जाणीव आई वडिलांची

Mom Dad Love

जाणीव आई - वडिलांची 


खरं आपल्या देशात प्रगती होत आहे का..?? 

आजकालच्या तरुणांना आपले आई वडील नको का.. 


   मी बघितलेली कथा सांगते.. 

आई वडिलांचे दुःख कवितेतून मांडते.. 

आई वडील मुलासाठी कष्ट करत होते

त्याला पोटभर अन्न मिळावं यासाठी ते उपाशी राहत होते 

एक नाही दोन नाही तर चार चार दिवस उपाशी रहायचे

आपले दिवस ते पाण्यावर काढायचे 

सतत त्या मुलांचा विचार करायचे 

त्याला शिकवून मोठे करायचे हेच स्वप्न पाहायचे 

पण आई वडिलांचे प्रेम त्या मुलांला कळलेच नाही 

ते आपल्यासाठी राबतात हे त्याला समजलेच नाही 

तो मुलगा मोठा झाला 

आई वडिलांच्या जिवावर बसून खायला लागला 

आरामाशिवाय दुसरे कोणतेही काम करत नव्हता 

व तो मुलगा नंतर आई वडिलांना मारायला लागला 

व्यसनात पुर्णपणे बुडून गेला होता 

आपल्याचं आई वडिलांना एके दिवशी घराबाहेर काढला 

बिचारे आई वडील दारोदर फिरु लागले 

आजारामुळे ते कोठेपण काम करेनासे झाले होते 

आई वडील शेवटचे क्षण जगण्यासाठी 

दारोदार भिक्षा मागु लागले 

यावरुन समजते की आपल्या देशात 

किती प्रगती झाली आहे.. 

ही आजकालची पिढी 

आई वडिलांची मान न राखणारी आहे 

या समाजात निर्माण झाली आहे... 








???