Mar 02, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

जगण्याला पंख फुटले भाग ४

Read Later
जगण्याला पंख फुटले भाग ४

©®प्रज्ञा बो-हाडे

जगण्याला पंख फुटले भाग ४

रेवा : चालेल ना. मी तुला मदत करायला तयार आहे. सिंधू खरचं या नाटकाला ओळखू शकणार नाही का? 


अमेय : नाही ग. खरतर तिला पाहायला मुलगा आला होता. तिच्या मनात माझ्या बद्दल थोड्या तरी भावना असतील तर ती लग्नाला होकार देणार नाही.

रेवा : पाहूया मग काय होते ते.

अमेय : उद्याच तू आमच्या घराजवळ ये. आपण एकत्र फिरायला जायचं नाटक करुया.

रेवा : घरचे तुला बोलणार नाहीत ना?

अमेय : त्यांना पण खर वाटायला हवं. नाहीतर ते सिंधूला जावून सांगतिलं की हे सगळ नाटक आहे.

रेवा : घरातले मला काही बोलले तर?

अमेय : तू नको टेन्शन घेवू्. मी आहे. करतो बरोबर मॅनेज. तू निश्चिंतपणे ये.

रेवा : तुझ्यावर भरोसा ठेवून करुया श्रीगणेशा नाटकाचा.

अमेय : नक्कीच,ये उद्या लवकर.

रेवा : अमू, चल लवकर आपल्याला पिक्चरला जायचे. उशीर होईल.

अमेय : आलो ग.

इतक्यात सिंधू घराबाहेर येते. अमेय मला न सांगता कुठे चालला. आणि हि कोण मुलगी आहे? याचा विचार करत होती.

अमेय : रेवा,अगदी वेळेवर आलीस. चल उशीर होईल आपल्याला नाहीतर.

अमेय निघून गेल्यावर घरातले जरा गोंधळलेलं होते. त्यात घराबाहेर उभी असणा-या सिंधू ने तन्वीला हाक मारली.

सिंधू : तन्वी इकडे ये ग जरा.

तन्वी : आले ग.

सिंधू : काय ग ही. तुझ्या भावाची नविन मैत्रिण का? कोण आहे?

तन्वी : जूनीच आहे ग. रेवा नाही का ? काॅलेजमध्ये असताना याच मुलीने दादाला प्रपोज केले होते.

सिंधू : या गोष्टीला तर अनेक वर्ष लोटली ना.

तन्वी : अग अचानक तिला घरी आलेलं पाहून आम्ही देखील बुचकळ्यात पडलोय.

असेच आठवडाभर कधी इकडे फिरायला तर कधी तिकडे अमेय आणि रेवाचं बाहेर फिरणं सुरुचं राहीले. सिंधू बोलायला आली की अमेय रेवाला फोन लावून तासन तास तिच्याशी बोलत राहायचा. हे सगळं पाहून सिंधू अस्वस्थ होते. सिंधू एक निर्णय घ्यायचे ठरवते.

शिवाचा आणि घरच्यांचा आधीच होकार आला होता. सिंधूचाच अद्याप यावर ठाम मत बनतं नव्हते. अमेय आणि रेवा एकमेकांवर जिवापाड प्रेम करतात. रेवानं तर आधीच प्रेमाची कबुली काही वर्षांपूर्वी दिली होती. अमेयला त्या प्रेमाची कदाचित आत्ता जाणिवं झाली असेल. आपणही आता आपल्या आयुष्यात पुढे जायला हवे.

शिवाचा स्वभाव चांगला आहे. तो आपल्याला नक्की समजून घेईल. म्हणून सिंधू घरच्यांना बोलावून शिवा बरोबर लग्न करायला तयार असल्याचे सांगते.

साठे कुटूंबांच्या बाबत, इकडे आड, तिकडे विहीर अशी अवस्था होते. त्यांना खरतर अमेय जावई म्हणून हवा होता. खोट्या नाटकामुळे आधीच शिवा लग्न करायला तयार झाला होता आणि आता प्रश्नच मिटला ते काय कमी होतं म्हणून सिंधूने देखील होकार दिला. यावर मार्ग कसा काढायचा हा एकच विचार घेऊन साठे कुटूंबिय गोरे कुटूंबासोबत चर्चा करायला घराजवळ असणा-या बागेत संध्याकाळच्या वेळी भेटतात. इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी करत मुद्यावर येवून पोहचल्यावर शेवटी जे होईल ते पाहत राहायचं या निष्कर्षा पर्यंत दोन्ही कुटूंबिय पोहचतात.दोघांनाही समजवण्यात अर्थ नाही. दोघेही हट्टी आहेत. स्वत:च्याच मनाप्रमाणे वागणार.

अमेय आणि रेवाचं एकमेकांसोबत वेळ घालवण्याचं प्रमाण वाढायला लागते. तसतसे सिंधू वैतागुन घरच्यांना लग्नाची तारीख काढायला सांगते. शिवा च्या घरच्यांशी बोलून साठे कुटूंबिय लग्नाची तारीख ठरवतात. लग्नाची सर्व बोलणी ठरवून लग्नाच्या तयारीला लागतात. 

सिंधू लग्नाची तारीख ठरवून बसली हि गोष्ट अमेयला कळाली तेव्हा तो अस्वस्थ झाला. आपल्याला सिंधूला एकदा शेवटचं भेटून तिच्यावर असणारं प्रेम व्यक्त व्हायला हवं. अस अमेयचं मन बोलत असताना, दुसरं मन मात्र त्याला मागे खेचत होतं. लग्ना पर्यंत निर्णय झाला, म्हणजे सिंधूला शिवा पसंत असेल.

सिंधू आपल्याच मनाला समजावत होती. उगाच अमेय भोवती जीव गुरफटत ठेवला. त्याचं दुस-या मुलीवर प्रेम असू शकतचं. तो तसा मोठा असल्याने क्लास मधल्या मैत्रिणीं पैकी आवडत असेल कोणी? हा विचार का नाही केलां? आता रडण्यात उपयोग नाही. लग्नाची तारीख आपल्याच संमतीने पक्की केली आहे. खरेदी सुरु झाली. आता जे होईल त्याला सामोरं जाण्याखेरीज दुसरा कोणताच मार्ग समोर दिसतं नाही.

शिवा आणि सिंधूचं खरचं होईल का लग्न? त्यांच लग्न म्हणजे देवानं बनवलेली जोडी तर नसेल ना? की अमेय आणि सिंधू आपल्या प्रेमाची कबुली देतील ? जाणून घेऊया पुढच्या भागात.

क्रमशः

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Pradnya Pavan Borhade

Home Maker

मनातल्या भावना कल्पकतेने गुंफूण कथांच्या माध्यमात मांडायला आवडते.

//