©®प्रज्ञा बो-हाडे
अष्टपैलू लेखक महासंग्राम
चौथी फेरी - प्रेमकथा .
सदर कथामालिका काल्पनिक स्वरुपात रेखाटली गेली आहे. वास्तवाशी त्याचा काहीही संबंध नाही. तसे आढळल्यास योगायोग समजावा. काही त्रूटी निदर्शनास आढळत असतील तर त्याबद्दल क्षमस्व.
एकाच चाळीत राहूनं एकमेकांना नेहमीचं अडचणीच्या कामात मदत करणारे गोरे आणि साठे कुटूंब. शेजारी म्हटले की, भांड्याला भांड हे लागणारं. राग एक दिवसाच्या वर कधीच टिकत नसायचा. गोरे कुटूंबात अमेय आणि तन्वी हे बहिण भाऊ तर साठे कुटूबांत अवधूत आणि सिंधू हे बहिण भाऊ राहत होते.
काॅलेजमध्ये नाट्य अभिनय, खेळांमध्ये दोघेही हिरीरीने भाग घेत असायचे. सिंधू आणि तन्वी या देखील जिवाभावाच्या मैत्रिणी होत्या. दोघींना सण उत्सवाला सेम रंगाची कपडे घालयला खूप आवडायचे. आईची नविन आणलेली साडी नेसून चाळीत मस्त फिरुन यायचा जणू दोघींना छंदच असायचा.
सुट्यांमध्ये वेगवगेळे पदार्थ करुन पाहत असताना गोरे कुटूंबांना देखील तो पदार्थ सिंधू देवू लागली. सिंधूच्या कलाकृतीतून जणू तिचं प्रेमचं व्यक्त होत होते. हे सार अमेय जवळून पाहत होता. अमेय चक्क सिंधूच्या प्रेमात पडला असावा. सिंधूने काढलेल्या रांगोळीला अमेय आता रोजच दाद देवू लागला. तिने केलेल्या पदार्थांना हाॅटेलपेक्षाही सुंदर झाले असल्याची कबूली द्यायचा. खरतरं सिंधूही अमेयच्या प्रेमात हळूहळू वाहवत चालली होती.
सिंधू आणि तन्वी देखील अमेय आणि अवधूतच्या काॅलेजमध्ये प्रवेश घेताता. चौघेही एकत्र काॅलेजला जातात. सहा महिने असेच निघून जातात. अमेय आणि अवधूत मात्र कॅंम्पस मुलाखती मधून नोकरी मिळवण्याच्या शोधात असतात.
अमेयला लकीली कॅंम्पस मुलाखती मधून नोकरीची आॅफर येते. मुलाखतीचे सर्व फे-या यशस्वी पार करत अमेय नोकरीला लागतो. काॅलेजचे शिक्षण पूर्ण करत असताना नोकरीची सुवर्णसंधी देखील हाताशी असल्याने अमेय खूश असतो.
इकडे सिंधू आणि तन्वीचे काॅलेज शिक्षण पूर्ण झालेलं असते. सिंधूला वाटणारं अमेय बद्दलचे प्रेम तेवढेच घट्ट होते. अमेय देखील आपलं प्रेम व्यक्त कधी करायचं याच गोष्टीचा विचार करत असे.
पहाटे चालण्याच्या तर रात्री देखील शतपावली करण्याच्या बहाण्याने घराबाहेर निघून अवधूत आणि तन्वीचे आई- बाबा घराबाहेर पडत असायचे. अवधूत आणि तन्वी देखील आपल्या मित्र - मैत्रीणीं सोबत सिंधू आणि अमेयला त्यांच्या प्रेमाची कबुली देण्याकरता कसं मनवायचं याची युक्ती आखू लागले.
कधी चित्रपटाची तिकीटे काढून ऐनवेळी सिंधू आणि अमेयलाचा पाठवू लागले, तर कधी सहलीला जाताना बाईक वर जाताना प्रत्येक जण आधीच एकमेकांच्या मागे बाईकवर बसून घ्यायचे. जेणेकरुन सिंधू आणि अमेय सोबत राहतील.
गोरे आणि साठे कुटूंबिय छोटाश्या सहलीचे आयोजन करुन पर्यटन स्थळ, कुळाचार अश्या धार्मिक स्थळांना देखील भेट देवू लागले. सणाचे औचित्य साधत एकमेकांच्या परीवारासोबत एकत्र येवून डिनर, छोटे-मोठे खेळ आयोजित करुन सणांच महत्व आणखी नाविण्यपूर्ण रुपात सजवू लागले.
अमेय आणि सिंधू आपल्या प्रेमाची कबुली एकमेकांना देतील का? की दोन्ही परीवार अक्कल हुशारी वापरुन दोघांना प्रेम व्यक्त करण्या इतपतं परीस्थिती उभी करतील? पाहूया पुढच्या भागात.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा