Feb 25, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

जगण्याला पंख फुटले भाग २१ अंतिम भाग

Read Later
जगण्याला पंख फुटले भाग २१ अंतिम भाग

©®प्रज्ञा बो-हाडे 

जगण्याला पंख फुटले भाग २१ अंतिम भाग

" तुझ्या शिवाय माझं अस्तित्व शून्य आहे. तुझ्यावर स्वत:पेक्षा जास्त जीव लावला मी", तुषार.


" मला ठावूक आहे सारं. माझा भूतकाळ आपल्याला एक होवून देईल की नाही हिचं शंका सतत मनात येतं होती. अजून एक मुलगा माझ्या प्रेमात या आधी पडला होता रवी त्याचं नाव. लग्नाची स्वप्न देखील दोघांनी रंगवली होती. त्या आधी माझा भूतकाळ त्याला सांगणं मी उचित समजलं, पण तो मला सोडून निघून गेला", निलांबरी.

" मी पणं तुला सोडून देईल. अस वाटलं का तुला", तुषार.

" हो, जिथं माझ्या जन्मदात्या वडिलांनी नाकारलं तिथं कोणाकडून अपेक्षा का करावी मी", निलांबरी.

" सगळेजण सारखे नसतात, मी कधीच तुला अंतर देणारं नाही. मी शेवटच्या श्वासापर्यंत तुझी सोबत करणारं आहे", तुषार.

तुषारचं बोलणे ऐकून निलांबरी ला हायसे वाटते. तरी शंकेची पाल मनात चुकचुकतं असते. नातेवाईक, समाज काय बोलेल ही खंत तुषार जवळ निलांबरी व्यक्त करते. 


" तू लग्नाला तयार आहेस ना माझ्याबरोबर इतकचं माझ्यासाठी महत्वाचं आहे. माझा अमेय मामा माझ्या पाठीशी खंबीर उभा आहे. तो समाजाला आणि नातेवाईकांना काय सांगायचे ते पाहून घेणारं आहे. आपण फक्त आपल्या दोघांचा विचार करायचा आहे", तुषार.

" मी आहे तयार. तुझ्याशी लग्न करायला", निलांबरी.


" मग झालं तर, मी मामाला तुझा होकार सांगतो. पुढे काय करायचे ते तुला फोनवर सांगेन", तुषार.

" मामा निलांबरी तयार आहे लग्न करायला माझ्याशी", तुषार.


" आपणं उद्याचं तिच्या घरच्यांशी बोलणी करुया", अमेय.

" आई काय म्हणाली? ती तयार आहे ना? ", तुषार.

" सुरवातीला नाहीच म्हणतं होती. आजीचं ऐकून. मी समज दिल्यावर मात्र तिला माझं बोलणे पटले", अमेय.

" माझं नक्कीच मागच्या जन्मीचं काहीतरी पुण्यं असणार म्हणून तूझ्यासारखा माझ्यापाठी उभ राहणारा खंबीर मला देवदूता सारखा लाभला", तुषार.

" खूप कौतुक नको करु, हरभ-याचं झाडं तुटेल आता", अमेय.


" खरचं मामा तू, आसवांनी गच्च झालेल्या डोळ्यांच्या पापण्या मिटतं मामाला घट्ट मिठी मारतो", तुषार.

अमेय देखील गहिवरतो. आपल्या भाच्याला त्याचं हक्काचं सुखं कोणत्याही पद्धतीने मिळवून देणारं असा पणं अमेयने केला होता.

निलांबरी आईला बोलावून घेते. तुषार बद्दल सांगून लग्नाची बोलणी करायला तुषारचा मामा आणि तुषार येणारं आहे. आईला होणारा आनंद शब्दांत मांडता येत नव्हता. निलांबरीच्या आईच्या मनात सतत एक विचार रेंगाळत असायचा. माझ्या मुलीशी कोणी संसार थाटू शकेल की नाही. तुषारच्या मनाचा मोठेपणा जो आज माझ्या मुलीशी लग्न करायला तयार झाला.

निलांबरीची आई तिच्या वडिलांना बरोबर येण्याचा आग्रह करते. निलांबरी चे तोंड पुन्हा कधी न पाहण्याच्या मतावर ठाम राहतं ते येतं नाही. तुषार, तन्वी आणि अमेय निलांबरीच्या घरी येतात. लग्नाची बोलणी होवून लग्नाची तारीख काढण्यात येते.


आजूबाजूच्या लोकांना निलांबरी विषयीचे सत्य समजते. नातेवाईक देखील या लग्नाला येण्याला नकार कळवतात.

आपल्याकरता चांगल काय आहे? हे फक्त आपल्यालाच माहित असते. जिथे दोघांनी एकमेकांना पसंत केले तिथे समाज आणि नातेवाईक आज, उद्या हि गोष्ट विसरून देखील जातील. संसार असणार आहे तो तुमच्या दोघांचा. तुम्हांला कोणी विचारायला देखील कोणी येणार नाही. लग्नाला कोणी नाही आलं तरी तुझे मामा, मामी, आई, बाबा, आजी, आजोबा आहेत पाठीशी", अमेय.

" हेचं तर माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहेत. मी नाही विचार करणार आता कोणत्याच गोष्टीचा", तुषार.

" असाचं धीर तुला निलांबरीला देखील द्यायचा आहे. तुझ्यापेक्षा तिला जास्त या प्रसंगाला तोंड देणे कठिणं होणारं आहे. तिची हिंमत बनून तुला समाजाशी दोन हात करायला लागतील. हि गोष्ट तुला सतत ध्यानातं ठेवायला हवी. आत्तापर्यंत तिला अशी साथ कोणीचं कधी दिली नसेल. ती उणीवं तुला भरुन काढायची आहे", अमेय.

लग्नाचा तो सोनेरी दिवसं उगवला. साखरपुड्याची तयारी सुरु झाली. मोजक्याचं लोकांमध्ये साखरपुडा संपन्न झाला. हळदीचा रंग निलांबरीच्या गो-या रंगावर खुलून दिसत होता. अक्षता आणि मंगलाष्टकांच्या मंत्राने विवाह संपन्न झाला. आता वेळ होती ती कन्यादानाची. 


निलांबरीच्या आई-वडिलांना गुरुजींनी स्टेजवर कन्यादाना करता बोलवले. निलांबरीची आई एकटीचं सकाळपासून लग्न मंडपात दिसत होती. निलांबरीचे बाबा लग्नाला आलेचं नव्हते.

अमेयने हि बाजू सावरुन घेण्याचे ठरवतं. निलांबरीच्या आईला निलांबरीचं कन्यादानं मी आणि सिंधू करतो असे सांगतो.

स्टेजच्या दिशेने सिंधू आणि अमेय निघणार तेचं निलांबरीचे वडिलं लग्न मंडपात उपस्थित झाले.

" मी माझ्या मुलीच कन्यादानं करणारं", निलांबरीचे बाबा.

स्टेजवरुन खाली पळत येवून निलांबरीने वडिलांना मिठी मारली.

" मला माफ कर, निलांबरी. मी तुला समजून न घेता तुझं अस्तित्वचं स्विकारु शकतं नव्हतो. अमेयनं मला काही गोष्टी अश्या पद्धतीने समजून सांगितल्या माझे डोळे उघडले. मी बेटा आता तुला माझी मुलगी आनंदाने जगाला ओरडून सांगणार. मला एक मुलगा आणि एक मुलगी देवाने दिली आहे. याचा अभिमान आहे. मुलीची राहिलेली हौस आता मी तू जेव्हा माहेरी येशील तेव्हा तुला तुझ्यावरं प्रेम करणारा बाबा दिसेल", निलांबरीचे बाबा.

" तुमचे आभार मी कसे मानू. जगातील सर्वच मुलींच्या मनातली इच्छा तिचे आई-बाबा लग्नाला बरोबर असावे. हि माझी इच्छा केवळं तुमच्या मुळे पूर्ण झाली. देवदूत बनून तुम्ही माझं आयुष्य इंद्रधनुच्या सप्तरंगी रंगात रंगून टाकले आहे", निलांबरी.

" मी काहीचं केलं नाही ग, समाजाला घाबरुन आपण आपलं जीवन जगणं तर नाही ना थांबवू शकत. आयुष्य सुंदर आहे. जन्म हा एकदाच लाभतो. मग का असं समाजाला घाबरुन कुढतं बसायचे", अमेय.


" खरं आहे तू तुझं आयुष्य मोकळेपणाने जग. आता तुझे आई-बाबा देखील तुझ्या सोबत कायम आहेत", निलांबरीचे बाबा.

निलांबरीचे कन्यादान थाटामाटात पार पडते. सासरी निघाताना सर्वांसमोर निलांबरी तुषारचा हात हातात घेवून "जगण्याला पंख फुटले", जगण्याला पंख फुटले, असे प्रेमानं गाणं गुणगुणते.

तुषार देखील तिच्या हातावर हात ठेवून जगण्याला पंख फुटले
आयुष्याला साथ तुझी लाभता
स्वप्नांचे अंकुर रुजले
निलांबरीच्या आगमनाने

असा उखाणा घेत तुषार निलांबरीला आपल्या घरी फटाक्यांच्या आतिषबाजी आणि बॅंजो च्या म्युजिक मध्ये घेवून जातो.

दोघांच प्रेम यशस्वी झालेलं पाहून अमेयच्या डोळ्यातं आनंद अश्रू तरंगतात.

कशी वाटली कथामालिका कमेंट करुन जरुर कळवा. पुन्हा एकदा सांगेन काल्पनिक रुप कथेला देण्यात आले आहे. कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू निश्चितच नाही. तसे आढळल्यास क्षमस्व.

समाप्त : 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Pradnya Pavan Borhade

Home Maker

मनातल्या भावना कल्पकतेने गुंफूण कथांच्या माध्यमात मांडायला आवडते.

//