जन्म बाईचा भाग १६
सूर्य मावळतीकडे झुकत होता. थंड असं वातावरण मन प्रसन्न करत होतं. मालती बाल्कनीत निवांत बसून चहाचा आस्वाद घेत होती. लहान मुलं खेळत होती. तिला लहान मुलं खूप आवडायची. असं वाटत होतं जाऊन त्या मुलांना कवेत घ्यावं. एका लहान मुलाकडे तिची नजर स्थिरावली. नटखट असं बाळ, त्याची आई त्याच्या मागे मागे पळत होती आणि ते बाळ हसत खिदळत इवलीशी पाऊलं टाकत तुरुतुरु पळत होतं. ते बघून मालतीलाही हसू येत होतं.
काही महिला ग्रुप बनवून वॉकिंग करत होत्या तर काही वयस्कर मंडळी कट्ट्यावर गप्पा मारत होते.
काही महिला ग्रुप बनवून वॉकिंग करत होत्या तर काही वयस्कर मंडळी कट्ट्यावर गप्पा मारत होते.
ती सर्वांचं निरीक्षण करत होती. तितक्यात लक्ष्मी आजी आणि त्यांचे मिस्टर नारायण आजोबा आले. एकमेकांना आधार देत हळूवार पावलं टाकत आले. त्यांच्या वयाची बरीच मंडळी होती. साधारण दहा बारा जण असतील.
आजोबा जाऊन मित्रांसोबत बसले. आजी मात्र दुसऱ्याच दिशेला जात होती. मालती लक्ष देऊन पाहू लागली.
दहा बारा पाऊलं पुढं गेल्या आणि तिथे मोगऱ्याचं झाड होतं तिथे जाऊन उभ्या राहिल्या. थोड्या वेळाने त्या झाडावर प्रेमाने हात फिरवू लागल्या. पाच एक मिनिटं तश्याच तिथे उभ्या राहिल्या.
आजीचं झाडावर पुष्कळ प्रेम दिसत होतं.
म्हणून सकाळी जेव्हा विचारलं की घरी कोण कोण असतं तेव्हा म्हणाल्या त्या,आजोबा आणि ही फुलं. मालतीला खूप कौतुक वाटलं.
बेल वाजली. पाहते तर श्रीकांत आला होता.
मालती आज रोजच्या पेक्षा वेगळीच दिसत होती.
तो तर तिला एकटक पाहत होता.
तिचं ते आकर्षक रूप त्याला भुलवत होतं. तिला बघूनच कामामुळे आलेला थकवा नाहीसा झाला.
तो फ्रेश होऊन आला.
मालतीने त्याला पाणी दिलं.
"मालती, आज खूप छान दिसतेय." पाण्याचा घोट घेत म्हणाला.
"थँक यु."
श्रीकांतसाठीच तर ती तयार झाली होती. दिवसभर वाट पाहत होती.
"दिवसभर कंटाळली असशील ना?" तिचा हात हातात घेत म्हणाला.
"नाही. सकाळी थोडावेळ आजीकडे गेली होती. घरातल्या कामात वेळ गेला आणि..."
एकाएकी त्याने तिच्या कमरेभोवती हातांचा विळखा घट्ट केला.
"आणि काय मालती?"
"काही नाही." ती त्याच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करू लागली.
"सोडा मला जेवण बनवायचं आहे."
"थांब थोड्यावेळाने जा."
ती घट्ट डोळे मिटून होती.
त्याचे श्वास तिच्या मानेवर रेंगाळत होते. त्याच्या प्रेमाचा स्पर्श तिला सुखावत होता. अंगातून वीज चमकून निघावी असं होत होतं.
तिच्या गजऱ्याचा सुगंध त्याला वेड लावत होता. तिच्या मानेवर
रुळणारे केस अलगद बाजूला केले.
ह्रदयाची गती वाढली होती.
"खरंच गोड दिसतेय मालती." तो तिच्या कमरेभोवती हाताचा विळखा अजून घट्ट करत म्हणाला. तिच्या अंगावर शहारे आले.
ती फक्त नि फक्त लाजत होती. श्रीकांतची प्रतिक्रिया अशी असेल तिला वाटलं देखील नव्हतं.
तितक्यात फोन वाजला. ऑफिसमधून फोन होता.
दोघांची तंद्री भंग झाली.
"असा चुकीच्या वेळी फोन का करतात लोकं?"
तो तोंड बारीक करत म्हणाला.
"बघा महत्वाचा फोन असेल." मालती त्याची मिठी सोडवत म्हणाली.
"तुझ्यापेक्षा काय महत्वाचं असेल."
त्याने तिच्या कपाळावर चुंबन घेतलं.
त्याने तिच्या कपाळावर चुंबन घेतलं.
तो फोन घेण्यासाठी निघून गेला.
हा श्रीकांतच आहे का?
हा असाही वागू शकतो?
असा प्रश्न तिला पडला.
जे ही होतंय ते किती छान होतंय ना? हेच तर तिला पाहिजे होतं. इथे आल्यापासून सगळंच किती बदललं होतं.
थोडे दिवस श्रीकांत उदास होता; पण आता त्याचंही मन रमू लागलं होतं. त्याच्यासाठी सर्वात जवळची व्यक्ती मालती होती.
आई,बाबा,बहीण,भाऊ सर्वांची आठवण येत होती; पण त्याच्या आयुष्यात मालतीचंही स्थान होतं.
मालती आणि श्रीकांत जवळ आले होते. मोकळेपणाने वावरत होते. आधी मालती श्रीकांतशी बोलतांना खूप विचार करायची आता मात्र बोलण्यात सहजता आली होती.
सोसायटीमध्ये हळूहळू ओळखी झाल्या.
मालतीच्या मैत्रिणी झाल्या. तिच्या मजल्यावर एक जोडपं राहायला आलं होतं. प्रिया आणि प्रतीक. थोड्या दिवसातच प्रिया तिची खास मैत्रीण बनली.
प्रियाचं नुकतंच लग्न झालं होतं. प्रिया बोलकी होती. चारचौघात रमायला तिला आवडायचं. मालती तिच्याच वयाची होती. हळूहळू औपचारिकता जाऊन दोघींमध्ये मैत्रीपूर्ण संबंध निर्माण झाले.
मालतीच्या मैत्रिणी झाल्या. तिच्या मजल्यावर एक जोडपं राहायला आलं होतं. प्रिया आणि प्रतीक. थोड्या दिवसातच प्रिया तिची खास मैत्रीण बनली.
प्रियाचं नुकतंच लग्न झालं होतं. प्रिया बोलकी होती. चारचौघात रमायला तिला आवडायचं. मालती तिच्याच वयाची होती. हळूहळू औपचारिकता जाऊन दोघींमध्ये मैत्रीपूर्ण संबंध निर्माण झाले.
प्रतीक आणि श्रीकांत हे दोघेही एकाच वयाचे होते. प्रतीक देखील चांगल्या हुद्द्यावर कार्यरत होता.
त्याचाही स्वभाव चांगला होता. बोलका होता.
रविवारी सुट्टी असली की, श्रीकांत, मालती, प्रिया,प्रतीक फिरायला जात.
त्याचाही स्वभाव चांगला होता. बोलका होता.
रविवारी सुट्टी असली की, श्रीकांत, मालती, प्रिया,प्रतीक फिरायला जात.
प्रिया आणि प्रतीक दोघांचं अरेंज मॅरेज होतं; पण असं वाटायचं नाही. दोघेही एकमेकांशी खुलून बोलायचे. जशी सांगत तशी रंगत चढते, असंच श्रीकांत आणि मालतीचं झालं होतं.
त्या दोघांचं बॉंडिंग पाहून मालती आणि श्रीकांत स्वतःच्या नात्याला फुलवू लागले होते.
प्रिया अगदी बोल्ड आणि बिनधास्त होती. तिच्यात एक वेगळीच सकारात्मकता होती.
मालतीला तिचं कौतुक वाटायचे.
तिचंही मन रमू लागलं. कधी कधी तर दोघीच मस्त फिरायला जायच्या.
एक दिवस प्रियाला खरेदी करायची होती.
"मालती, आज खरेदीला जाऊया का?"
"चालेल."
दोघीही मॉलमध्ये गेल्या.
प्रियाचा वाढदिवस येणार होता, छान वन पिस घ्यायचं तिने ठरवलं होतं.
चेंजिंग रुममध्ये तो वन पिस घालून पाहिला.
बाहेर आली.
"मालती, कसा दिसतोय गं?"
तिच्या गोऱ्या रंगावर निळ्या रंगाचा वन पिस खूप खुलून दिसत होता.
"खूप छान दिसतोय." मालती.
प्रियाने मालतीला कधी वेस्टर्न कपड्यामध्ये पाहिलेच नव्हते.
साडी किंवा पंजाबी ड्रेस.
तिच्या डोक्यात विचार आला. मालतीलाही असाच छान ड्रेस घेऊया.
तिने एक छान वन पिस घेतला आणि मालतीच्या हातात दिला.
"हे घे मालती तू ट्राय कर."
"नको नको." मालतीने पुन्हा प्रियाला तो ड्रेस दिला.
"का नको? खूप छान दिसशील. घालून तर बघ एकदा." प्रिया.
"मी असलं काही घालत नाही." मालती.
"अगं घालत नाही,म्हणून काय कधीच ट्राय करायचं नाही का? आता नाही घालणार तर काय सत्तरीला आल्यावर घालणार का?"
"प्लिज नको."
ती ऐकतच नव्हती.
प्रिया देखील तिला चांगली ओळखून होती.
ती मुद्दाम तोंड फुगवून बसली.
'माझ्यामुळे प्रिया नाराज झाली. आता इतकं म्हणतेय तर ट्राय करते.'
"बरं मी विकत घेणार नाही; पण तू म्हणतेय म्हणून मी घालून बघते."
मालतीला फार अनकम्फर्टेबल वाटत होतं; पण प्रियासाठी तिने तो ड्रेस चेंजिंग रूममध्ये घालून बघितला. तिने जसं आरशात पाहिलं तिला तर विश्वासच बसत नव्हता. तिचं असेही रूप आहे हे तिला पहिल्यांदाच कळलं होतं. तिने थोडासा दरवाजा उघडला आणि आतूनच प्रियाला आवाज दिला. ती बाहेर यायला लाजत होती. पाहते तर काय मालती खूप गोड दिसत होती.
"अनबिलीव्हेबल! मालती तू तर किती सुंदर दिसतेय. खरंच विश्वासच बसत नाहीये की, ही तू आहेस."
मालतीला तो ड्रेस परफेक्ट बसला होता. प्रियाने मालतीच्या नकळत तो वन पिस तिच्यासाठी विकत घेतला.
दिवसभर मस्त फिरल्या.
"चल संध्याकाळ होत आली आहे. घरी जाऊन जेवण बनवायचं आहे." मालती.
"अगं मालती काय हे तुझं असतं? जेवण बनवायचं, काम करायचं. घरकाम,जेवण ह्यापलीकडे आयुष्य असतं. ती जबाबदारी आहेच; पण स्वतःला खुश ठेवणं ही देखील मोठी जबाबदारी आहेच. सारखं तेच तेच करत राहिलो की, आयुष्य कंटाळवाणं होतं. थोडं रिलेक्स रहायला शिक. तुझ्या डोक्यात सतत कामाची यादी असल्यावर डोकं शांत कसं राहणार? रिलॅक्स माय डियर मालती. बरं चल आपण पाणीपुरी खाऊया. तुलाही आवडते ना?"
"हो चालेल."
आजचा दिवस खूप छान गेला होता. मालती घरी आली. निवांत बसली होती. श्रीकांत यायला अजून बराच वेळ होता. ती हाच विचार करत होती
'खरंच मी खूप छान दिसत होती त्या कपड्यांमध्ये, ती मीच होते का? पण नको यांना आवडणार नाही आणि सासुबाई, मामांजी ह्यांना कळलं तर ? नको असलं काही.'
तिच्या चेहऱ्यावर हास्य आलं होतं. आज वेगळच रूप पाहून तिची तिलाच नवल वाटलं होतं. हे सगळं प्रियामुळे झालं होतं नाहीतर ती स्वतः साठी काहीच करायची नाही. स्वतःला तिने एका साच्यामध्ये बांधून ठेवलं होतं; पण त्या साच्यातून बाहेर आल्यावर खूप मोकळं वाटत होतं.
'प्रिया बरोबर बोलतेय स्वतःला खुश ठेवणं ही देखील आपलीच जबाबदारी आहे.'
प्रियाच्या संपर्कात राहून मालती नव्याने आयुष्य जगायला शिकली होती.
क्रमशः
अश्विनी ओगले.
अश्विनी ओगले.
आजचा भाग कसा वाटला कंमेंटमध्ये जरूर सांगा. एक लाईक जरूर द्या.
सदर कथेचे लिखाण सुरु आहे. कथेचे भाग पेजवर येत जातील, पेजला जरूर फॉलो करा.
कथेचा वापर यु ट्यूब किंवा इतर ठिकाणी आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल. साहित्यचोरी कायद्याने गुन्हा आहे.
सदर कथेचे लिखाण सुरु आहे. कथेचे भाग पेजवर येत जातील, पेजला जरूर फॉलो करा.
कथेचा वापर यु ट्यूब किंवा इतर ठिकाणी आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल. साहित्यचोरी कायद्याने गुन्हा आहे.
अष्टपैलु स्पर्धा २०२५
दीर्घकथा लेखन
दीर्घकथा लेखन