©®प्रज्ञा बो-हाडे
जगण्याला पंख फुटले भाग ८
घरातून जड पावलांनी लग्नाकरता गेलेलं वराडी मंडळी लग्नावरुन येताना मात्र आनंदात होते. चेह-यावर मनासारख्या गोष्टी घडत असल्याचे समाधान झळकत होते. सिंधूचा गोरे कुटूंबात गृहप्रवेश अगदी थाटामाटात झाला. तन्वी नणंद बाईने गृहप्रवेश करताना दार धरुन गाणं म्हटले. मुलीची मागणी केली, तेव्हाचं घरात प्रवेश करु दिला.
गव्हाची रास करुन त्यात सोन्याची अंगठी लपवली जायची. नवरा आणि नवरीने एक-दोन-तीन म्हटले की सगळ्यात आधी आपल्याकडे ते गहू ओढून घ्यायचे. ज्याच्या ओढलेल्या वाट्यात सोनं असेल तो जिंकला. आयुष्यभर तो या घरावर राज्य करणारं असे मानले जाते. दुस-या दिवशी आंघोळीचा देखील खेळ घेतला गेला. घराच्या अंगणात अमेय आणि सिंधूला दोन बादल्या आणि तांबे देण्यात आले. समोरासमोर पाट मांडून सिंधूला एका बाजूला तोंड करुन उभ राहायला सांगितले. अमेयला सिंधूकडे तोंड करुन उभे केलं. सिंधूने मागे वळून अमेयच्या अंगावर गुळणी टाकायची. आणि अमेयने सिंधूच्या अंगावर. कोणाची गुळणी एकमेकांपर्यंत पोहचते. हे पाहिले जात होते. अमेयनं सिंधूला उचलून घरात आणले.
आंघोळ झाल्यानंतर घराजवळ असणा-या देवतांना दर्शनाकरता सिंधू आणि अमेय निघाले. त्यानंतर कुलदेवी आणि कुलदेवताला घरातले काही मंडळी देखील अमेय आणि सिंधू बरोबर जावून आली. दुस-या दिवशी सत्यनारायण पूजा ठेवून गोरे कुटूंबियांनी आपल्या घरच्या नातलगांना बोलावून घेतले. अमेयचे लग्न अचानक झाल्याने नातेवाईकांना लग्नाला बोलवण्याची संधीच मिळाली नव्हती.
अमेय आणि सिंधूच्या संसाराला सुरवात झाली. आपलं लग्न शिवामुळे खरतर शक्य झाले. शिवा करता मुलगी शोधण्याची जबाबदारी आपली मानतं सिंधू आणि अमेय शिवा करता स्थळ शोधू लागतात. एक मुलगी पसंत पडताच शिवाला त्या मुलीशी भेट घडवून देतात. दोघांची पसंती दर्शवल्याने शिवा आणि दिपाचं लग्न लावले जाते. मैत्रीच्या नात्याने सिंधू आणि अमेय शिवाच्या लग्नाची जबाबदारी स्वत:च्या अंगावर घेतात. हे पाहून शिवाच्या घरच्या लोकांच्या सिंधू बद्दल असणारा राग दूर होतो. सिंधूला माफ करुन अमेय आणि सिंधूच्या संसाराला शिवाच्या घरचे भरभरुन आशिर्वाद देतात.
सगळे इतक्या घाईत घडल्याने अमेय काही दिवस कामावर सुट्टी घेवून सिंधू बरोबर फिरायला जातो. सर्वांसाठी भेटवस्तू घेवून अमेय आणि सिंधू घरी येतात. तन्वीला आणलेला ड्रेस आणि पर्स खूप आवडते. सिंधू ने आणलेली साडी सासूबाईंना देखील आवडते.
जे सिंधू आणि अमेयच्या प्रेमाचं अबोल साक्षीदार होतं.सणवाराला घराभोवती आणखी आकर्षक रांगोळी सिंधू काढत असे. अमेय सिंधूच्या आणि रांगोळीच्या आणखी प्रेमात पडत राहिला. आपल्या बायकोचं कौतुक किती करावं आणि किती नको अशी अवस्था अमेयची झाली होती.लग्नानंतर पहिल्यांदाच येणारे सिंधू आणि अमेयचे सण उत्साहात साजरे झाले. पाहता पाहता वर्ष कसे उलटून गेले कोणाला कळले देखील नाही.
घरच्यांना चाहूल लागली होती ती आता नव्या पाहुण्याची. एकदा घरातले काम आवरुन रात्री जेवण झाल्यावर सर्वजण गप्पा मारत बसले असताना.
अमेयची आजी : किती बाजू घेतोसं बायकोची.
आता आपल्या तन्वीचं देखील लग्न करायला हवं.
अमेय : हो.
ठरल्याप्रमाणे बघण्याचा कार्यक्रम पार पडतो. तन्वीचे लग्न करुन तन्वी सासरी जाते. घरात रोज चालणारी चिव-चिव बंद होते. तन्वीची कमी सिंधू भरुन काढत होती. कामावर काहि दिवसांची रजा घेवून सिंधूनं घराला घरची मुलगी आणि सून या दोन्ही नात्यांची गुंफण गुंफत उत्तम सांभाळले.
पुढच्या भागात पाहूया नव्या पाहुण्याच्या आगमनची बातमी कोणाकडून समजते. सिंधू की तन्वी कडून?
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा