Feb 23, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

जगण्याला पंख फुटले भाग २

Read Later
जगण्याला पंख फुटले भाग २

©®प्रज्ञा बो-हाडे

जगण्याला पंख फुटले भाग २

अमेय नक्की सिंधूवर किती प्रेम करतो याची परीक्षा घेण्याचे साठे आणि गोरे दोन्ही कुटूंबिय ठरवतात. या करता सिंधूला पाहायला एक मुलगा आणि त्याची खोटी फॅमिली तयार करतात.

साठे कुटूंबात पाहुणे पाहायला येणार म्हणून नविन टेबल क्लाॅथ, नविन पडदे, फुलांचा फ्लाॅवरपाॅट सजवण्याचे अशी कामाची लगबग सुरु होते.
सिंधूला पाहायला पाहुणे येणारं हि गोष्ट अमेयला अजिबात आवडत नाही. सिंधू तरी कशी तयार झाली? तिचं खरचं माझ्यावर प्रेम नसेल का? आजवर मी तिनं रांगोळीतून व्यक्त केल्या जाणा-या भावनांना प्रेम समजून चूक तर केली नाही.
अमेय त्या दिवशी पूर्णपणे अस्वस्थ होता. नीट जेवण करत नव्हता की कोणत्या कामात त्याचं मन गुंतत होते. आपल्याला नक्की काय होते हे समजतचं नव्हते. सिंधूला पाहायला येणारा मुलगा म्हणजेच शिवा. सिंधूच्या खरचं प्रेमात पडतो. हे नाटक जरी असले तरी मला सिंधू बरोबरच लग्न करायचे, म्हणून होकार देतो. हे प्रकरण भलतचं अंगाशी येत असल्याचे साठे कुटूंबिला वाटले. यातून मार्ग काढायचा तरी कसा? शिवाकडे साठे आणि गोरे कुटूंबिय खोट नाटक करायला सांगतात याचा व्हिडिओ रेकाॅर्ड केलेला होता. त्यामुळे तो ब्लॅकमेल करुन सिंधूचं माझ्या बरोबर लग्न लावून द्या अशी मागणी करत होता.

इकडे अमेयने डोक्यात भलताचं राग घालून घेतला होता. सिंधूनं नाकारलं म्हणजे मला कोणी मिळणारं नाही अस नाही. त्याला नकळत रेवाची आठवण होते अशावेळी. रेवाने काॅलेजमध्ये असताना एकदा अमेयला प्रपोज केलं होते. हि चर्चा काॅलेजमध्ये पसरली जाणं साहचिकचं शक्य होतं. रेवाने प्रपोज हटके अंदाजात केलं होतं.

काॅलेजच्या कॅन्टिंग मध्ये सर्वांदेखत फुलांचा गुच्छ एका हाताने पुढे करत मला तू खूप आवडतो. माझ्याशी लग्न करशील. मी खूप दिवसांपासून हि गोष्ट तुला सांगण्याचा प्रयत्न करत होते. पण आज जीव एकवटून तुला सांगण्याचा धीर झाला. रेवाच्या या प्रपोजल ने अमेयला त्यावेळी कशी प्रतिक्रिया द्यावी समजतचं नव्हते. असा प्रकार मुलीच्या बाबतीत घडणे स्वाभाविक आहे. अमेयाच्या बाबतीत हे नविन होतं. रेवाला त्याच क्षणी काही न सांगताच तिथून निघून जाणे अमेयला सोईस्कर वाटले.

एक दिवस रेवाला भेटून आत्ता हे वय करीअर साध्य करण्याचे आहे. सध्यातरी लग्नाचा विचार मनात नाहीये. आणि मैत्री पलिकडे आपल्या मनात दुसरं कोणतचं नात नाही हे स्पष्ट पणे सांगायला हवं. 

अमेय रेवाला रविवारी एका हाॅटेलमध्ये भेटायला बोलवतो. रेवाला वाटायचं. सगळ्यांसमोर उत्तर द्यायला घाबरत असावा. म्हणून एकटिला होकार द्यायचा आहे. म्हणून तर हाॅटेल ला बोलवलं असावं. या विचारातचं रेवा उत्साहाने ड्रेस कोणता घालायचा, हा नको, तो नको करत आख्ख कपाटचं बाहेर ओढून घेते. आवडीचा क्लिप, पर्स आधल्या दिवशी सर्व तयारी करते.
रेवाची चालणारी लगबगीची धावपळ पाहून
रेवाची आई: कसली तयारी चालली एवढी?
रेवाला दोन मिनिट काही सुचलचं नाही बोलायला.
रेवा:आपल्या एका मैत्रिणीचा वाढदिवस आहे. तिने हाॅटेलला ठेवला वाढदिवस. संध्याकाळी फॅमिली सोबत आणि सकाळी मित्र - मैत्रिणीं सोबत वाढदिवस साजरा करणार आहे. हाॅटेलच्या जवळच असणा-या गार्डन मध्ये आम्ही मैत्रिणी मस्त फोटोशूट करणार आहोत. म्हणून तर तयारी सुरु आहे आई.
रेवाची आई : अरे वा. तुमच्या पिढीची खरचं कौतुकं वाटतं. किती हौशेने तुम्ही प्रत्येक क्षण भरभरुन जगत आहात.

आमच्या वेळी नव्हतं अस काही. घराच्या बाहेर पडायचं म्हणजे विचारचं करावा लागायचा. आणि जरी घराबाहेर पडलो तरी घरातलं मोठं माणूस आमच्या सोबत सतत असायचे. त्यावेळी आमच्यातही हिंमत नव्हती एकट्याने बाहेर पडण्याची. 

रेवा : आता एकविसाव्या शतकापासून चित्र पालटले आहे. स्री स्वत: सर्व गोष्टी एकटी सहज करु शकते. त्याकरता कोणावरही अवलंबून राहण्याची तिला खरच गरज नाही. शिक्षणाने स्री सज्ञान झाली आहे. स्वत:चं आयुष्य आपल्या मनाप्रमाणे जगू शकते.एक स्वच्छंदी जगण्याचा तिला देखील अधिकार आहे. हो ना आई. 

रेवाची आई : तू अगदी बरोबर बोलते. बर चल झोप आता. खूप छान भाषण दिलेसं टाळ्या.उद्या जाणार आहेस ना लवकर.

रेवा : तू पण आई. काहीपण बोलते. भाषण काय त्यात. मी माझं मत फक्त तुझ्यासमोर मांडले. आणि तसही अजून एक सांगायचं तुला.

रेवाची आई : आता काय आणखी.


रेवा खरचं आईला काय सांगेल? अमेय बद्दल वाटणा-या भावना आईला इतक्यात रेवा सांगेल का? की अमेयशी भेट झाल्यावर डायरेक्ट अमेयला आई समोर रेवा उभी करेलं जाणून घेवूया पुढच्या भागात.

क्रमशः

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Pradnya Pavan Borhade

Home Maker

मनातल्या भावना कल्पकतेने गुंफूण कथांच्या माध्यमात मांडायला आवडते.

//