जावयाचा मान

काय बरोबर!? तेव्हाही दोन माणसं होती आताही तेवढीच .काय आहे ना सध्या माझे ई.एम.आइ मुळे बरेच पैसे कापले जातात. तेव्हा हे ॲडव्हान्स घेणे. -------------------------------------
*जावयाचा मान*

उषाने टेबल आवरले व पर्स उचलून उठली, तेवढ्यात सुधाकर ,\" तिचामित्र कम सहकर्मी\" बॉस च्या केबिन कडे जाताना दिसला.
उषा त्याची वाट पहात उभी राहीली. रोज ती व सुधाकर बरोबर ऑफिसमधून बाहेर पडतात व बस स्टॉप पर्यंत पायी जातात. सुधाकर बसने पुढे जातो. उषा चा नवरा तिथे तिला घ्यायला स्कूटरवर येतो, त्याचे ऑफिस अजून पुढे आहे मग ते बरोबर घरी जातात.
सुधाकरने बाहेर येताच सांगितले की, ऍडव्हान्स मनी अॅपलिकेशन द्यायला गेला होता.
"आत्ता ??दिवाळी तर होऊन गेली" मग?
" अग आई-बाबा येणार आहे".
ते तर दिवाळीतच येऊन गेले ना?
"माझे नाही ग, हिचे सुनंदा माझ्या बायकोचे".
अच्छा अच्छा.
दिवाळीत मी विचारले होते नां तेव्हा नाही म्हणाली. मग आता कां कोण जाणे?
"अरे असेल गरज."
"म्हणत होती, दूध जास्तीचे लावावं लागेल, आणि किराणाही एक्स्ट्रा, त्याशिवाय इतर खर्चही वाढतील."
"बरोबरच आहे".
काय बरोबर!? तेव्हाही दोन माणसं होती आताही तेवढीच .काय आहे ना सध्या माझे ई.एम.आइ मुळे बरेच पैसे कापले जातात. तेव्हा हे ॲडव्हान्स घेणे.
ते खरे ",पण --सुनंदाचे ही बरोबर आहे."
म्हणजे बघ --तुझे आई बाबा त्यांना तुझी खरी परिस्थिती माहीत आहे, आणि दुसर म्हणजे सुनंदाने जर वेडावाकडा खर्च न करता आहे तेवढ्याच भागवले ते तुझ्या आईने पाहिले म्हणजे त्यांनाही ते पटले असेल.
हो-- आई कौतुक करत होती माझ्याजवळ, कि सुनंदा संसार नीट नेटका, थोडक्यात पण व्यवस्थित करते.
पण--- आता गोष्ट वेगळी आहे. तिचे आई-बाबा येणार\" त्यांना कुठलीही कमतरता दिसायला नको .नाहीतर त्यांना वाटेल आपल्या मुलीला संसारात सुख नाही, आणि --मग ते मदत करू पाहतील .ते तुला आवडणार नाही .
बापरे--" हे माझ्या लक्षात नाही आले", सुधाकर घाबरून म्हणाला.
"अरे --आम्ही बायका आपल्या नवऱ्याची" आब" सांभाळायचा प्रयत्न करतो."
काही झाले तरी तुझा मान सांभाळायचा प्रयत्न आहे हा सासू सासर्यां समोर, तिच्या नवऱ्याचा"म्हणजेच" जावयाचा मान"कमी नको व्हायला.
"बापरे, हे माझ्या लक्षातच नाही आलं"
"धन्य आहात तुम्ही बायका" सुधाकर हात जोडत हसत म्हणाला.
-------------------------------------