जरा विसावू या वळणावर

गाणी जी तुम्हाला सकारात्मक बनवतात
मला गाणी मग तू जुनी, नवी ,मराठी ,हिंदी, इंग्रजी सर्वच ऐकायला खूप आवडतात असच एक गाणं आहे "भले बुरे जे घडून गेले विसरून जावू सारे क्षणभर जरा विसावू या
वळणावर" किती अर्थपूर्ण आणि जगण्याची नवीन कला शिकवून जात हे गाणं ...
आपल जुन वैर , भांडण ,एखाद्या बद्दल अडी किती काळ मनात ठेवून असतो , का नाही आपण ते विसरून जात आणि नव्याने नात्याला सुरुवात करत ....
खर तर ह्या गाण्यात जे सांगितलंय तसे आपण वागू ना तर घटस्फोट , खून , या अतिशय टोकाच्या गोष्टी होणारच नाहीत , मी कितीतरी बातम्या वाचते आणि मन सुन्न होवून जात , काय तर मुलगी पळून गेली म्हणून तिच्याच आईने तिचा खून केला , इतका मोठा गुन्हा असतो का की त्याची शिक्षा आयुष्य संपवून द्यायची त्या पेक्षा शांत व्हा आणि रोज हे गाणं ऐका, हळू हळू तुमचा राग निघून जाईल ,
कधी कधी नवरा बायको खूप टोकाचे भांडतात आणि घटस्फोट घेवुन टाकतात नंतर काही वर्षांनी त्यांना पश्र्चाताप देखील होतो तेव्हा परिस्थिती जास्त चीगळली नसेल तर विसरून जा ना सारे क्षणभर आणि नव्याने सुरुवात करा ....
जेव्हा तुम्हाला ह्या गाण्यातील शब्द आणि शब्दाचा अर्थ कळेल तेव्हा तुम्हाला वाटेल खरंच आपण उगाच नको त्या गोष्टीसाठी भांडत होतो , आयुष्याच्या प्रत्येक वळणावर काही चांगलं घडेल काही वाईट घडेल , म्हणून नेहमी वाईटच लक्षात ठेवलं तर कस चालेल ? त्या पेक्षा वाईट विसरून चांगलं तेवढं लक्षात ठेवूया ना ...
हे गाणं खर तर मला आई कुठे काय करते मध्ये अरुंधती ने गायलं तेव्हापासून अजूनच आवडलं , किती कणखर दाखवले आहे तिला जिच्यासाठी तीच विश्र्वाच नवरा ,आणि मुल हेच होत त्याच नवऱ्याकडून विश्वास घात झाल्यावर देखील ती उठून उभी आहे आणि भव्य अश्या त्या मंचावर अतिशय सुरेल आवाजात डोळे मिटून ती " भले भुरे जे घडून गेले विसरून जावू सारे क्षणभर "म्हणते आहे , आणि तिला पाहून तिच्या जुन्या नवऱ्याच्या देखील डोळ्यात पाणी उभे आहे , टचकन आपल्या देखील डोळ्यात पाणी आणणारा हा प्रसंग , जितकं हे गाणं दुःख विसरायला लावत तितकंच ते तुम्हाला सकारात्मक व्हायला लावत आयुष्यात कितीही वाईट होवू देत मी ते दुःख कुरवाळत नाही बसणार , आणि जे घडलं ते विसरून आहे त्या क्षणाचा मिळालेल्या आयुष्याचा आनंद घेणार किती सकारात्मक विचार!!!!!
नक्की नक्की हे गाणं ऐका आणि तस वागून पाहा बघा आयुष्य अजून सुंदर होईल ......