Jan 23, 2021
माहितीपूर्ण

जंगली धनीया

Read Later
जंगली धनीया

फोटोमध्ये जी दिसतेय ती आहे जंगली धनीया/कोथिंबीर... आपण वापरात असलेल्या नेहमीच्या कोंथिबीरी पेक्षा हीचा रंग रूप जरी वेगळला असला तरी तिचा वास, चव हा नेहमीच्या कोथिंबीर सारखाच येतो.. मला जेव्हा फर्स्ट टाइम कळालं तेव्हा माझी रिऍक्शन पण तुमच्या सारखीच झालेली..

फिजीच्या जवळपास सगल्याच लोकांना गार्डनिंग ची खूप हौस आहे.. सगळ्यांच्या घराबाहेर छान गार्डन दिसते.. गार्डन मध्ये कढीपत्ता, वांग्याचं झाड, पपई, नारळ,शेवगा, जंगली मिरची यांची झाड त्याचबरोबर सदाफुली, jaswndi, गुलाब यांची वेगवेगळ्या रंगाची फुलझाड दिसतील.

मी पण गार्डनिंग चा प्रयत्न करायला घेतलेला.. त्यामध्ये मी सगळ्यात आधी कोथिंबीर लावलेली.. जंगली नाही हं नेहमीची कोथिंबीर आणि पहिल्याच प्रयत्नात यश मिळालं म्हणून मग कॉन्फिडन्स वाढला मग रोजच्या वापरातील बिया वेगळ्या काढून त्या लावू लागले.. कारल्याचा वेळ 2-3 वेळा आला पण त्याची फुल गाळून जायची.. मग शेवटी एक वेल छान मोठा झाला आणि त्याला खूप सारी कारली आली.. एवढी की अगदी शेजारच्यांनी ही पोट आणि मन भरून खाल्ली. मग टोमॅटो, चेरी टोमॅटो,jaswandi, मिरच्या अस सगळ्यांचीच झाड मस्त झाली.. तोंडली चा वेल आम्ही यायच्या आधीपासूनच होता.. माझा 1 वर्षाच्या मुलाला ती फार आवडायची.. तो स्वतःच तोडून खायचा ती..

स्वतः लावलेल झाड आणि त्याला आलेल फळ फुल बघुन जो आनंद होतो न तो शब्दात सांगणं कठीण आहे....

आपल्या भारत देशात भेटतो का कुठे असा जंगली धनीया..? जेवणाची चव वाढविणाऱ्या कोथम्बिरीच हे नवीन रूप मी तरी नव्हतं बघितलेला कधी.. तुम्ही बघितला आहे का कुठे.. असेल तर नक्की कळवा कंमेंट्स मध्ये...