प्रसिद्धी मिळवणं हा झाला त्यातला एक भाग ,पण त्या साठी कुठल्याही थराला जाणं किंवा साहित्य एखाद्याचं लंपास करणं हे तर रोजचच अनुभवतोय प्रत्येकजण..
यांत तसा धोका काहीच नाही,थोडा वेळ वाईट वाटतं पण तुमच्या साहित्याची ईतरांना दखल घ्यावी वाटती आहे आणि ते ढापावं वाटतंय यांत आनंद मानावा..?
त्यांतून तुमच्यावर वैयक्तिक टिका टिप्पणी कराव्या वाटत असतील ,तुमच्या वैयक्तिक आयुष्यांत घुसखोरी कराविशी वाटत असेल तर अशा साहित्यिक चोरांना,वाचकांना.. तर सुखाचे दिवस तुमचे आलेत अशी खात्री करुन घ्यावी .. असो ..??आपला प्रत्येक लेख,कथा ,कविता आवर्जुन वाचली जातीय याचं समाधान मानावं तेवढं कमी आहे.. ??
आता दूसरा प्रश्न आपल्या वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टी,घटना आपले नातेसंबंध,आपल्याला एखाद्या प्रसिद्ध लेखक/लेखिकेच्या साहित्या बद्दल काय वाटतं यांसारखे विषय आपण कुणा जवळ ,आणि कितपत बोलतो आहोत याचं ही भान हवं..
समोरची व्यक्ती कितपत विश्वासार्ह्य आहे ती आपल्या व्यक्ती रिक्त किती जणांच्या संपर्कात आहे..आपल्या अशा व्यक्त होण्याचा गैरफायदा घेऊ शकला जाऊ शकतो याचीही काळजी घ्यावी..
ईथे एकतर संपुर्ण विश्वास ठेवावा की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न , फेक अकाऊंट काढून तुमच्या फ्रेंडलिस्ट मध्ये आलेली कितीजण आहेत हे ही समजायला मार्ग नसतो..अगदी बायकांची नांवं घेऊन सर्रास तुमच्याशी मैत्री केली जाऊ शकते..
एखाद्याच्या प्रामाणिकपणावर संशय घेणं योग्य नसलं तरीही स्वतःची आयडेंटीटी ज्याला लपवावीशी वाटते तो स्वतःशी तरी प्रामाणिक कितपत असेल याची खात्री कुणीच देऊ शकत नाही..
तेंव्हा सावध रहा.. सुखरुप रहा.. काळजी घ्या.. अशा लोकांना ठराविक अंतरावर ठेवा..
©लीना राजीव.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा