Feb 22, 2024
विनोदी

जावयाला सासुरवास

Read Later
जावयाला सासुरवास

आज शामल आणि जयेश यांच्या लग्नाची बोलणी झाली. नेहमीप्रमाणे याद्या, देवाणघेवाण, मानपान हे सगळ ठरलं. येणाऱ्या आठवड्यातला मुहूर्त धरण्यात आला. लग्न उत्तमरित्या पार पडले. जयेश उंबरठा ओलांडून घरात आला. जयेशने येताना खूप स्वप्न रंगवली होती जसं की बायको प्रेमळ असेल, सासुसासरे आईवडिलांप्रमाणे असतील. पण कसलं काय ? घरात येताच त्याला सगळ्यांचे खरे रुप दिसु लागलागले.
आल्यादिवशीच सासरेबुवांनी सांगितले आपल्याकडे मात्रुसत्ताक पध्दती आहे. त्यामुळे अर्थाज्रनाचे काम आपल्या घरातील स्रियाच करतात तर घरातील सर्व काम आपण करणे बंधनकारक आहे. मी आणि माझा मुलगा म्हणजे तुझा मेहुणा मिळुन ही कामे करतो. आता तु आला आहेस तर या घरचा जावई म्हणून सगळी जबाबदारी तु घेणं क्रमप्राप्त आहे. जबाबदारी दिली असली तरीही मनाचा कारभार करु नकोस. सर्वच गोष्टी सासू किंवा बायकोला एकदातरी विचार, नाहीतर तुझ्या नादात आम्हाला मार खावा लागेल.
हे ऐकताच जयेशला सासु आणि बायकोची भितीच वाटु लागली. दुसऱ्या दिवसापासुन जयेशला सासरवास सुरु झाला. कारण शामल समोर असताना खूप गोड गोड बोलत असत याउलट शामल नसताना मात्र बिचार्या जयेशला सर्व काम लावत असत. पहाटे पाचला सुरू होणारी कामे रात्री अकरापर्यंत चालत असत. सगळ्यांचे डबे, झाडलोट, केरकचरा आणखी छोट्या मोठ्या कामाचे ओझं एकट्या जयेशवर पडे. पण त्याने कधी कोणाविरूध्द  तक्रार केली नाही. सर्व काही निमुटपणे सहन केलं.
घरी कधी फोन केला तर त्याचे वडील समजून सांगत "अरे आपला जन्म हा सहन करण्यासाठी आणि जुळवून घेण्यासाठी झाला आहे". सगळ काही छान होईल असे सांगत. बाबांसोबत बोलुन त्याला थोडा धीर येई.
पण एक दिवस तर हद्दच झाली. सासूसासर्यांचे असे म्हणणे होते की आता बरेच दिवस झाले लग्नाला तर आम्हाला नातवंडे खेळवायची आहेत. यासाठी जयेशची ना नव्हती पण घरातल्यांना कुलदिपिकाच हवी होती. याउलट जयेशसाठी मुलगा मुलगी समान होते. शामलच खुप प्रेम होत जयेशवर पण तिला आईवडील विरुद्ध नवरा या वादात पडायच नव्हतं. जयेशने घरातल्या सर्वांना समजावण्याचा प्रयत्न केला . त्याचे कोणी ऐकले तर नाहीच याउलट बाबांसोबत भांडल्यामुळे शामलने जयेशला खाडकन कानाखाली लगावली.
अन् तो जागा झाला. हो .जागा झाला कारण हे सत्य नव्हे तर स्वप्न होते. स्वप्नात एकच फरक होता तो म्हणजे शामलच्या ठिकाणी जयेश होता. आणि जयेशच्या ठिकाणी शामल. खरी परिस्थिती अशी होती की या घरात शामलला कोणीही समजावून घेत नसे आणि घरातल्यांचा अट्टाहास होता तो मुलासाठी. पण या स्वप्नानंतर जयेश स्वप्नातच नाहीतर खर्याखुर्या आयुष्यात सुध्दा जागा झाला. त्याने प्रेमाने शामलकडे पाहिले. आज पहिल्यांदा तिच्यासाठी बेड टी बनवला. शामलने उठल्यानंतर हे पाहिले. तिला आश्चर्याचा धक्काच बसला. पण जयेशने प्रेमाने तिच्याकडे सर्व चुका कबूल करून तिची माफी मागितली. आणि आयुष्यभर तिची साथ देण्याचे वचन दिले. शामल हे ऐकताच साश्रु नयनांनी जयेशला बिलगली.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Mrunal Mohite

Lecturer

I am Pursuing my PhD in English. But My First Love Is Reading And Writing

//