जगण्याला पंख फुटले भाग ३

खर प्रेम आहे की नाही हे जाणून घेताना भूतकाळात घडलेल्या आठवणी नकळत आठवून जातात.

©®प्रज्ञा बो-हाडे

जगण्याला पंख फुटले भाग

रेवा: पूर्वीसारखं मुलाने पसंती दर्शवली म्हणजे मुलीचं लगेच लग्न लावून द्यायचे. आता मात्र मुली ठरवतात हा मुलगा आवडतो की नाही. हे ठरवण्याचा पूर्णपणे त्यांना पाठींबा आहे.


रेवाची आई : आता हे काय भलतचं. आत्ता यावेळी हे सांगायचं होत का तुला.

रेवा : म्हणजे कस सांगू तुला. मुलींचं मत आता विचारात घेतलं जात.

रेवाची आई : तुझ्या लग्नाच्या वेळी आम्ही तुला पसंत असणाऱ्या मुलाशीच लग्न लावून देऊ बर का?

दोघी हसत हसत आपल्या रुम मध्ये झोपायला जातात.

इकडे रेवा झोपेतं अमेय बरोबर सुखी संसाराची स्वप्न बघायला देखील सुरु करते. लग्नाचा सजलेला मंडप, मुंडावळ्या बांधून अमेय मांडवात उभा आहे. स्वत:शीच लाजत रेवा देखील मुंडावळ्या बांधून मंडपात उभी होती. गुलाबाच्या फुलांचा हार हातात घेवून अमेयला हार घालणार इतक्यात घड्याळाचा गजर होतो.
घाईघाईत आवरुन अमेयने दिलेल्या वेळेत रेवाला पोहचायचे होते. तरी बर आधीच तयारी करुन ठेवल्यामुळे आवरायला वेळ कमी लागला. चला पळायला हवं,म्हणत रेवा हाॅटेलमध्ये पोहचली.
अमेयची वाट पाहत रेवा पाच मिनिट आधी पोहचली होती. बाईकवर अमेयला येताना पाहताच. रेवानं पर्स मधला छोटासा आरसा काढत चेहरा, केस व्यवस्थित आहेत ना याची खात्री करुन घेतली. अमेयने हाॅटेलमध्ये प्रवेश करताचं रेवानं हाक मारुन अमेयला बोलावले.

अमेयला खरतर रेवाला कसं सांगायचं याचा प्रश्न पडला होता. पण आता नाही सांगितलं तर उगाच गैरसमज वाढत जावून रेवा आपल्यात गुंतत जाईल हे अमेयला ठावूक होते. नंतर परीस्थिती हाता बाहेर जाण्या आधी आत्ताच सविस्तर बोलून विषय संपवलेला बरा.


अमेय : मला यायला उशीर झाला का?

रेवा : नाही. अरे मीच पाच मिनिट आधी आली आहे.

अमेय : अच्छा. काय आॅर्डर द्यायची. सांग तू.

रेवा : त्या आधी काॅलेज मध्ये सर्वांसमोर तुला विचारले त्याबद्दल माफ कर मला.

अमेय : त्याच बाबत तुझ्याशी बोलायचं आहे. माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढू नकोस.

रेवा : नाही बोल ना.

अमेय : मला लग्न करण्याचा सध्या विचार नाही. आणि एक मैत्रिणी पलिकडे मी कधीच तुझ्याकडे वेगळ्या नजरेने पाहिले नाही. आपण घट्ट मित्र - मैत्रिण बनून राहूया.

रेवा : डोळ्यातले आसवे लपवत. ठिक आहे ना मग. राहूया आपण मैत्रीच्या नात्याने. चल आता दिलेली आॅर्डर थंड होण्या आधी खाऊन घेवू.

रेवानं मनात कोणतीच अढी न ठेवता परीस्थिती सौम्यपणे हाताळली होती. अमेयला या गोष्टीचा आनंद झाला. खावून झाल्यावर रेवाला घरी सोडण्याबाबत अमेय विचारतो.

रेवा : आम्ही मैत्रिणी मिळून गार्डन मध्ये जाणार आहोत. तू जा पुढे. माझ्या मैत्रिणी येतील इतक्यातचं.

अमेय : चालेल. चल बाय.

रेवा खरतर हव तेवढं रडून घेते. तोंडावर पाणी मारुन फ्रेश होवून हाॅटेल बाहेर पडून मैत्रिणींना भेटायला गार्डन मध्ये जाते. फोटोशूट, गप्पा मारुन झाल्यावर रेवा घरी येते.

आई : कसा गेला आजचा दिवस. बघू मला तुमचे छान फोटोज.

रेवा : हे बघ. मजा आली खूप. आपण सर्व फॅमिली मिळून या गार्डनमध्ये नक्की जावू. ससा,मोर, हत्ती प्राण्यांबरोबर झोका, सेल्फी पाॅईंट देखील तिथे बनवले आहेत.

आई : नक्की जावू खरचं. खूप मस्त आलेत फोटो. 

यानंतर रेवा रुममध्ये निघून जाते. रात्र भर विचार आणि रडून झोप अपूर्ण होते. डोक दुखू लागल्याने रेवा दुस-या दिवशी उठू शकत नव्हती. त्यानंतर रेवा आजारीचं पडली.
अमेयला टेन्शन यायला लागले. आपल्या बोलण्याने रेवा आजारी पडली असणार? तो रेवाला तीन - चार दिवसांनी फोन करतो.

अमेय : काय होवून बसले रेवा. काय झाले तुला? खरच अग मला तुला दुखवायचे नव्हते.

रेवा : अरे तस काही नाही. मी येते दोन दिवसात काॅलेजला तेव्हा बोलू आपण.

दोन दिवसांनी रेवा काॅलेजला जाते. आणि आपण जे अमेयला प्रपोज केलं ते मैत्रिणींच्या सांगण्यावरुन केले. आम्हा मैत्रिणींमध्ये बेट लावली होती. त्यात काहीही करुन रेवाला जिंकायचं होतं. म्हणून तिनं अमेयला प्रपोज केलं. अस कोणतचं नात अमेय मध्ये नाही असे रेवा कबुल करते. कॅन्टिंग मधले मुले हसून एकमेकांना टाळ्या देत होते.


अमेय : अग मग आपण भेटलो तेव्हा तू मला खर का नाही सांगितलसं.

रेवा : माझ्या बेट लावणा-या मैत्रिणी तिथेच दुस-या टेबलावर बसून आपण काय बोलत आहोत ते ऐकत होत्या. मी तुला खर न सांगता तू काय बोलणार आहेस हे त्यांना जाणून घ्यायचं होतं. आणि फायनली तू त्यांना हवा तसाच वागला. मी बेट हरले. त्या जिंकल्या.

अमेय : मला आधी माहित असतं तर मी तुला नसतं हरु दिलं. पण यापुढे अशी बेट नको ग माझ्यासोबत. मी खरचं खूप सिरीअस झालो होतो. तुला काय वाटेल या विचाराने मला झोप लागत नव्हती.


रेवा : मीच आता अश्या कोणत्याही बेट लावण्याच्या आग्रहाला बळी पडणार नाही. नाहीतर माझ्या प्रेमात खरच कोणी पडलं तर? 


अमेय : तस कोणीही पडू शकतं बर का? आहेसच इतकी सुंदर.

रेवा : हो का. मग तू का नाही बोललास. रेवा थोडी सिरअस होवून विचारते.

अमेय : काय ग. अस काय बोलते.

रेवा : नाही रे आपलं सहजचं.

रेवा झालेल्या गोष्टी मनाला लावून न घेता जिथं प्रेमच नाही त्याचा विचार करण्यात वेळ वाया घालवायचाच नाही. जीवनात पुढे जाणे कोणाला थांबलयं का? पण रेवानं एक निश्चय मनाशी पक्का केला. आता आई-वडिल म्हणतील त्याच मुलाशी लग्न करायचे. 

रेवा बाबत घडलेली घटना अमेयला आठवताच. अमेय रेवाला पुन्हा एकदा फोन करुन भेटायला बोलवतो. त्याचं सिंधूवर प्रेम आहे. आणि यावेळी तिला माझ्या बद्दल वाटणा-या भावना जाणून घ्यायच्या आहेत. त्यात तुझी साथ हवी असे रेवाला अमेय बोलू लागला.

रेवा : म्हणजे जस मी काॅलेजमध्ये तुझ्या बाबत केले ते तू विसरला नाहीस. परतफेड करायची का आता मला त्रास देवून.

अमेय : नाही ग. मला फक्त मैत्रिण बनून मी रचलेल्या नाटकात तुझी सथ हवी. ते पण सिंधूच्या मनात माझ्या बद्दल प्रेम आहे की नाही?

पुढच्या भागात पाहूया रेवा अमेयला करेल का मदत? कि पुन्हा काॅलेजच्या त्या आठवणींमध्ये जावून अस्वस्थ होईल? नाटक करत असताना अमेयवर खरं प्रेम करण्याची चूक रेवा करेल का?

क्रमशः

🎭 Series Post

View all