जय.... वेडी 5(अंतिम) ....आपण पण समाजाचं काही देणं लागतो.....

नयन.........

आता तीन महिने होत आले होते, जयने त्याला त्याच्या कामामध्ये वाहून घेतले होते......दिवस रात्र कशाचीही पर्वा न करता तो मनापासून आपले काम करत होता......अधूनमधून वेळ भेटेल तसा तो घरी आणि नयन ला फोन करत होता...

लॉकडाऊन असल्यामुळे नयन आता घरातच होती, घरूनच तिचे ऑफिस चे काम सुरू होते....पण तीच कशातच मन लागत नव्हते..... टीव्ही वर येत असलेल्या न्यूज मुले तिचा जीव अजूनच खालीवर व्हायचा.....ती फक्त जय च्या फोन ची वाट बघत असायची..,

आता लॉकडाऊन उघडले होते.....बाहेर बऱ्याच गोष्टी सुरू झाल्या होत्या.........गरज नसतांना सुद्धा लोकांची रस्त्यावर गर्दी वाढायला लागली होती....त्याचा परिणाम आता असा झाला होता की रोग्यांच्या संख्येमध्ये दुपटीने चौपटीने वाढ व्हायला लागली होती.....रोगाचं पसरते प्रमाण आता आटोक्याच्या बाहेर जायला लागले होते.....

नयन....मी तुला भेटायला आलोय....खाली येतेस..???....जय ने नयन ला फोन केला...

तो इथे आल्याचं ऐकून नयन चा आनंद गगनात मावेनासा झाला......आणि ती होती तशीच पळत खाली आली...,..नी त्याला समोर बघून तिला खूप आनंद झाला.....त्याला बघून तिच्या डोळ्यात आनंदाश्रू जमले होते.....ओठांवर हसू....का नाही होणार असे, तब्बल ४ महिन्यांनी तो तिला भेटायला आला होता.....

तो थोडा थकला वाटत होतं....जरा बारीक ही झाल्यासारखा वाटला.....पण चेहऱ्यावर मात्र तेच प्रसन्न भाव.....तो तिथेच गेट बाहेर आपले दोन्ही हात खिशात घालून तिच्या कडे बघत उभा होता.......

त्याला बघून ती पळतच त्याच्या जवळ गेली..... नी त्याच्या मिठीत जाणार तेवढयात तो मागे सरकला.......त्याला तसे करतांना बघून तिचा हिरमोड झाला....

नयु.....सोन्या, अशी नाराज नको होऊ ग राणी.....मी हॉस्पिटल मधून आलोय ना......आपल्याला सुरक्षेतेचे सगळे नियम पाळायला हवे ना.......जय

ह्मम.........,नयन

कशी आहेस पिल्लू........जेवत नाही काय नीट.....किती कोमेजली...... जय

तुम्ही पण तर बारीक झाला.......नयन

तू नव्हती ना जवळ......म्हणून........जय

मग माझं पण तसेच झाले......तुम्ही नव्हता ना खाऊ घालायला........घशाखाली अन्नच नाही उतरत......नयन बिचारा चेहरा करत त्याच्या सोबत बोलत होती

त्याला तिला तसे बघून हसायला आले..,

पण तुला असे करून चालणार नाही.....तुला नीट राहायला हवे.....राहशील ना.....माझ्यासाठी..??.......जय

तुम्ही आलात ना आता......आता बघा कशी मस्त गुबगुबीत होते........मग तुम्हीच म्हणाला आता बारीक हो.....नयन ने त्याची मस्करी केली...

नयन कॉफी दे ना ग........खूप थकलोय...........जय तिथेच बाजूला एक मोठसा दगड बघत त्यावर बसत बोलला......आणि हो पेपर ग्लास मध्ये आणशील........

हो....आलीच....... म्हणतच ती वरती घरी पळाली.....आणि ती त्याला आवडते अशी गरामा गरम कॉफी घेऊन खाली त्याच्या जवळ येत कॉफी चा ग्लास त्याच्या पुढे धरला....

तो शांत नजरेने तिच्याकडे बघत होता......,

तो कॉफी का घेत नाही आहे तिला कळत नव्हते.....आणि मग अचानक तिच्या लक्षात आले......नी तिने त्या ग्लास ला आपले ओठ लावत एक सीप घेतला.....नी त्याच्या पुढे ग्लास धरला....... तिला तसे करतांना बघून त्याच्या चेहऱ्यावर समाधानाचे स्मायल पसरले....

नयन खाली ठेव ग्लास...........जय

नयन ने त्याच्या पुढ्यात ग्लास खाली ठेवला......

त्याने तो ग्लास उचलून घेत.....तिने पिले होते त्याच साईड ने कॉफी पित होता........तिच्या हातचा कॉफी च समाधान त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.......त्याला बघून तिला पण बरे वाटले...

नंतर थोड्या वेळ अशाच थोड्या गप्पा मारत होते.....गप्पा काय नयन फक्त बोलत होती नि तो तीच ऐकत होता.....

नयन सोन्या,काळजी घे स्वतःची..... आणि हो अजिबात कशाला घाबरायच नाही.....मला माहिती आहे तू खूप स्ट्राँग आहेस.....पण तरीही सांगतोय....येणाऱ्या प्रत्येक परिस्थिती मध्ये खंबीर राहायचं........जय

हो.....तुम्ही सोबत असताना मला घाबरायच काय काम.........नयन

नयु........मी सोबत असेल नसेल....पण तू खंबीर राहणार आहेस.........जय

तुम्ही असे का बोलत आहात......नयन

अग राणी, मी फक्त तुला रिॲलिटी सांगतोय......जय

ओके........आता परत कधी याल....??....नयन

माहिती नाही......जय

म्हणजे....??....का..?...का माहिती नाही...??.....तुम्ही काही दिवस सुट्टी घ्या ना....किती थकला आहात....थोडा आराम करा, मग परत जा कामाला.....नयन

ह्मम ...बस काही दिवस, मग आरमच आहे......जय

ठीक आहे........नयन

I Love you Rani...... खूप मिस करतो तुला.....

Love you too doctor........ मी पण खूप मिस करते तुम्हाला...

नयु......एकदा जय म्हण ना.......जय

मला नाही जमत, डॉक्टर च ठीक आहे.....नयन

प्लीज ना नयु.....मला ऐकायचं माझं नाव तुझ्या गोड आवाजात.......जय

अहो....डॉक्टर....नाही ना हो जमत........नयन

प्लीज ssss...... असं समज शेवटचं मागतोय तुला काहीतरी....नंतर नाही मागणार.......जय

असं नका बोलू.....तुमचा हक्क आहे....तुम्ही मला काहीं पण मागू शकता.......मी माझं काळीज सुध्धा तुमच्या पुढ्यात काढून ठेऊ शकते......नयन

ते तर माझं खूप प्रिय आहे, ते कसे काय मागणार मी......फक्त एका जय म्हण...बस आणखी काही नकोय...... जय

जय......,जय.......I Love you.... Jay....... नयन

Thank you नयु......... बरं मला आता निघायला हवे..,...जय

ह्मम.....तिच्या डोळ्यात पाणी साचायला लागले....

नयु.....माफ कर मला....तुला दिलेली वचन मी नाही पाळू शकलो.....तुझ्यासोबत लग्न सुद्धा नाही करू शकलो.....नाही तुला माझ्या जवळ नेहमी साठी ठेऊ शकलो.......माफ कर ग राणी मला........तो तिच्याकडे बघत मनातच बोलत होता.........आता त्याच्या सुद्धा डोळ्यात पाणी होते......

इतक्या वर्षात आज पहिल्यांदा ती त्याच्या डोळ्यात पाणी बघत होती..........इतक्या कठीण परिस्थिती त्याच्या पुढे आल्या होत्या आतापर्यंत , पण कधीच तो डगमगला नव्हता.......तिने कधीच त्याचा डोळ्यात पाणी बघितले नव्हते......नेहमीच आलेल्या वाईट प्रसंगातून बाहेर निघू याचा आत्मविश्र्वास त्याच्या चेहऱ्यावर असायचा....पण आज पहिल्यांदा तो हरल्यासारखा वाटत होता.....आणि ती बऱ्याच प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे बघत होती, त्याचे डोळे वाचण्याचा प्रयत्न करत होती....

ही जर अशीच माझ्याकडे बघत राहिली तर हिला सगळं कळेल, इथून लवकर निघालेले बरे.....विचार करत च तो जाण्यासाठी निघाला...

Take care नयु.......Love you राज्या....... म्हणतच एकवार त्याने नयन कडे बघून घेतले...तिला डोळ्यात, मनात , साठून घेतले....नी तो कार मध्ये जाऊन बसला...

डॉक्टर......नयन.जोराने ओरडत त्याला फ्लायिंग किस देत होती......तिला तसे करतांना बघून त्याच्या चेहऱ्यावर हसू पसरलं....त्याने पण तिला तिथूनच फ्लायिंग किस दिले नी तिथून निघून गेला....

ती परत घरी आली.....पण तिला खूप बेचैन होत होते......काहीतरी होत जे ती समजायला मिस करत होती.......जेव्हापासून तिने त्याच्या डोळ्यात पाणी बघितले होते......तीच कशातच मन लागत नव्हते......तिला रात्री सुद्धा झोप लागली नाही......सतत डोळ्यापुढे जय येत होता...,.सकाळी सुद्धा तिला खूप घाबरायला होत होते.....आणि न राहाऊन शेवटी तिने जय ला फोन केलाच..

हॅलो डॉक्टर.........नयन

Yes नयन.....

तुम्ही कोण...??..,तिला जय चा आवाज आला नाही

नयन मी, मी डॉक्टर नील......नील

ओह...डॉक्टर नील....कसे आहात तुम्ही.....??...नयन

मी ठीक......नील

डॉक्टर नील......डॉक्टर ला.... I mean जय आहे काय तिकडे , त्याला देता काय फोन...?....नयन

नयन , त्याला आताच औषध दिलं आहे.....झोपला आहे तो.....,नील

आणि ते ऐकून तिच्या हातातला फोन खाली पडला.....,आणि आता कालचा जय आणि त्याचे शब्द तिला आठवायला लागले.......आणि आता तिला त्याच्या डोळ्यातल्या पाण्याचा अर्थ कळत होता.......ते सगळं आठऊन तिच्या काळजात खूप दुखायला लागलं.....तिला असहाय वेदना होऊ लागल्या......तिला श्वास सुद्धा घेता येत नव्हता.....तिच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहायला लागले होते.......तिच्या डोळ्यांसमोर आतापर्यंत चा जय येऊ लागला...

ये नयु......मी डॉक्टर आहो ना....कळते ना मला सगळे............... जय, जय हट्ट करत होता

काही कळत नाही तुम्हाला......नयन

अग , एक किस केल्याने काही नाही होत.......जय

नाही......हे सगळं लग्न नंतर......नयन

अरे यार तुम्ही सगळे किती हट्टी आहात.....तिकडे ते नाही मानत आहेत, इकडे तू नाही........मी आज पर्यंत एकही किस केले नाही आहे ना...... बघू तर दे मला कसं असते ते........जय

डॉक्टर फाजील हट्टीपणा नाही करायचा हा......नाही म्हणाले ना...नाही तर नाही.......नयन

अग किस केल्याने मुलं नाही होत ग बाई........जय

मला माहिती आहे ते.......नयन

मला माझ्या लिमिट माहिती आहे...........जय

माहिती मला ते पण.........नयन

मग.....मग काय प्रोब्लेम आहे........तू माझी आहेस, माझ्या जवळ आहेस....तरी पण मी तुला थोडासा पण स्पर्श नाही करू शकत यार.........how unlucky I am..........जय

नयन ला आता त्याचा बोलण्याच हसायला येत होते......

नयन किचन मध्ये काहीतरी काम करत होती...नी जय बाहेर सोफ्यावर लोळत टीव्ही बघत होता....कुठला तरी ह्रितिक रोशन चा हिंदी मूवी सुरू होता....नी त्यात एक किसींग सिन बघून जय चा हट्ट सुरू होता,....ज्याला नयन नकार देत होती...

डॉक्टर हे काय आज तुम्ही टीनएजर्स मुलांसारखे करत आहात......... आणि आधी ते चॅनल बदलावा......काय काय बघताय, नी काय काय डोक्यात येत आहे.......नयन

यार माझ्याकडे एकच गर्लफ्रेंड आहे, ती पण ही अशी हट्टी.......मग मी कुणाकडे जायचं..........जय

नयन ला तर आता हसूच आवरत नव्हते.......कसल्या लहानशा मुलासारखा त्याचा हट्ट सुरू होता....नयन हाथ धून त्याच्या जवळ जाऊन बसली..

असच कुणाच्यातरी हट्ट पणा मुळे माझा जन्म झाला असणार, नाही....??....सगळ्यांना सगळं माहिती असून सुद्धा योग्य वेळी भावनांवर संयम ठेवता आला नाही.....आणि मग आमच्यासारख्या मुलांचा जन्म होतो....आम्हाला फेकून देण्यासाठी.......या जगाचे वाईट अनुभव घेण्यासाठी......नयन त्याचा हाथ आपल्या हातात घेत त्याच्या डोळ्यांमध्ये बघत बोलत होती...

मला माझ्या लिमिट माहिती आहे नयु.....and trust me I will never ever leave you alone...... जर मी तुला सोडलं ना तर माझेच श्वास बंद होतील......जय

माझा तुमच्यावर स्वतःपेक्षा पण जास्ती विश्वास आहे....पण काही गोष्टी लग्न नंतरच शोभतात ना.....नयन

परत...........??....मी चाललो झोपायला.....डोक्यावर आठ्या पडतच तो बेडरूम मध्ये पाय आपटत चालला गेला ...

कोणी म्हणेल हे एक फेमस डॉक्टर आहे........ येडू च आहे...,..नयन हसतच त्याच्या कडे बघत बसली....

फोन च्या आवाजाने नयन भानावर आली....बघितला तर डॉक्टर नील चा फोन होता..

हॅलो डॉक्टर........नयन

ते फोन मध्येच कट झाला.........नील

डॉक्टर मला तुमच्या जवळ काम आहे.......नयन त्याच्यासोबत बोलली.....नी उठून आपले डोळे पुसले.....नी काहीतरी निर्धार केला.....छान सुंदर जय ला आवडते अगदी तशी तयार झाली.....सगळं तिने त्याच्या आवडीचे घातले.....त्याचा आवडीचा ड्रेस, त्याच आवडीचे परफ्यूम, लिपस्टिक...सगळं सगळं त्याचा आवडीचे......नी त्याला आवडणाऱ्या तिच्या खणखणार्या बांगड्या......तयार होऊन ती हॉस्पिटल मध्ये गेली......तिने आधीच नील सोबत बोलून ठेवल्याने....तिला आतमध्ये यायची परमिशन मिळाली होती.....नील ने तिला PPE safety किट घालायला दिली.......आणि जय च्या रूम मध्ये सोडले....

पेशंट ट्रीटमेंट देतांना कोरोना व्हायरस ने जय वर अटॅक केला होता.....आणि तो दोन दिवसापूर्वीच कोरोना पोझीटिव आहे त्याला कळले होते, आणि तेव्हाच तो शेवटचं एकदा बघायला नयन कडे गेला होता.....त्याला माहिती होत असे पोझिटीव असल्यावर बाहेर जाणं योग्य नाही, पण त्याला नयन ला बघायचा मोह आवरला नव्हता....शेवटचं एकदा त्याला तिला बघायचे होते....डोळेभरून मनभरून....तो सगळे प्रिकॉशन्स घेऊन तिला भेटायला आला होता....तो त्याच्याच हॉस्पिटल मध्ये एका प्रायव्हेट रूम मध्ये त्याची ट्रीटमेंट सुरू होती.....

नयन रूमर मध्ये आली.....जय बेड वर शांत झोपला होता....तिने एकदा जय कडे बघितले नी मागे वळून रूमचे दार लॉक केले.......त्या आवाजाने जय ची चुळबुळ झाली आणि त्याने मन वळाऊन बघितले आणि तो शॉक झाला.......

तू......??......तू इथे काय करते आहेस......?....this is not safe place for you....go......go out right now........ जय

नयन त्याच्या कडे बघत हळू हळू पुढे येत होती...

Nayu, listen me..... don't come to close me......go back......... जय ला तिला जवळ येताना बघून आता खूप भीती वाटत होती .

जिथे जय तिथे नयन..,..आपलं आधीच ठरलं होत ना.....मग मला एकटीला सोडून कसे काय आलात तुम्ही.....मला नेहमी तुमच्याजवळ ठेवायचे प्रॉमिस विसरलात काय तुम्ही......you can't break my promise.......म्हणतच ती तिने घातलेली PPE किट काढत होती...

What are you doing....??... don't remove it, it's for your safety....... जय, बोलतच होता की तो तिच्या कडे अवाक होत बघत होता........ती पूर्ण त्याला आवडते तशी तयार होऊन आली होती........तिच्या डोळ्यात त्याच्या प्रती खूप प्रेम दिसत होते, चेहऱ्यावर कुठलीच भीती नव्हती.......निर्धास्त वाटत होती......आणि त्याला तिच्या डोक्यात सुरू असलेल्या गोष्टी कळत होत्या....आणि आता त्याला खूप भीती वाटायला लागली होती......

I want to feel you.....I want to touch you....... I want to kiss you.......I want to live within you.......म्हणतच ती त्याच्या जवळ त्याच्या बेड वर जाऊन बसली...

Stay...... stay away from me......... please nayu .... ऐकना, नको माझ्या जवळ येऊ राज्या.....नको ग राणी........खूप त्रास होतोय.......जय

एकमेकांचा त्रास आपण वाटून घेणार होतो ना.....मी परत जायला नाही आले आहे........मला फक्त नी फक्त तुमच्या कुशिमध्येच जगायचं, तुमच्या कुशिमध्येच मरायचं........आता मला दुसरं काहीही नको आहे.....फक्त तुम्ही हवे आहात..... I want you only.....you are my life.....wherever you will go,  we will travel together............ म्हणतच ती त्याच्या पांघरुणात त्याच्या कुशीत शिरली...आणि त्याला घट्ट बिलगली......तिच्या जवळ येण्याने, तिच्या स्पर्शाने त्याचं मन खूप भरून आलं होत.......आपोआप त्याचे डोळे मिटल्या गेले.......त्याच्या डोळ्यातून अविरत अश्रू बाहेर येत होते.....आणि कुठल्या क्षणाला का आपण तिच्या प्रेमात पडलो......का तिला आपण आपल्यासोबत आपल्या आयुष्यात आणण्याचा हट्ट केला.....तो स्वतहालाच खूप दोष देत होता......

इतक्या वर्षात आज पहिल्यांदा ती त्याच्या इतक्या जवळ आली होती..,...तिने त्याच्या शरीराचा पूर्ण ताबा घेतला होता.........तो क्षीण झाला होता, तिला प्रतिकार करण्यात त्याची शक्ती कमी पडत होती......तिने हळूवार पणे त्याच्या कपाळावर किस केले........आणि तिच्या त्या स्पर्शाने त्याच्या हृदय मधून खूप दुखरी अशी कळ गेली.....इतक्या वर्षापासून तो तिच्या त्या गोड स्पर्शासाठी आसुसला होता.....पण आज त्याला तिचा तो गोड स्पर्श नको होता........ती सुखरूप असावी तेवढीच एक इच्छा होती त्याची......तो मनोमन ती सुखरूप असावी याची देवाकडे प्रार्थना करत होता....देवा जवळ प्रार्थना करण्या खेरीज आज त्याच्याजवळ काहीच उरलं नव्हते.........तिने तिच्या आवडत्या त्याच्या गालांच्या खळीवर किस केले.......आणि आता तिची नजर त्याच्या ओठांवर गेली.......ते त्याच्या लक्षात आले, आणि त्याने ती जवळ येत आहे बघून त्याची मान पलटली........तिने हळूवारपणे आपल्या हाताने त्याची मान वळावत स्वतःकडे केली.......तो तिच्या कडे असहाय नजरे ने बघत होता........

I Love you Jay........ तुम्ही मला खूप छान आयुष्य दिलं आहे........खूप मनसोक्त जगले तुमच्या सोबत...तुमच्यामुळे माझ्या आयुष्याला मान मिळाला........you are the most beautiful  creation by God.......म्हणतच एकदा त्याच्या डोळ्यात बघितले.......नी त्याच्या ओठांवर आपले ओठ टेकवले........नी तिला श्वास घेता येईल तोपर्यंत ती त्याला किस करत होती.......जगाची सगळी बंधन सोडून आज ती त्याच्या सोबत एकरूप झाली होती.......

*******
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी........

का मला परत अनाथ करून गेलात......नयन दूर रस्त्यावर एका ठिकाणी बसून  आगीत एकरूप झालेला जय बघत आसवे गाळत होती....वयाच्या अवघ्या अठ्ठावीस वर्षी एकुलता एक तो त्याच्या आईवडिलांना, त्याची जीव की प्राण त्याची नयु सगळ्यांना मागे सोडून गेला होता..

काल जेव्हा ती त्याच्या जवळ गेली होती, पूर्णपणे त्याची झाली होती.....तेव्हा तिला कितीही समजावले तरी ती समजण्याच्या पलीकडे गेली होती..आणि आता ती बोलण्याने समजणार नव्हती त्याला कळले होते......आणि त्याने तीच लक्ष नसतांना तिच्या मानेवर हाताने एक वार करून तिला बेशुद्ध केले होते.....नी नील ला नी बाकी स्टाफ ला बोलाऊन घेतले...

नील, तू काबर तिला आतमध्ये सोडले....??.......जय

तिने मला तिचा जीव देण्याची धमकी दिली होती........ I was helpless....... नील

हे ऐकल्यावर जय ला काय बोलावं काहीच कळत नव्हते...

Nil, please take care of her.........today she was very much close to me .... कळतेय ना तुला....I have clean her throat and possibly everything......but start all the treatments for her....and all the tests........ आणि तिथे टेबल वर माझे काही प्रॉपर्टी पेपर्स आहेत, तिच्या नावावर केले आहेत......sanaitize it, and take it....... जय

जय ला कळले होते तो आता त्याच्या कडे खूप कमी वेळ उरला आहे , आणि म्हणूनच पुढे भविष्यात नयन काही त्रास होऊ नये म्हणून त्याने तिला गरज पडतील असे सगळे पेपर्स साइन करून ठेवले होते.....

नील फक्त त्या दोघांकडे बघत होता....जे होत होते ते सगळं त्याच्या समजण्याच्या पलीकडले होते........एक जो तीच भविष्य सेक्युर करत होता....आणि एक जी त्याच्यासोबत जायचा प्लॅन करत होती.......तो आपल्या कर्तव्याला जगला होता...ती आपल्या प्रेमासाठी जगली होती...

******

नयन च्या डोक्यात फक्त जय होता...बाकी ती सगळच विसरली होती..आणि हे होणारच होते...त्याचं प्रेम इतकं वरचढ होत की तो नसण्याच अस्तित्व तिला सहन च होत नव्हते....जय शिवाय तील काहीच दिसत नव्हते, ती सैरभैर झाली होती...........
आता सणवार सुरू झाले होते, रस्त्यांवर गर्दी वाढली होती.....नयन रस्त्यांनी सगळ्यांना येता जाता ...बाहेर नका येऊ, घरात रहा...गरज नसतांना बाहेर फिरू नका खूप विनवण्या करत होती.....

आबा घरी रहा हो.....मावशी नका हो शॉपिंग करू.....यावर्षी नवीन कपडे नाही घातले तर दिवाळी दसरा नाही होणार काय..?...तुमची लक्ष्मी तुमच्यावर रुसणार काय....??....नका हो बाहेर येऊ......आमचं आयुष्य रुसतय आमच्यावर......समजेल कळेल अश्या शब्दात प्रेमाने तर कधी ओरडून...ती रस्त्यावर येता जाता लोकांच्या हाथ पाय जोडत विनवण्या करत रस्त्यांवर फिरत होती.....तिला कशाचीच सुधबुध नव्हती...... लोकं ऐकत नाही बघून २ ३ दा ती लोकांवर ती धाऊन सुद्धा गेली होती........आता तर ती लोकांना पागल वाटायला लागली होती........आणि अशातच तिच्याकडून लोकांना इझा होत आहे बघून गर्दिपैकी लोकांनी पोलिस स्टेशन ला फोन करून पोलिस तिला मेंटल असायलाम मध्ये घेऊन गेले होते.....त्यातूनही ती तिथून पळून आली होती....नी परत रस्त्यांवर फिरत होती.....नी परत लोकांना विनवण्या करत होती..... परत हॉस्पिटल वाल्यांनी तिला पकडुन आणलं होते, नी तिला शॉक दिले होते......हे असेच गेल्या तीन महिन्यापासून सुरू होते.......

नयन ने आपल्या उशिखालून जय चा फोटो काढला.....नी प्रेमाने त्या फोटोवरून हाथ फिरवत होती........

I love you doctor....... तिने फोटो ला किस केले, बाजूला ठेवलेली त्याने तिला पहिल्यांदा दिलेली शाल आपल्या अंगावर पांघरून घेत , हाथ पाय आपल्या छातीशी कवटाळून झोपली....

कोरोना आधी जाणार की ती बरी होणार आता याचीच वाट होती.......

समाप्त

*********

नमस्कार मित्रांनो

आता हे जे कोरोना नावाचं महामारीच संकट आपल्यावर आलंय....ते आपल्या सगळ्यांना मिळून आपल्याला त्यासोबत फाईट करायचे आहे.....एकमेकांच्या सोबतीने आपल्या यातून बाहेर पडायचे आहे...

डॉक्टर्स, नर्स, पोलिस, सुरक्षा कर्मचारी सगळे आपल्या साठी त्यांच्या जिवाचं बलिदान देत आहेत...निस्वार्थ पणे आपल्या समाजाची काळजी घेत आहेत.....

..सगळ्यांना विनंती आहे की गरज नसतांना बाहेर नका, पडू...... स्व सुरक्षेची पूर्ण काळजी घ्या..थोडासा आपल्या मनावर कंट्रोल ठेवा....आपल्या enjoyment मुळे दुसऱ्यांची आयुष्य उद्ध्वस्त होणार नाही याची काळजी घ्या...

कथा कशी वाटली नक्की कळवा....काळजी घ्या...

******

🎭 Series Post

View all