©®प्रज्ञा बो-हाडे
जगण्याला पंख फुटले भाग ६
अमेयच्या मनात विचार येतो. खरचं देशील मला साथ. येणाऱ्या विचारांना थांबवत अमेय सिंधूला डोळे बंद केल्याचे सांगतो.
सिंधू : हळूच आता पायरी चढायची आहे.
हि रांगोळी तर अमेयला भासवणा-या त्या प्रेम भावनेचीचं आठवण करुन देत होती. चाळीतले सर्वजण केक, चिवडा, लाडू खाऊन घरी जातात. टेरेसवर सिंधूशी बोलून मनातलं गुपित उघडं करावसं अमेयला वाटू लागले.
अमेय : मला थोड बोलायचं आहे सिंधू.
सिंधू : शिवा पाहून गेल्यानंतर दुस-या दिवशी रेवाला तुझ्या घराजवळ पाहिलं मी. नंतर सलग आठ दिवस तुझ्या बरोबर पाहून मला वाटले तुमच्यात प्रेमसंबंध असतील. म्हणून मी शिवाला होकार देण्याचा निर्णय घेतला.
तन्वी टेरेसवर राहिलेला केक सिंधूच्या घरात घेऊन जायला वर येत असते. दोघांचही एकमेकावर प्रेम आहे . पण गैरसमजूती मुळे ते व्यक्त न झाल्याने किती मोठा त्याग करायला निघाले होते. हे तन्वीच्या लक्षात आले. तिने हि गोष्ट सिंधूच्या आई-वडिलांना सांगितली. घरी पळत जावून आपल्या आई - वडिलांना देखील तन्वीने हि गोष्ट सांगितली.
त्याच रात्री पुन्हा गोरे आणि साठे कुटूंबिय भेटले. आपल्याला हवं तसेच घडले. पण लग्नाच्या चार दिवस आधी. आता काय करायचे? शिवाच्या घरच्यांना समजवायचं तरी कसं. शिवाकडे आधीच नाटक करत असल्याचा व्हिडिओ आहे. त्याने सिंधूला खर सांगितले आणि सिंधूचा गैरसमज झाला तर?
त्यापेक्षा लग्नाच्या दिवशी अमेयला सांगून सिंधूला पळवून न्यायला सांगू. असे गोरे आणि साठे कुटूंबिय ठरवतात. सिंधू खरतर शिवाला फोन करुन सांगू शकली असती. पण आई-वडिल, नातेवाईकांचा विचार करत सिंधू लग्न करायला तयार होती. उलटं सिंधूचे आई-बाबाच तिला अमेय बरोबर पळून जायचा सल्ला देत होते.
लग्नाचा दिवस उजाडला. चाळीत सर्वजण लग्नाच्या हाॅलमध्ये जायला निघाले. अमेय सामान गाडीत नेऊन ठेवत होता. खरतर अमेयचे डोळे आणि चेहरा लाल झाला होता. रात्रभर झोप न आल्याने नि:स्तेज, थकलेला दिसत होता. सिंधूची देखील तशीच अवस्था होती. मेकअप च्या आत थकलेलं भावनिक रुप लपलं गेलं होत. मंडपात पोहताच. साखरपुडा, हळदीचा कार्यक्रम सुरु झाला. सिंधू मनापासून लग्नाला तयार नाही हे शिवाला जाणवले. जेवण झाल्यनंतर मंडपाच्या दिशेने जाताना.एक मुलगी रडताना शिवा पाहतो.
लग्नाच्या मांडवात कोणते नविन वळण येणार आहे पाहूया पुढच्या भागात.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा