"मी वेडी नाही आहे......सोडा मला........" ती काकुळतीने सांगत होती , पण कोणीच तीच ऐकत नव्हते.. मेंटल असैलन चे कर्मचारी तिच्या हाथ पायांना पकडून तिला अंबुलन्स मध्ये नेऊन बसवत होते......ती हाथ पाय झाडत होती.....पण त्या सगळ्यांच्या शक्ती पुढे तीच काहीच जोर लागत नव्हता.....आणि अखेर त्यांनी तिला हॉस्पिटल मध्ये आणलं....तिच्या तोंडामध्ये बोळा कोंबला नी तिला शॉक ट्रीटमेंट दिली.......शॉक असहाय्य झाल्याने ती शेवटी शांत झाली नी तिने डोळे मिटले.....
थोड्या वेळाने तिला जाग आली....तिने इकडे तिकडे नजर फिरवली....संध्याकाळ होत आली होती..सगळीकडून कुणाचे हसण्याचे, ओरडण्याचा, किंचाळण्याचा आवाज येत होता.......ते एक मेंटल असैलन होते....तिथे खूप अशी पेशंट होते.....त्यांचे वेगवेगळे आवाज दिवसभर तिथे येत राहायचे....तिला ते सगळं सहन होत नव्हते........घाबरून कानवर हाथ ठेवून घाबरलेल्या नजरेने ती इकडेतिकडे बघत होती.......कोण होत तीच इथे, कोणीच नाही....कोण मदत करणार होते तिला...कोणीच नाही......आणि मग तिला आठवला तिचा तो.....तिने तिच्या उशीखाली ठेवलेला त्याचा फोटो हातात घेतला.....नी त्याला बघता बघता तिच्या डोळ्यातून झर झर पाणी वाहायला लागले..
डॉक्टर, मी वेडी नाही आहे हो.....बघा ना कोणीच ऐकत नाही आहे.....तुम्हाला तर माहिती आहे ना, मी वेडी नाही....का तुमच्या सोबत येऊ नाही दिले मला ...कशी जगू तुमच्या शिवाय.........डॉक्टर........ती फोटो हातात घेऊन रडतच त्याच्या सोबत बोलत होती.....नी त्याचा फोटो बघता बघता ती तिच्या सुंदर आठवणीत हरवली...
मॅडम, अहो प्लीज ऐकून घ्या माझं...माझ्या बहिणीची तब्बेत खरंच खूप खराब आहे हो, तिला इथे डॉक्टरांच्या ट्रीटमेंट ची खूप गरज आहे हो, जास्ती वेळ नाही हो माझ्या जवळ, प्लीज एकदाच ऐका, मला डॉक्टरांना भेटू द्या......एक...20-21 वर्षाची , 5.3 5.4 उंची असावी, रंग गोरा, गोल चेहरा, चाफेकळी नाक, छोटीशी जीवनी, नाजूक ओठ, कोरीव डोळे, केस वरती घेऊन पोनी केलेले, जीन्स त्यावर शॉर्ट आकाशी रंगाचा कुर्ता, गळ्यात स्टोल, अगदी साधीशी पण बघताक्षणी डोळ्यात भरणारी ती रिसेप्शनिस्ट जवळ उभी होत तिला खूप विनवण्या करत होती.........तो तिला दुरून बघत होता..तिची ती चाललेली धडपड, बोलतांना तिचे होणारे हातवारे, तिचे ते नाजूक हाथ.....तिचा मधाळ आवाज त्या भुरळ पाडत होता, नी तो एकटक तिच्या कडे बघत होता.....
तिच्या हावभाव वरून ती काहीतरी प्रोब्लेम मध्ये वाटत होती, आणि तो तिच्या मागे येऊन उभा राहिला....
मिस.........तो
बोलता बोलता तिने मागे बघितले...
एक मिनिट हा मिस्टर.....मी आधी आले आहे....मला आधी बोलू द्या...तुम्ही नंतर बोला.....माझं खूप महत्वाचं आहे.....म्हणत तिनें परत रिसेप्शनिस्ट कडे बघत बोलणं कनटीन्यू केले..
डॉक्टर जय......त्याला तिथे बघून रिसेप्शनिस्ट उठून उभी राहिली....
त्या आवाजाने तिने मागे बघितले....
डॉक्टर...???..तुम्ही डॉक्टर आहात...??.....ती
ह्मम......त्याने मान हलवली
डॉक्टर...सर.....माझी मदत करा प्लीज, या मॅडम माझं काहीच ऐकत नाही आहे.....ती
Sir, I will handle it.........रिसेप्शनिस्ट
It's okay Maya....send her in my cabin...... जय, बोलत तो त्याच्या केबिन मध्ये निघून गेला.
डॉक्टर जय, 26 वर्षाचा जनरल फिजिशियन इथे सिटी केअर हॉस्पिटल मध्ये प्रॅक्टिस करत होता नि सोबतच पोस्ट ग्रॅज्युएशन करत होता...5.11उंची, दिसायला एखाद्या मॉडेल सारखाच, नियमित व्यायामाने फीट असलेली बॉडी, रंग गव्हाळ गोरा, चेहऱ्यावर हुषारीच तेज, डोळ्यावर चष्मा त्याला खूप सूट करत होता...नी गालांवर खळी........स्वभावाने शांत, पण कामा मध्ये खूप हुशार, सदैव गरजूंना मदतीसाठी धावणारा.....त्याने तिला बोलतांना बघितले नी ती काहीतरी प्रोब्लेम मध्ये आहे त्याला जाणवले होते, आणि म्हणूनच त्याने तिला कॅबिन मध्ये पाठवायला सांगितले होते.
मी आता येऊ काय..?? तिने कॅबिन च डोअर नॉक केले
Yess please......... जय
ती आतमध्ये आली..नी त्याच्या पुढे येऊन उभी राहिली, खूप अपेक्षेने ती त्याच्या कडे बघत होती..
Please बसा मिस.....त्याने तिला चेअर वर बसायचा इशारा केला
Thank you doctor...... ती बसत बोलली
बोला मिस , काय झालं??
सर, माझी लहान बहीण तिची तब्बेत खूप खराब आहे , तील आम्ही सरकारी दवाखान्यात भरती केले ३ दिवस झाले, पण तिच्या तब्बेती मध्ये काहीच सुधारणा होत नाही आहे, दिवसेंदिवस जास्तीच खराब होत आहे, तिथली डॉक्टर सुद्धा नीट लक्ष देत नाही आहेत असे मला वाटते आहे. माझ्या एका कलिग ने या हॉस्पिटल चे नाव सुचवले, म्हणून मी इथे विचारपूस करायला आले होते. त्या मॅडम म्हणत आहे केस क्रिटिकल आहे, २५००० हजार भरा....पण डॉक्टर माझ्या कडे सद्ध्या येवढे पैसे नाही, १५००० आहेत, मी त्यांना विनंती केली की मी थोड्या दिवसांनी देते, पण आता माझ्या बहिणीला ट्रीटमेंट द्या...पण त्या मॅडम ऐकत नाही आहे हो. माझ्या बघिनीची खरंच तब्बेत खूप खराब आहे , प्लीज तुम्ही तरी त्यांना समजवा.....बोलता बोलता तिचा आवाज कापरा झाला
मिस शांत व्हा.....मला फाईल दख्वता काय तुमच्या बहिणी ची....??.तो शांतपणे बोलला
त्याने तसे बोलल्या मुळे तिला थोड बर वाटेल आणि तिने लगेच तिच्या बॅग मधून एक फाईल काढून त्याच्या पुढ्यात ठेवली.....त्याने ती फाईल चेक केली...
घेऊन या तुमच्या बहिणीला इथे....आपण लगेच काही टेस्ट करू आणि ट्रीटमेंट सुरू करू......जय
खरंच..??....पण पैसे??........ती प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे बघत होती
त्याची तुम्ही काळजी नका करू, मी बघतो ते, तुम्ही घेऊन या त्यांना...... जय
त्याचं बोलणं ऐकून ,त्याला तिच्या डोळ्यांमध्ये खूप आनंद दिसत होता.....तिला आनंदी बघून त्याला पण समाधान वाटले...
Thank you doctor....... मी तिला लगेच घेऊन येते...म्हणतच ती बाहेर जात होती
मिस, तुमचे नाव..??....जय
नयन.............ती नाव सांगून बाहेर पळाली
नयन.......तो मनाशीच बोलला नी त्याच्या चेहऱ्यावर आनंद पसरला...
नयन थोडया वेळातच तिच्या लहान बहिणीला ज्योती ला घेऊन हॉस्पिटल मध्ये आली, जय आधीच इन्फर्म करून ठेवले असल्यामुळे तिला कोणीच अडवले नाही....
जय ने ताबडतोब ज्योतीच्या काही टेस्ट करून घेतल्या, त्यात तिला डेंग्यू झाल्याचे स्पष्ट झाले होते, जय ने ज्योतीला हॉस्पिटल मध्ये भरती करून घेतले नि तिच्या वर उपचार सुरू केले..
ज्योतीच्या प्लेटलेट्स खूप कमी झाल्या होत्या त्यामुळे तील रिकॉवर व्हायला बराच वेळ लागत होता.....नयन दिवस रात्र फक्त संध्याकाळचे ५ तास सोडले तर ज्योती जवळ च असायची....जय राऊंड वार निघायचा, ज्योतीला तपासायला यायचा तेव्हा एकदा नयन कडे नक्कीच बघून जायचा.....त्याला पण आता तिला बघायची सवय झाली होती....नयन ने पण तिथे राहून , नर्सेस, आजूबाजूचे सगळ्यांसोबत गोड बोलून सर्वांना च आपलेसे केले होते....
अरे आमच्या गोडुल्या बाबू काय झालं..??...का रडतोय.....नयन बाजूच्या चिल्ड्रेन वॉर्ड मध्ये जात बोलली, तिथे एक पाच सहा वर्षाचा मुलगा इंजेक्शन घेण्यासाठी रडत होता, तो इतका त्रास देत होता की नर्स ला त्याला इंजेक्शन देता येत नव्हते...ती, त्याची आई बरेच बोलून त्या लहान मुलाला खूप समजावण्याचा प्रयत्न करत होते, पण तो कोणालाच काही ऐकत नव्हता, खूप गोंधळ घालत होता
काय झालं आमच्या स्ट्राँग बाबू ला .....ती त्याच्या जवळ जात बोलली.
बघा ना ताई इंजेक्शन च घेऊ देत नाही आहे, मग लवकर बरा कसा होणार...त्या मुला ची आई तिला सांगत होती
ताई...रोज इंजेक्शन देतात, खूप दुखते ग..... तो लहान मुलगा...
नयन त्याच्या डोक्याजवळ जाऊन बसली , त्याला आपल्या कडे वाळवत, त्याला गोष्ट सांगू लागली, तो पण तिच्या गोष्टी मध्ये रमला..... हसत, एकमेकांना टाळ्या देत त्यांच्या गोष्टी सुरू होत्या, इकडे नर्स ने आपले काम केले होते, त्या लहान मुलाला तर काहीच कळलं नव्हतं...
काय डॉक्टर जय, तिच्या प्रेमात वैगरे पडलात की काय??? ...डॉक्टर नील मागून येत जय च्या खांद्यावर हात ठेवत बोलला, जय चिल्ड्रन्स वॉर्ड समोरुन जात होता तेव्हा नयन ला तिथे बघून तिथेच थांबला होता नि तिला बघत होता..
Don't know......... म्हणतच जय तिथून पुढे गेला...
दुसऱ्या दिवशी सकाळपासून नयन जय ला दिसली नव्हती...... त्याचं मन कामात लागत नव्हते...दोन तीनदा त्याने ज्योती च्या रूम समोरून चक्कर घातली होती....पण अजूनही ती त्याला दिसली नव्हती.......
कसे वाटतेय ज्योती आता...??...जय ज्योतीला चेक करायला आला होता
बरं वाटतेय डॉक्टर.....ज्योती
गुड........त्याने तिथे फाईल मध्ये काही लिहिले नी परत जायला वळला...नी परत काहीतरी आठऊन तो ज्योती जवळ आला....
आज तुझी मोठी ताई नाही दिसत आहे....??..जय
तिची आज परीक्षा होती म्हणून आज ती कॉलेज ला गेली आहे, आणि त्या नंतर नोकरी असते तिची रात्री आठ पर्यंत, नंतर येईल ती......ज्योती
ती दमत असेल.....दुसऱ्या कोणाला बोलाऊन घ्या घरून , तुझ्याजवळ.....जय
आम्ही अनाथ आहो डॉक्टर, इथे एका आश्रम मध्ये राहतो.....ज्योती
जय ला काहीच कळत नव्हते , तो प्रश्नार्थक नजरे ने ज्योतीला बघत होता.....त्याच्या डोळ्यांतले भाव ज्योतीला कळले होते
नयन ताई माझी सख्खी बहिण नाही, आम्ही लहानपणापासून त्या आश्रमामध्ये राहतो म्हणून तिथले सगळे आम्ही एकमेकांचे बहीण भाऊ आहोत......त्यात नयन ताई मोठी,....खूप प्रेम, खूप काळजी घेत असते ती आम्हा सगळ्यांची.. आमचं आश्रम जे बाहेरून डोनेशन भेटते त्यावर चालते, नयन ताई कॉलेज मध्ये शिकत आहे, पण गरज पडली तर जवळ पैसे असावे म्हणून ती एका रेस्टॉरंट मध्ये काम करते.., तिच्यामुळेच मला इतकी चांगली ट्रीटमेंट मिळत आहे डॉक्टर......ज्योती
तीच बोलणं ऐकून जय शॉक झाला होता........आणि त्याला पहिल्या दिवशी बघितलेली नयन आठवली... रिसेप्शनिस्ट ला विनवण्या करणारी नयन.......आतापर्यंत तर ती जय ला आवडत तर होतीच, पण त्याला आता तिचा खूप अभिमान वाटत होता....
Okay Jyoti take care, नी तू एकटी नाही आहेस इथे, मी आहो, काही लागलं तर हक्काने आवाज दे ....तो तिच्या डोक्यावर थोपटत तिथून निघून गेला..
आज तिला बघितलं नसल्यामुळे त्याला काहीच करमत नव्हते, आणि जेव्हा पासून ज्योतीने त्याला नयन बद्दल सांगितले होते, तेव्हा पासून तर तिला कधी बघतो असे त्याला झाले होते.....ती रात्री येईल ज्योतीने सांगितले होते, म्हणून आज त्याने नाईट शिफ्ट घेतली होती...रात्रीचा राऊंड आटोपून तो सगळ्यात शेवटी ज्योतीच्या रूम मध्ये गेला ......
ज्योती झोपली होती, जय ने आतमध्ये येऊन तिथे अडकवलेले काही पेपर चेक केले, नी ज्योती च्या हाताची नस चेक केली, पेपर वर काही लिहिले , परत जायला वळला तर तिथेच स्तब्ध होत उभा राहिला....त्याला नाईट शिफ्ट घेतल्याचे सार्थक झाल्यासारखे वाटले....
समोर एक चेअर वर नयन पाय वरती पोटाजवळ घेऊन हातांनी पकडत, पायांवर डोकं ठेऊन झोपली होती, केस हवेवर भुरभुर उडत होते, चेहऱ्यावर थकवा स्पष्ट दिसत होता, त्यातही तिच्या ओठांवर समाधानाचे स्मायल होते...... तिचं ते रूप त्याला हवेहवेसे बघावेसे वाटत होते....आणि तो तिथेच उभा तिला बघत होता...
थोड्या वेळाने तिची चुळबुळ सुरु होती, ती तिचे पाय अजून घट्ट तिच्या पोटाशी घेत चुळबुळ करत होती, बहुतेक तिला थंडी वाजत असावी, आणि चेअर वर तिला नीट झोपता येत नसावे .....तो तिला बघत अंदाज बांधत होता, पण थकल्यामुळे ती खूप गाढ झोपेत होती, ती तिथेच झोपेतच स्वतहाला कशीबशी अडजस्ट करत होती....
जय बऱ्याच वेळ काहीतरी विचार करत होता, जय च्या डोक्यात काही आले नि तो तिथून बाहेर गेला नि थोड्या वेळातच परत आला.....नयन तशीच झोपली होती, त्याने हातातली शाल बाजूला ठेवली आणि तिच्या जवळ जाऊन उभा राहिला...... तिला हात लावू कि नको, बराच वेळ तो विचार करत उभा होता......उद्या परत तीच कॉलेज असेल, नंतर नोकरी, तिची झोप होणार नाही विचार करत त्याने अलगद तिला आपल्या हातांवर उचलत आपल्या कुशीत उचलून घेतले....ती झोपेतच होती , तिचं डोकं त्याच्या छातीवर पडलं.......तिच्या डोक्याचं झालेल्या स्पर्शाने त्याला ती अजूनच त्याच्या जवळची वाटायला लागली.....
काश , अशीच तू नेहमी साठीच माझ्या मिठीत , माझ्या जवळ राहिलीस.....तिला बघत त्याच्या डोक्यात गोड विचार येऊन गेला.......डॉक्टर जय तुम्ही या मॅडम च्या प्रेमात पडले बहुतेक......स्वतःच विचार करत त्याला स्वताहवाराच हसायला आले.....त्याने तिला बाजूला असलेल्या बेड वर हळूवारपणे तिची झोप मोडणार नाही याची काळजी घेत बेड वर झोपवले......नी सोबत आणलेली शॉल तिच्या अंगावर टाकली.....शाल टाकत होताच की तेवढयात तिने त्याच्या हाथ पकडला.....थोड्या वेळ साठी तो दचकला, ती उठली की काय म्हणून त्याने तिच्या कडे बघितले तर तिने झोपेतच त्याचा हाथ पकडला होता....आणि त्याने रोखून ठेवलेला श्वास सोडला......तिने त्याचा हाथ पकडत तिची कड बदलली नी त्याच्या हाताच्या पंज्यावर डोकं ठेऊन झोपली.......तिच्या गालाचा मुलायम स्पर्श त्याचा गालाला होत होता.....पहिल्यांदा कुठल्या तरी मुलीचा असा स्पर्श तो फील करत होता......त्याला तसं उभ राहताना खूप अवघडल्यासारखं झालं होते.......तो तसाच तिच्या शेजारी असलेल्या चेअर वर बसला ....तिने अजूनही त्याचा हाथ पकडून ठेवलेला होता.......हाथ काढू की नको या द्वंद मध्ये त्याच मन फसले होते, हाथ काढतांना तिची झोपमोड झाली तर.......नको, नको, बसतो असाच थोड्या वेळ, आपोआपच सोडेल ती हाथ हा विचार करत तो तिच्या निरागस चेहऱ्याकडे बघत बसला होता.........
काय डॉक्टर , आमची ताई आवडली की काय......??...ज्योती
ज्योतीचा आवाज आला तसे त्याने मागे वळून बघितले.........तर ती त्याच्याकडे बघत हसत होती.....
ती जागी आहेस??.....जय
हो, तुम्ही मला चेक करायला आला होता तेव्हापासूनच.......ज्योती
आता त्याला ओशाळल्या सारखे झाले.......आणि त्याने कशीतरी स्मायल ज्योतीला दिली...
.तशी आमची ताई आहेच गोड.....हो ना???.......ज्योती
हो........ बरं हे आपलं सिक्रेट आहे, बर का.......नाहीतर चिडायची तुझी ताई............जय
हो.....टॉप सिक्रेट..............ज्योती
आणि मग बऱ्याच वेळ ज्योती आणि जय बोलत होते, बोलत काय तर जय नयन बद्दल विचारत होता, नी ज्योती त्याला तो जे जे विचारात होता ते सांगत होती.....
नयन ताई आज खूप दिवसांनी अशी निर्धास्त झोपली आहे.....शांत एकदम.....जेव्हा पासून मी तिला बघतेय ती अशी गाढ कधीच झोपलेली नाही.....आज तिला बहुतेक खूप सेफ वाटत आहे......ज्योती
जय नयन कडे बघत होता...झोपेतही तिच्या ओठावर गोड हसू होत...
बरं खूप गप्पा झाल्या आता, तुला झोपायला हवे, तुला आरामाची गरज आहे.........जय
हो डॉक्टर..........ज्योती ने डोळे बंद केले....
जय ने सुद्धा हळूवार पणे तिच्या हातातून आपला हाथ काढून घेतला.....नी तिच्या डोक्यावरून मायेने हाथ फिरवत एकदा तिच्या कडे बघितले नी त्याच्या कॅबिन ला निघून गेला....
******
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा