती.....अजूनही ते जय च्या घरून लग्नासाठी परवानगी ची वाट बघत होते.....

 

आणि या काळातच एक नवीन रोगाने पृथ्वीवर थैमान घातलं होत.... कोरोना नावाचं हे सावट सगळीकडे पसरला होता.......रक्षसरुपी त्या व्हायरस ने लाखो लोकांना गिळंकृत करणे सुरू केले.......सगळीकडे हाहाकार माजला.....सगळ्या देशांमध्ये इमार्जेन्सी लागू झाली होती......हॉस्पिटल पेशंट नी भरले होते, रोग्यांसाठी दवाखान्यांमध्ये जागा सुद्धा नव्हती, लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला होता.......

 

आता हा व्हायरस भारत ही पोहचला होता...भारतातही त्या व्हायरस ने आपलं थैमान घातलं होत.....सगळी कडे महामारी पसरली........ पूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले..... लोकं घरात बसली.....

आधितर सरकारी दवाखाने सुरू करण्यात आले होते.....डॉक्टर, स्टाफ, मेडिसिन सगळ्यांचं गोष्टींची कमतरता व्हायला लागली......परिवाराचे परिवार उध्वस्त व्हायला लागले........

 

डॉक्टर जय सुद्धा मदतीला धाऊन गेला होता....तो रात्रंदिवस रोग्यांच्या सेवेमध्ये लागला होता.....

 

बाळा , नको रे.....आहेत ना बरीच डॉक्टर ....तुला काय गरज या आगीमध्ये उडी घ्यायची.....सोडून दे ही डॉक्टरी, नको आपल्याला हे काही.......जय ची आई त्याला समजावत होती

 

आई अग असे काय करते, माझी गरज आहे आता हॉस्पिटल मध्ये, आम्ही जेव्हा डॉक्टर बनतो तेव्हाच शपथ घेतो....आमचं काम अमही प्रामाणिकपणे करू.... डॉक्टर हे भूतलावर देवाचेच दुसरे रूप आहे, ती लोक आमच्याकडे खूप आशेने बघत आहे....त्यांना आमची गरज आहे, त्यांची सेवा करणे हे माझं कर्तव्य आहे,  मी माझं कर्तव्य सोडणार नाही.......मी मागे हटणार नाही.....जय

 

तू कधीतरी आमचं ऐकणार आहेस काय...?? बरं तुझी इच्छा आहे ना नयन सोबत लग्न करायची, ती पण मान्य आहे आम्हाला, पण नको जाऊ बाळा......आई

 

आई , अग हे नी लग्न दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत .....आणि लग्नाचं म्हणशील तर एकदा ही महामारी सावरून जाऊ दे..... मग बघू......बर आता मी निघतोय.....नयन ला भेटून तिकडूनाच हॉस्पिटल ला जाईल......काळजी घ्या तुम्ही दोघं....त्याने आपल्या आईबाबांना हग केले......., येतो.....म्हणत जय घरून बाहेर पडला......त्याच्या आईच्या डोळ्यात आसवे होती.......

 

जय नयन ला भेटायला तिच्या घरी आला होता.....

 

नयु, मी हॉस्पिटल मध्ये जातोय......मला आता काही दिवस तुला भेटायला येता येणार नाही.....

 

ह्ममम........नयन

 

मला तिथेच राहायला लागणार आहे...........जय

 

ह्मम.........नयन

 

वेळ भेटेल तसा तुला फोन करेल........जय

 

ह्मम........नयन

 

जय च्या तिला खूप इंस्ट्रक्शन्स देणे सुरू होत्या......नयन मात्र त्याला अजून अजुन घट्ट पकडत त्याच्या मिठीत शिरली होती.....तिला माहिती होते हे त्याचे काम आहे, आणि कितीही काही बोललं तरी तो मागे हटणार नव्हता.....पण नयन ला आतमधून खूप भीती वाटत होती....तीच शरीर थरथर कापत होते.......त्याला पण तीच होणार कंपन जाणवत होते.....तिच्या मनातली भीती त्याला कळत होती.....त्याने पण तिला आता आपल्या खूप जवळ घट्ट मिठीत घेतले होते.......खूप वेळ नयन जय ला पकडून त्याच्या कुशिमध्ये बसली होती......ती खूप घाबरली होती....आता प्रयत्न करूनही तिच्या डोळ्यातले पाणी खाली ओघळत होते.....आणि दाबून ठेवलेला तिचा हुंदका बाहेर आला.......तिच्या रडण्याचे आवाजाने त्याच्या काळजातून एक कळ गेली.........त्याने तिचा चेहरा आपल्या दोन्ही हातात पकडत वरती केला .....नी तिच्या डोळ्यात बघत होता....तिच्या डोळ्यात त्याला खूप वेदना दिसत होत्या......अविरत पाणी तिच्या डोळ्यातून वाहत होते.,.,....तिला होणाऱ्या वेदना त्याला सहन होत नव्हत्या.,......त्याने मानेनेच तीला रडू नको म्हणून खुणावले.....जरी रडतांना तिचा आवाज नव्हता तरी तिच्या डोळ्यातले अश्रू थांबायचं काहीच नाव घेत नव्हते.......तिला असं बघून त्याला सुद्धा रहावले नाही......आणि तो आता तिच्या जवळ येत होता.....दोन्ही हातानी तिचा गालांना पकडत वर करत हळूवार पणे त्याने त्याच्या ओठांनी तिच्या डोळ्यांवर चे अश्रू टिपले......त्याच्या त्या स्पर्शाने आपोआपच तिचे डोळे मिटल्या गेले.......आज पहिल्यांदा तिने पूर्णपणे स्वतःला त्याला अर्पण केले होते.......त्याला पण तिच्या चेहऱ्यावरचे भाव कळले होते........डोळ्यांवर किस करून तो तिच्या त्या शांत चेहऱ्याकडे बघत होता......मनभरून तिला आपल्या डोळ्यात साठाऊन घेत होता.......आता हळूवारपणे त्याने त्याचे ओठ तिच्या कपाळावर टेकवले........तिच्या श्र्वासांची गती आता वाढली होती.........त्याला सुद्धा तिचे श्वास जाणवत होते......खाली येत त्याने अलगद तिच्या एका गालावर आपले ओठ टेकवले........आणि आता त्याच लक्ष तिच्या ओठांवर गेले........तो हळू हळू तिच्या ओठा जवळ जात होता......की त्याचा फोन वाजयाला लागला.......आणि तो भानावर आला.....आपण हे काय करतोय....हे चुकीचे आहे.......त्याच्या डोक्यात विचार येताच तो तिच्यापासून दूर झाला....नी फोन रिसिव्ह केला...

 

 

हो....पोहाचातोच आहो.........म्हणत त्याने फोन कट केला...

 

 

 

नयु..... बाळा , काळजी घे तुझी.......मला निघावं लागणार आहे आता........लवकरच भेटू.........म्हणत त्याने तिच्या डोक्यावर किस केले...नी बाहेर जाण्यासाठी वळला......तेवढयात नयन ने त्याला पाठीमागून मिठी मारली..........I Love you doctor.....लवकर या.... वाट बघतेय तुमची........नयन

 

Love you too pillu........त्याने तिच्या हाताला पकडत तिला आपल्या पुढे आणले नी तिला आपल्या मिठी मध्ये घेतले.......

 

Take care doctor.......... तिने त्याच्या गालावर किस केले....

 

You too sweetheart ????????.......

 

*******

 

आता तीन महिने होत आले होते, जयने त्याला त्याच्या कामामध्ये वाहून घेतले होते......दिवस रात्र कशाचीही पर्वा न करता तो मनापासून आपले काम करत होता......अधूनमधून वेळ भेटेल तसा तो घरी आणि नयन ला फोन करत होता...

 

लॉकडाऊन असल्यामुळे नयन आता घरातच होती, घरूनच तिचे ऑफिस चे काम सुरू होते....पण तीच कशातच मन लागत नव्हते..... टीव्ही वर येत असलेल्या न्यूज मुले तिचा जीव अजूनच खालीवर व्हायचा.....ती फक्त जय च्या फोन ची वाट बघत असायची..,

 

आता लॉकडाऊन उघडले होते.....बाहेर बऱ्याच गोष्टी सुरू झाल्या होत्या.........गरज नसतांना सुद्धा लोकांची रस्त्यावर गर्दी वाढायला लागली होती....त्याचा परिणाम आता असा झाला होता की रोग्यांच्या संख्येमध्ये दुपटीने चौपटीने वाढ व्हायला लागली होती.....रोगाचं पसरते प्रमाण आता आटोक्याच्या बाहेर जायला लागले होते.....

 

नयन....मी तुला भेटायला आलोय....खाली येतेस..???....जय ने नयन ला फोन केला...

 

तो इथे आल्याचं ऐकून नयन चा आनंद गगनात मावेनासा झाला......आणि ती होती तशीच पळत खाली आली..

 

 

*****

क्रमशः

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Megha Amol

उडणाऱ्या पक्षासारखं बेधुंद होता यावं...!! आणि हे जगणं सुंदर व्हावं...!!!❤️