जपुन ठेवायचं आहे!

A Marathi poem about love and marriage.

तुझ्या प्रेमा साठी व्याकूळ हे मन,

ह्रदयाची धडधड आणी श्वासांचं स्पंदन...

तुझ्या आणि माझ्या प्रितीचा तो सुगंधित चंदन,

जपुन ठेवायचं आहे मला हे नाजुक बंधन!

सप्तपदीच ते सुंदर स्वप्नं,

सह जीवनाचे ,ते सात वचनं...

तुझ्या आणि माझ्या नात्यातला तो सुगंधित चंदन,

जपुन ठेवायचं आहे मला हे नाजुक बंधन!

जन्मोजन्मीच्या ह्या सुंदर भेटी,

स्वर्गात बांधलेल्या, जीवनाच्या गाठी,

तुझ्या आणि माझ्या आयुष्यातला तो सुगंधित चंदन,

जपुन ठेवायचं आहे मला हे नाजुक बंधन,

जपुन ठेवायचं आहे मला हे नाजुक बंधन!!!