भाग -5
डॉक्टरांनी सांगितल्या प्रमाणे अमेय व सान्वी दोघेही चित्रा ची व्यवस्थित काळजी घेत होते, महागडी ट्रीटमेंट होती, चित्रा न जमवलेलं गोतावळ इतकं होतं कि त्याला काही सीमा नव्हती रक्ताची नसली तरी भावणांनी विनलेली नाती तिनं अगणित जमवली होती, मैत्रीण सान्वीची पण तिच्या आईशी घट्ट मैत्रीच नातं चित्रा च होतं अगदी एक दिवस आड भेटणं, व्यक्त होणं, अगदी चटईवर ही झोपणं सगळं त्या मैत्री मध्ये नॉर्मल होतं. दोघी कुठेही सोबतच जायच्या म्हणजे नेमकं यांच्या लेकी मैत्रिणी आधी झाल्या का यांचंच नातं आधी घट्ट झालं ही शंका यायची, अशी अनेक नाती तिनं जमवली होती,त्यातल्या जमेल तशी मदत जवळच्या एक दोघांनी केली पण ती मदत फार काळ पुरणारी नव्हती, सान्वीच्या लग्नासाठी करून ठेवलेले दागिणे तिनं विकले, अमेयणे जमेल तसा पैसा उभा केला, गाडी विकली, हे सगळं चित्राच्या मागे सुरु होतं कारण तिनं यातलं काहीही करू दिलं नसतं आणि आपल्या मनगटात आहे ती पूर्ण ताकद चित्रा ला वाचवायला लावायची इतकंच अमेय व सान्वीला ठाऊक होतं, काही जणांनी मदत तर केली नाहीच वर 3rd स्टेज चा कॅन्सर वर कशाला ऋण काढून खर्च करता असेही सल्ले दिले,हे ऐकून सान्वीवर काय परिणाम होतील याचा कणभर ही विचार बोलणाऱ्यांनी केला नाही,परिस्थिती वाईट असली कि सगळेच परीक्षा बघतात तेव्हा फक्त आपली हिम्मत तुटू द्यायची नसते हे मात्र तितक्या कठीण काळातही चित्रा सान्वीला समजावत होती,
बऱ्यापैकी ट्रीटमेंट ला तिचं शरीर रिस्पॉन्ड करत होतं. चित्रा ची एक इच्छा होती कि आपल्या एकुलत्या एका लेकीचं लग्न बघायचं, सान्वीला आधी आई ठणठणीत बरी व्हायला हवी होती पण आईची सोबत आपल्याला आता किती लाभणार आहे याची कल्पना तिला होती, चित्राच्या आजारपणात सान्वी च्या एका मित्रानं तिची खूप मदत केली होती तो क्षणोक्षणी तिच्या पाठीशी उभा होता अगदी रात्रीचे कितीही वाजले असतील तो मदतीसाठी कायम उभा असायचा आणि हे सगळं चित्रा च्या नजरेनं हेरलं होतं, किमो आटोपून घरी आल्यावर चित्रा नं अद्वैत ला घरी बोलावलं, सान्वी आणि त्याच्याशी ती बोलली आणि तिच्यासमोर त्यांच लग्न बघण्याची तिची इच्छा बोलून दाखवली, त्या दोघांचा होकार होताच पण अद्वैत च्या घरच्यासोबत ही रीतसर बोलणं गरजेचं होतं आणि त्यांनाही सान्वी आवडते असं कळल्यावर चित्रासमोर लग्न आटोपण्याचा विचारांच त्यांनी स्वागतच केलं, किमो सध्या बंद केले असले तरी महागडी इंजेक्शन आणि औषधं सुरूच होती, चित्रा कधी खूप प्रसन्न दिसायची तर कधी खूप थकलेली, आणि त्यात तिचा एकच हट्ट सान्वी ला नववधुच्या रूपात नटलेलं बघणं, शेवटी तिच्या हट्टाखातर छोटेखानी लग्न आटोपायचं ठरलं, आठवडा भरात लग्न आटोपायचं ठरलं कारण परत चित्रा च्या किमो सुरु कराव्या लागणार होत्या, छोटेखानी म्हंटल तरी धावपळ होणारच होती पण सान्वीच्या मैत्रिणी आणि अद्वैतच्या घरच्यांनी सगळं सांभाळून घेतलं, मोजक्या लोकात समारंभ पार पडला, चित्रा अमेयच्या पायाला हळद लागली, चित्रानं एकुलत्या एका लेकीला नवरीच्या वेशात बघितलं आणि काय तो तिचा आनंद, समाधानी दिसत होती ती त्या क्षणी, आता मरण आलं तरी आनंद इतकी शांतता, समाधान, आनंदाची छटा तिच्या चेहऱ्यावर झळकत होती. अद्वैत गावातलाच असल्यामुळे गृहप्रवेश आटोपून सान्वी नं काही दिवस इकडेच राहावं असं सासरच्यांनी तिला सुचवलं.
काही दिवसांनी परत चित्रा च्या किमो सुरु झाल्या, 2किमो व्यवस्थित पार पडल्यावर 3ऱ्या किमो ला मात्र अचानक चित्रा अस्वस्थ जाणवू लागली, तिला दरदरून घाम फुटला होता.तोंडातून शब्द बाहेर पडत नव्हते, ऑक्सिजन पातळी एकदम कमी झाली होती, कृतिम ऑक्सिजन लावण्यात आला, औषधं आणायला बाहेर गेलेली सान्वी रूम च्या दारात दिसल्याबरोबर चित्रा च्या डोळ्यातून पाणी निघू लागलं आणि तिची नजर सान्वी वरचं शांत झाली, श्वास थांबले, शरीर शांत झालं... सान्वी धावत तिच्यापरेंत पोहचली पण तोवर आई दूर निघून जाण्याच्या मार्गाला लागली होती.. तिनं फोडलेला हंबरडा ही आईपरेंत पोहचणार नव्हता, चित्राचं पार्थिव घरी नेण्यात आलं पूर्ण वेळ शांत पणे सान्वी चित्राजवळ बसून राहिली गार पडलेल्या तिच्या कपाळावरून हात फिरवत राहिली आणि शेवटी ती वेळ आली चित्राला नेण्यासाठी सगळे आत आले तोच इतकावेळ शांत बसलेल्या सान्वी नं मोठ्याने हंबरडा फोडला... आईईईईईई.......तिच्या वेदनेणं तिथे असलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आलं.. सान्वी ला सांभाळणं आता कठीण होतं.. चित्रा ला नेण्यात आलं पण इकडे सान्वी मात्र शून्यात हरवली होती शक्य ते प्रयत्न करून मारून रागवून तिच्या मैत्रिणींनी, अद्वैत नं तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. सान्वी ला नॉर्मल होण्यासाठी महिना निघून गेला पण आता ती भरपूर सावरली होती, अमेयची व्यवस्थित सोय करून देऊन ती सासरी राहायला गेली, अधनं मधनं तिची चक्कर राहायचीच, तिच्या ट्युशन्स ही परत सुरु झाल्या...
आईची आठवण साहजिकच यायचीच पण आता जिथे असशील तिथे सुखात राहा असं म्हणून ती त्या आठवनींना तितक्यापुरता विराम द्यायची, अश्यातच एक दिवस तिला अस्वस्थ वाटू लागलं, सारखं गरगरल्यासारखं होत होतं, अन्न ही पचत नव्हतं, खाईल ते पडायचं... अद्वैत तिला डॉक्टरांकडे घेऊन गेला आणि दोघेही घरी आले ते आनंदाच्या लहरीनी उड्या मारतच आले. सान्वी आणि अद्वैत आई बाबा होणार होते... घरात आनंदाची लाट पसरली पण सान्वीच्या डोळ्यात पाणी आलं सासूबाईंजवळ जाऊन आज आई हवी होती असं ती म्हणताच सासूबाई म्हणाल्या अगं आईच येतेय तुझ्या पोटी, होती तोवर तिनं तुला जपलं आता तू तिला जपायचं, आजवर तू जिची लेक होतीस आता ती तुझी लेक असेन, रडू नकोस तिचं परतून येणं आनंदान साजरं कर आणि खरंच त्या क्षणापासून सान्वी तिच्या आयुष्यातलं हे नविन वळण आनंदाने जगू लागली.