जरा विसावू या वळणावर - भाग 7 (अंतिम)

Marathi Story
जरा विसावू या वळणावर - भाग 7 (अंतिम)

मागच्या भागात आपण वाचले अमित कोणालाही न सांगता लग्न करून घरी येतो....आता पुढे

अभि आणि अनुने दरवाजाच्या दिशेने धाव घेतली.
दारात अमित आणि त्याची बायको दोघे उभे होते.दोघांच्या गळ्यात फुलांचे हार होते.
दोघांना असे बघून अभि - अनुला धक्काच बसला.
काय बोलावे, काय नाही दोघांनाही समजत नव्हते.जणू काही समोरचे दृश्य खोटे आहे.काहीतरी वेगळेच घडते आहे की काय असे वाटून अनु अमितला म्हणाली...

" अमित, अरे हे काय? असे का थांबले तुम्ही. तुमच्या कंपनीत काही कार्यक्रम होता का? "

नाही आई....मी लग्न केलंय.

हे एकूण अनुच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते.
तिने कावऱ्या -बावऱ्य नजरेने अभिजीत कडे बघितले.

"अमित, आई-बाबांना एकदाही सांगावेसे, विचारावेसे वाटले नाही तुला. एवढा मोठा डिसिजन एकट्याने घेतलास. असं अपेक्षित नव्हत आम्हाला "

अभिजीतला चिडलेला पाहून अमित म्हणाला,

"बाबा मी सगळं सांगणारच होतो पण अशा काही घटना घडल्या की मला लग्न करावं लागलं. आम्ही आत येऊ का?"

"अरे असे कसे लगेच लग्न करावं लागलं आणि तू असं कसं वागू शकतोस."
अनुला तर आपल्या मुलावर विश्वासच बसत नव्हता.

"आई आत येऊ का ?आत आल्यावर सगळं सांगतो."

"या असे म्हणून अभिजीत आत गेला. पाठोपाठ अनु आणि मयुरी ही गेल्या .
अमितही त्याच्या बायकोला घेऊन आत आला.
सर्वजण हॉलमध्ये बसले होते.
अभि- अनु अमित च्या बोलण्याची वाट बघत होते.
पाच दहा मिनिट अमित शांत बसला

"अमित काही सांगणार आहेस का?"
अभीचा आवाज चढला होता.

"हो बाबा,
ही नैना. माझ्याच कंपनीत जॉबला आहे. आमचे एकमेकांवर प्रेम आहे पण इतक्यात लग्न करायचं नव्हतं आम्हाला म्हणून तुम्हाला काहीच सांगितले नव्हते. पण आज अचानक नैनाचा फोन आला आणि ती म्हणाली तिच्या आई-बाबांनी तिच्यासाठी दुसरा मुलगा बघितला आहे."

"अरे मग लगेच लग्न करायचं का?आधी आमच्याशी बोलायचं आम्ही बोललो असतो तिच्या आई-बाबांशी."

"बाबा तेवढा वेळ नव्हता. नैना ने माझ्याबद्दल सांगितले होते पण ते आमच्या लग्नाला तयार नव्हते. म्हणून मग.."

"म्हणून काय तुम्ही पळून जाऊन लग्न केलं"
अनु चिडून म्हणाली.
"आई असं का म्हणतेस,मी घरी आलोय."

"अरे वा! खूपच मोठ काम केलं. अरे पण हिच्या आई-वडिलांचं काय त्यांच्यासाठी तर तू त्यांच्या मुलीशी पळून जाऊनच लग्न केलं ना."

"प्लीज असं रागवू नका मीच अमितला लग्नासाठी आग्रह केला. आई बाबा माझा ऐकून घ्यायला तयार नव्हते म्हणून मग मला..".....
एवढं बोलून नैना ने खाली मान घातली.

यावर आता काय बोलावे ते अनुला सुचत नव्हते.
थोड्या वेळ सगळेच शांत बसले.

अमित हळूच म्हणाला
"बाबा तुम्हालाही मान्य नसेल तर.."

"तर ....तर काय?"... अभि

"तर आम्ही दोघेही बेंगलोर ला शिफ्ट व्हायचा विचार करतोय."
"वा छान! पुढचाही प्लॅनिंग ठरवून आला आहेस. मग आता काय बोलायचे. अजून काही राहिले असेल सांगायचे तर सांगून टाक."....... अनु

"आई रागवू नकोस ग.
बाबा, भीती हीच वाटते आहे की, समज नैनाच्या बाबांनी पोलीस कम्प्लेंट केली तर....
बाबा प्लीज तुम्ही बोलता का नैनाच्या आई-बाबांशी.
तुम्ही सांगा ना त्यांना त्यांची मुलगी माझ्याबरोबर सुखी राहील."

मुलाचे हे बोलणे ऐकून अभी आणि अनु नि:शब्द झाले होते.
मुलाच्या सुखासाठी शेवटी दोघेही नैनाच्या आई-वडिलांशी बोलायला तयार झाले.

मयुरी नैनाला घेऊन तिच्या रूममध्ये गेली. थोड्यावेळ आई-बाबांजवळ बसून आमितही त्याच्या रूममध्ये गेला. आता हॉलमध्ये अभि आणि अनु दोघेच होते. दोघेही एकदम शांत. डोळ्यातले पाणी जागेवरच आट वण्याचा अनु केविलवाना प्रयत्न करत होती. तिची ही अवस्था अभिला बघवत नव्हती.
"अनु ,तु त्रास करून घेऊ नकोस."

"काय चुकले रे अभि माझे. आपल्या आईवडिलांच्या आपल्याकडून काही अपेक्षा असतील याचा साधा विचारही केला नाही त्याने.अपेक्षा तरी काय केली मी त्याचा निर्णय त्याने आपल्याला आधी सांगावा एवढीच ना."
आपले रडू आवरत ती पुढे म्हणाली..
"अरे आपल्या पासून लांब राहण्याचा ही निर्णय त्याने घेऊन टाकला.अमित असं कसं करू शकतो."

"अनु ..अनु ..हे बघ गैरसमज करून घेऊ नको. तो आपल्यापासून लांब जाणार आहे असं नाहीये. ओढवलेल्या परिस्थितीत पुढे काय करता येईल याचा त्याने फक्त विचार करून ठेवला आहे,आणि त्याने जे पाऊल उचलले आहे त्यामुळे त्याने जो काही पुढचा विचार करून ठेवला तो चुकीचा आहे असे मला वाटत नाही.भावनेच्या भरात विचार करू नको.तो चुकला आहे मला ते मान्य आहे पण अनु अग, चिमणा- चिमणी आपल्या पाखरांना फक्त उडायला शिकवतात त्यांना उडता आले की त्यांची घराकडे येण्याची वाट बघत नाही. उलट आपले आयुष्य आनंदाने जगतात. आज अमित ने हे पाऊल उचलले आहे उद्या मयूही आपल्या समोर एखादा मुलगा उभा करू शकते. तेव्हाही तू स्वतः लाच त्रास करून घेणार का? बस आता मुलांसाठी जगणं आता तरी स्वतः साठी जग. मी काय म्हणतोय येतंय का तुझ्या लक्षात."

" हो ..बरोबर आहे तुझं. पाखरं मोठी झाले का त्यांना स्वच्छंदपणे उडू द्यायचे असते.आपल्या अपेक्षांचे ओझे त्यांच्यावर लादायचे नसते."
आपले डोळे पुसत अनु म्हणाली.

"चल जाऊदे मी काय बोलत बसले...स्वयंपाकाला लागते ..सून आली आहे घरात ...आनंदाचा दिवस आहे."

अनु जाण्यासाठी फिरली तोच अभि ने तिचा हात पकडला आणि म्हणाला
"अनु हे बघ ना किती छान गाणं चालू आहे ऐक ना जरा..
अनु चिडून म्हणाली
"कोणते गाणे रे मला तर ".....
ती पुढे बोलणार तेवढ्यात अभि ने त्याच्या मोबाईल वर गाणे लावले
भले बुरे जे घडून गेले
विसरून जाऊ सारे क्षणभर .....

हे गाणं एकूण अनु ने अभि ला घट्ट मिठी मारली आणि एवढा वेळ हळू - हळू हुंदके देत रडणाऱ्या तिने मोठ्याने रडायला सुरुवात केली.

अभि तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाला.
" जेवढे रडायचे तेवढे रडून घे अनु. यानंतर येणाऱ्या कोणत्याही प्रसंगाला आपण हसत सामोरे जाणार आहोत."

तो पुढे म्हणाला
"अनु अजून जेवायला वेळ आहे.थोडावेळ माझ्याबरोबर चौपाळ्यावर बसशील."

अनुने अभिकडे बघत मान हलवत होकार दिला.
ते दोघेही चौपाळ्यावर बसले.
"अनु इथे आल्यापासून मला तुझ्याबरोबर इथे निवांत बसून गप्पा मारायच्या होत्या पण तू नेहमी बिझी असायची.पण आतापासून नाही,जेव्हा वाटेल तेव्हा आता आपण इथे बसून छान गप्पा मारायच्या."

"हो ..ठीक आहे.
तुला आठवतंय का आपण असे लग्नाच्या आधी गप्पा मारत बसलो होतो."

"मला आठवायची गरजच नाही अनु.मी कधी ते विसरलोच नाही पण तू मात्र ....जाऊदे
त्यावेळी आपण अजून एक गोष्ट ठरवली होती.आता मी तुझे काहीही ऐकणार नाही मी आता जिथे म्हणेल तिथे आपण आता मस्त फिरायला जायचे समजल."..........अभि

अनु अभिकडे बघत म्हणाली
"तू म्हणशील ते....
आत्तापर्यंत तू हे म्हणत होता.आता पासून तू जे म्हणशील तेच मी करेल."


पुढे ती म्हणाली
फक्त आत्ता मी म्हणेल ते करशील
"हम..."........अभि

"ते तुझ्या मोबाईल मध्ये गाणं लाव ना परत थोड्यावेळ शांत बसून ऐकावेसे वाटते आहे."

"बरं तू म्हणशील ते...
दोघेही हसतात..
अनुने अभि च्या खांद्यावर डोकं टेकवलं.तिने डोळे मिटून घेतले. अभि ने ही तिच्या खांद्यावर हात ठेवला.
गाणं चालू झाले....

भले बुरे जे घडून गेले
विसरून जाऊ सारे क्षणभर
जरा विसावू या वळणावर या वळणावर.

कसे कोठुनी येतो आपण
कसे नकळता जातो गुंतून
उगाच हसतो उगाच रूसतो
क्षणात आतुर क्षणात कातर
जरा विसावू या वळणावर .........या वळणावर
**********
समाप्त.
सुजाता इथापे.


🎭 Series Post

View all