जावे त्यांच्या वंशा

आता ती एक चिमणी आहे जी उडू शकते
जावे त्याच्या वंशा

रीना ऑफिसमधून निघाली, आज शनिवार, हाफ डे होता .
वाटेत थोडे सामान घ्यायला एका स्टोर समोर गाडी थांबवली.
एक तारीख असल्याने दुकानात बरीच गर्दी होती.
दुकानाच्या बाहेर काही पोती धान्याची ठेवलेली होती त्यातले काही धान्य खाली सांडलेली दिसत होते .तिथे काही चिमण्या येऊन ते दाणे टिपत होत्या.
\"किती मजा यांची काही टेन्शन नाही ,यावे आणि हवं ते खावे \"रीना ला वाटले.

सामान घेऊन रीना निघाली.
आज शनिवार म्हणून वाहनांची बरीच गर्दी होती . ट्रॅफिक सिग्नल लाल पाहून रीना ने गाडी थांबवली.रस्त्याच्या पलीकडे दोन गाड्यांची टक्कर झाली होती त्यामुळे जाम लागला होता.
चार दिवसांनी राहुल टूर वरून आला असेल त्यामुळे रीनाला घरी पोहोचायची घाई होती त्यामुळे ही पांच मिनिटेही तिला भारी वाटत होती.

सूर्य अस्ताला चालला होता, आकाशात पाखरांचा एक थवा चिव चिवत तिच्या डोक्यावरून गेला.
" मलाही असे पंख असते तर-- भुर्रकन उडून घरी गेले असते असे रीनाला वाटले तेवढ्यात ग्रीन सिग्नल झाला आणि गाड्यांच्या त्या प्रवाहात तीही सामील झाली

रात्री स्वयंपाक घर, ओटा आवरून रीना बेडरूम मध्ये आली तेव्हा राहुल महिनाभराच्या खर्चाशी हातमिळवणी करत होता.
मुलांची फीस, औषध, पेट्रोल, किराणा , औषध, घराच्या लोन ची किश्त या सगळ्या खर्चा नंतर काय उरते ?त्यानंतर मुलांच्या फर्माईशी, येणारे जाणारे लग्नकार्य एवढ्या सगळ्या नंतर फारसे काही उरतच नाही.

कितीतरी दिवस झाले रीनाला नवीन ड्रेस घ्यायचा होता पण,---.

उद्या रविवार म्हणायला सुट्टी पण राहुल चे टूर वरुन आल्या वरचे कपडे धुवायचे, सकाळ चा नाश्ता,, एक च दिवस सुट्टीचा म्हणून आरामात उठण
. दुपारच्या जेवणात काहीतरी स्पेशल हव,असा विचार करत तिने उठून छोले भिजवले, तिच्या हातचे छोले भटूरे मुलांना खूप आवडतात.
रोज तर घाई गर्दीमध्ये भाजी पोळी असते, सासुबाई संभाळतात सर्व पण एक दिवस तरी त्यांनाही आराम हवा .

रीना झोपायला आली तेव्हा राहुल घोरायलाही लागला होता.

आई-बाबांच्या खोलीतून टीव्हीवरच्या सिनेमाचा शेवटचा सीन झालेला दिसत होता एक गाणे वाजत होते "पंछी बनू ऊडती फिरू मस्त गगन में"

रीना ला वाटल"काय माणसाचे आयुष्य सारखी दगदग धावपळ आणि चींता"पण् जर ती ही चिमणी असती तर किती चिंतामुक्त जीवन असते. फक्त दाणे टिपायचे उडायचे .उद्याची काहीच काळजी नसती.

विचार करता करता डोळे जड व्हायला लागले आणि असे वाटले जसे शरीर हळूहळू हलके हलके होत आहे .
आता ती एक चिमणी आहे असे तिला दिसू लागले जी उडू शकते.तिने पंख पसरले आणि बाहेर आली.

इतर चिमण्या बरोबर ती उन्मुक्त उडू लागली.
उडता उडता ती एका शेतात उतरली आजूबाजूला बरेच पक्षी दाणे टिपत होते रीनाला ते दाणे खाल्ले पण अगदी च बेचव लागले.

अचानक सर्व चिमण्या ओरडू लागल्या रीना चिमणीला काही कळेच ना काय झाले?
ती उडून झाडावर येऊन बसली खाली पाहते तो एक मोठ्ठमांजर एका चिमणीला तोंडात धरून बसलं होतं.
रीनाचा जीव घाबरला. बापरे .
आता हळूहळू अंधारायला लागले सर्व पक्षी घरट्याकडे परतू लागले .
रीना ला ही घरी जावेसे वाटू लागले. सर्व चिमण्यांसोबत तीही निघाली.
झाडाच्या तिथे बराच गोंधळ दिसत होता झाडाच्या फांद्या कापलेल्या होत्या कुठेच बसायला जागा नव्हती. घरटे उध्वस्त झाली होती.

कशीबशी एक जागा शोधून ती इतर चिमण्यांप्रमाणेबसली. आता तहान ही लागली पण पाणी कुठे असेल कळेना हळूहळू ती फांदीवर झोपली .

मध्येच तिला जाग आली, खाली पाहिलं तर एक सांप झाडावर चढून येत होता तो अगदी तिच्याजवळ पोहोचला ,घाबरून तिने किंकाळी मारली असे वाटले जसे दोन्ही पाय फांदीवरून सुटले व ती खाली खाली पडते आहे .

"रीना--रीना ,राहुलच्या आवाजाने रीना ची झोप मोडली.
कां ग --काही वाईट स्वप्न पाहिलं कां?

हं--म्हणत तिने परत डोळे मिटले.

सकाळी खूप उशिरा झोप उघडली. रीना बाहेर आली.

बाहेर माळी उभा होता,हातात कुर्हाड घेऊन.

\"ताई, झाडाच्या फांद्या छांटायच्या---\"

"नाही नाही, फांद्या वगैरे कापायच्या नाही."
माळी आश्चर्याने पहात राहिला.
"असं कर फांद्यांवर मातीचे भांडे लावून त्यात दाणे व पाणी भरून ठेव पक्ष्यांसाठी."

रीना आत आली, राहुल चहाचा कप घेऊन उभा होता.
" घे,चहा पी."
"अरे पण --मला उठवलं का नाहीं?

" अग आज संडे आहे,
संडे इज हॉलिडे ."

बस आरामात.

चहा पिता पिता रीना ला जाणवले ती जो विचार करत होती त्या प्रमाणे पक्ष्यांचे जीवन वाटते तितके सोपे नाही
. स्वप्नात का होईना तिने चिमणी होऊन तो अनुभव घेतला. बरीच संकट त्यांच्या जीवनात असतात .
चिमण्यांपेक्षा माणूस म्हणून जगणेच आनंदाचे आहे. कमीतकमी आपलं माणूस आपल्या सोबत असतं.
"जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे" असे मनाशी म्हणत ती उठून कामाला लागली.
--------------------------------_-----

-------------------------------------------
लेखन. सौ.प्रतिभा परांजपे