©®प्रज्ञा बो-हाडे
जगण्याला पंख फुटले भाग ५
सिंधूचा बस्ता बांधायला मावशी, काका, आत्या, बहिणी, भाऊ सगळ्यांचीच गर्दी झाली. ताई च्या लग्नात मला घागरा घ्यायचा, तर कोणी साडी घ्यायची, अशी सर्वांचीच एकत्र बोलण्याची गडबड सुरु झाली. कोणाला कोणाचचं बोलणं समजतं नव्हत. तरीही चेह-यावरचा उत्साह सारं काही सांगत होता.
सर्वांसमोर आपण आनंदी आहोत खासकरुन अमेयला दाखवण्यासाठी सिंधू हसून - खेळून राहायची. तिचा तो आनंदी चेहरा पाहून अमेयला दु:खही व्हायचे आणि सिंधूच्या मनासारखं होत म्हणून आनंद देखील वाटायचा.
लग्नाचा मूहर्त पण असा निघाला होता की ज्याच्या चार दिवस आधी अमेयचा वाढदिवस होता. दरवर्षी सारखा या वर्षी देखील अमेयचा वाढदिवस साजरा करायचा असा विचार सिंधूच्या मनात रेंगाळत होता. त्याचक्षणी रेवाची सिंधूला आठवण होते. आता माझी काय गरज. रेवा आहे अमेयच्या आयुष्यात. तरीही लग्न झाल्यावर पुन्ही अमेयच्या वाढदिवसाला यायला मिळेल की नाही? त्यापेक्षा हा वाढदिवस मनातले क्लेश बाजूला ठेवून सिंधू अमेयच्या वाढदिवसाला त्याच्याशी बोलण्याचे ठरवते.
जे अमेयला मनापासून अपेक्षित होते तेच घडले. सिंधूचाच मेसेज होता. वाढदिवसाचं पहिलं विश सिंधू ने केलं होतं. त्यात उद्या दुपारी ४ वाजता भेटायचं का अस देखील विचारले होते. खूश होवून अमेयने ताबडतोब रिप्लाय केला.
तन्वी सोबत मिळून सिंधूने वाढदिवसाच्या एक दिवस आधी सगळे प्लॅनिंग ठरवले होते. सिंधूच्या गच्चीवर तसही लग्ना निमित्ताने मेहंदी, हळद या कार्यक्रमा करता मांडव घातलेला होता. सिंधू आणि तन्वीने वाढदिवसाची थीम ठरवून फुगे आणि फुलांची सजावट करण्याचे डेकोरेशन वाल्याला सांगितले. मोठ्या लेअर्सची केकची आॅर्डर देखील फायनल केली.
अमेयने भेटण्याला होकार दिला हे कळल्यावर स्वत:च ते शर्ट देण्याचं सिंधू ठरवते. दिवस उजाडताचं अमेय कधी एकदा दुपार होतेय म्हणून सारखा घड्याळ्यात पाहू लागतो.
तन्वी : आज सारखं काय घड्याळ पाहतो. कुठे जाणार आहेस का? वाढदिवसा निमित्त. की रेवाने काही खास प्लॅन बनवला आहे.
तन्वी : हो. इतकं नको स्पष्टिकरण देऊस. मस्करी करते मी.
अमेय : अच्छा.
अमेय : मंदिरात जावून आलं की किती फ्रेश आणि उत्साही वाटत ना.
तन्वी : हो,तर.
सिंधूने दिलेलं सरप्राइज अमेयला आवडेल का? दोघांच्या मनातील प्रेम भावना अमेयच्या वाढदिवशीचं व्यक्त करतील का? पाहूया पुढच्या भागात.
क्रमशः