Login

जणू माझी आईचं झाली...

Aai Lekich Sundar Nat

#अलक

जणू माझी आईचं झाली...

आज गायत्रीला अनघाची खूप आठवण येत होती. आज पूर्ण एक वर्ष झालं अनघा शिकायला परदेशी गेली. ती गेली त्या दिवसापासून एकही दिवस असा गेला नाही की गायत्रीला अनघाची आठवण आली नाही.

अनघाची बारावी झाली आणि गायत्रीला उमगलं आता लेक भरारी घेणार, या घरट्यापासून खूप लांब जाणार. तिने मनाची तयारी करून ठेवलेली होती.

जाण्याचा क्षण आला आणि अश्रूंना भरती देऊन गेला, दोघींनी भावनांना वाट मोकळी करून दिली होती.


आज अनघाचा वाढदिवस होता. हा अनघाचा पहिला असा वाढदिवस होता जेव्हा ती घरापासून लांब दूर परदेशी होती.

त्यांनी ऑनलाइन वाढदिवस साजरा केला खरा, पण गायत्रीच्या मनातली तिला भेटण्याची हुरहुर संपत नव्हती. अनघा गायत्रीशी बोलली.
तिच्या बोलण्यातून गायत्रीला जाणवलं लेक आता मोठी झाली, जणू माझी आईच झाली, आज आपण दोन तीरावर असलो तरी माझा पुन्हा जन्म झाला आणि मला माझी आई मिळाली.

समाप्त: