जगावेगळ्या मायलेकी भाग -०२

This is the story of mother and daughter. The duo who struggle lot just to fullfill their dreams. Sanvi, Chitra and Amey, basically 3of them are main characters of this story.

भाग -०२

आयुष्य समोर जात राहिलं,प्रसंगावर प्रसंग घडत राहिले. चित्रा फक्त सान्वी साठी कायम हिमतीने जगत राहिली. रत्नपारखी कडची माणसं मुळातच बदलणारी नव्हती. त्यांचं वागणं पाहून तर वाटायचं की,ती माणसंच नव्हती कदाचित. चित्राची नौकरी बऱ्यापैकी सुरू होती आणि सान्वी ही आता दहावीची परीक्षा पास करून अकरावीच्या ऍडमिशन साठी सज्ज होती आणि घरातलं वातावरण जरी बदललेलं नसलं तरी आता सांन्वी चित्राच्या हाताशी आल्यामुळे बऱ्यापैकी चित्रा कणखर झाली होती.आता चित्राचं एकच ध्येय होतं ते म्हणजे सान्वीचं शिक्षण, त्याच्यासाठी ती दिवस रात्र एक करून काम करायला,झटायला तयार होती. आणि म्हणून दिवसभराची नोकरी आटोपल्यावर घरी येऊन, स्वयंपाक पाणी आटोपल्यावर,ती साड्यांना फॉल लावून द्यायचं काम करायची, दोन-चार का होईना पण त्याही पैशांची तिला मदतच व्हायची. आता एकाच विचारानं चित्राला झपाटलं होतं.ते म्हणजे सान्वी चं करियर, तिचं भविष्य.

सान्वी ची बारावी घरचे तमाशे आणि आईचे कष्ट इतके बघण्यात आटोपली देखील.जेमतेम मार्कांनी सान्वीन बारावीची परीक्षा पास केली.वर्ष बाद गेलं नाही इतकंच काय ते समाधान होतं.सान्वीनं बारावी जेमतेम मार्क्स नी पास करूनही चित्रा तिच्यावर ओरडली नाही, की तिला मारलं नाही.उलट तीनं शांतपणे सान्वी ला विचारलं की तुला पुढे काय करायचं आहे. सानवीचा शब्द चित्रासाठी कायम शेवटचा असायचा अगदी झोपेतून उठल्या उठल्या सान्वीनं फर्माईश करावी आणि चित्र तिची इच्छा पूर्ण करणार नाही असं कधीच होणार नाही. महागडे कपडे असो किंवा तिची कुठलीही इच्छा चित्रा पूर्ण करणारच आणि चित्रानं नाही म्हटलं तर सांन्वी लाडात येऊन ते सगळं पूर्ण करून घ्यायची.पण, सांन्वी ला आजीची माया कधीच मिळाली नाही तिच्या पदरी आले ते कायम आजीच्या मुखातले शिव्या शापच.

ती आता मोठी झाली होती तिला सगळच कळायचं कारण वयासोबतच तिच्यात शारीरिक आणि मानसिक बदलही होत होते. घरचं वातावरण तर बदलत नव्हतच पण त्यामुळे सांन्वी ची चिडचिड वाढली होती. आईसाठी स्वतःसाठी आजी समोर ठामपणे उभे राहता राहता कुठेतरी तिच्यातली निरागसता हरवत चालली होती तिच्या वागण्यातला हा बदल चित्रासाठी काळजीचा ठरत होता कारण एक आई म्हणून घरच्या डिस्टर्ब वातावरणामुळे झालेला सांन्वीतला बदल तिला स्पष्ट दिसत होता.बारावीनंतर सान्वीनं डिप्लोमा केला. पण नंतरच्या शिक्षणासाठी मुद्दामच घरच्या वातावरणापासून चित्रानं सान्वीला इंजिनिअरिंग साठी थोडं दूर ठेवायचं ठरवलं. दूर म्हणजे अगदीच दूर नाही साधारणता साडेतीन तासाच्या अंतरावर म्हणजे कसं की ती या वातावरणापासून दूर अभ्यासावर लक्ष देऊ शकेल आणि अमेयने नुकतीच फोरव्हिलर घेतली असल्याने अधेमधे घरच्याच गाडीने सांन्वी कडे जाऊन तिच्यावर लक्षही ठेवता येईल.त्यात तिची खूप कसरत होणार होती, भयंकर धावपळ तिला करावी लागणार होती,त्यात तिची नौकरी, घरातल्यांचे तमाशे आणि सान्वी सोबत कनेक्टेड राहणं.कारण मुलीची जात आणि त्यात सान्वी पहिल्यांदाच घराच्या दूर राहणार होती आणि या सगळ्यांपेक्षा चित्रा आता क्षणोक्षणी सान्वीला मिस करणार होती.कारण तिचं विश्वच फक्त सान्वी भोवती गुंतलेलं होतं. मायलेक एकमेकींच्या घट्ट मैत्रिणी होत्या.चित्राचा दिवस सान्वी पासून सुरू आणि सान्वी वरच संपायचा. अमेयनं त्रास च इतका दिला होता की या दोघींच्या फ्रेम मध्ये अमेय होता मात्र विश्व त्या दोघींचच होतं.हा सगळा भावनांचा खेळ एका बाजूला आणि चित्रासमोर खरं आव्हान होतं सान्वी च्या फी आणि डोनेशन साठी पैसे उभे करण्याचं सान्वी ला चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन पाहिजे असल्यामुळे फीज ही चांगलीच भरावी लागणार होती. चित्रांन तिचे थोडेफार दागिने गहाण ठेवले. ओळखीच्या एक दोन ठिकाणाहून कर्ज घेतलं आणि सान्वी च्या भविष्याची सोय करताना पहिली पायरी पार केली.

सान्वी ला सोडायचा दिवस एका दिवसावर येऊन ठेपला.आणि चित्राची धावपळ सुरू झाली तिच्यासाठी सोबत द्यायला तिला आवडतं ते सगळं थोडं थोडं अगदी घरी बनवून चित्रानं लेकीसाठी तयार केलं.अमेय आणि चित्रा दोघेही सांन्वी ला सोडायला आली सान्वीला सोडून परत निघनं अमेय आणि चित्रा दोघांसाठीही खूप कठीण होतं. जड अंतकरणाने दोघेही परत निघाले रोज मायलेकी सकाळ संध्याकाळ एकमेकींसोबत न चुकता बोलायच्या आज काय काय केलं ते काय खाल्लं इथपर्यंत सगळंच. पैसे हवे असल्यास सान्वी चित्राला जरा जास्तच लाडीगोडी लावायची. नुसतच चित्र नाही तर अमेय कडूनही ती वेगळे पैसे काढून घ्यायची.बापाच्या लाडाची म्हणून बापही सहज 200 मागितले की 100 तरी देऊनच टाकायचा.सान्वी ची काळजी तर होतीच.पण घरातल्या कलुषित वातावरणापासून ती दूर आहे म्हणून चित्राला समाधानही होतं.

अमेय भरपूर चांगला वागायचा पण लगेच लहर आली की क्षणापूर्वीचा त्याचा चांगुलपणा धुतला जायचा,इतकी क्रूरता दुसऱ्याच क्षणाला त्याच्या वागण्यात असायची. बाप म्हणून तो वर्ल्ड क्लास बाप असेलही पण नवरा म्हणून त्याला शब्दात मांडणं चित्रासाठी कायम अवघड होतं. सान्वी च सगळं व्यवस्थित सुरू होतं म्हणून चित्राचं चित्त शांत होतं ती कामावरही आता छान लक्ष देत होती. तिला आता दुपटीने मेहनत घ्यायची होती फक्त आणि फक्त सान्वी साठी तिच्या भवितव्यासाठी.पण आपल्याला जे हवं असतं नियती कायम वेगळच आपल्या नशिबासाठी वाढवून ठेवत असते आणि सान्वी आणि चित्राच्या बाबतीतही तेच होतं.

🎭 Series Post

View all