जगण्याला पंख फुटले भाग १०

मनी वसेलेलं प्रत्यक्षात कधी साकार झालं याचा प्रत्यय सिंधूला आला.

©®प्रज्ञा बो-हाडे

जगण्याला पंख फुटले भाग १०

दोघांच्या प्रवासाला सुरवात झाली. सिंधूचा हात हातात घेवून अमेय सिंधू कडे पाहत होता. मनसोक्त गप्पा आणि गाण्यांच्या भेंड्या दोघांमध्येच खेळता-खेळता कधी उतरण्याचे ठिकाण आले. समजलेच नाही. हाॅटेलच्या रुममध्ये जावून फ्रेश झाल्यावर दोघेजण आजूबाजूचा परीसर पाहण्यासाठी निघाले. तिथे एक प्राचीन मंदिर होते. तिथे जावून दोघांनी दर्शन घेतले.

पुन्हा हाॅटेलवर जावून जेवण केले. प्रवासाचा फारसा थकवा जाणवला नाही. कामाचं तणावं नसल्यानं गप्पा मारता - मारता झोप कधी लागली,समजलेच नाही.
दुस-या दिवशी ओला कॅब ने प्रेक्षणीय स्थळे, म्यूजियम, रोझ गार्डन पाहिली. गार्डन मध्ये असणा-या फोटोग्राफरने कपल फोटो काढा छान. गुलाबी फुलांमध्ये. सुंदर दिसेल. कायमस्वरुपी आठवण राहिलं. तुमच्याकडे. खरतर या गोष्टी अमेयला कधी आवडणा-या नव्हत्या. सिंधूचा फोटो काढणे म्हणजे विकपाॅईंट असायचा. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अमेयने पुढे निघून गेलेल्या फोटोग्राफर ला हाक मारुन मागे बोलवले.

"काढ आमचे फोटो", अमेय.

" आश्चर्यचं वाटतं जरा मला", सिंधू.

" अग, त्यात काय, मजा करायला आलो, कधीतरी करायची हौस", अमेय.

" बघातरं कोणं बोलतयं",सिंधू.

"कधी कधी वाटतं थोडं रोमॅंटिक व्हायला", अमेय.

" चांगली बाजू आहे", सिंधू.


गार्डन पाहून झाल्यावर जवळचं असणा-या खरेदीच्या ठिकाणी गाडीवाल्याने गाडी थांबवली. इथे खरेदी ची दुकाने आहेत चार-पाच गल्ली. फिरुन घ्या.

सिंधूला वाटले, आता काही अमेय गाडीतून खाली उतरणार नाही. खरेदी म्हटले, की तू तुझं करुन ये. अस म्हणणारा. आज चक्क सिंधूला खाली उतर म्हणाला.

दोन मिनिटं सिंधू एकटक पाहतचं बसली.

"मॅडमं ,उतरा की खाली, साहेब आवाज देतात", गाडीवाला.

" हो, थोडीशी भांबवलेल्या नजरेने सिंधू गाडीतून खाली उतरली".


सिंधूच्या खांद्यावर हात ठेवतं अमेयने सिंधूकरता, कानातले, ड्रेस, जॅकेट स्वत:हून खरेदी केलं. सिंधू आज खुश झाली होती. अमेयनं आज स्वत: ध्यानी मनी नसताना सिंधूसाठी खरेदी केली होती.

" आजचा दिवसचं काही खास आहे". अमेय नेहमीपेक्षा फिरायला आल्यापासून बदलेला वाटतं आहे",एवढं खूश या आधी कधीचं पाहिलं नव्हतं. नेमकं झालयं तरी कायं"? सिंधू.

अमेय : तू पुढे जा, रुममध्ये. मी आलोच दहा मिनिटांत.


सिंधू : लवकर या.

अमेय : हो ग.

सिंधू चावीने रुमचे दार उघडते. क्षणभरासाठी आपण चुकून दुस-या रुममध्ये नाही ना आलो असे सिंधूला जाणवले. कारण, रुम फुलांनी सजवलेली असते. फुगे आणि टेबलावर केक आणि गुलाबाच्या फुलांचा बुके ठेवलेला असतो. सिंधूच्या मनात विचार चक्र सुरु होते. आज तर ना वाढदिवस ना लग्नाचा वाढदिवस? एवढी सजावट कोणी आणि का? केली असणारं.

हा विचार करत सिंधू जवळचं असणा-या खूर्चीत बसते. इतक्यात दारावरची बेल वाजते. नक्कीच अमेय आला असणारं. त्याला विचारायला हवं काय आहे आज? 


दार उघडताच रुम सर्विस वाला एक मुलगा हातात गिफ्ट घेवून उभा होता. सरांनी द्यायला सांगितले असे तो म्हणाला.

सिंधूला खरतरं काय करावे समजतचं नव्हते. एकावर एक सरप्राइज मिळत होते.

गिफ्ट घेवून सिंधू ते उघडण्याच्या तयारीत होती तेच पुन्हा दारावरची बेल वाजली. सिंधूने दार उघडताना जरा अंदाज घेवूनचं हळूवार दार उघडले.


अमेय : काय ग, एवढ्या हळू का दार उघडतेस.

सिंधू : आपली रुम तर हिच आहे ना, नक्की?

अमेय : हो. काय झालं.

सिंधू : रुम किती सजवली आहे बघा. आणि हे गिफ्टं पण समजतचं नाही मला.

अमेय : वेडाबाई तुझ्याकरता आहे सारं. आपलं लग्न घाईगडबडीत झालं. बाहेर अस कुठं जाताचं आलं नाही. लगेच वर्षभरात तन्वीचं लग्न. त्याची तयारी. कामाच्या व्यापामध्ये मी तुला वेळचं देवू शकलो नाही. फुल न फुलाची पाकळी म्हणून हे माझ्याकडून गिफ्ट समजं.

सिंधू : याबद्दल मी कधी काही बोलली का तुम्हांला. 


अमेय : हेच तर ना. माझे मित्र बोलतात. नशिबवान आहेस. बायको हट्ट करत नाही. कोणत्याचं गोष्टीचा.

सिंधू : हो का. खूप झालं कौतुक. पुरे आता. एवढं छान ऐकण्याची सवय नाही मला.

अमेय : हो का. थांब आता कशी सवय नाही म्हणत सिंधूला गुदगुल्या करायला लागतो.

सिंधू : हे काय नविन. लहान आहोत का आपण. गुदगुल्या करत हसत बसायला.


अमेय : हो ना.

सिंधू : आज अमेय खूप खूश दिसतो. बाळा बद्दल विचारुया का?

अमेय : अग तनुची गुड न्यूज आहे. छान वाटलं ऐकून.

सिंधू : हो ना. आपण मामा- मामी होणारं.

अमेय : त्या आधी आई-बाबा झालो असतो तर.,

सिंधू : अगदी माझ्या मनातलं बोललात.

अमेय : आपले प्रयत्न चालूचं आहेत की, शिवाय न चुकता कुलदेवी आणि कुलदेवतेला जातो.


सिंधू : बरोबर आहे तुमचे. शेवटी डाॅक्टरांकडे देखील जावून यायला हवं. एकदा.

अमेय : आपण पुढच्या महिन्यात पाहुयात चांगला डाॅक्टर. तू कोणाच्या ओळखीचा डाॅक्टर असेल तर सांग किंवा नेटवरुन सर्च करुया आपण दोघे.

सिंधू : आजचा दिवस माझं भाग्य उजळवायला झालेला आहे.मनासारख्या एक से बढकर एक घटना घडत आहे. ही ट्रिप आयुष्यात सुवर्ण क्षण कोरण्यासाठीच झाली यावर सिंधूचा विश्वास बसतो.

ट्रिपच्या शेवटच्या दिवशी घरातल्यांसाठी उपयोगी वस्तू खरेदी करायला नेमला. 


"हि अनोखी ट्रिप नेहमीच आठवणीत राहणार ", सिंधू.

" आता आपण वरचेवर अशी ट्रिप नेहमीच आखूया, खूप आनंदी आणि तनावमुक्त वाटतयं"अमेय.

डाॅक्टरकडे गेल्यावर डाॅक्टर कोणती ट्रिटमेंट चालू करतील? डाॅक्टरच्या प्रयत्नांना यश येईल का? अमेय आणि सिंधू आई-बाबा होतील का? ही गोड बातमी सिंधू घरच्यांना कधी देणार आहे? डाॅक्टर चालू असतील इतर कोणकोणते प्रयत्न सिंधू आणि अमेयला करावे लागणार आहेत? पाहुया पुढच्या भागात.

क्रमशः

🎭 Series Post

View all