©®प्रज्ञा बो-हाडे
जगण्याला पंख फुटले भाग ९
तन्वीच्या घरात वर्षाच्या आतचं नव्या पाहुण्याची चाहूल लागते. घरातले आपला मोर्चा सिंधूकडे वळवतात बघा तुमच्या मागून येवून नंबर लावला. तुम्ही कधी देणारं आनंदाची बातमी. आता मला दोन्ही नातवंडाचं तोंड पाहायचं आहे. लेकीनं जशी हि बातमी सांगून आमच्या जीवनात आनंदाचा वर्षाव केला तसाच आनंदाचा वर्षाव तुमच्याकडून ही लवकर मिळू दे.
संध्याकाळ झाली तरी अमेय घरी लवकर आला नव्हता. अमेय आॅफीस मधून फोन करुन उशीर होईल घरी यायला असे सांगतो.
मोकळ्या वातावरणात अमेयशी बोलता येईल. घरी विषय काढला कि, सगळे आपलं मतं मांडून मोकळे होतात. आज सिंधू भलतीचं खूश होती. कितीतरी महिन्यांनी असे दोघेचं एकांतात फिरायला निघाले होते. त्या दिवशी रात्रीचं सिंधूने तिची बॅग आणि अमेयची कपडे पॅक केली होती.
चार तासात सिंधूची झोप पूर्ण झाली. गुलाबी रंगाची साडी, नाजूक मोत्याचे नेकलेस, झुमके, त्यावर उठून दिसणारी चंद्रकोर, गुलाबी रंगात शोभून दिसतील अश्या साडीच्या पदराला मॅच होणा-या पिवळ्या बांगड्यांची रंगसंगती उठून दिसत होती. आवरुन झाल्यावर अमेयला उठवायला सिंधू जाते.
सिंधू : अहो,उठा लवकर. उशीर होईल जायला आपल्याला. माझं आवरलयं. खाली जावून मी नाश्ताची तयारी करते. आवरुन या तुम्ही लवकरं.
गो-यांची सून गोजिरी |
जीव झाला वेडापिसा,
सजली ती साजिरी |
आज तुझ्याकडे पाहत बसावसचं वाटतय ग. आपण कॅन्सल करुया का जाणं. तुला एक क्षणही नजरेआड होवू द्यायचं नाही मला.
सिंधू : अहो. बाहेर जायचे म्हणून तर इतकी छान तयार झाले मी. आणि काय कॅन्सल करायचं बोलताय. उलट बाहेर गेल्यावर पाहता येईल माझ्याकडे. घरात सर्वजण आहेत. काही ना काम सुरुच राहणार घरामध्ये.
अमेय : हो ग. आवरतो मी पटकन.
अमेयने केलेल्या चारोळीत सिंधू आज खूश होती. तिच्या चेह-यावर लाजेची लाली चढली होती. थोडीशी बावरतच सिंधूने किचनमध्ये प्रवेश केला.
सासूबाई : रोज तूच आवरुन जाते घरातले काम. आज मी केलं तरी कुठे बिघडलं.
सिंधू : आई, मी चार-पाच दिवस नसणार तेव्हा तुमच्यावरचं जबाबदारी येणार सगळी.
इतक्यात अमेय बॅग घेवूनच हाॅलमध्ये येतो.
अमेय : सिंधू, नाश्ता आण ग. ओला कॅब येईल इतक्यात. तुझं आवरलय ना. काही राहिलयं का एकदा बघून घे.
अमेय : आई, बाबा येतो आम्ही. पोहचलो की फोन करतो. वेळ असेल तसे मेसेज किंवा फोन करेल.
अमेयचे आई-बाबा : सावकाश जा. प्रवासात काळजी घ्या.
सिंधू आणि अमेय फिरायला गेल्यावर कोणत्या गमंती जमंती करणार आहेत? तसेच, सिंधू आणि अमेय बाळा बद्दल कोणता निर्णय घेतील पाहूया पुढच्या भागात.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा