©®प्रज्ञा बो-हाडे
जगण्याला पंख फुटले भाग १७
घराच्या जवळचं असणाऱ्या बागेतं झाडाच्या खाली पारावर बसून एखादे गाणं म्हणून मनात उद्भवणारी कोडी उलगडतातं का हे पाहायचे म्हणून सुरवतीला एक बागेत एक चक्कर मारुन तुषार त्या झाडाच्या पारावर गाण्यासाठी बसला. डोळे घट्ट मिटून गाण्याच्या माध्यमातून आपलं गाणं गातं तुषार बसला. मध्येच मुलींच्या हसण्याचा आवाज तुषारच्या कानी येत होता. त्याने डोळे उघडून कणों हसतं आहे हे पाहण्याचा तसेच आजूबाजूला थोडे चालून पाहण्याचा प्रयत्न केलां.
कोणी आजूबाजूला दिसले नाही. पुन्हा आपल्या सुरात सुर मिसळून तुषारं गाणं गायला सुरवात करु लागला.
" तुम्ही किती छान गाणं गाता", निलांबरी.
" धन्यवाद तुमचे", तुषार.
" आम्ही एक बोलू का तुमच्याशी", निलांबरी.
" संकोच काय त्यात बोला", तुषार.
" आम्हांला आमच्या म्युझिक बॅंड मध्ये वाद्य वाजवणारे सगळे टिम मेंबर मिळाले. कमी होती ती म्हणजे. एका गायकाची.", निलांबरी.
" मी काय करावं, असं वाटतं तुम्हांला.", तुषार.
" आमच्या ग्रुपमध्ये तुम्हांला यायला आवडेलं का? ", निलांबरी.
" सांगतो थोड्या दिवसांत" तुषार.
एवढे दिवस जिच्या शोधामध्ये तुषार आकंठ बुडाल होता. आज ती सुंदर परी म्हणजेचं निलांबरी तुषार बरोबर चक्क बोलतं होती. तिचे वा-याभोवती उडणारे केसं, काळेभोर डोळे, गालावर पडणारी खळी पाहून प्रत्येक जण तिच्या प्रेमात वेडा होईलं अशीचं अप्सरा वाटतं होती. जिचां भासं क्षणोक्षणी जाणवतं होता, तो आज प्रत्यक्ष समोर उभा पाहून तुषार आनंदाने उड्या मारु लागला. आपल्याला जाणवणारा हा भास नसून सत्य आहे. ती खरचं इतकी सुंदर आहे. बघत बसावचं वाटतं होतं नुसते.
तुषारला खरतरं भावनांना आवर घालणं जमतचं नव्हतं. काॅलेज आणि गाण्याचा क्लास सांभाळून अजून एका बॅंड मध्ये सहभागी होणे खरतरं तारेवरची कसरतचं होती. पण काही मिळवायचे असले की काहीतरी गमवावे लागते हे मात्र नक्की. या उक्तीवर विश्वास ठेवतं आपलं मनं निलांबरी कडे ओढ घेतं आहे.
त्या साठी बॅंड मध्ये भाग घ्यायलाचं हवा. तन्वीला सांगून तुषार म्यूझिक बॅंड मध्ये सहभागी होतो.
तन्वी : सगळं सांभाळून तुला शक्य होईलं ना.
तन्वी : तुला हवं तसं करं.
दोन महिन्या नंतर.,
तन्वी तुला सुद्धा घरी यावसं वाटले नाही का? शेवटी न राहवून मीचं आलो तुमच्या घरी.
अमेय : अग मगं एक फोन तरी करायचा. एवढी धावपळ होत होती तुझी. आई आली असती मदतीला.
तन्वी : हो ना. सासूबाईंची नेमकी याच काळात देवदर्शनाला जाण्याची तयारी. मला काही सुचतचं नव्हतं.
फोन करायला देखील जमले नाही.
" मी खास काम घेवून आलो आहे तन्वी तुमच्या घरी", अमेय.
तन्वी : काय म्हणतो. खूश दिसतो. काय झाले?
अमेय कोणते खास कारणं घेवून तन्वीकडे आला असणारं याची उत्सुकता माझ्या इतकीचं तुम्हांलाही असणारं हो ना. ते जाणून घेवूयातं पुढच्या भागात.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा