जगण्याला पंख फुटले भाग १९

मनापासून केलेल्या प्रेमातं लुटूपुटूचे भांडण हे होणारचं.

©®प्रज्ञा बो-हाडे

जगण्याला पंख फुटले भाग १९

शिवाची एकुलती एक मुलगी म्हणजे सुमी. ज्याचं लग्न सिंधू बरोबर होणारं होतं. सिंधू आणि अमेयने शिवा करता विवाहसंस्थेत नाव नोंदवून एका मुलीचा बायोडाटा पसंत केला होता. त्याच मुलीशी शिवा ने विवाह केला. त्याला सुमी हि गोंडस मुलगी झाली. ती सात महिन्यापूर्वीच बॅंकेत नोकरीला लागली होती.


सुमीला कामाचं स्वरुप समजावून सांगत असतानाचं चैतन्य सुमीच्या प्रेमातं पडतो. सुमीला चैतन्यच्या डोळ्यातं स्वत:बद्दल प्रेम दिसतं असतं. नकळतपणे ती देखील चैतन्यच्या प्रेमातं पडते.

चैतन्य सुमीच्या आई-वडिलांना आपल्या घरी येण्याबद्दल सांगतात.
सिंधू आणि अमेय शिवाला पाहून आश्चर्यचकीत होतात.

" सुमी तुमची मुलगी आहे तर", सिंधू.

" हो ना, दोघांच एकमेकांवर प्रेम आहे. चैतन्यने आम्हांला आज घरी बोलवले तुमची भेट घडवून द्यायला", शिवा.

" आपणं आधीच एकमेकांना चांगले ओळखतो,आता तर आपण सोयरे होणार. आमच्याकडून होकार समजा आणि लग्नाच्या तयारीला लागा", अमेय.


" आम्हांला देखील खूप आनंद झाला. मुलीचं भाग्य उजाळले. आमची एकलुती एक मुलगी तुमच्या घरी समाधानाने राहणार", शिवा.

चैतन्य आणि सुमीला घरचे लग्नाकरता परवानगी देतील की नाही याची शाश्वती वाटतं नव्हती. त्यांच्याकडून परवानगी मिळाली आणि दोघांनी पाहिलेलं स्वप्न आज सत्यातं उतरलं.

निलांबरी मैत्रिणींच्या सांगण्यावरुन तुषारला टाळण्याचा प्रयत्न करतं असते. काहीही निमित्त काढून कधी मावशीकडे चालली, तर कधी काकांकडे राहायला गेली अशी कारणे निलांबरी देवू लागली. 


निलांबरी टाळत आहे याच्या पाठीमागचे नेमकं कारणं तुषारला जाणून घ्यायचं होतं. निलांबरीला भेटायला एका कॅफेत तुषारने बोलावले.

निलांबरी : मला पुढे काम आहे एक. तुला काय बोलायचे ते लवकर बोलं.


तुषार : एकतरं हल्ली म्यूझिक बॅंडला पण येत नाहीस. माझ्याशी भेटायचं देखील टाळते. माझ्याकडून चूक झाली का काही.

निलांबरी : काही नाही तसं.

तुषार : मग सांग ना खर काय आहे. तूला भेटले नाही की माझा जीव कासाविस होतो. माझं तुझ्यावर प्रेमं आहे. तुला ही अस्वस्थता नाही का जाणवतं माझ्यासारखी.

निलांबरी : मला आत्ता काहीच बोलता येणारं नाही. म्हणत निलांबरी रडत तिथून निघून जाते.

निलांबरीला फोन करण्याचा तुषार अनेक वेळा फोन करतो. निलांबरी तो फोन उचलतं नाही.


निलांबरीच्या मैत्रिणी भूतकाळा विषयी तुषारला सांगून टाकावे असे सुचवतात. निलांबरी पुन्हा आपल्याला तो सोडून जाईल. ही भीती मनात दडून राहिलेली असते. ज्यांनी निलांबरीवर प्रेम केले, त्यांनी हा भूतकाळ समोरं येताचं निलांबरीची सोबत कायमस्वरूपी तोडली होती.

हिचं परीस्थिती तुषारच्या बाबत घडू नये असे निलांबरीला वाटतं होते. तुषारबद्दल मनात प्रेम असून देखील, त्याला आयुष्यभर मित्राच्या रुपात निलांबरीला जपायचे होते.

तुषार च्या मित्रांकडून समजते तुषारचा अॅक्सिडेंट झाला. निलांबरी धावत-पळत दवाखान्यात तुषारला भेटायला जाते. 


तुषार : माझा अॅक्सिडेंट झाल्यावर तू अशी दवाखान्यात मला भेटायला येणार हे माहितं असतं तर मी कधीच स्वत:हून एखाद्या गाडी खाली आलो असतो.

निलांबरी : तू लवकर बरा हो. मला तुझ्याशी बोलायचं आहे.

तुषार : बोल तू. तुझ्या तोंडून शब्द ऐकायला मी केव्हापासून तयार आहे. तुच माझ्याशी बोलायचं टाळतं आहेस.

आणि लवकर बरा हो. अस म्हणते आहेस, तुला पाहून माझं आजारपणचं दूर पळाले. दवाखान्यात मी आहे तोपर्यंत येशील ना रोज भेटायला.


निलांबरी : मी नाही तुला अश्या परीस्थिती पाहू शकत. मी रोज येईन. पण लांबूनच तुला पाहून जाईल.

तुषार : लवकरं बरं होणं हेचं माझ्या हातातं आहे.

निलांबरी : बरोबर ओळखलसं तू.

निलांबरी रोज दवाखान्यात येवून तुषार करता कधी गुलाबाच्या फुलांचा बुके, तर कधी स्वत:च्या हाताने डबा बनवून आणू लागली. तिची हि तळमळ तन्वीच्या लक्षात आली. तन्वीला देखील निलांबरी सारखीचं सून घरात यायला हवी होती.

निलांबरी आता तन्वी, सिंधू, अमेयला ही तुषारची बायको म्हणून पसंत पडू लागली. तिच्या निळ्याशार डोळ्यातं सर्वांना आपलसं करण्याची ताकद होती. गोरीपाण, नाजूक बांधा, गालवर खळी, गोड आवाज सर्वगुण संपन्न लाखात एक अशी निलांबरी दिसायला सुंदर होती.

तुषार आता बरा झाला होता. घरच्यांनी निलांबरी सून म्हणून पसंत आहे. असे तुषारला सांगितले. 


तुषार : मला आधी याविषयी निलांबरी बरोबर बोलायला हवे.

तन्वी : बोलायचं काय त्यात. तिच्या डोळ्यातं तुझ्याविषयी वाटणारे प्रेमं माझ्याबरोबर सर्वांनी पाहिले आहे.

तुषार : तरी मी निलांबरीशी उद्या भेटून सांगतो तुम्हांला.

निलांबरीचा भूतकाळ तुषार समोर आल्यावर निलांबरीशी लग्न करायला तयार होईल का तुषार? तन्वी, सिंधू आणि अमेय तयार होईल का निलांबरीला आपली सूनं म्हणून घ्यायला. पाहूया पुढच्या भागात.

क्रमशः

🎭 Series Post

View all