Mar 02, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

जगण्याला पंख फुटले भाग २०

Read Later
जगण्याला पंख फुटले भाग २०

©®प्रज्ञा बो-हाडे

जगण्याला पंख फुटले भाग २०

फोनची रिंग वाजते.


"बोल ग, मी तुझ्याचं फोनची वाट पाहत होतो", तुषार.

" कसा आहेस तू. कशी आहे तुझी तब्येतं", निलांबरी.

" मी बरा आहे", तुषार.

" आज आपणं भेटायचं का"? निलांबरी.

" चालेलं भेटूया आपणं", तुषार.

" उशीर झाला का मला यायला", निलांबरी.


" मी पाच मिनिटं झाले आलो आहे, आज मला तुझ्याशी खूप बोलायचं आहे. किती महिन्यांनी आपण असं समोरासमोर निवांत बोलणार आहोत", तुषार.

" मी दवाखान्यात पाच दिवसांपूर्वीच भेटले होते ना तुला", निलांबरी.

" तेव्हा मला फारसं बोलतं येत नव्हतं", तुषार.

" मला तुझ्याशी खूप सिरीअस विषयावर बोलायचं आहे. मला माझा भूतकाळ तुझ्या समोर उघडं करायचा आहे", निलांबरी.


" खरतरं तुझा भूतकाळ मला जाणून घ्यायचा नाही. आज आहेस ती तू माझी खरी. यावर माझा पूर्ण विश्वास आहे. आमच्या घरच्या लोकांना देखील तू पसंत पडली आहेस. याच विषयी मी तुझ्याशी बोलण्याकरता फोन हातात घेत होतो. तितक्यात तुझा फोन आला.", तुषार.

" हे जाणूनं घेणं तुझ्याकरता महत्वाचं आहे", निलांबरी.


" ते सांगून जरं तुझ्या मनाला शांती लाभणारं असेल तर सांगून टाक काय ते", तुषार.

" मी एक ट्रान्सवुमन आहे. माझं नाव निलांबर होतं. जसं समजलं आतून काहीतरी मुलींसारखं नटायला आवडायचं. आईची साडी घालून आरश्या समोर लिपस्टिक, टिकली, कानतलं, गळ्यातलं कोणी घरी नसताना घालण्याची सवयचं जडली होती. एक दिवस बाबांनी हे माझं रुप पाहिले. मी स्वत:ला आहे तसं स्विकारायचं ठरवलं. हि गोष्ट आईला पटली. बाबांनी मात्र मला घराबाहेर काढले. मी स्वतंत्र राहण्याचा विचार केला. नोकरी करुन स्वत:च छोटं का होईना घर घेतलं. आई वरचेवर भेटायला यायची. बाबांनी कधीच माझं तोंड न पाहण्याचा निर्णय घेतला. माझा भाऊ अमोल. त्याने देखील वडिलांसारखचं माझ्याशी नातं तोडलं", निलांबरी.


" हे तू काय सांगते, तू मला फसवल आहेस निलांबरी ", तुषार.

" तू माझ्यात गुंतत गेलास. मी हि तुझ्या प्रेमात आकंठ बुडाले. मला देखील तू आवडू लागला", निलांबरी.

" हे असं कसं शक्य असू शकते", तुषार.

" हेचं सत्य आहे. जे तुला स्विकारावं लागेल", निलांबरी.

तुषारच्या पायाखालची जमिन सरकते. तो संतापाने घरी येतो. चार-पाच दिवस घराच्या बाहेर पडत नाही. तो इतका झालेला पाहून तन्वी घाबरते. ती अमेयला फोन करुन घरी बोलवून घेते.


" तुझे काही दुखते का? तन्वी सांगत होती तू घराच्या बाहेर देखील निघाला नाहीस. काय झालं? माझ्याशी बोलू शकतो. काही अडचण आहे का?", अमेय.

" काय सांगू आता, मोठ्या संकटात सापडलो आहे,मामा", तुषार.


" बोल तू. बोलून प्रश्न सुटतात ", अमेय.

" आपण जिच्याशी नातं जोडण्याचा प्रयत्न करत होतो ती एक ट्रन्सवुमन आहे. सहा दिवसांपूर्वीच तिनं मला भेटायला बोलवून हे सांगितलं. मला काय करावं त्या क्षणी कळले नाही. मी काही न बोलता तिथून निघून आलो", तुषार.

" तुला आधी माहितं नव्हतं का हे, अमेय.


" नाही. ती आधी सांगायचा प्रयत्न करत होती. एक भूतकाळ आहे म्हणून. त्याचा अर्थ वेगळा घेतला होता मी. असेल कोणी प्रियकरं या गैरसमजा मध्ये होतो मी. तसे काही नसून वेगळेचं समोर आलयं. कोंडी झाली माझी", तुषार.

" तुझं काय मत झालं ते सांग मला ", अमेय.


" मामा मला निलांबरी आवडते. मी तिला स्विकारायला तयार आहे. आईची आणि आजीची , नातेवाईकांची समजूत कशी काढायची कळत नाही मला", तुषार.

" तू त्याची काळजी करु नकोस. तुझं अंतर्मन तुला काय सांगते ते बघं", अमेय.

" मामा मी निलांबरी शिवाय दुस-या कोणाशीही लग्न करु शकत नाही. माझा जीवं तिच्यात गुंतला आहे. आणि ती देखील तेवढिचं माझ्यात गुंतली आहे", तुषार.

" मी घरच्यांना समजावतो. तू चार दिवसांपासून निलांबरीशी बोलला आहेस की नाही", अमेय.


" नाही", तुषार.

" या सगळ्याचा तिनं वेगळा अर्थ काढायला नको", अमेय.

" मी आत्ताच जातो,तिला सांगतो. जग आपल्या विरोधात उभं राहिलं तरी आपण आपली साथं सोडायची नाही", तुषार.

" ताबडतोब जा, उशीर नको व्हायला या गोष्टीला", अमेय.

तुषार लगेच निलांबरी ला भेटायला तिच्या घरी जातो. घरी नसल्याने निलांबरीला फोन लावतो. फोन स्विच आॅफ सांगतात. काय करावं तुषारला समजतं नसतं. तो मैत्रिणींना निलांबरी विषयी विचारतो.

ती उद्या गावी कायमवरुपी राहायला जाणार आहे हे कळते. आजच्या दिवस ती तिची खास मैत्रिण चेतना जवळ राहायला गेली होती. तुषारने मैत्रिणींकडून चेतनाचा नंबर आणि पत्ता घेतला. चेतनाच्या घरी जावून निलांबरीला पाहून. तुषारने घट्ट मिठी मारली. निलांबरी दोन मिनिटे काही कळलेचं नाही.

" तू मला एकट्याला सोडून कुठं जाणार होतीस", तुषार.

" मी नाही तुचं मला चार-पाच दिवसांपासून काहीच बोलायचा प्रयत्न करतं नव्हतास. मला वाटले तुला माझां भूतकाळ स्विकारणे अवघड झाले असणारं. कदाचित तू माझ्यावर नाराज झाला आहेस. म्हणून मी तुझ्यापासून लांब जाणार होते.

तुषार आणि निलांबरी चे लग्न होईल का? तन्वी इतर नातेवाईक या लग्नाला परवानगी देतील का? पाहूया अंतिम भागात.

क्रमशः

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Pradnya Pavan Borhade

Home Maker

मनातल्या भावना कल्पकतेने गुंफूण कथांच्या माध्यमात मांडायला आवडते.

//