Mar 03, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

जगण्याला पंख फुटले भाग १५

Read Later
जगण्याला पंख फुटले भाग १५

©®प्रज्ञा बो-हाडे

जगण्याला पंख फुटले भाग १५

तन्वी : आपणं विचार करत राहून काही होणारं नाही. तू नको मनाला लावून घेवू सिंधू. एवढं काही नाही.


सिंधू : विचारं येतो मनात सारखा. कुठे कमी पडतोयं आपण.

तन्वी : जाऊ दे गं. ऐक तिकडे मस्त साडीवर घालण्यासाठी कानातले झुमके दिसतातं, आपणं घेवूया. दोघींना मॅचिंग.

मधू : आई मला पण हवे झुमके.

तन्वी : तुला तरं पहिले घेणारं मग आम्हांला.

सिंधू : मी जरा आलेचं जावून तुम्ही थांबा या दुकानात.

तन्वी : अग आम्ही पणं येतो. कुठे चालली तू. आधी हे कानातले घेवू नंतर जावूया म्हणशील तिथे.

सिंधू : इथे घे तू. घरी जायला उशीर होईल आपल्याला. परत नैवद्याची तयारी करायची घरी गेल्यावर.

तन्वी : ये लवकर.

सिंधू : हो आलेचं.

तन्वी : हे काय गं. 


सिंधू : चैतन्य आणि तुषारला सेम टि-शर्ट घेतले. छान दिसत होते त्या दुकानात लावलेले.

तन्वी : आम्ही पण आलो असतो ना.

सिंधू : इथले पण झाले ना आवरुन. चला आता पळूया.

घरी जाण्याआधीचं अमेय आणि तुषार घरी आलेले असतात. 


अमेय : उशीर झाला का तुम्हांला. एवढी काय खरेदी केली पाहू तरी?

तन्वी : कानातलेचं घेतलं दुसरं काही बघत नाही बसलो, नाहीतर अजून उशीर झाला असता.

अमेय : बरं झालं लवकर आलात. आई कधी पासून वाटं पाहत होती. तिला सोडून मध्येचं तुम्ही गायब झाल्या.

सिंधू : अवो आईंना वाटेत आपल्या शेजारच्या काकू भेटल्या. त्या ब-याच वेळं गप्पा मारतं बसल्या होत्या. आईचं आम्हांला बोलल्या तुम्ही पुढे जा.

अमेय : तेच तरी आई बोलत होती. माझ्या आधी घरी यायला निघाल्या पण अजून कश्या आल्या नाहीतं.

सासूबाई : काय आरडाओरडं चालली एवढी. सिंधू मी एकदाच बोलले. अजून का नाही आल्या. हा तुम्हांला उगाच चिडवतो आहे.

मला माहितं आहे. पोरींकरता यात्रेत फिरणं, चार-पाच दुकानं पाहतं थोडा वेळ होणारचं.

तन्वी : तू आम्हांला चिडवण्याची एक सुद्धा संधी सोडू नकोस.

अमेय : तू नसतेसं ना सारखी खोड्या काढायला. मग काय संधी मी शोधतचं असतो.


खळखळणारं तुषारचं हसू पाहून सर्वजणं अचंबित होतात. एरव्ही कोणाच्या बरोबर मिक्स न होणारा. मनमुराद हसत होता.

आज तुषारचं वागणं तन्वी बरोबरचं घरातल्या प्रत्येक व्यक्तीला वेगळचं भासतं होते.

नैवद्याची सगळी तयारी करुन झाल्यावर दिवे आणि नैवद्य दाखवायला अमेय निघाला. तेवढ्यात., आवाज ऐकू येतो.

" मामा, मी पणं येवू का सोबत", तुषार.

" हो, चलं ये बरोबर", अमेय.

तन्वी : आज खरचं देवाच्या कृपेने जादू झाली वाटते. तुषारचा एका दिवसात झालेला बदल डोळ्यांना सुखावणारा आहे. अमेयने काहीतरी जादूची छडी फिरवली वाटते.


सिंधू : मला देखील तसचं वाटतं.

खरतरं तुषारलं हवं होतं असं कोणीतरी की जो त्याच्या आवडीनिवडी जाणून घेवून, त्याच्या कलेने त्याला समजून घेणारा. अमेयने आज वेगळं असं काहीचं केलं नव्हतं. तुषार बद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न सुरु होता. त्यातील उत्तरांच्या निकषावरुन अमेय आज तुषार बरोबर तसे वागण्याचा प्रयत्न करत होता.

खरतरं हा प्रयत्न सुरवातीपासून करायलां हवा होता. पण तेव्हा तुषार बद्दल असं कारण घरी न येण्याचं असू शकेल असे वाटतचं नव्हते. तुषारने खरचचं त्याच्या गायनाच्या किंवा चित्रकलेत स्वत:ला झोकून दिल्याने घरी येण्याचं टाळतं असावं. असे वाटतं होतं.


शेवटी उशीरा का होईना तुषारचं मनं वळवण्यात अमेय यशस्वी झाला होता.

तुषारची आवड जपत अमेय आता महिन्यातून एकदा तन्वीच्या घरी जायला लागला. त्याला आवडणारा खाऊ घेवून अमेय तुषारला घेवून बाहेर फिरायला घेवून जायला लागला. आता तुषार आणि मामाची गट्टी वाढू लागली.
न विचारताचं तुषार आता मामाच्या घरी कधी जायचे म्हणून हट्ट करायला लागला. तुषारचे हे बदलेलं रुपा पाहून तन्वी चकितं झाली.

अमेय तुषारने काढलेल्या चित्रातले गुण-दोष सांगू लागला. तर कधी तुषारने सांगितल्याप्रमाणे एक निसर्ग रम्य ठिकाणी सहल नेवून तुषारला गाणं म्हणायची संधी देवू लागला. आपल्याला आत्ता पर्यंत कोणीचं समजून घेवू शकत नाही हि बाब अमेयनं तुषारच्या बाबत खोटी सिद्ध करुन दाखवली. मित्र नसल्याची उणीवं अमेयने भरुन काढली होती.

मधूचं काॅलेजचे शिक्षण पूर्ण करुन मधू नोकरीला लागली होती. चैतन्य काॅलेजच्या दुस-या तर तुषार काॅलेजच्या पहिल्या वर्षाला गेला होता. आधीची भांडणे विसरुन तिघांची घट्ट आता मैत्री झाली होती. सिंधू केवळ मधूचेचं नाहीतर आपलं देखील लाडं करते हे अमेयने समजून सांगितल्याने तुषारला पटले.

काॅलेजमध्ये गेल्यावर तुषारच्या आयुष्यात कोणता बदलं घडणार आहे. ते आपण पाहूया पुढच्या भागात.

क्रमशः

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Pradnya Pavan Borhade

Home Maker

मनातल्या भावना कल्पकतेने गुंफूण कथांच्या माध्यमात मांडायला आवडते.

//