जगण्याला पंख फुटले भाग १६

आयुष्यात आलेल्या सुंदर परीमुळे जगणं हवसं वाटत होतं.

©®प्रज्ञा बो-हाडे

जगण्याला पंख फुटले भाग १६

तुषार काॅलेजला गेला तसा त्याचा हट्टीपणा थोडा कमी झाला. इतरांमध्ये मिक्स न होणारा आता मात्र सर्वांशी हसून-खेळून राहायला लागला. सर्वांशी मैत्रीचा हात आपणहून पुढे तुषारने केला.


तुषारच्या गायनच्या परीक्षा देखील पूर्ण झाल्या होत्या. तो क्लास मधून विविध गाण्यांचे शो सादर करु लागला. याच बरोबर काॅलेमधल्या गॅदरींग, डे च्या दिवशी गायनाचे सादरीकरण करुन संपूर्ण काॅलेज मध्ये प्रसिद्धि मिळवली होती.

शिवाय बोर्ड वर सुंदर चित्र रेखाटून तुषार काॅलेजमध्ये नावारुपाला आला होता. प्रदिप या मित्राच्या ओळखीने एका कार्यक्रमात तुषारला गाण्याच्या कार्यक्रमाला बोलावले. तिथे एक सुंदर मुलगी स्वर्गातून अवतरलेली परीचं जणू पाहायला मिळली. तिला प्रथम क्षणी पाहताचं प्रेमात पडावं अशी तुषारची अवस्था झाली होती. दोन मिनिटं गाणं थांबवून क्षणभर तिच्याकडेचं बघत बसावसं वाटत होते.

स्वत:ला सावरतं तुषार गाण्यावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करत होता. कसाबसा तो कार्यक्रम तुषारने पार पाडला. त्याची नजर त्याच सुंदर परीचा शोध घेण्यात व्यस्त होती. सर्वजण निघून गेले. ती बहुधा लवकर निघून गेली असावी. असा अंदाज तुषार लावतो.


" जर आपल्या नशिबात तिच्याशी भेट घडणे लिहले असेल तर नक्की आपल्या समोर कोणत्या ना कोणत्या निमित्ताने गाठभेट हि होतचं राहिल", तुषार.

दिवसामागून दिवस निघून जातात. तुषारमध्ये काहीसा बदल दिसायला लागतो. तो न आवडणारी भाजी कुरकूर न करता खायला लागतो. एरव्ही वाद घालणारा कोणाशीही शब्द न बोलता शांत आणि स्वत:शीच हसत असायचा. त्याची नजर सतत कोणाचा तरी शोध घेत आहे असे तन्वीला आढळून आले.

अमेयला फोन करुन तन्वी तुषारशी एकदा बोलून त्याच्या मनात नक्की चालले तरी काय ते जाणून घे. तो हल्ली वेगळा वागतो. मागच्या वेळी तू समजूत काढून पर्यायी मार्ग कसा अवलंब करायचा ते शिकवलेसं. हि देखील तशीच वेळ आहे हे समज.

" मी माझ्या बाजूने सर्वाथाने प्रयत्न नक्की करतो", अमेय.


तुषारला एका कॅफेत बोलावून अमेय तुषार च्या मनात नक्की काय चालले याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो. पण असे वेगळे काहीच नसल्याचे तुषारकडून अमेयला समजते.

" नक्की आपल्याला काय होतयं हेच समजत नाही, सांगायचं तरी काय", हा प्रश्न तुषारच्या मनात रेंगाळत असतो.

तुषार : मामा काही नाही. थोडं अभ्यासाचं टेन्शन आलयं. परीक्षा जवळ आली ना. अभ्यासाला गाण्यांच्या शो मुळे दुर्लक्ष होत आहे.


अमेय : एवढेचं ना.

तुषार : हो, मामा.

परीक्षा जवळ येत असल्याने तुषार अस्वस्थ आहे असे तन्वीला अमेयकडून कळते. 


तन्वी : मला थोडं वेगळे वाटते. दादा.

अमेय : तसं काही असेलचं तर तुषार बोलेलं माझ्याशी मोकळेपणाने.

तन्वी : बरोबरं आहे तुझं. ठेवते विश्वास तू सांगितले आहेस त्यावर. मला थोडं वेगळं जाणवतयं.


अमेय : वेडाबाई, नको इतका विचार करुस, तुषारचा. तिकडे मुलीचा विचार करायला हवा. कन्यादान करायचं आहे आम्हांला. मधू लहानाची इतकी मोठी कधी झाली कळालेचं नाही. ती नोकरीला देखील लागली.

तन्वी : हो ना. खरतरं कोणी बोललं तरचं मनात मधूच्या लग्नाचा विषय येतो. तशी ती अजून लहानचं आहे असचं वाटतं राहते.

अमेय : बरोबर आहे तुझे.छोटीशी बाहुली , भातुकलीचे खेळ खेळतं इतकी मोठी कधी झाली समजलेचं नाही.

महिना असाच निघून जातो. तुषारचे पेपर देखील संपतात. एकदा मित्रांसोबत सुट्यांमध्ये तो फ्रेश होण्याकरता सहलीला जातो. तिथे त्याला हि सुंदर परी पुन्हा दिसते. हा दैवी चमत्कारचं आहे असे तुषारला वाटू लागले. तो तिच्या मागे माग जात असताना तुषारचे मित्र त्याला फोटो काढण्यासाठी आवाज देतात. हिच्या मागे जावू की मित्रांनी बोलवले तिकडे जावू. या द्विधा मन:स्थितीत तुषार आता अडकला होता. मित्रांना थोड्यावेळाने येतो हे सांगायला मागे तुषार वळला. त्याचक्षणात ती सुंदर परी दिसेनाशी होते.

तुषारचा हिरमोड होता. दुस-यांदा संधी मिळून देखील तिचे साधे नाव पण विचारता आले नाही याची खंत तुषारला भासत होती.

सहलीवरुन तुषार आला की तो फ्रेश होईल असे तन्वीला वाटतं होते पण तो तितका नेहमीप्रमाणे आनंदी दिसत नव्हता. शेवटी आपल्याच मनाचा खेळ आहे असे समजून तन्वीने तुषारच्या या वागण्याकडे दुर्लक्ष करायचे ठरवले.

ती सुंदर परी तुषारला भेटेलं का पुन्हा. तन्वीने तुषारच्या वागण्याकडे दुर्लक्ष करुन चूक तर केली नाही ना? या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी वळूया पुढच्या भागाकडे.

क्रमशः

🎭 Series Post

View all