जरी दूर तू

जरी दूर तू आज आहे तरीहीतुझे गीत माझ्या ओठात आहेतुझे स्वप्न आहे नजरेत माझ्यातुझे प्रेम जपले मी हृदयात आहे

जरी दूर तू




जरी दूर तू आज आहे तरीही

तुझे गीत माझ्या ओठात आहे

तुझे स्वप्न आहे नजरेत माझ्या

तुझे प्रेम जपले मी हृदयात आहे


किती ओढ आहे नभाला भूमीची

तो पाऊस होऊन येतोच ना!

मी वाऱ्यात मिसळून आले कधी तर,

सांग तेव्हा तूला ते समजेल ना?


कधी सावली मी होऊन येईल

तुझ्या उन्हाला मी बिलगून जाईल,

मी रोज तुझिया स्वप्नात येईल 

माझिया क्षणांवर तुझे राज्य राहील


श्वासात एका येईल कधी तर,

कधी स्पंदनी तुझ्या येईल मी

अश्रुत दाटून मी येईल तुझिया

अशी रोज भेटून तुला जाईल मी


राहील मी आजन्म तुझी रे

दुराव्यात ही अंतरी तू राहशील 

दोन ध्रुवांवर दोघे आपण,

ही भावना विसरून तू जाशील.



***



कवयित्री :- कोमल पाटील

कवितेचे नाव : जरी दूर तू

कवितेचा विषय : दोन ध्रुवांवर दोघे आपण

जिल्हास्तरीय कविता स्पर्धा फेरी -2

जिल्हा : नाशिक


©Komal Patil