जगण्याला पंख फुटले भाग १४

लहानपणी मनात घट्ट रुतून बसणारी गोष्ट सहजासहजी नाही विचरता येतं.

©®प्रज्ञा बो-हाडे

जगण्याला पंख फुटले भाग १४

लहानपणी एखादी गोष्ट मनातं घर करुन बसली आणि त्याचं वेळी समजूत न निघल्याने त्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोण निराळाचं होतो. कोणी कितीही समजूत काढू द्या. त्यांचे विचार न पटणारे असतात. 

अशीचं काहीशी स्थिती तुषारची झाली होती.

" आपणं तर कधीच असा दुजाभाव पोरांच्या बाबत केला नाही, उलटं तुषारचं कधी आपल्या घरी येत नव्हता", सिंधू.

" झालं तरी काय असं", अमेय.

" अहो, तुषार खूप चिडचिड करतोयं. लहानपणापासून कधी आपल्याघरी आलाचं नाही. आज इतक्या दिवसांनी यात्रेला आला आहे तर.", सिंधू.

" तर., काय ग", अमेय.

" त्याला वाटतं आपण त्याचे लाड करतं नाही. मधू आणि चैतन्यवर जास्त प्रेम आहे सगळ्यांच", सिंधू.


" मी बघतो कसे करायचे ते", अमेय.

" इतक्यात नका काही करु. यात्रा झाल्यावर काय बोलायचे ते बोला. तुषारला न रागवता जरा समजूतीनं सांगा", सिंधू.

" हो गं. तेवढं मला कळतं, तू नको करु काळजी", सिंधू.


यावेळी यात्रेला देवाच्या दर्शनानंतर मोठ्या पाळण्यात बसायला अमेयनं चैतन्य ऐवजी तुषारचा हात हातात घेवून पाळण्यात बसवले. आज तुषारवर विशेष लक्ष देण्याचं अमेयनं ठरवले. तुषारच्या मनात नक्की काय आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न अमेयचा सुरु होता.

अमेय : तुषार कसा चालला तुझां अभ्यास.

तुषार : मामा अभ्यास जेमतेम सुरू आहे. पण चित्रकला आणि गायनची विशेष आवडं. असं वाटतं एखाद्या निसर्ग रम्य ठिकाणी जावून मनसोक्त गाणं गावं. चित्रकलेचा बोर्ड घेवून चित्र काढत त्यात निरनिराळे रंग भरावे.

अमेय : छान की. तुझी आवडं, विचारं खूप सुंदर.

तुषार : तुला खरतरं मनापासून गोष्टी सांगाव्या वाटतातं.

अमेय : संकोच न करता बोल. त्याआधी आपण इथे चला वडापाव, मिसळ जे आवडते खाऊ.

चैतन्य : मधू ताई आणि मी वडापाव खातो.

अमेय : बरं चालेलं. तुषार तुला कायं आवडतं.

तुषार : मिसळ खायची.

अमेय : तन्वी तू सगळ्यांना घेवून पुढे जा. मी आणि तुषार येतो बरोबर घरी.


तन्वी : तुषार येशीलं ना मामा बरोबरं.

तुषार : हो, आई.

तन्वी : आज मामा - भाचे जोरातं आहेत. काही खास खिचडी बनवते का दोघांत.

अमेय : हो. आम्ही स्पेशल खाऊ खाणारं अजून जा तुम्ही.

मधू : मामा मला पण हवायं.

अमेय : अग खाणारं असतो तर., आत्ताचं सगळ्यांना नसतं का मागवलं.
आलोचं तुषारचं खावूनं झालं की. तुम्ही खरेदी करा पुढे जावून. मधू करता कानातले,गळ्यातले, बांगड्या घे गं सिंधू.

सिंधू : जातो आम्ही तुम्ही या तसेच. घरी. आम्हांला खरेदी करायची म्हणजे कदचित उशीर देखील होईल.

अमेय : चालेलं भेटूया घरी.


तन्वीला आजं निराळेचं वाटतं होते. एरव्ही मामाशी कधी न बोलणारा. आज मामासोबतं इतका लळा लागलेला पाहून आश्चर्यच वाटले. 

हाच प्रश्न सिंधू, मधू आणि चैतन्यला देखील पडला होता.

तन्वी : चला कोणासोबतं तरी मनं मोकळ्या पणाने आज वावरतो आहे. ते पाहून छान वाटते.

सिंधू : हो ना. छान वाटते.

तन्वी : एक विचारु का तुला? तू काही बोललीस का कालच्या तुषारच्या वागण्याबद्दल.

सिंधू : खरतरं काही सांगायचं नव्हतं. पण मनातली इतक्या वर्षापासूनं वाटणारी खंत बोलून दाखवावीशी वाटली. त्यामुळे नकळतं बोलून गेले, तुषारबद्दल. यात्रा संपल्यावर बोला असं म्हटले होते. आजचं कसं काय बोलले माहित नाही.

तन्वी : राहू दे. श्रीगणेशा केला म्हणायचा. मंदिरात त्याने तुषारशी बोलण्याचा.


सिंधू : तन्वी पण एक सांगू का. आम्ही कधीच त्याला फरक पडावा असं वागलो नाही. जसं चैतन्य तसाच तुषारही आम्हांला. आता एक गोष्ट खरी आहे, मुलींना आपण आवडीने वस्तू घेवू शकतो. त्यात प्रकार देखील असतात खूप सारे. चप्पल, पर्स, दागिने, कपडे. तसं मुलांना आवर्जून तेचं नाही घेता येतं.

तन्वी : राहू दे. श्रीगणेशा केला म्हणायचा. मंदिरात त्याने तुषारशी बोलण्याचा.


सिंधू : तन्वी पण एक सांगू का. आम्ही कधीच त्याला फरक पडावा असं वागलो नाही. जसं चैतन्य तसाच तुषारही आम्हांला. आता एक गोष्ट खरी आहे, मुलींना आपण आवडीने वस्तू घेवू शकतो. त्यात प्रकार देखील असतात खूप सारे. चप्पल, पर्स, दागिने, कपडे. तसं मुलांना आवर्जून तेचं सारखं नाही घेता येतं. त्यामुळे मधूकरता जे घ्यावं वाटलं ते मी घेतं गेले. पण याचा तुषारवरं असा परीणाम होईल वाटत नव्हते.

तुषारच्या मनातला गैरसमज दूर करु शकेल का? अमेय. तुषारचं मत परीवर्तन होवू शकते का? पाहूया पुढच्या भागात.

क्रमशः

🎭 Series Post

View all