Mar 02, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

जगण्याला पंख फुटले भाग ११

Read Later
जगण्याला पंख फुटले भाग ११

©®प्रज्ञा बो-हाडे

जगण्याला पंख फुटले भाग ११

सासूबाई : खूश दिसतायं दोघं. फ्रेश मूड आणि आनंदी चेहरे पाहून आम्हांलाही छान वाटतं आहे.


सिंधू : आई, खरचं खूप मस्त मजा केली आम्ही. पुढच्या वेळी तुम्हांलाही घेवून जाणार. फॅमिली ट्रिप काढूया.

सासूबाई : आमची कशाला सगळ्यांची उगाचं लुडबूड. तुम्ही दोघं राजा-राणीनं फिरायचं.

सिंधू : तस नाही ओ, आई. फॅमिली बरोबर पण ट्रिपला जाण्याची मजाच काही निराळी असते.

सासूबाई : चालेलं, जाऊया.

सिंधू : आम्ही तुमच्यासाठी हि जांभळ्या रंगाची सिल्क साडी घेतली. तन्वीला तिला आवडणारा लाईट पिंक गरारा ड्रेस घेतला. छानसं बाळाचं पोस्टरं देखील आहे. तन्वीला गिफ्ट द्यायला. बाबांना हा तुमच्या साडीला मॅच होणारा कुर्ता आणलायं.

सासूबाई : अग सर्वांसाठी आणलं तुम्ही दोघांनी काही खरेदी केली की नाही?

सिंधू : आई खूप सांगायचं तुम्हांला.

सासूबाई : अग हो. आत्ताच प्रवास करुन आलात. जरा विश्रांती घे.

सिंधू : हे एकदम वेगळे वागले ट्रिप मध्ये.

सासूबाई : काय ग. काय झालं?

सिंधू : घाबरु नका आई. ह्यांनी माझ्याकरता स्वत: खरेदी केलं. ड्रेस, कानातले. मला एकसे एक गिफ्ट सरप्राइज दिले.


सासूबाई :छान. असेच एकमेकांना आयुष्यभर समजून घ्या.

सिंधू : हो आई. चला आवरुन घेते आता. चार दिवस बाहेरचं खाऊन कंटाळा आला होता. आता पटकन जेवण बनवते.


सासूबाई : जेवण बनवले मी. तू तुझं आवरुन घे. आणि ताटं वाढायला घे. आपण सगळे बरोबरचं जेवण करु.

सिंधू : हि बाकरवडी छान आहे. हा चिवडा तुम्ही घरी बनवलाय का आई. एकदम टेस्टी झालायं.

सासूबाई : तन्वीच्या सासूबाईंनी तन्वीला आवडतो म्हणून चिवडा करुन ठेवलायं भरपूर. ती आपल्या घरी आली तेव्हा चिवडा आणि बाकरवडी घेवून आली होती.

सिंधू : या रविवारी आपण तन्वीला भेटायला आणि तिला आणलेला ड्रेस द्यायला जावूया.

सासूबाई : चालेल ना.

सिंधू नेटवरुन डाॅक्टरांची लिस्ट चेक करते. बेस्ट स्टार वाल्या डाॅक्टरांची चार-पाच नावं आणि पत्ता लिहून घेते. अमेयला ती नावे दाखवून. दोघांच्या मताने एक डाॅक्टराची निवड करण्यात येते. डाॅक्टरची अपाॅईंटमेंट घेवून ट्रिटमेंटला सुरवात होते.


ब्लड टेस्ट, युरीन या प्राथमिक टेस्ट झाल्यानंतर महिन्याची औषधे सुरु केली जातात. दोघांचे रिपोर्ट नाॅरमल असतात. असेच महिन्या मागून महिने उलटत जातात.

वर्षभराचा काळ नजरेसमोरुन कधी उलटला जातो. कळतचं नाही.


सासूबाई : तन्वीचा घरात गोडूलीचं आगमनं झालं. तिच्या येण्यानं पूर्ण दिवस आनंदात जातो. आपल्या घरी चिमुकल्याचं आगमन कधी होणारं ग?

सिंधू : प्रयत्न चालू आहेत आई. जरा गॅप घेवून बघतो थोडे दिवस. पुन्हा दुसरा डाॅक्टर बघतो.

सासूबाई : त्याआधी मला तुमच्या दोघांची पत्रिका आणून दे. एका ब्राम्हणाला दाखवते.

सिंधू : या गोष्टींवर तुमचा विश्वास आहे सासूबाई.

सासूबाई : तसं नाही ग. पण एक अंदाज आपण लावू शकतो. सगळ्या बाजूने प्रयत्न करुन बघूयात.


सिंधू : हो आई. देते आणून मी दोघांच्या पत्रिका.

सासूबाई : दोघांच्या पत्रिका पाहिल्या. ब्राम्हणाने नारायण नागबली करायला सांगितला. पितृदोष दाखवला आहे पत्रिकेत. आपण पुढच्या महिन्यतचं त्र्यंबकेश्वरला जावून ती पूजा करूया.

सिंधू : अमेयला सांगून सुट्टीचे मॅनेज करतो.


सासूबाई : तीन दिवस लागतील. शनिवार, रविवार बघा म्हणजे एकचं दिवस सुट्टी घ्यावी लागेल.

सिंधू : हो. या पूजेविषयी थोडं माहितं होतं. तीन दिवस लागतात ते.


पूजा झाल्यावर फरक पडेल असे सिंधूला वाटले. पण वर्षभरात अशी कुठलीचं बातमी येण्याची चिन्ह दिसत नव्हती. अखेरीस दुसरा डाॅक्टर पाहण्याचा निर्णय घेण्यात आला. अमेयची चिडचिड वाढू लागली.

अमेय :अजून कितीवेळा हे डाॅक्टरचं बघायचं ग. वैताग आला. कधी होणारं आपल्याला बाळं.

सिंधू : काळजी नका करु. देव योग्य वेळ आली कि आपल्या पदरात नक्की बाळ येईल.

अमेय : थकायला झालयं, मलाचं. माझे मित्र पणं हाच विषय काढत असतातं. कधी देतो गुड न्यूजं.

सिंधू : आपल्या गावी एक मंदिर आहे. तिथल्या देवाला नवस बोलला की तो नवस पूर्ण होतोचं. आई सांगत होत्या. आपण गावी जावूया का.

अमेय : चला हे देखील करुया.

सिंधू : श्रद्धा आणि संयम ठेवणं हेचं आपल्या हातात आहे.

अमेय : बरोबर बोललीस.


सासूबाई : आता लवकरचं आपल्या गावच्या जागृत देवस्थानाला जावून आल्याने आनंदाची बातमी कानावर येणार आहे.

सिंधू : हो आई.

अमेय : एका मित्राने आपल्या दोघांना त्याच्या घरी बोलावले आहे. का माहित नाही. पण वहिनींना घेवून ये असे बोलला.

सिंधू : जावूया परवा. रविवार आहे ना.

अमेय : अगं मला खरचं माहित नव्हतं तो असं काही आपल्याला कुठं घेवून जाईल.

सिंधू : हे तरं माझ्या आत्यानं सांगतिलं होत तसचं देवीच्या मंदिरात फुल लावून काही गोष्टींच पथ्य धरायला सांगितल होतं. बाहेरचं जास्त खायचं नाही. घरात शिजलेलं अन्न खायचं. तुम्हांला हेचं सांगायचा त्यावेळी प्रयत्न करत होते मी.

अमेय : हो ना. मला खरचं कल्पना नव्हती. त्याच्या घराजवळचं अस मंदिर असेल याची. 


अमेयचा मित्र : पाच रविवार येथे दर्शनाला या. खरचं गुण आहे ह्या देवीचा. येतो म्हणजे येतोचं. पाच रविवारच्या आतचं तुमची इच्छा पूर्ण होईल.

सिंधू आणि अमेय मोठ्या विश्वासाने घरी आले. आपल्या कामात व्यस्त होवून न चुकता पाच ही रविवार देवीचे दर्शन घेतले. सिंधूने सांगितल्याप्रमाणे पथ्य देखील धरले. तिला आवडणारे केळी आणि पेरुचं खाणं थांबवलं.

येईल का सिंधू आणि अमेयच्या प्रयत्नांना यश? की डाॅक्टर अजून एकदा बदलून पाहतीलं. शेवटी काय निर्णय घेतील? पाहूया पुढच्या भागात.

क्रमशः


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Pradnya Pavan Borhade

Home Maker

मनातल्या भावना कल्पकतेने गुंफूण कथांच्या माध्यमात मांडायला आवडते.

//