जगण्याला पंख फुटले भाग १८

प्रत्येकाला भूतकाळातल्या आठवणींनी वर्तमानाचा देखील विसर पडतो.

©®प्रज्ञा बो-हाडे

जगण्याला पंख फुटले भाग १८

अमेय : तन्वी आपल्या लाडूबाई करता माझ्या जिवलग मित्राच्या मुलाचं स्थळ घेवूनं आलो. त्यांना आपल्या मधूचा फोटो पसंत पडला. तू आई जवळ दिलेली मधूची पत्रिका देखील पाहिली. गुण देखील उत्तम जुळतात. आता मधूला मुलगा पसंत पडला म्हणजे झाले.


तन्वी : छानचं होईल मग. हल्ली ओळखीतचं लग्न लावून द्यायला हवे.
नंतर खूप त्रास होतो काही गोष्टींचा.

अमेय : तू अजिबात काळजी करु नकोस. माझा मित्र माझ्या शब्दाबाहेर नाही. तो आपल्या मधूला मुलीप्रमाणेचं पाहिलं.

तन्वी : माझी काळजी दूर केली तू. 


अमेय : आपण बघण्याचा कार्यक्रम करुन घेवूया. येत्या रविवारी पाहण्याचा कार्यक्रम करुया. मी कळवतो तसे मित्राला.

तन्वी : चालेल. मी मधूशी बोलते.

अमेय : हो. येतो आता मी. येईल तो मित्र आणि आपल्या होणा-या जावयाला घेवूनचं येतो.

मधू नुकतीच कामावरुन घरी आलेली असते.

तन्वी : तुझं काम आता संपलं असेल ना.

मधू : हो ग. हा रविवार आराम आहे. महिनाभर आॅडिटचे काम करुनं दमायला झालं.

तन्वी : आज मामा घरी येवून गेला. तुमच्या बद्दल विचारतं होता.

मधू : थांबला का नाही तो. भेटला असता आम्हांला.

तन्वी : येणार आहे या रविवारी तो.

मधू : छान. आपणं मस्त फिरायला जावू.

तन्वी : अग तुझ्यासाठी स्थळ घेवून येणारं आहे. मामाचाचं मित्राचा मुलगा आहे.

मधू : चालेल ना आई. तुम्ही म्हणालं तसं करुया. पाहून घेवूया मामा दाखवतो ते स्थळ.

घराची आवरा आवर करुन तन्वी कार्यक्रमाच्या तयारीला लागते. ठरल्या प्रमाणे मधूला पाहण्यासाठी मुलाकडचे येतात. मधूला पाहायला येणा-या श्रीकांतला मधू पहिल्याच नजरेत पसंत पडते. मधुचे समजूतीने बोलणे. नम्र वागणूक, सर्वांशी मिळून-मिसळून राहण्याचा स्वभावं श्रीकांतला आवडतो.


मधूला देखील श्रीकांत मेहनती वाटतो. जबाबदारी अंगावर घेतं वडिलांचा व्यवसाय सांभाळून नोकरी देखील करत होता.

दोघांना बोलायला दिलेल्या वेळेतं एकमेकांशी चर्चा करुन दोघांची पसंती असल्याने साखरपुड्याची तारीख काढण्यात आली.

साखरपुडा झाल्यावर लगेचचं लग्नाचा मुहर्त काढण्यात येतो. लग्नाचा मुहर्त तारखेच्या दिवशी उशीरा असल्याने आॅर्केस्टा ठेवण्यात येतो. त्यात निलांबरी गिटार वाजवताना पुन्हा तुषारला दिसते.


आपल्या बहिणीच्या लग्नाला पुन्हा एकदा निलांबरीचे दिसणे योगायोगचं म्हणावा असे तुषारला वाटू लागले.

मधूचे लग्न थाटामाटात पारं पडते. मधूच्या जाण्याने घर तन्वीला भकासं वाटू लागते. असेचं महिना देखील उलटून जातो. मधूचे लग्नानंतरचे पहिले सण सासरी आणि माहेरी दोन्ही ठिकाणी उत्साहात साजरे होतात.


निलांबरीच्या प्रेमात वेडा झालेला तुषार म्यूजिक बॅंडच्या निमित्ताने अनेक शो मध्ये एकत्र भाग घेवू लागले. वेगवेगळ्या जिल्हा, शहरांमध्ये जाण्याच्या अनेक संधी त्यांना मिळतं होत्या.

निलांबरी देखील तुषारवरं प्रेम करायला लागली होती. पण तिला तिचा भूतकाळ तुषारवरं प्रेम करण्यासाठी थांबवतं होता.

निलांबरीच्या आधीच्या एका मित्राने अशीचं प्रेमाची वचने देवूनं फसवलं होते. तो हाच भूतकाळं जाणूनं. पुन्हा कधी या फंदात न पडण्याचा निर्णय घेतला परंतु तरी देखील तुषार बद्दल प्रेम भावना जागृत झाल्या होत्या.

निलांबरी तिच्या मैत्रिणींना तुषार विषयी भावना सांगते. त्या मैत्रिणी निलांबरीला तुषारशी जवळीक न साधण्याचा सल्ला देतात. यावेळी जरं निलांबरी तुटली तर कायमची स्वत:ला गमावून बसेल, याची भीती साहजिकचं मैत्रिणींना वाटतं होती.

निलांबरी देखील मैत्रिणी सांगतात ते बरोबरचं आहे. ह्या दृष्टिने तुषारला न भेटण्याचा निर्णय देखील घेते. दैवी खेळ म्हणतात तो असा, तुषार आणि तन्वीची तर आता रोजचं भेट घडून येत होती. निलांबरी चित्रपट बघायला मैत्रिणींबरोबर जायची नेमकी त्याचवेळी तुषार देखील मित्रां सोबत तिथे येत असायचा.

मधूचा संसार सुखाने चालू होता. आता चैतन्य देखील बॅंकेत नोकरी करायला लागला होता. सिंधू आणि आजीला घरात सूनेची गरज भासायला लागली. मधू नंतर आता चैतन्याचं देखील लग्न लावूनं देण्याचा त्यांनी विचार केला.


चैतन्यचं नेमकी बॅंकेतं काम करणा-या सुमी सोबतं प्रेमाचे बंध जुळले होते. योगायोग तर बघा. सुमी नेमकी होती ती तरी कोण? हे कळताचं तुम्हांला आश्चर्य वाटणे साहजिकचं आहे.

निलांबरीच्या जीवनाशी निगडीतं असा कोणता भूतकाळ पाठपुरावा करतं असेल? तसेच सुमी नेमकी कोणं आहे ते आपण पाहूया पुढच्या भागात.

क्रमशः

🎭 Series Post

View all