©®प्रज्ञा बो-हाडे
जगण्याला पंख फुटले भाग १३
मधू सगळ्यात मोठी बहिणं असल्याने दोघा भावांनी तिचं ऐकावं अशी अपेक्षा करणे साहचिकचं होते. चैतन्य स्वभावाने शांत होता. तुषार मात्र हट्टी होता. स्वत:चचं मत कसं बरोबरं आहे हे पटवून देण्यात तुषार तरबेज होता.
"चैतन्यचं आपला भाऊ असता तर., चांगले झाले असते, शांतपणे समोरच्याचे बोलणे तरी ऐकून घेतो", मधू.
मधू करता कानातलं,गळ्यातलं, वेगवेगळ्या फॅशनची फॅन्सी कपडे, पर्स सिंधू आवडीने आणायची. आपल्याला वाटणारी मुलीची हौस मधूच्या रुपात सिंधू पूर्ण करुन घ्यायची. मधू सुट्टीच्या दिवशी कधी घरी आली की,सिंधू मधूच्या लांबसडक केसांवर वेगवेगळ्या हेअर स्टाईल करायची. मधूचा मेकअप सिंधू करुन द्यायची. मेकअपचे लागणारे सामान सिंधू मधूला आणून द्यायची.
मामी भाचीचं प्रेम पाहून तन्वीला भरुन यायचं. असचं नातं आयुष्यभर असं मागणं तन्वी देवाजवळ करत असायची.
तुषार स्वत:च्याच विश्वात रमायचा. सिंधूला तुषार ही मधू इतकाचं लाडाचा वाटायचा. चैतन्यला घेतल्या जाणा-या ड्रेसची सेम जोडी सिंधू, तुषार करता घेवून यायची. तुषारला हे मामीचं प्रेमं कधी कळलेचं नाही.
मधूच्या आवडीचं करतात फक्त. असा गैरसमज तुषारने करुन घेतला होता.
मामाकडे पोहचताचं. आजीने लवकर का नाही आलात म्हणून सूर लावला.
मधू : आजी या तुषार मुळे आईला लवकर येता आलं नाही.
मधू : जाऊ दे गं आज्जू्. तसाचं आहे तो. त्याचा हट्टीपणा कधी जाणारं काय माहितं.
तन्वी: आपणं यात्रा अनुभवायला आलो ना. छान हसून-खेळून रहा. तो चैतन्य बघा किती शांत पणे आपलं बोलणं ऐकून घेतो आहे पहा.
चैतन्य समजूत काढू शकेल का तुषारची. अमेयला तुषार लहानपणापासून घरी का येत नव्हता याचं कारणं समजल्यावर कोणतं पाऊल अमेय उचलेलं. पाहूया पुढच्या भागात.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा