जाणीव असावी

Janiv
जाणीव

ती दमून भागून घरात टेकली आणि त्याने ऑर्डर सोडली , "अग आज ताईच्या घरचे पाहुणे येत आहेत जरा स्वयंपाक जास्त करावा लागेल, तर लवकर स्वयंपाक करायला लाग, आणि हो थोडे आंबे आहेत रस कर, त्यासोबत पुरी कर..बस जास्त काही नको ...हो पण लवकर कर.."

त्याने हुकूम सोडला आणि असले नसलेले अवसान ही गायब झाले..तिची आवस्था बघण्यासारखी होती..अजून तिने पायातली चप्पल ही काढली नव्हती ,बॅग तशीच खांद्यावर होती, तोच हा आदेश...त्याला जाणीव ही नव्हती की ती किती थकून आली आहे...काम फार नव्हते पण ह्या आवस्थेत तिला त्याच्या कडून थोडी जाणीव हवी होती..तिला तेच काही शब्द बळ देऊन गेले असते...

तिला अपेक्षा होती ,तो म्हणेन बस जरा वेळ थोडी रिलॅक्स हो मग बाकी होत राहील...पण ते होत नाही...

तसाच तो फ्रेश होऊन बाहेर आला ,नीट स्वयंपाक घरात गेला आणि त्याने तिच्यासाठी गरम गरम चहा करून आणला, तशी ती चमकली आणि तिच्या चेहऱ्यावर आनंद झळकला... तसा तो म्हणाला, "तू बस चहा घे ,रिलॅक्स हो मग कामाला लाग ,हवे तर आमरस बाहेरून मागवू..तू दमली आहेस आज. "

तिला ह्या शब्दाने खूप बळ दिले होते जणू आणि ती चहा घेऊन थोडी रिलॅक्स झाली तशी ती कामाला लागली, मग तिने आमरस पुरी, भजे,पापड, सोबत तिची खास speciality असलेला मसाले भात ही केला... आणि त्याला विचारले अजून काही करूया का पाहुण्यांना ..आणि हो त्यांना विचार अजून किती जण येतील सोबत..

तिला बळ देणारे शब्द हवे असतात...म्हणजे जर जाणीव नसेल तर चहा ही करायला बळ येत नाही आवड निर्माण होत नाही..पण जर तिच्या कष्टाची जाणीव असेल तर ती काही ही करू शकते.. कारण तिला दोन शब्द ही खूप बळ देऊन जाते..