Mar 02, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

जगण्याला पंख फुटले भाग ७

Read Later
जगण्याला पंख फुटले भाग ७

©®प्रज्ञा बो-हाडे

जगण्याला पंख फुटले भाग ७

तन्वी : आपण काहीतरी करायला हवं. तुमचं लग्न थांबवायला हवं.


शिवा : लग्न थांबवायला काय? मी आत्ता जातो आणि हे लग्न होणारं नाही असं सांगतो.

तन्वी : त्यापेक्षा आपण एक युक्तीचा वापर करुया.

शिवा : कोणती? कशी? आता ऐनवेळी काही सुचणार नाही. तुझ्या डोक्यात काही कल्पना असेल तर बोल पटकन. वेळ नाही आपल्याकडे.


तन्वी : आपण अमेयला बोलावून हे सगळं सांगूया. तुमच्या ऐवजी अमेयला नव-याच्या वेशात लग्नाला त्याला उभं करुया.

शिवा : ग्रेट आयडिया. तू त्याला घेवून वर पक्षाच्या रुम मध्ये घेवून ये.

तन्वी : दाद. चल तुला शिवाने बोलावलं आहे. काहीतरी काम आहे महत्वाचं तुझ्याकडे.

अमेय : आता यावेळी काय काम आहे. थोड्याचं वेळात मिरवणूक निघेल. तयार झाला नाही का तो.

तन्वी : त्याबाबतचं काही असेल. आता मला काय माहित. मी मैत्रिणीचा फोन आला म्हणून तिकडून जात होते. तर त्याने मला आवाज देवून अमेयला बोलवं म्हणून सांगितलं.

अमेय : मला ओळखतो का तो? आणि कसा ग? त्याचे असतील ना एवढे नातेवाईक, मित्र परीवार. माझ्याकडेचं अस काय काम आहे.


तन्वी : आपण सगळे शिवाला आधीपासूनचं माहित आहोत. चलं आता उगाच नको ते डायलाॅग मारत बसू.

अमेय : चल. जातो मी. तू पण येणार आहेस का.

तन्वी : तू जाऊन ये. मी काय करु तिकडे येवून.

अमेय : शिवा काय काम होतं तुझं.

शिवा : एका प्रश्नाचं खर उत्तर देशीला का?

अमेय : बोल ना. देईल उत्तर.

शिवा : सिंधूवर तुझं मनापासून प्रेम आहे ना?

अमेय : हे तू आत्ता का? विचारतो. काही मिनिटांत तुमचं लग्न आहे.

शिवा :विचारले तेवढचं बोल.

अमेय : आहे प्रेम. पण याचा आता काय उपयोग. खरतरं सिंधून ही तिचं माझ्यावर प्रेम असल्याची कबूली काही दिवसांपूर्वीच दिली. तोपर्यंत लग्नाची सर्व तयारी झाली होती. आई-वडिलांच्या इज्जती करता सिंधून हे पाऊलं उचण्याचं ठरवलं.

शिवा : बर ऐकं इकडे ये. तुमचं दोघांचं एकमेकांवर खर प्रेम असेल तर मी कोण तुमच्या मध्ये येणारा.


अमेय : म्हणजे?

शिवा : आता हा नवरदेवाचा ड्रेस तू घालायचा. हा नवरदेवाचा झिरमिळ्या लावलेला टोप आहे. मंगलअष्टका झाल्यावर एकमेकांना हार घालालं तेव्हा मुकूट बाजूला कर. तू तिला हार घालं. कोणी काही बोललं तरी त्याकडे लक्ष देवू नको. मी तिथली परीस्थिती मॅनेज करेल.

लग्नाची वेळ जसजशी जवळ येत होती. तशी सिंधू जड पावलांनी लग्न मंडपाच्या दिशेने येत होती. शिवा बरोबर कर्तव्य आणि जबाबदारी म्हणून संसार करणे खरचं योग्य आहे का? खरं प्रेम तर अमेयवर आहे. पण सगळा विचार पक्का झाला असताना. आत्ता हे विचार का? येतात मनात सिंधूच्या कळत नव्हते.

त्या विचारात स्टेजवर सिंधू पोहचते. हातात हार देवून मंगलष्टका सुरु करण्याकरता वर आणि वधूला पाटावर उभे करुन दोघांच्या मध्ये पडदा धरला जातो. टाळ्या, बॅंड आणि फटाकांच्या आवाजात शेवटची मंगलाष्टका पार पडते.

आता वेळ येते ती एकमेकांना हार घालण्याची. चेह-यावर कोणतेच भाव न दाखवता सिंधू वराच्या गळ्यात माळ घालणारं इतक्यात तिचं लक्ष वराकडं जाते. आणि पाहते तर काय? शिवा च्या ऐवजी अमेयचं समोर उभा होता. सारं स्वप्नवतं वाटत होते. अगदी एका चित्रपटात घडणा-या सीन सारख घडतयं असाच भास सिंधूला झाला.

आनंदाने वेडेपिसं होत चेह-यावर गोड हसू आणतं सिंधूने अमेयच्या गळ्यात हार घातला. बाकी लोकांमध्ये एकच गोंधळ उडाला होता. शिवा भटजींना सांगून लग्नाचे पुढिल विधी सुरु करायला सांगतो. गोरे आणि साठे कुटूंबियांनी तर एकमेकांना मिठीच मारली. देवानेच हा चमत्कार घडवून आणला. आपल्याला हव तसंच झालं.

इकडे शिवा घरच्यांची आणि जमलेल्या लोकांना त्या दोघांच एकमेकांवर प्रेम असल्याने दोघांचा विवाह झाला हे समजून सांगत होता.


अखेरीस हि गोष्ट शिवा पर्यंत पोहचली कशी याचा विचार साठे आणि गोरे कुटूंबिय करत असताना. तन्वी त्यांना जावून घडलेला प्रकार सांगते.
" शिवाने रडताना पाहिल्यामुळे अमेय आणि सिंधू बद्दल खरं सांगून बसले", सिंधू.

"जे होतं ते चांगल्यासाठी होतं, तुला देवानेच हि बुद्धी दिली असावी", साठे आणि गोरे कुटूंबिय.

तन्वी : हो.

साठे आणि गोरे कुटूंबिय : चला आता नवरा नवरीला वाजत-गाजत आपल्या चाळीत घेवून जाऊया.

तन्वी : दादाच्या वरातीत नाचणार मी खूप. माझी मैत्रिणीचं माझी वहिनी झाली. खूप आनंद होतोय.

साठे : बॅंन्जो वाल्याला कळवायला हवं.

गोरे : आमच्या ओळखीचाचं आहे. एका फोनवर कधीही हजेरी लावेल. चिंता नका करु, व्याही.

क्षणभर काळजीने गजबजलेलं गोरे आणि साठे कुटूंबिय एकमेकांना टाळ्या देत आपला आनंद व्यक्त करत होते. शिवाच्या घरचे मात्र नाराज होवून गाडी काढून मंडपातून निघून गेले. शिवा लग्नाच्या विधी होईपर्यंत मांडवातच थांबला. 


गोरे आणि साठे कुटूंबिय : आम्ही तुला चुकीचं समजतं होतो. पण तू जे आम्हांलाही शक्य नव्हते ते करुन दाखवलसं. तू तुझ्या हट्टाला पेटून चुकीचं वागणार असचं समजतं होतो आम्ही.

शिवा : यातून मी एक गोष्ट शिकलो. आपल्या मनात दुसरी बाजू समजून न घेता उगाच गैरसमज करुन घेवू नये. दोन्ही बाजूंशी तपासणी करुन अंतिम ध्येयाला पोहचावे.

गोरे आणि साठे कुटूंबिय : अगदी बरोबर आहे. या गैरसमजामुळेच तर सगळं घडले. नाहीतर आज खूप मोठा अनर्थ ओढावला असता.

चला तर मग अमेय आणि सिंधूचं लग्न झालं. पण आपली कथामालिका संपली नाहीये अजून बर का? यांचा फुलत जाणा-या     संसाराच्या घडामोडी पाहूया पुढच्या भागात.

क्रमशः

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Pradnya Pavan Borhade

Home Maker

मनातल्या भावना कल्पकतेने गुंफूण कथांच्या माध्यमात मांडायला आवडते.

//