एका आईच काळीज .... काय असतं हे कोणालाच सांगायची गरज नाही . आईची कुस, आईची माया , तिचे आलिंगन हा सर्व एक आनंददायी प्रकार आहे . फक्त माणूस आपल्या भावना व्यक्त करू शकतो . आनंद , दुःख , राग , प्रेम , एकमेकांच्या प्रती वाटणारी आपुलकी हे सर्व तो बोलून तो व्यक्त होऊ शकते .
जगात सुंदर काय असेल तर एक आईचे प्रेम . सगळी दुनिया एकीकडे आणि आई एकीकडे . आईचे प्रेम मिळवण्यासाठी काहीही वेगळे करण्याची गरज राहत नाही .
या चराचरातील प्रत्येक सजीवांच्या मनात ममतेचा एक कोपरा असतोच . आपल्या पिल्लांप्रती असलेलं प्रेम व्यक्त करण्याची पध्दत वेगळीच असते . घार जरी उंच आकाशात फिरत असली तरी तिचे लक्ष स्वत : च्या पिल्लांभोवतीच असते . आपल्या चोचीने दाणा पिल्लांना दाणा भरवणारी चिऊताई असो , गायीचे आपल्या वासराला चाटणे असो .
म्हणतात ना , एका आईचे महत्त्व एक आई झाल्याशिवाय कळत नाही. आज विज्ञान कितीही पुढे गेलं असलं तरी माणुस आज न समजण्याच्या पलीकडे गेलेला आहे . त्याच्यात असलेल्या प्रेमाची जागा क्रुरतेनी घेतली .
फक्त अमानवी अशा कृत्यांना आपण आळा घालू शकत नाही .
अगदी ताजी घटना , हा हत्तीणीला आपलं बाळ गमवावे लागले . स्वत : चा जीव धोक्यात असतांनाही खूप शांत आणि संयम ठेवून स्वत :चे प्राण सोडले . कुठेही आक्रमक न होता ति निश्चल आणि स्तब्ध पणे नदीमध्ये उभी होती . तिची माया , ममता या भावना तिला व्यक्त करता आल्या नाहीत .
एक पिल्लू जे या जगात येण्या आधीच या क्रूर जगाचा निरोप घेत . कदाचित तिच्या एका डोळ्यांत आनंदाश्रु असेल कि या मानवी जगात एकट्याचा निभाव लागला नसता . एका डोळ्यांत दुःखाचे अश्रू असतील कि आपण किती हतबल झाले होतो . आपण आपल्या बाळाला वाचवू शकत नाही .....
एका आई आपल्या पिल्लाला वाचवू शकली नाही . याच दुःख ती सहजतेने पचवू शकली नसेलही .
एका व्यक्तीने फळांच्या रुपात फटाके त्या अबोल , मुक हत्तीणीला खाऊ घातले आणि होत्याचं नव्हतं झालं ....
काय आनंद मिळाला असेल देव जाणो . क्रुर आनंदाला त्याने किती सहजपणे आनंद मिळवला .
अगदी अमानुषपणे हत्या केली गेली . तिला आणि तिच्या होणाऱ्या बाळाला जगण्याचा अधिकार नव्हता का ?
लेख आवडल्यास एक लाइक नक्की करा.आणि नावासकट शेअर करा .
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा