Feb 22, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

जगण्याला पंख फुटले भाग १२

Read Later
जगण्याला पंख फुटले भाग १२

©® प्रज्ञा बो-हाडे

जगण्याला पंख फुटले भाग १२

सिंधू देवावर भरोसा ठेवतं, जे होईलं ते चांगलेच होणारं या आशेवर जीवनात हसत राहून येणाऱ्या परीस्थितीला तोंड देण्याचे ठरवते. अमेयच्या मामीकडून एका नावाजलेल्या डाॅक्टरबद्दल माहिती कळते. अमेय त्या डाॅक्टरकडे जाण्याचा निर्णय सिंधूच्या सल्याने घेतो.

पुन्हा एकदा नव्या उत्साहात सिंधू आणि अमेय डाॅक्टरकडे जातात. डाॅक्टर सुरु असताना, सिंधूच्या मावस सासूबाई एका मंदिरात जावून येवूचं. तसेच एक ब्राह्मण राहतो जवळ तेव्हा जो चेहरा पाहताच काही दोष असेल तर सांगतो. आपण जाऊन येवू.

अमेयची आई : अमेय एकदा मावशी सांगते तिकडे जाऊन यायला काय हरकतं आहे. आपलं काम झाल्याशी मतलबं.

अमेय : आता डाॅक्टर आहे ना चालू. या सर्व गोष्टींवर माझा विश्वास अजिबात बसत नाही.

सिंधू : खरं आहे सासूबाई यांच पण. एका मर्यादेपर्यंत आपण हि श्रद्धा बाळगणे ठिक आहे. पण आता मलाही यांच बोलणं पटतं आहे.

सासूबाई : तू त्याला समजवायचं सोडून त्याच्या होकारात हो मिळवतेसं का ग?

अमेय : दोघी भांडू नका आता.

सिंधू : आम्ही काय भांडण नाही करतं. काही गोष्टी पटायला लागल्या आहेत.

अमेय : आईच्या इच्छेकरता मावशी बोलते तिकडे पण जाऊ. 


सिंधू : मी नाही बोलतं. पण सगळेच जण आपल्या परीने पर्याय सुचवतात. आपण तेचं करत राहायचं का? इतके दुबळे झालो आहोत का आपण? खरतरं हल्ली कामात सुद्धा लक्ष लागतं नाही माझं.

अमेय : एवढी निराश नको होवूस. टेन्शन घेतले की शरीरावर आणखी वाईट परीणाम दिसून येतात. त्यापेक्षा आनंदी रहा.

या वेळी डाॅक्टरांनी बोलवल्या प्रमाणे सिंधू दवाखान्यात चेकअप करायला आली. ती घरी परतली ते आनंदाची बातमी घेवून. कधी एकदा अमेय आणि घरच्यांना हि बातमी सांगेल असे वाटतं होतं. खरतरं प्रत्येक वेळी प्रेगन्ससी टेस्ट चेक करायला जायचं आणि नेहमी पाॅझिटिव्ह रेष पाहण्यासाठी आतुर असताना नेहमी निराशाच पदरी यायची.

यावेळी सिंधूने चेक न करताच डाॅक्टरांशी फोनवर बोलणं झाल्याने दवाखान्यात चेकींग करता सिंधू गेली होती. तेव्हा ही आनंदाची बातमी यावेळी असणार असं मनात देखील नव्हतं. 

घरी आल्यावरं अमेयला छानस सरप्राइज देण्याचं सिंधूनं ठरवलं. एक छोटा बाॅक्स घेवून किट घेवून घरी गेल्यावर चेक केलं. ते किट बाॅक्समध्ये ठेवून अमेयच्या कपाटात ठेवले.

आॅफिस मधून घरी आल्यावर अमेय फ्रेश होवून कपडे बदलायला कपाटाचं दार उघडलं. तर त्यात एक आकर्षक बाॅक्स दिसलं. सिंधूला अपेक्षित होतचं ते. बाॅक्स पाहून अमेय आवाज देणारं ते. सिंधू आवाज देवूनही न आल्याने अमेय तो बाॅक्स उघडून पाहतो. 

आणि दोन मिनिटं त्याकडे पाहतचं बसतो. आनंदाने उड्या मारायला लागतो. सिंधू त्याचक्षणी रुममध्ये येते. अमेयच्या चेह-यावरचा आनंद पाहून ती सुखावते. अमेयला काय करु आणि काय नको असे होते.
आई-बाबा, आजी-आजोबा, नातेवाईक, मित्रांना कधी एकदा हि न्यूज देतो असे झाले होते. रुमच्या बाहेर आल्यावर आई - बाबांना न्यूज दिली. सर्वांनी दोघांच अभिनंदन केलं.
अमेय फोन करायला जाणारं इतक्यात अमेयच्या आईंने कोणाला याबद्दल लगेच सांगायचे नसते असे सांगितले.

निदान तीन महिने तरी काळजी घ्यायची असते. 


तन्वी : माझ्या गरोदरपणात तू माझ्या आवडी- निवडी जपल्या. आता माझी वेळ आहे. तुला काय हवं नको ते पाहण्याची.

सिंधू : हो पण अग तू माहेरी आलीस. आणि काम करते. मला कसतरीचं वाटतं आहे.


तन्वी : अग, तू आराम कर. मी बघते बरोबर.

नऊ महिन्याचा काळ कधी उलटून गेला कळालेचं नाही. अमेय आणि सिंधूच्या आयुष्यात जन्म झाला चैतन्य चा. चैतन्यच्या येण्यानं घर आनंदाने बहरले. कित्येक वर्षांची अमेय आणि सिंधूच्या प्रयत्नांना यश लाभले होते.

चैतन्य ला सांभाळण्यासाठी काही वर्ष नोकरी न करण्याचा निर्णय सिंधू घेते. चैतन्यच्या येण्यानं अमेय आॅफिस वरुन देखील लवकर घरी येवू लागला. 

तन्वी देखील आपल्या स्वराला घेवून चैतन्याच्या ओढिने खेळायला घेवून माहेरी येत असायची.


दोन- तीन वर्षांनंतर,

तन्वीला मुलगा हवा म्हणून सासर-माहेरचे बोलू लागतात. तन्वीला खरतरं एकच अपत्य बासं हव असतं. पण एकाला दोघं असले की बरे असते. या विधानाला दुजोरा देतं. तन्वी देखील दुस-यांदा आई होण्याचा निर्णय घेते.


दैवी संकेतचं म्हणावा लागेल. तन्वीला मुलगा देखील होतो. तुषार त्याचे नाव ठेवण्यात येते.

तन्वीची मुलगी मधू हिला चैतन्य आणि तुषारच्या रुपात दोन भावंडे मिळतात. खरतरं आता सगळ्यांनी सिंधूलाही एखादी मुलगी झाली पाहिजे म्हणून आग्रह करणार त्या आधीचं अमेयनं घरच्यांना डाॅक्टरांनी सांगितल्याप्रमाणे सिंधू ची तब्येत नाजूक आहे. दुसरा चान्स घेणं सिंधूच्या तब्येतीकरता धोक्याचं ठरु शकते.

मधू, चैतन्य आणि तुषार यांच्या जीवनात घडणा-या घडामोडी, बालपण या बद्दलची माहिती आपण पाहणार आहोत पुढच्या भागात.

क्रमशः

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Pradnya Pavan Borhade

Home Maker

मनातल्या भावना कल्पकतेने गुंफूण कथांच्या माध्यमात मांडायला आवडते.

//